Shop

गॅस स्टोव्ह बद्दलची सर्व माहिती आणि सर्वात चांगले गॅस स्टोव्ह | Best Gas Stove 2022

नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय गृहपयोगी वस्तू बद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण गॅस स्टोव्ह/शेगडी बद्दल सर्व माहिती तसेच भारतातील चांगले गॅस स्टोव्ह कोणते आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Gas Stove information in Marathi

मित्रांनो, प्रत्येक घरात स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण म्हणजे गॅस स्टोव्ह. गॅस स्टोव्ह वापरणे हे खूप फायदेशीर आणि सुरक्षित असे उपकरण आहे. गॅस स्टोव्ह घेताना फक्त त्याची डिझाइन पाहणे महत्वाचे नसते तर त्याची कार्यक्षमता बघणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी गॅस स्टोव्ह होते पण ते एका बर्नर चे किंवा दोन बर्नरचे असायचे. आता गॅस स्टोव्ह मध्ये प्रचंड बदल झालेले आहेत. आता एका गॅस स्टोव्ह मध्ये तुम्हाला तीन किंवा चार बर्नर सुद्धा मिळतात. मार्केट मध्ये पण 2, 3, 4 बर्नर असलेले अनेक कंपनी चे मॉडेल्स आहेत. पण त्यापैकी कोणता चांगला असेल हे आपल्याला माहीत नसते. त्यातून योग्य गॅस स्टोव्ह निवडणे खूपच कठीण काम आहे.



पण मित्रांनो, तुम्ही गॅस स्टोव्ह निवडताना त्यात काही गोष्टी चेक करून घेतल्या पाहिजे. तसेच कुठलाही गॅस स्टोव्ह खरेदी करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याकोणत्या गोष्टी आहेत ते पाहू या.

सर्वात चांगले गॅस स्टोव्ह

ब्लॉहॉट हेवी गॅस स्टोव्ह (Blowhot)Amazon वर बघा
सनफ्लेम प्राईड गॅस स्टोव्ह (Sunflame)Amazon वर बघा
ब्लॉहॉट हेवी गॅस स्टोव्ह (Blowhot)Amazon वर बघा
पिजन अस्तर गॅस स्टोव्ह (Pigeon Aster)Amazon वर बघा
प्रीती ब्लु फ्लेम गॅस स्टोव्ह (Preethi Blu Flame)Amazon वर बघा

गॅस स्टोव्ह खरेदी करताना विचारात घेण्यासारखे काही मुद्दे

  • मित्रांनो, गॅस स्टोव्ह घेण्याआधी तुम्हाला किती बर्नर असलेला व किती आकाराचा गॅस स्टोव्ह पाहिजे आहे हे ठरवणे महत्वाचे आहे. बाजारात 2, 3, 4 बर्नर असलेले गॅस स्टोव्ह उपलब्ध आहेत. तसेच बऱ्याच आकारात पण गॅस स्टोव्ह उपलब्ध आहेत. पण तुमच्या स्वयंपाक घरात गॅस स्टोव्ह ठेवण्यासाठी उपलब्ध जागा किती आहे ते बघून मगच गॅस स्टोव्ह खरेदी करा.
  • याशिवाय गॅस स्टोव्ह घेण्याआधी तुम्हाला कोणत्या मटेरियलचा व कोणत्या रंगाचा गॅस स्टोव्ह घ्यायचा आहे ते ठरवा. तस पहायला गेले तर गॅस स्टोव्ह मध्ये मटेरियलच्या अनेक व्हारायटीझ आहेत जसे की , स्टेनलेस स्टील, टॉप टफन ग्लास, फ्रेम ब्लॅक आणि टॉप ग्लास इत्यादी. यापैकी कोणताही एक मटेरियल चे गॅस स्टोव्ह तुम्ही घेऊ शकता.
  • गॅस स्टोव्ह खरेदी करताना बर्नर कसा हवा ते बघणे ही महत्वाचे असते. नवीन तंत्रज्ञान मुळे गॅस बर्नर चे ही खूप प्रकार आहेत. जसे की पितळी बर्नर, अल्युमिनियम बर्नर, ब्रास चे बर्नर इत्यादी. यापैकी ब्रास चे बर्नर उत्तम व टिकाऊ असतात.
  • गॅस स्टोव्ह घेताना त्यात इग्निशनचा कोणता प्रकार आहे हे बघणे चांगले. कारण काही गॅस स्टोव्ह बटन वर चालू बंद होतात. तर काही गॅस स्टोव्ह मध्ये ऑटोमॅटिक इग्निशन असते. त्यामुळे तुम्हाला जे माचीस व लायटर पासून सुटका हवी असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक इग्निशन गॅस स्टोव्ह चा विचार करू शकता.
  • अजून एक महत्त्वाचे म्हणजे गॅस स्टोव्ह घेताना त्यात बर्नरच्या भोवती ड्रीप ट्रे आहे की नाही ते चेक करा. कारण अन्न सांडल्यावर ते ड्रीप ट्रे मध्ये कलेक्ट होईल व खाली घाण होणार नाही. तसेच गॅस स्टोव्ह मध्ये पॅन सपोर्ट चांगला व मजबूत असणे ही खूप आवश्यक आहे.
  • तुम्ही घेतलेले प्रोडक्ट किंवा गॅस स्टोव्ह ISI प्रमाणित आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या. सुरक्षेच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचे आहे.
  • तसेच गॅस स्टोव्ह मध्ये पाइपलाइनची सुविधा कशी आहे ते ही तपासून घ्या.
  • गॅस स्टोव्ह घेताना दोन बर्नर मधील अंतर जास्त असायला हवे. जर जास्त अंतर नसेल तर आपण दोन मोठी भांडी बर्नर वर ठेवू शकत नाही. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ही दोन बर्नर मध्ये अंतर असणे महत्त्वाचे आहे.
  • तसेच गॅस स्टोव्ह मधील नॉब्स योग्य आहेत का ते ही तपासून बघणे महत्वाचे आहे.

भारतातील सर्वात चांगले गॅस स्टोव्ह

Prestige Magic Glass Top 2 Burner Gas Stove

प्रेस्टीज मॅजिक गॅस स्टोव्ह (Prestige Magic Gas Stove)

Prestige Magic Glass Top 2 Burner Gas Stove

मित्रांनो, प्रेस्टीज चा हा गॅस स्टोव्ह दोन, तीन, चार बर्नर मध्ये पण येतो. या प्रोडक्ट बद्दल बोलायचे झाले तर हा गॅस स्टोव्ह खूप चांगला आहे. या गॅस स्टोव्ह ची बिल्ड क्वालिटी तसेच याचे रिझल्ट्स पण चांगले आहेत. यात फक्त जर तुम्ही कंपनी च्या इंस्ट्रक्शन्स फॉलो केल्यातर हा बर्नर खूप टिकाऊ आहे. आणि उत्तम काम करतो. या गॅस स्टोव्ह ची डिझाइन तसेच याचे सरफेस खूप चांगले आहे. तसेच साफ करायला पण खूप सोपे आहे. या गॅस स्टोव्ह ची डिझाइन ही स्पिल प्रूफ आहे. तसेच याचे ड्रीप ट्रे जे स्टेनलेस स्टील चे बनलेले आहे, ते पण साफ करण्यास सोपे आहेत.

यात तुम्हाला ब्रास चे चांगल्या क्वालिटी चे ब्रनर्स मिळतात. यात तुम्हाला टफन चे ब्लॅक कलर चे ग्लास बघायला मिळतील. तसेच स्टोव्हच्या सेन्टर ला प्रेस्टीज चे ब्रँड नेम बघायला मिळते. तसेच हा गॅस स्टोव्ह ISI प्रमाणित आहे. या प्रोडक्ट वर तुम्हाला 2 वर्षाची वॉरंटी मिळते. तसेच या प्रोडक्ट चे वजन हे अंदाजे 6 किलो आहे. जर तुम्ही दोन बर्नर चा गॅस स्टोव्ह घेणार असाल तर तुम्हाला त्या साठी 2800 रुपये मोजावे लागती आणि जर तुम्हाला तीन बर्नर चा गॅस स्टोव्ह खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 3800 रुपये मोजावे लागतील. तसेच जर तुम्ही चार बर्नर असलेले गॅस स्टोव्ह घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 5900 रुपये मोजावे लागतील.



Prestige Magic Glass Top 2 Burner Gas Stove

सनफ्लेम प्राईड गॅस स्टोव्ह (Sunflame PRIDE Gas Stove)

Sunflame PRIDE 2 Burner Gas Stove

मित्रांनो हा गॅस स्टोव्ह सगळ्याच बर्नर साईझ मध्ये येतो. या प्रोडक्ट ची बिल्ड क्वालिटी ही खूप चांगली आहे. यात तुम्हाला हेवी ड्युटी पॅन सपोर्ट बघायला मिळेल. तसेच या गॅस स्टोव्हचा वरचा सरफेस हा खुप चांगला ब्लॅक फिनिशिंग मध्ये दिला आहे. याचे बर्नर पण ब्रास कज बनलेले आहेत. या स्टोव्हच्या टॉप ला 6mm चा खूप चांगला टफन ग्लास दिला गेला आहे. याचा ड्रीप ट्रे हा स्टोव्ह ला फिक्स असला तरी साफ करायला सोपा आहे. या गॅस स्टोव्ह चे वजन हे पाच किलो असून या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते. याची किंमत बघायची झाली तर दोन बर्नरचा गॅस स्टोव्ह हा तुम्हाला 2500 रुपये पर्यंत मिळू शकतो. तीन बर्नर चा गॅस स्टोव्ह हा तुम्हाला 5400 रुपये पर्यंत मिळू शकेल आणि चार बर्नर चा गॅस स्टोव्ह हा तुम्हाला 6500 रुपये पर्यंत मिळू शकतो.

BlowHot Heavy Brass 2 Burner Auto Ignition Gas Stove

ब्लॉहॉट हेवी गॅस स्टोव्ह (Blowhot Heavy Gas Stove)

BlowHot Heavy Brass 2 Burner Auto Ignition Gas Stove

मित्रांनो या गॅस स्टोव्ह ची डिझाईन ही खूप स्लिम आहे. तसेच लुक वाईझ म्हणजे दिसायला हा गॅस स्टोव्ह खूप छान आहे. या गॅस स्टोव्ह ची बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे. तसेच याचे रिझल्ट आणि फीडबॅक पण खूप चांगले आहेत. या प्रॉडक्ट ची खासियत म्हणजे या मध्ये तुम्हाला ऑटो इग्निशन चा ऑप्शन मिळतो. जो बाकीच्या प्रॉडक्ट मध्ये नाही मिळत. या गॅस स्टोव्ह चा बेस ही खूप चांगला आहे. तसेच या मध्ये गंज लागण्याची चिंता नाही राहत. तसेच या मध्ये तुम्हाला टॉप ला टफन ग्लास मिळतो. जो खूप चांगल्या क्वालिटी चा आहे.

याचे बर्नर बघायला गेले तर ते ब्रास चे बनलेले आहेत. तसेच याचा नॉब ही खूप चांगल्या पद्धतीचा आहे. या मध्ये दिलेला ड्रीप ट्रे हा स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे. आणि तो खूप चांगला आहे आणि साफ करण्यासाठी ही सोपा आहे. या प्रोडक्ट ची वॉरंटी बघितली तर ती तुम्हाला 2 वर्षाची मिळते. तसेच या प्रॉडक्टचे वजन हे अंदाजे दहा किलो पर्यंत असू शकते. या प्रॉडक्ट ची किंमत बघायची झाली तर दोन दोन बर्नर असलेल्या गॅस स्टोव्ह ची किंमत ही अंदाजे 4900 रुपये पर्यंत असू शकते. तर तीन बर्नर असलेल्या गॅस स्टोव्ह ची किंमत ही 5900 रुपये पर्यंत असू शकते. आणि चार बर्नर असलेल्या गॅस स्टोव्ह ची किंमत ही 6700 रुपये पर्यंत असू शकते. या गॅस स्टोव्ह ची किंमत जरी जास्त असली तरी याची बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे. तसेच नवीन काळाच्या दृष्टीने एक उत्तम प्रोडक्ट आहे.

Pigeon Aster Gas Stove 2 Burner

पिजन अस्तर गॅस स्टोव्ह (Pigeon Aster Gas Stove)

Pigeon Aster Gas Stove 2 Burner

मित्रांनो, पीजन चे हे गॅस स्टोव्ह एक उत्कृष्ट असे प्रोडक्ट आहे. तसेच पीजन च्या सर्व प्रकारच्या गॅस बर्नर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. तसेच या गॅस स्टोव्ह चे रिझल्ट्स आणि फीडबॅक खूप चांगले आहेत. या मध्ये दिलेले स्टेनलेस स्टील चे डिप ट्रे स्वच्छ करणे खूप डोपे आहे. या गॅस स्टोव्ह चे बर्नर पण ब्रास सारख्या चांगल्या क्वालिटी चे बनलेले आहेत, तसेच ते हेवी व टिकाऊ पण आहेत. यातील नॉब ही अनब्रेकेबल आहेत. याचे बेस स्टँड चांगले मजबूत आहेत. यात ही तुम्हाला टफन ग्लास मिळतात. तसेच या गॅस स्टोव्ह चे वजन हे 4.7 किलो पर्यंत आहे.

याशिवाय या गॅस स्टोव्ह वर तुम्हाला २ वर्षांची वॉरंटी मिळते. या गॅस स्टोव्ह ची किंमत सांगायची झाली तर दोन बर्नर असलेल्या गॅस स्टोव्ह ची किंमत ही अंदाजे 2000 रुपये पर्यंत असू शकते. तर तीन बर्नर असलेल्या गॅस स्टोव्ह ची किंमत ही 2500 रुपये पर्यंत असू शकते, आणि चार बर्नर असलेल्या गॅस स्टोव्ह ची किंमत ही अंदाजे 3500 रुपये पर्यंत असू शकते.

Preethi Blu Flame Gleam Glass Top 2 Burner Gas Stove

प्रीती ब्लु फ्लेम गॅस स्टोव्ह (Preethi Blu Flame Gas Stove)

Preethi Blu Flame Top 2-Burner Gas Stove

मित्रांनो, प्रीथी चे हे गॅस स्टोव्ह एक खूप चांगले मॉडेल आहे. तसेच याची सर्विस पण खूप चांगली आहे. तसेच वरच्या सरफेस वर तुम्हाला 7 mm चा टफन ग्लास दिला आहे. जो खूप मजबूत आणि टिकाऊ आहे. याचा ड्रीप ट्रे हा स्टेनलेस स्टीलचा असून तो रिमुवेबल आहे. म्हणजे त्याला काढता येत आणि साफ स्वच्छ करून परत लावता येत. पॅन सपोर्ट पण खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड केले आहे. तसेच यात तुम्हाला हेवी ब्रास बर्नर मिळतात. या गॅस स्टोव्ह ची अजून एक खासियत म्हणजे याचे जे चालू बंद करण्याचे बटन आहेत ते अंधारात ग्लो करतात म्हणजे चमकतात.

तसेच लायटर ठेवण्यासाठी त्यांनी एक स्पेशल होल्डर पण दिले आहे. या गॅस स्टोव्ह चे वजन हे 10 किलो आहे. आणि या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी दिली जाते. जर तुम्ही दोन बर्नर चा गॅस स्टोव्ह घेतला तर तो तुम्हाला 5500 रुपये पर्यंत मिळू शकतो. तसेच तीन बर्नर चा गॅस स्टोव्ह 6800 रुपये पर्यंत असू शकतो. आणि चार बर्नर चा गॅस स्टोव्ह हा तुम्हाला जवळ पास 7500 रुपये पर्यंत मिळू शकतो. मित्रांनो या प्रोडक्ट ची किंमत जरी जास्त असली तरी हे प्रोडक्ट वापरण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.


हे हि वाचा – प्रेशर कुकर बद्दल सविस्तर माहिती | सर्वात चांगले प्रेशर कूकर कोणते ?

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण गॅस स्टोव्ह बद्दल बरीच शी माहिती जाणून घेतली. तसेच चांगले गॅस स्टोव्ह मॉडेल पण बघितले. तुम्ही जर नवीन गॅस स्टोव्ह घेण्याचा विचार करत असाल तर या लेखाचा तुम्हाला नक्की च फायदा होईल, अशी आशा करतो. तसेच हा लेख आवडला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!