गणेश पूजा विधी
- मित्रांनो, सर्वात आधी पूजा सूरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा. व कपाळाला गंध लावावा.
- तुम्ही जर दिवसा पूजा करत असाल तर पूर्वेला तोंड करून पूजा करावी व जर संध्याकाळी करत असाल तर उत्तरेला तोंड करून पूजा करावी. आता सर्वात पहिले तूपाने भरलेला दिवा लावायचा आहे व दिपपूजन करायचे आहे.
- त्या नंतर पवित्रकरण करायचे आहे. पवित्रकरण म्हणजे पूजा सुरू करण्यापूर्वी स्वत:ला किंवा पूजन साहित्य पवित्र करण्यासाठी हा विधी केला जातो.
- तसेच आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहात त्या आसनाची शुद्धी करण्यासाठी आसन पूजा करायची आहे.
- शुभ कार्य आणि शांतीसाठी स्वस्ति पूजन करायचे आहे व हातात पाणी घेऊन श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री महागणपती देवाची प्रसन्नतेने पूजा करतो. असा संकल्प करून श्री गणेशाचे ध्यान म्हणून त्यांना नमस्कार करावा.
- आता हातात अक्षदा घेऊन श्री गणपतीचे आवाहन व प्रतिष्ठापना करायची आहे.
(मित्रांनो, मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे खालील मंत्र म्हणावेत.
अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।
रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।
पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।
बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।
देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।।
- त्या नंतर श्री गणेशाला प्रथमत: पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे. व महागणपतीला नमस्कार करून वस्त्र समर्पित करा.
- श्री गणपतीला रक्त चंदनही अर्पित केले जाते. त्यामुळे चंदन, गंध, शेंदूर व दुर्वा वहावेत.
- त्या नंतर दिवा किंवा समई लावून सुगंधित अगरबत्ती लावावी.
- आता श्री गणेशाला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यात श्री गणेशाला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळे त्यामध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावे. तसेच दक्षिणा व नारळ देवाला अर्पण करावे.
- आता या नंतर श्री गणपतीची आरती करून पुष्पांजली अर्पण करावी. व गणपतीला एक प्रदक्षिणा मारावी.
- आता सर्वात शेवटी पूजा, विधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. त्यासाठी देवाकडे क्षमा प्रार्थना करावी.
गणपतीची प्राणप्रतिष्ठा माहिती थोडक्यात दिलेली आहे. तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर हा विडिओ बघा.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण श्री गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा साहित्य व मांडणी, अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवादl
लेखामध्ये दिलेले फोटोंचा रेफेरेंस Sonic Octaves Shraddha युट्युब चॅनेल वरून घेतला गेलेला आहे
Tags: Ganpati Pooja Sahitya, Ganpati Chaturthi Sahitya, Ganpati Chaturthi Mandani, Ganpati Chaturthi Pooja kashi Karaychi, Ganpati Chaturthi Puja, Ganpati Chaturthi Puja Vidhi, Ganpati Sthapana Vidi, Ganpati Sthapana Kashi Karaychi, Ganpati Stapana Sahitya, Ganpati Sahitya List, Ganpati Sthapana Sahitya List, Ganpati Pooja Sahitya List, Ganpati Pooja Kashi Karaychi