Government CardsGovernment LicenseGram Panchayat

ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर कसे पहायचे | Gram Panchayat Mahaegram Citizen Connect App

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही नवीन व उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर कसे पहायचे याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Gram Panchayat Mahaegram Citizen Connect app Mahiti

मित्रांनो, कोणत्याही गावाच्या विकासाचे मुख्य केंद्र म्हणजे त्या गावची ग्रामपंचायत. या ग्रामपंचायत कडून आपल्याला अनेक प्रकारचे दाखले मिळत असतात. जसे की जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी दाखले, विविध उतारे. पण हेच ग्रामपंचायत चे दाखले तुम्ही आता मोबाईल वर पाहू शकणार आहात. ते कसे पहायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर पहा

ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला Play Store ओपन करून त्यात Mahaegram असे सर्च करायचे आहे. त्या नंतर पहिलेच अँप म्हणजे Mahaegram Citizen Connect (Early Access) हे अँप इन्स्टॉल करायचे आहे. त्या नंतर ते ओपन करायचे आहे.

Gram Panchayat Dakhale Mobile Var Kase Pahayche Step 1

स्टेप 2: मित्रांनो, अँप ओपन केल्यावर तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील त्या allow करायच्या आहेत.

Gram Panchayat Dakhale Mobile Var Kase Pahayche Step 2

स्टेप 3: त्यानंतर नवीन पेज वर तुम्हाला तुमचे नवीन अकाउंट तयार करायचे आहे. त्यासाठी खाली Don’t have account? Register या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Gram Panchayat Dakhale Mobile Var Kase Pahayche Step 3

स्टेप 4: त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव (प्रथम नाव, मधले नाव, आडनाव या क्रमाने) टाकायचे आहे. त्यानंतर तुमचे लिंग म्हणजे स्त्री किंवा पुरुष सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमची जन्म तारीख टाकायची आहे.



त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व नंतर ई-मेल आयडी टाकायचा आहे. आणि नंतर जतन करा या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Gram Panchayat Dakhale Mobile Var Kase Pahayche Step 4

स्टेप 5: या नंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला दिलेल्या जागी टाकायचा आहे. व नंतर Confirm बटन वर क्लिक करायचे आहे.

Gram Panchayat Dakhale Mobile Var Kase Pahayche Step 5

स्टेप 6: या नंतर तुमचे अकाउंट सक्सेसफुली ओपन होईल. व नंतर तुम्हाला एक मेसेज येईल त्यात तुमचा युझरनेम म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड आला असेल तो दिलेल्या जागी टाकून लॉग इन करायचे आहे.

Gram Panchayat Dakhale Mobile Var Kase Pahayche Step 6

स्टेप 7: या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्या नंतर तालुका निवडायचा आहे. व नंतर तुमचे गाव किंवा जी ग्रामपंचायत असेल निवडून घ्यायचे आहे. व नंतर Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

Gram Panchayat Dakhale Mobile Var Kase Pahayche Step 7

स्टेप 8: यानंतर तुमची ग्रामपंचायत मॅप होऊन जाईल. व नवीन इंटरफेस वर तुम्हाला ‘समजले’ या ऑप्शन वर क्लिक करत जायचे आहे.

Gram Panchayat Dakhale Mobile Var Kase Pahayche Step 8

स्टेप 9: या नंतर तुम्हाला काही ऑप्शन दिसतील, जसे की दाखले, कर भरणा, वगैरे. त्यातील सर्वात पहिले दाखले / प्रमाणपत्र या वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत एकदा सगळ्यांना ‘समजले’ असे क्लीक करायचे आहे.

मित्रांनो, या ऑप्शन मध्ये तुम्ही जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, असेसमेंट उतारा असे विविध प्रकारचे दाखले काढू शकणार आहात.

Gram Panchayat Dakhale Mobile Var Kase Pahayche Step 9

ऑनलाईन जन्मचा दाखला

समजा, आपण जन्म दाखला वर क्लिक केले तर तुम्हाला इथे सांगण्यात येईल की इथे जन्म दाखले फक्त 31/12/2015 पर्यंतचेच उपलब्ध आहेत. तर त्या नंतर तुम्ही तुमचा जिल्हा, तालुका निवडून तुमची इतर माहिती भरून तुमचा जन्म दाखला काढू शकता. याच पद्धतीने तुम्ही तुमचा मृत्यू दाखला, वगैरे काढू शकता.

Gram Panchayat Janm Dakhale Mobile Var Kase Pahaycha

ऑनलाईन पाणीपट्टी किंवा घरपट्टी भरणा

तसेच मित्रांनो, जर तुम्हाला पाणीपट्टी किंवा घरपट्टी भरणा करायचा असेल तर तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करून Ok बटन वर क्लिक करायचे आहे व नंतर प्लस आयकॉन वर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत सिलेक्ट करून मग मिळकत नंबर ऍड करायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमची घरपट्टी, पाणीपट्टी पाहू शकता तसेच त्याचा भरणा करू शकणार आहात.

Gram Panchayat Online Gharpati ani Panipati kashi bharaychi

मित्रांनो, याशिवाय इथे तुम्हाला आपले सरकार सुविधा हा ऑप्शन पण देण्यात आला आहे. यात आपले सरकार मार्फत काय काय सुविधा देण्यात येणार आहेत ते बघू शकता. तसेच सूचना पेटी या ऑप्शन मध्ये तुम्हाला जर तुमच्या ग्रामपंचायत ला काही सूचना करायची किंवा द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. तुम्ही दिलेली सूचना ही ग्रामपंचायत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पोहचेल.

नोट – मित्रांनो, जर तुमची ग्रामपंचायत मध्ये नोंदणी असेल तर तुम्ही हे सर्व प्रकारचे दाखले पाहू शकता व डाउनलोड ही करू शकता. हे अँप नवीन असल्याने यात अजून ही काही सुधारणा होणे बाकी आहे.

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)

तर मित्रांनो, आपले सरकार तर्फे हे अँप लाँच करण्यात आले आहे. यात अजून काही गोष्टी अपडेट करायच्या बाकी असून काही दिवसांनी तुम्ही हे अँप वापरून तुमचे दाखले मोबाईल वर पाहू शकता. तसेच हा लेख तुम्हाला आवडला असल्यास किंवा महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

Tags: Gram Panchayat Mahaegram Citizen Connect App, Gram Panchayat Mahaegram Citizen Connect App Install, Gram Panchayat Dakhale App, Gram Panchayat Dakhale App Download, Mahaegram App Download, Online Gram Panchayat Dakhale Kase Kadhayche, Online Gram Panchayat Dakhale, Online Gram Panchayat Panipati, Online Gram Panchayat Gharpati

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!