Business Guide

गुगल मॅप वर आपल्या बिझनेसची माहिती आणि अड्रेस कसा टाकायचा ? | How to Add a Business to Google Maps

नमस्कार मित्रांनो, आज आपण गुगल मॅप (Google Map) वर आपल्या बिझनेस/व्यवसाय ची माहिती आणि पत्ता फ्री मध्ये कसा टाकायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Google Map var Business Add Kasa Karaycha

मित्रांनो, तुम्ही जेव्हा दुसऱ्या शहरात जाता आणि जर तुम्हाला तिथले शॉपिंग मॉल, हॉटेल, लॉज वगैरे शोधायचे असेल तर तुम्ही काय करता? गुगल मॅप वर सर्च करता, बरोबर.? तसच जर बाहेरून कोणी तुमच्या शहरात आलं आणि त्यांना जर हॉटेल, मेडिकल, शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल, एखादे हॉस्पिटल वगैरे शोधायचे आहे. आणि तुमचा पण जर यापैकी एखादा बिझनेस असेल आणि जर तो गुगल मॅप वर ऍड केलेला नसेल तर ती लोक कसे शोधणार? त्यामुळे तुम्हाला तुमचा बिझनेस, बिझनेस अड्रेस व लोकेशन गुगल मॅप वर ऍड करावा लागेल. तुम्ही जर आत्ता पर्यंत तुमचा बिझनेस अड्रेस गुगल मॅप वर टाकला नसेल तर, आत्ता टाकून घ्या. त्याची पूर्ण प्रोसेस म्हणजेच गुगल मॅप वर बिझनेस अड्रेस व लोकेशन कसे ऍड करायचे याबद्दल आज आपण सविस्तर पणे जाणून घेऊ या…



गुगल मॅप वर बिझनेस ऍड का करावा

सर्वात पहिले (Google Map) गुगल मॅप वर बिझनेस ऍड का करायचा या बद्दल थोडे जाणून घेऊ या

मित्रांनो, आज काल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतोच. आणि आपण सर्व जण गुगलचा वापर करत असतो. आणि या गुगल चेच एक टूल किंवा अँप म्हणजे गुगल मॅप (Google map). गुगल मॅपद्वारे आपण एखादे हॉटेल, रेस्टॉरंट, पिकनिक स्पॉट, हॉस्पिटल, मेडिकल, किराणा दुकान, अगदी जवळ पासची एखादी लाँड्रि सुद्धा शोधू शकतो. पण लोकं यागोष्टी केव्हा शोधू शकतील, जेव्हा व्यावसायिक त्यांचा व्यवसाय गुगल मॅप वर ऍड करतील. तुमचा ही एखादा व्यवसाय असेल आणि तुम्हाला पण जर तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहचवायचा असेल, तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, जास्तीत जास्त गिऱ्हाईक मिळवायचे असतील, तर गुगल मॅप सारखे दुसरे माध्यम नाही.

तसेच गुगल मॅप वर तुम्ही तुमच्या बिझनेस अड्रेस सोबतच त्याचे फोटोज व तुमच्या बिझनेसची माहिती ही टाकू शकता. याचा उपयोग तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी व लोकप्रिय होण्यासाठी नक्कीच होईल. आणि यामुळे तुमचा बिझनेस ही गुगल मॅप वर टॉप लिस्ट होण्यास मदत होते. आणि त्यामुळे जास्तीत जास्त कस्टमर तुमच्यापर्यंत पोहचतील व तुमचा इन्कम सोर्स ही वाढेल.

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की गुगल मॅप हे सर्वात जास्त वापरले जाणारे अँप आहे. असे अनेक लोक आहेत जे गुगल मॅप चा वापर दररोज करतात. म्हणूनच सांगतो की, तुमचा व्यवसाय किंवा बिझनेस वाढवण्यासाठी, व जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी तुमचा बिझनेस हा गुगल मॅप लिस्ट होणे खूप आवश्यक आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा गुगल मॅप वर बिझनेस ऍड केला म्हणजे झालं, असं नाही , तर तुम्हाला तुमच्या बिझनेस ची माहिती, फोटोज वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे.

गुगल मॅप वर दुकान / शॉप / बिझनेस कसा ऍड करायचा

गुगल मॅप वर बिझनेस अड्रेस किंवा लोकेशन कसे टाकायचे हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा….



स्टेप 1: मित्रांनो, तुमच्या मोबाईल मध्ये जर गुगल मॅप ऍप्लिकेशन नसेल तर सर्वात पहिले तुम्हाला गुगल मॅप ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 1

स्टेप 2: त्या नंतर वरती प्रोफाइल आयकॉन वर क्लिक करायचे आहे. आता तिथे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्यातले Add Your Business या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आणि जर हा ऑपशन येत नसेल तर अँप अपडेट करून घ्या.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 2

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमच्या बिझनेसचे नाव व कॅटेगरी टाकायचे आहे. व नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.

उदा. Name – Samarth Kirana Store, Category – Grocery Store (नाव टाकताना इंग्लिश टाकावे)

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 3

स्टेप 4: त्या नंतर तुम्हाला access level मध्ये तुम्हाला management आहे की ownership आहे ते सिलेक्ट करायचे आहे. नंतर Relationship मध्ये तुम्ही त्या बिझनेस मध्ये काय पद आहे (म्हणजे owner, employee, agency) ते टाकायचे आहे. तुम्ही स्वतः चा बिझनेस रजिस्टर करत असाल तर owner टाकून तुमची माहिती टाकायची आहे.

नंतर खाली Your Contact Name मध्ये तुमचे नाव टाकायचे आहे. व शेवटी फोन नंबर टाकायचा आहे व नंतर आलेल्या पेज वर तुम्हाला बिझनेस रेजिस्टर केल्याची डेट म्हणजेच तारीख दिसेल व नंतर Done ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 4

स्टेप 5: नेक्स्ट पर्ज तुम्हाला Manage Now या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 5

स्टेप 6: आता नेक्स्ट पेज वर Type your business name मध्ये तुमचा बिझनेसचे नाव टाकून सर्च करायचे आहे कि तो आधीच गुगल मॅप वर ऍड केलेला आहे का ते, आणि जर बिझनेस सापडला नाही तर Can’t find your business? वर क्लिक करा.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 6

स्टेप 7: या नंतर तुम्हाला कस्टमर विझिट करण्यासाठी बिझनेस लोकेशन ऍड करायचे आहे का? असे विचारले जाईल. म्हणजे तुम्हाला कस्टमर तुमच्या शॉप/व्यवसाय ठिकाणी येऊन खरेदी/विक्री करू इच्छित आहेत का. तर तुम्ही इथे Yes ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. व नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 7

स्टेप 8: नेक्स्ट ओएज वर आता तुम्हाला तुमच्या बिझनेसचा पत्ता टाकायचा आहे. त्यात तुम्हाला कंट्री/देश नेम, स्टेट/राज्य नेम, सिटी/शहर, पिनकोड वगैरे टाकून Next ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 8

स्टेप 9: मित्रांनो, आता तुम्हाला तुमचे लोकेशन विचारले जाईल. तर तुमचे लोकेअहन सेट करून घ्यायचे आहे. म्हणजे तुमचा बिझनेस मॅप वर कुठे आहे तो लाल पॉइंटरनी दाखवायचा आहे. आणि लक्षात ठेवा हि जागा तुमचा बिझनेस म्हणून रजिस्टर होणार आहे, त्यामुळे मॅप वर झूम करून जेथे बिझनेस आहे तिथे लाल पॉइंटर घेऊन जा.

आणि जर तुम्हाला तुमचा बिझनेस मॅप शोधताना अडचण येत असेल तर, ज्या ठिकाणी बिझनेस आहे तिथे जाऊन मोबाइलची लोकशन चालू करा आणि मॅप वर असेलेल्या गोल आणि टिम्ब चिन्हावर क्लिक करा. तुम्ही जिथे उभे आहात तिथे लाल पॉइंटर येईल नंतर झूम करून अचूक ठिकाणी लाल पॉइंटर घेऊन जा. व Next बटन वर क्लिक करायचे आहे.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 9

स्टेप 10: आता तुम्हाला तुमच्या बिझनेसचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. तसेच जर तुमची वेबसाईट असेल तर ती देखील टाकायची आहे. आणि जर वेबसाईट नसेल तर i don’t have any website या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.

व परत एकदा Next बटन वर क्लिक करायचे आहे.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 10

स्टेप 11: या नंतर तुमचा बिझनेस किंवा शॉप कधी कधी ओपन/उघडा असतो व किती वाजता ओपन होते, किती वाजता क्लोज/ बंद होते ते टाकायचे आहे. व Next बटन वर क्लिक करायचे आहे.

उदा. Monday/सोमवार Open at 9.00 ते Close at 10.00

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 11

स्टेप 12: त्या नंतर तुम्हाला जर कस्टमरला मेसेज करण्याची परवानगी द्यायची असेल तर Accept Messages या ऑप्शन वर टिक करून नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 12

स्टेप 13: मित्रांनो, नेक्स्ट पेज Add Business Description ऑप्शन मध्ये तुमच्या बिझनेस विषयी थोडी माहिती लिहायची आहे. या मध्ये तुमच्या व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे तुमची खासियत काय आहे तुमची कोणते प्रॉडक्ट/सर्विसेस विकता इत्यादी माहिती टाकायची आहे व नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 13

स्टेप 14: मित्रांनो, आता तुम्हाला Add Photos ऑप्शन वर क्लिक करून तुमच्या शॉपचे किंवा बिझनेसचे काही फोटोज अपलोड करायचे आहे. इथे तुम्ही डायरेक्ट कॅमेरा मधून ही फोटोझ घेऊ शकता. फोटो निवडताना ते क्लिअर असावेत आणि तुमच्या बिझनेसच्या संभंदीत असावेत.

Google Map var Business Add Kasa Karaycha Step 14

अशा प्रकारे आज आपण गुगल मॅप वर तुमचा बिझनेस करा रजिस्टर/ऍड करायचा ते बघितले. तुम्ही वरती टाकलेली माहिती गुगल तापसली जाईल आणि 7 ते 15 दिवसात तुमचा बिझनेस मॅप वर दिसू लागेल. तसेच ही सर्व प्रोसेस झाल्यावर तुम्हाला तुमच्या प्रोफाइल मध्ये Your Business Profile हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या बिझनेस चे नाव आलेले दिसेल.

तुमच्या बिझनेसच्या नावावर क्लीक केल्यावर तुम्हाला पूर्ण बिझनेस प्रोफाइल बघायला मिळेल. इथे तुम्ही कोण कोणते फोटो अपलोड केलेत ते ही दिसेल. व गुगल मॅप वर तुमचे बिझनेस लोकेशन live होईल. तुम्ही ते परत edit पण करू शकता. तसेच तुम्ही तुमचा बिझनेस अड्रेस ही परत एडिट करू शकता. त्यासाठी edit profile वर क्लिक करून तुम्ही तुमच्या बिझनेस ची इंफॉरमेशन, टाइम, फोटोज, वगैरे अपडेट करू शकता.

गुगल मॅप वर बिझनेस अड्रेस ऍड करण्याचे फायदे

  • मित्रांनो, गुगल मॅप वर बिझनेस ऍड करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक ग्राहकांपर्यंत पोहचू शकता.
  • तसेच ग्राहकांना तुमच्याशी थेट संपर्क करता येतो.
  • जास्तीत जास्त ग्राहक मिळाल्याने तुमचा फायदा होतो व आर्थिक उत्पन्नात ही वाढ होते.
  • तसेच तुम्ही व्यवसायिकांपेक्षा पुढे रहाल. त्यामुळे मार्केटमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण होईल.
  • त्याचप्रमाणे तुम्हाला इतरही काही नवीन व्यवसाय कल्पना मिळू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण गुगल मॅप वर बिझनेसची माहिती व अड्रेस कसा टाकायचा याबद्दल माहिती जाणून घेतली. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

FAQ

गुगल मॅप वर बिझनेस ऍड करण्यासाठी किती चार्जेस लागतात?

मित्रांनो, गुगल मॅप वर बिझनेस ऍड करणे मोफत आहे. त्यासाठी गुगल तुमच्या कडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही.

गुगल मॅपवर तुमचा व्यवसाय लिस्टिंग व्हायला किती दिवस लागतात?

मित्रांनो, गुगल मॅप वर तुमचा व्यवसाय लिस्टिंग होण्यासाठी एक ते दोन आठवडे लागू शकतात.

गुगल मॅप वर बिझनेस फोटो सोबत विडिओ पण टाकू शकतो का?

हो. मित्रांनो, गुगल मॅप वर बिझनेस प्रोफाइल तयार करताना तुम्ही तुमच्या बिझनेस फोटो सोबतच विडिओ सुद्धा टाकू शकता.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!