घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? | Gharkul Yojana Online Apply | PM Awas Yojana Survey App Online Form
नमस्कार मित्रांनो, आज आपण घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, महाराष्ट्रातील गरीब, बेघर, व कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःचे असे एक पक्के घर मिळवून देण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. आणि त्यासाठीच प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत यावर्षी सरकार द्वारे लाखो घरांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
मित्रांनो, सरकारची ही योजना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण योजना असणार आहे, कारण या योजने द्वारे महाराष्ट्रातील लाखो बेघर आणि गरीब गरजू कुटुंबांना त्यांचे स्वतःचे घर मिळणार आहे व त्यांचे ही चांगल्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मित्रांनो, महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी महाराष्ट्रातील खेड्या गावांमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला ही जर अजून राहण्यासाठी पक्के घर नसेल किंवा जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल मधून प्रधानमंत्री घरकुल आवास योजना महाराष्ट्र साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. व यासाठी अजून 15 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. या अनुषंगानेच घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची माहिती सर्वांना मिळावी म्हणून आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

घरकुल योजना अर्ज भरण्यासाठी आवश्यक मोबाईल अँप
मित्रांनो, घरकुल योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी आता एक सोपा मार्ग उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त भारत सरकार मान्य ‘आवास प्लस 2024’ (AwaasPlus 2024) नावाचा ॲप तुमच्या मोबाईल च्या प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घ्यायचा आहे व त्या द्वारे अर्ज भरायचा आहे. याशिवाय, ‘आधार फेस आरडी’ हे दुसरे एक महत्त्वाचे ॲप देखील आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचा ओळखपत्र अर्जासोबत सहज जोडता येईल.
घरकुल योजना फॉर्म भरण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
स्टेप 1:- तर मित्रांनो, घरकुल योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी, मोबाईल च्या प्ले स्टोअर मधून AwaasPlus 2024 हे App (ऍप) डाउनलोड करून घ्यायचे आहे. आणि त्या सोबतच Aadhar face RD हे App फक्त इन्स्टॉल करून घ्यायच आहे ते ओपन करायचे नाही.

स्टेप 2:- आता आवास प्लस ऍप ओपन केल्या नंतर तुम्हाला मराठी भाषा सिलेक्ट करायची आहे व Get started या बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3:- त्या नंतर तुम्हाला लॉगिन मध्ये लॉगिन चा प्रकार निवडायचा आहे. त्यात दुसरा ऑप्शन म्हणजे ‘नागरिक / लाभार्थी वापरकर्ता म्हणून लॉगिन करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मित्रांनो, क्लिक केल्या नंतर तुम्हाला काही परमिशन विचारल्या जातील त्यांना allow करायचे आहे.

स्टेप 4:- त्यानंतर दिलेल्या जागी तुम्हाला कुटुंब प्रमुखाचा किंवा ज्या लाभार्थ्याचा अर्ज भरायचा आहे त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व नंतर ‘पडताळणी करा’ या बटन वर क्लिक करायचं आहे. व विचारलेल्या परमिशन्स द्यायच्या आहेत.

स्टेप 5:- त्या नंतर तुम्हाला face Authentication करायचं आहे म्हणजेच व्यक्तीचा लाइव्ह फोटो घ्यायचा आहे. त्यासाठी ऍक्सेप्ट बटन वर क्लिक करून proceed करायचं आहे.

आता फोटो घेताना दिलेल्या सर्कल मध्ये व्यक्तीचा चेहरा दिसला पाहिजे व नंतर डोळे मिचकवायचे आहेत.

अशा प्रकारे तुमची केवायसी पूर्ण होऊन जाईल. व त्यात तुमचे म्हणजे व्यक्तीचे नाव, जन्म तारीख, वगैरे माहिती दाखवली जाईल. त्या नंतर ‘ठीक आहे’ बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 6:- मित्रांनो, या नंतर तुम्हाला एक चार अंकी पिन तयार करायचा आहे. तो पिन पुन्हा खाली टाकून नंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 7:- त्या नंतर पुढे तुम्हाला पत्ता टाकायचा आहे, त्यासाठी Maharashtra सिलेक्ट करून त्यानंतर तुमचा जिल्हा, Block म्हणजे तुमचा तालुका, तुमची ग्रामपंचायत आणि गावाचं नाव टाकून मग ‘सुरू करा’ या बटण वर क्लिक करायचे आहे. व नंतर Go to next करायचं आहे.

स्टेप 8:- या नंतर तुम्हाला बएक नवीन पेज दिसेल तिथे तुम्हाला ‘स्वतःचे घर मिळवण्यासाठी स्व सर्वेक्षण करा’, असा ऑप्शन दिसेल या ऑप्शन वरील ‘सुरू करा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 9:- मित्रांनो, आता तुम्हाला पुढे काही स्टेप्स दिल्या जातील त्यात तुमची म्हणजेच लाभार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल, यामध्ये पहिले पत्ता आधीच भरलेला आहे. त्या नंतर

- वैयक्तिक माहिती:- या मध्ये, सर्वात पहिले कुटुंब प्रमुखाचे नाव, त्याचा आधार कार्ड नंबर, जॉब कार्डचा नंबर ( जॉब कार्ड नसेल तर ग्रामपंचायत मधून काढून घ्यावे.), त्या नंतर gender, वय सिलेक्ट करून Social Category सिलेक्ट करायची आहे. त्या नंतर तुमचं वैवाहिक स्थिती टाकून मग वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे व नंतर Mobile Number टाकायचा आहे.
हे हि वाचा => जॉब कार्ड: कसे काढावे, डाउनलोड, कागदपत्रे
त्या नंतर तुमचं शिक्षण व व्यवसाय टाकायचा आहे. त्या नंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील सदस्यांची संख्या टाकायची आहे. त्या नंतर pwd मध्ये कोणी अपंग असेल तर त्याची माहिती तसेच कुटुंबात कोणी गंभीर आजारी सदस्य आहेत का? त्याची माहिती टाकायची आहे. त्या नंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे ते टाकायचं आहे व ‘जतन करा व पुढे जा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- कुटुंबातील सदस्य जोडा:- मित्रांनो, यात तुम्हाला कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती टाकायची आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबात जेवढे सदस्य असतील तेवढया जणांची माहिती इथे टाकायची आहे. त्यात त्यांची नावं, आधार कार्ड नंबर, जेंडर, तुमचं त्यांच्याशी नातं काय आहे, वय, वैवाहिक स्थिती, मोबाईल नंबर, शिक्षण, व्यवसाय वगैरे माहिती टाकायची आहे. व खाली दिलेल्या ‘सदस्य जोडा’ या बटन वर क्लिक करायचं आहे.
- बँक खात्याचा तपशील:- मित्रांनो, यात तुमच्या बँक खात्याची माहिती द्यायची आहे. पण जर तुमचं बँक खाते नसेल तर अश्या वेळी तुम्ही हे तपशील नंतर देखील देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ‘माझ्याकडे सध्या बँकेचे खाते तपशील नाहीत. मी ते नंतर अपडेट करेन’ असा पर्याय दिला आहे. त्यावर टिक करायचं आहे.

तर मित्रांनो, तुमच्या कडे बँक खाते असल्यास सर्वात पहिले तुम्हाला बँकेचा/पोस्ट ऑफिस प्रकार निवडायचा आहे, त्या नंतर बँक / पोस्ट ऑफिस चे नाव निवडायचं आहे, त्या नंतर बँकेचा शाखेचे नाव IFSC कोड सह निवडायचं आहे, त्या नंतर बँकेचा खाता क्रमांक, टाकायचा आहे व बँक खाते क्रमांक पुष्टी करा मध्ये पुन्हा एकदा तुमच्या बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे. व शेवटी बँक खात्यावर तुमचं जे नाव असेल ते पूर्ण टाकायचं आहे व शेवटी ‘जतन करा व पुढे जा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- गृहनिर्माण संबंधित प्रश्न:- मित्रांनो, या मध्ये ‘सर्वेक्षण केलेल्या घराची मालकी’ या ऑप्शन मध्ये घर स्वतःच आहे की भाड्याचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्या नंतर ‘भिंतीसाठी प्रमुख सामग्री’ या ऑप्शन मध्ये घराच्या भिंती पक्क्या आहेत की कच्च्या ते सिलेक्ट करायचं आहे. त्या नंतर ‘छतासाठी प्रमुख सामग्री’ या ऑप्शन मध्ये घराचे छत पक्के आहे की कच्चे ते सिलेक्ट करायचं आहे. तसेच खोल्यांची संख्या, शौचालय सुविधा आहे की नाही ते सिलेक्ट करायचं आहे. त्या नंतर घरगुती उत्पन्नाचा स्रोत काय आहे ते सिलेक्ट करायच आहे। त्या नंतर खाली विचारलेल्या सर्व प्रश्नांची हो किंवा नाही या मध्ये उत्तर द्यायची आहेत. त्या नंतर ‘जतन करा व पुढे जा’ पर्यायावर क्लिक करायचं आहे.

- जुन्या घराच्या प्रतिमा अपलोड करा:- या मध्ये तुम्हाला तुमच्या जुन्या घराचे काही फोटो अपलोड करायचे आहेत. यात तुमच्या घराचा फोटो, घरामधील फोटो आणि घरासमोर तुम्ही उभे आहात त्याचा फोटो सबमिट करावा लागेल. तसेच ज्यांनी जागा आहे सिलेक्ट केले होते त्यांनी रिकाम्या जागेचे फोटो अपलोड करायचे आहेत. आहेत टिपण्णी मध्ये no असे टाकायचे आहे. व नंतर go to next बटन वर क्लिक करायचे आहे.
- लाभार्थी प्राधान्य निवडा:- या मध्ये तुम्हाला ‘लाभार्थी गवंडी प्रशिक्षणात नावनोंदणी करु इच्छित आहे का?’ असे विचारले जाईल. तर इथे तुम्ही हो किंवा नाही सिलेक्ट करायचे आहे. तसेच खाली तुम्हाला ‘पसंतीचा घराचा प्रकार’ या मध्ये तुम्हाला घराचे काही प्लॅन दाखवले जातील त्यापैकी तुम्हाला आवडेल तो प्लॅन सिलेक्ट करायचा आहे व शेवटी ‘जतन करा व पुढे जा’ पर्यायावर क्लिक करायचं आहे.

मित्रांनो, वरील सर्व माहिती भरल्या नंतर तुम्हाला “लाभार्थी प्राधान्यांचे तपशील यशस्वी रित्या जतन केले गेले” असा मेसेज येईल व त्या नंतर खाली go to next बटन वर क्लिक करायचं आहे.
- सर्वेक्षण तपशीलांचे पूर्वावलोकन करा आणि जमा करा:- या मध्ये तुम्हाला उजव्या बाजूला पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिसेल. तेथून पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे. तसेच खाली दिलेली सर्व माहिती बरोबर आहे का नाही ते एकदा चेक करून घ्यायच आहे. सर्व माहिती बरोबर असेल तर ‘पुढे जा’ ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
त्या नंतर “सर्वेक्षण पूर्ण झाले कृपया अपलोड करा” असा मेसेज येईल. म्हणजे तुमचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून आता ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि त्यासाठी go to next बटन वर क्लिक करायचं आहे व ही माहिती अपलोड करण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यासाठी खाली दिलेल्या ‘ आधार सत्यापित करा’ वर क्लिक करायचे आहे. तसेच ‘जॉब कार्ड सत्यापित करा’ वर क्लिक करायचं आहे. दोन्ही गोष्टी व्हेरिफाय होऊन जातील.
मित्रांनो, जर इथे काही एरर येत असेल तर थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करायचा आहे. त्या नंतर वरती बॉक्स मध्ये टिक करून खाली दिलेल्या ‘सर्वेक्षण अपलोड करा’ पर्यायावर क्लिक करायचं आहे.
तर मित्रांनो, अश्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या घरकुल योजनेत तुमचं नाव लावू शकता तसेच ऑनलाईन पद्धतीने तुमचा सर्वे / फॉर्म पूर्ण करू शकता. मित्रांनो, यात्रा पर्यंत तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर अजून 15 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे, लवकरात लवकर ऑनलाईन पध्दतीने मोबाईल द्वारे घर बसल्या फॉर्म भरून घ्या.
मित्रांनो, तुम्हाला जर मोबाईल वरून फॉर्म भरताना अडचणी येत असतील तर अशावेळी तुम्ही ग्रामपंचायतीतील सरपंच किंवा ग्रामसेवकांकडे जाऊन त्यांची मदत घ्या. ते तुम्हाला फॉर्म भरून देण्यात मदत करतील.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.
FAQ
घरकूल योजनेसाठी मोबाईल मधून फॉर्म भरता येतो का?
हो मित्रांनो, तुम्ही मोबाईल मधून AwaasPlus App द्वारे फॉर्म भरु शकता.
घरकुल बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना मार्फत किती पैसे मिळतात?
साधारणतः 1.20 लाख पासून 2.10 लाख मिळतात.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजना फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती?
घरकुल योजना साठी लाभार्थ्याच्या पात्रतेनुसार दरवर्षी फार्म भरले जातात. म्हणून या योजनेसाठी किती प्रकारची शेवटची तारीख नसते. फक्त ज्या वर्षी एखादा लाभार्थी फॉर्म भरत असेल तर त्याला फॉर्म भरण्यासाठी विहित कालावधी दिला जातो.
घरकुल योजनेसाठी कोण पात्र आहे?
मित्रांनो, महाराष्ट्रात घरकुल योजनेसाठी पात्र होण्यासाठी, अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा कमी उत्पन्न गटातील महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे. तसेच भारतात कुठेही पक्के घर नसावे.
Tags: pm awas yojana mahiti, pm awas yojana arj, gharkul yojana online apply maharashtra 2025, gharkul survey online form, pm awas yojana online form apply, gharkul yojana gramin in maharashtra online apply, gharkul form kaise bhare, gharkul yojana self surve kasa karava, gharkul yojana online form maharashtra, gharkul survey 2025, pm awas yojana maharashtra online apply, pm awas yojana online form kaise bhare, awas yojana survey online, awas plus survey online form, gharkul yojana document, awas yojana maharashtra