गणपती पूजा मांडणी कशी करावी
1) मित्रांनो, सर्वात पहिले ज्या ठिकाणी तुम्ही गणपती मूर्ती स्थापित करणार आहात ती जागी रिकामी करून स्वच्छ करून घ्या. व तिथे चौरंग, टेबल, पाट, टीपॉय वगैरे कोणत्याही वस्तूचा वापर करू शकता.
2) त्या नंतर चौरंग किंवा पाट ठेवला असेल तर त्यावर एखादे स्वच्छ नवीन वस्त्र टाकावे व चौरंग किंवा पाटा भोवती रांगोळी काढून घ्यावी .
3) आता त्या वस्त्रा वर एक मूठ तांदूळ टाकावे, आवड असल्यास तुम्ही त्याचे स्वस्तिक देखील काढू शकता.
4) व त्या नंतर त्यावर श्री गणेशाची मूर्ती ठेवावी. ही मूर्ती वस्त्राने झाकून ठेवावी. व ही मूर्ती उत्तरपूजा पर्यंत काढु किंवा हलवू शकत नाही त्यामुळे सुरवातीलाच मूर्ती व्यवस्थित लक्ष पूर्वक ठेवावी.
5) आता मूर्तीच्या समोर आपल्या डाव्या हाताला एक कलश पाणी भरून ठेवावे व त्यासोबतच पळी, पंचपात्र, ताम्हण ठेवावे.
6) मूर्तीच्या बाजूला जागा असल्यास आपल्या उजव्या बाजूला शंख व डाव्या बाजूला घंटा ठेवावी. व मूर्तीच्या दोन्ही बाजूला समया ठेवाव्यात. आणि इथेच अगरबत्ती व काडीपेटी ठेवावी.
7) आता आपल्या उजव्या बाजूला विड्याचे ताट करून ठेवावे. विडे करताना दोन पान घेऊन त्याचे देठ देवाच्या दिशेने करून ठेवावे. त्यावर सुट्टे नाणे व एक सुपारी ठेवावी. असे पाच विडे तयार करून घ्यावे. व दोन देवासमोर मांडावे.
8) यानंतर आपल्या डाव्या हाताला फुलांचे ताट ठेवावे. या ताटात वेगवेगळ्या प्रकारची फुले ठेवावी व दुसऱ्या एका ताटात आणलेली पत्री स्वच्छ करून ठेवावी.
9) मित्रांनो, आता वाट्यांमध्ये हळद, कुंकू, गंध, अक्षदा, शेंदूर, चंदन, जानवे, कापसाचे वस्त्र, अत्तर इत्यादी ठेवावे.
10) आता आपल्या उजव्या बाजूला विड्याच्या ठिकाणी पाच प्रकारची फळे ठेवावी. व त्याच्या बाजूला गुळ खोबरे व दोन नारळ ठेवावे.
11) आता देवासाठी आणलेले हार, नैवेद्य किंवा मोदक, मिठाई, पंचामृत ही आहि सर्व तयारी आपल्या जवळ करून ठेवावी.
12) तसेच आरतीसाठी एक तुपाचे निरंजन किंवा कापूर आरती तयार करून ठेवावी.
13) ही सर्व मांडणी झाल्यावर श्री गणेश मूर्ती वरचे वस्त्र काढून घ्यावे. व गणपतीला मनोभावे नमस्कार करावा.
गणेश पूजा विधी
आता श्री गणेश पूजा विधी बद्दल माहिती => इथे क्लिक करून पूर्ण माहिती वाचा <=