गोल्ड लोन नियम, कागदपत्रे, प्रक्रिया आणि बँकांचे व्याजदर माहिती | Gold Loan Information in Marathi
रोजच्या आयुष्यात काही वेळा आपल्याला आर्थिक अडचणी येतात. सर्वसाधारण मनुष्य अशा वेळांसाठी बचत, गुंतवणूक करतच असतो. पण काही अडचणी अचानक समोर येवून उभ्या राहतात, जसे मेडिकल इमर्जन्सी. तर काही वेळेस आपली तयारी कमी पडते, जसे घर घेणे, मुलांच्या शाळा- महाविद्यालयात प्रवेशाचा प्रश्न असो किंवा इतर काही. अशा अचानक उद्भवणाऱ्या खर्चांसाठी तुम्ही काय कराल? कारण थोड्या पैशांसाठी आपल्या स्वप्नातील घर सोडून देणे किंवा मुलांना आवडत्या कोर्स, कॉलेजमध्ये प्रवेश न मिळणे आपण कदापि मान्य करणार नाही. बरोबर आहे, एखाद्याकडे उसने मागाल किंवा वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन घ्याल. पण यात काही अडचणी येवू शकतात. मग यावर उपाय काय? तर गोल्ड लोन म्हणजे सोने तारण ठेवून घेतलेलं कर्ज.
तर वाचकहो, आपण या लेखात गोल्ड लोन, त्यासाठीचे नियम, लागणारी कागदपत्रे, प्रक्रिया आणि वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर यबद्दलची माहिती घेणार आहोत.
Gold Loan Information in Marathi
गोल्डलोन म्हणजे काय आणि ते कसे उपयुक्त आहे?
जर बचत कमी पडत असेल तर सामान्य भारतीय माणूस वळतो गोल्ड लोनकडे. आपल्या भारतीयांचे सुवर्णप्रेम जगजाहीर आहे. सोने खरेदी करण्यात भारत हा जगात सर्वात अग्रस्थानी आहे. भारतातील प्रत्येक घरात किमान चार पाच तोळे सोने तर जरूर असतं. सोने खरेदी ही फक्त आपली हौस नाही तर एक इंवेस्टमेंट म्हणून ही आपण करतो. मुलींच्या विवाहाच्या वेळी स्त्रीधन म्हणून शक्यतो सोनेच दिले जाते कारण अडीअडचणीच्या वेळी हेच सोनं गहाण ठेवून आपण कर्ज घेवू शकतो.
इतर प्रकारचे कर्ज जसे शिक्षणकर्ज, गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोनसाठी आपल्याला अनेक प्रकारच्या कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. जसे शैक्षणिक कर्जासाठी जिथे शिक्षण घेणार त्या संस्थेचे प्रमाणपत्र वगैरे लागतं आणि जेवढं त्या कोर्सचे शुल्क असेल तेवढं कर्ज मंजूर होते. बाकीचे कर्ज जसे पर्सनल लोनसाठी तुमचा सिबिल स्कोर तपासला जातो, इन्कम प्रुफची गरज असते, सगळ्या फॉर्मालिटीज किंवा प्रक्रिया पार पाडण्यात बराच जास्त वेळ जातो, त्यासाठी कित्येक अटी आणि नियम असतात. पण गोल्डलोन मात्र याला अपवाद आहे. अट फक्त एकच तुमच्याकडे सोने हवे.
गोल्ड लोनसाठी लागणारी कागदपत्रे कोणती?
Gold Loan Required Documents
इतर प्रकारच्या कर्जासाठी भारंभार कागदपत्रांची पूर्तता आपल्याला करावी लागते. परंतु गोल्ड लोनसाठी कमीत कमी कागदपत्र लागतात. आयडेंटिटी प्रूफसाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी तर ॲड्रेस प्रूफ म्हणून पॅन कार्ड सोडून वरील सर्व कागदपत्रे सादर केली तरी चालतात.
या व्यतिरिक्त तुमचे ज्या बँकेकडून कर्ज हवे आहे तिथे बचत खाते असणे गरजेचे आहे.
सुवर्ण तारण कर्ज मिळण्याची प्रक्रिया काय आहे?
Gold Loan Complete Process Information
गोल्ड लोन मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही बँकेकडे जाता तेव्हा तिथे तुमच्या सोन्याची शुद्धता तपासली जाते आणि त्याचे मूल्य निर्धारित केले जाते. हे काम त्या बँकेने नियुक्त केलेल्या व्हॅल्युअर असलेल्या सराफाकडून केले जाते. यामध्ये आधी सोन्याचे वजन केले जाते (ग्रॉस वेट). मग तो सराफ तुमच्या दागिन्यांची काळजीपूर्वक चाचणी करुन त्यातील शुध्द सोने किती आहे ते सांगतो. दागिन्यांच्या वजनातून त्यात असलेले खडे, लाख वगैरेंचे वजन वजा करून फक्त सोन्याचे वजन काढले जाते. हे झाले नेट वेट. हे साधारण मूळ वजनाच्या ३० ते ४०% कमी होते. याच वजनावर आपल्याला कर्ज दिले जाते.
बावीस कॅरेटपर्यंतच्या सोन्यावर कर्ज घेतले जाऊ शकते. त्यापेक्षा कमी कॅरेटवरही मिळू शकेल पण त्या सोन्याची शुद्धता कमी असल्याने ते तितके फायदेशीर नाही. हॉलमार्क असलेल्या सोन्यावर नेहमीपेक्षा थोडा जास्त पैसा मिळते, साधारण प्रति ग्रॅम शंभर रुपये जास्त. पोकळ दागिने जसे कडे, पोकळ बांगडी यावर कर्ज मिळत नाही कारण त्याचे नेट वेट काढणे, शुद्धता तपासणे अवघड असते. प्रत्येक बँकेकडे प्रति ग्रॅमवर किती कर्ज द्यावे याचे एक कोष्टक असते. ती सोन्याच्या किमतीवर आधारित असते. समजा आजचा सोन्याचा दर ४६००० रुपये प्रति दहा ग्रॅम असेल तर आपल्याला प्रति ग्रॅम ३०००-३२०० रुपये मिळू शकतात. बाकीची रक्कम त्या बँकेचे मार्जीन असते. लक्षात ठेवा, शुध्द सोन्याचे वजन यात लक्षात घेतले जाते (नेट वेट).
ही सर्व प्रक्रिया पार पाडताना व्हॅल्यूअरचे मानधन जे साधारण पाचशे रुपयांपर्यंत असते आणि बँकेची मामुली प्रोसेसिंग फी आकारली जाते. कर्ज मंजूर झाल्यावर ती रक्कम तुमच्या बचत खात्यावर जमा केली जाते. आधी सांगितल्याप्रमाणे त्याच बँकेत कर्जदाराचे बचत खाते असणे आवश्यक आहे.
हे वाचा – कॅरेट ( Karat ) म्हणजे काय? | 24 कॅरेट गोल्ड म्हणजे काय? | कॅरेटचे प्रकार – 24K, 22K, 18K आणि 14K
गोल्ड लोनचे व्याजदर
All banks Gold Loan rate of interest in Marathi
निरनिराळ्या बँकांचे व्याजदर निरनिराळे असू शकतात. खाली प्रमुख बँकांचे व्याजदर दिलेले आहेत. हे व्याजदर कंज्मशन किंवा नॉन प्रायोरिटी लोन्स म्हणजे वैयक्तिक कारणासाठी घेतलेल्या जाणाऱ्या कर्जांसाठी आहेत याची नोंद घ्यावी.
- बँक ऑफ बडोदा – 9% द.सा.द.शे
- बँक ऑफ इंडिया – 8.40% 12 महिन्यांसाठी आणि त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी – 8.90%
- बँक ऑफ महाराष्ट्र – 7%
- कॅनरा बँक – 7-35%
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 9.05%
- इंडियन ओवरसिस बँक – 8%
- पंजाब अँड सिंध बँक – 10 लाखापर्यंत 7% त्यावरील रक्कमेसाठी – 7.50%
- पंजाब नॅशनल बँक – 7.25%
- स्टेट बँक ऑफ इंडिया – 7.30%
- युको बँक – 7-7.50%
- युनियन बँक ऑफ इंडिया – 8.25%
नोट – हि माहिती काळानुसार बदलू शकते, एकदा बँकेत जाऊन खात्री करून घ्या. आम्ही कोणतेही कर्ज देत नाही. या वेबसाइट वर फक्त शैक्षणिक हेतूने, गोल्ड लोनची माहिती देण्यात आली आहे.
Tags – Gold Loan 2022 complete process purpose, eligibility criteria, documents required, interest rate, security, margin and applicable charges