Pooja Vidhi

श्री गणपती प्राणप्रतिष्ठा, पूजा साहित्य व मांडणी, अगदी सोप्या पद्धतीने


नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी एक नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण श्री गणपती ची प्राणप्रतिष्ठा अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी, त्यासाठी काय काय पूजा साहित्य लागेल व त्यांची मांडणी कशी करावी, या अश्या सर्व गोष्टी बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Ganpati Pooja Sahitya Mandani

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात, परंतु गणेश उत्सवाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच हा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाचा दिवस असतो. गणपती बाप्पांच्या आगमनाने सर्वांच्याच आनंदाला उधाण येते. सर्वत्र उत्साह अन् जल्लोष पाहायला मिळतो. घरोघरी गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु असते. अनेक जण घरी बाप्पाची प्रतिष्ठापना पूजा अर्चा करून करायचा प्रयत्न करतात.



पण मात्र या धावपळीच्या काळात प्रत्येकाला घरी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी गुरुजी मिळतीलच असे नाही. मग अशावेळी स्थापनेसाठी साहित्य काय असावे, पूजेची मांडणी कशी करावी, बाप्पांची स्थापना कशी करावी असा प्रश्न पडतो. पण मित्रांनो, आता मात्र तुम्हाला चिंता करण्याच काही कारण नाही. पुजेचा संपुर्ण विधी, साहित्य, स्थापना या सर्वांची माहिती आज आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

गणेश स्थापना पूजेचे साहित्य व मांडणी कशी करावी

सर्वात आधी श्री गणेश स्थापना पूजेचे साहित्य व त्यांची मांडणी कशी करावी त्या बद्दल जाणून घेऊ या:-

गणपती पूजा साहित्य

कुंकू, हळद, गंध, अक्षदा

Ganpati Pooja Sahitya 1

अत्तर, उदबत्ती, जानवे – २, धुप, कापूर, कापसाचे वस्त्र

Ganpati Pooja Sahitya 2

वेगवेगळ्या प्रकारची फुले



Ganpati Pooja Sahitya 3

पत्री – मोगरा, माका, बेल, दुर्वा, धोत्रा, तुळस, आघाडा, रुई, अर्जुन पत्र, डाळिंब, करडळी

Ganpati Pooja Sahitya 4

गुळ खोबरे, काडेपेटी, सुपारी – १५, सुट्टे पैसे – २५ रुपये, रांगोळी, विड्याची पाने – २५



Ganpati Pooja Sahitya 5

पाच फळे, पंचामृत – मध, दूध, साखर, तूप, दही एकत्र करून वेगळ्या वाटीत ठेवा

Ganpati Pooja Sahitya 6

समई – २, अगरबत्ती स्टॅन्ड, निरंजन – २, आरतीसाठी एक तुपाचे निरंजन किंवा कापूर आरती

Ganpati Pooja Sahitya 7

कापसाचे वस्त्र, पळी पंचपात्र, ताम्हण, कलश

Ganpati Pooja Sahitya 8

चौरंग, पाट, किंवा टेबल, किंवा टीपॉय, नवीन वस्त्र, रांगोळी, तांदूळ, अक्षदा, हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा, हार, नैवेद्य किंवा मोदक, मिठाई इत्यादी.

गणपती पूजा मांडणी

  1. मित्रांनो, सर्वात पहिले ज्या ठिकाणी तुम्ही गणपती मूर्ती स्थापित करणार आहात ती जागी रिकामी करून स्वच्छ करून घ्या. व तिथे चौरंग, टेबल, पाट, टीपॉय वगैरे कोणत्याही वस्तूचा वापर करू शकता.
Ganpati Pooja Mandani 1
  1. त्या नंतर चौरंग किंवा पाट ठेवला असेल तर त्यावर एखादे स्वच्छ नवीन वस्त्र टाकावे व चौरंग किंवा पाटा भोवती रांगोळी काढून घ्यावी .
  2. आता त्या वस्त्रा वर एक मूठ तांदूळ टाकावे, आवड असल्यास तुम्ही त्याचे स्वस्तिक देखील काढू शकता.
Ganpati Pooja Mandani 2
  1. व त्या नंतर त्यावर श्री गणेशाची मूर्ती ठेवावी. ही मूर्ती वस्त्राने झाकून ठेवावी. व ही मूर्ती उत्तरपूजा पर्यंत काढु किंवा हलवू शकत नाही त्यामुळे सुरवातीलाच मूर्ती व्यवस्थित लक्ष पूर्वक ठेवावी.
Ganpati Pooja Mandani 3
  1. आता मूर्तीच्या समोर आपल्या डाव्या हाताला एक कलश पाणी भरून ठेवावे व त्यासोबतच पळी, पंचपात्र, ताम्हण ठेवावे.


  1. मूर्तीच्या बाजूला जागा असल्यास आपल्या उजव्या बाजूला शंख व डाव्या बाजूला घंटा ठेवावी. व मूर्तीच्या दोन्ही बाजूला समया ठेवाव्यात. आणि इथेच अगरबत्ती व काडीपेटी ठेवावी.
  2. आता आपल्या उजव्या बाजूला विड्याचे ताट करून ठेवावे. विडे करताना दोन पान घेऊन त्याचे देठ देवाच्या दिशेने करून ठेवावे. त्यावर सुट्टे नाणे व एक सुपारी ठेवावी. असे पाच विडे तयार करून घ्यावे. व दोन देवासमोर मांडावे.
Ganpati Pooja Mandani 4
  1. यानंतर आपल्या डाव्या हाताला फुलांचे ताट ठेवावे. या ताटात वेगवेगळ्या प्रकारची फुले ठेवावी व दुसऱ्या एका ताटात आणलेली पत्री स्वच्छ करून ठेवावी.
  2. मित्रांनो, आता वाट्यांमध्ये हळद, कुंकू, गंध, अक्षदा, शेंदूर, चंदन, जानवे, कापसाचे वस्त्र, अत्तर इत्यादी ठेवावे.
  3. आता आपल्या उजव्या बाजूला विड्याच्या ठिकाणी पाच प्रकारची फळे ठेवावी. व त्याच्या बाजूला गुळ खोबरे व दोन नारळ ठेवावे.
  4. आता देवासाठी आणलेले हार, नैवेद्य किंवा मोदक, मिठाई, पंचामृत ही आहि सर्व तयारी आपल्या जवळ करून ठेवावी.
Ganpati Pooja Mandani 5
  1. तसेच आरतीसाठी एक तुपाचे निरंजन किंवा कापूर आरती तयार करून ठेवावी.
  2. ही सर्व मांडणी झाल्यावर श्री गणेश मूर्ती वरचे वस्त्र काढून घ्यावे. व गणपतीला मनोभावे नमस्कार करावा.
Ganpati Pooja Mandani 6

गणेश पूजा विधी

आता श्री गणेश पूजा विधी बद्दल जाणून घेऊ या

  1. मित्रांनो, सर्वात आधी पूजा सूरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा. व कपाळाला गंध लावावा.
  2. तुम्ही जर दिवसा पूजा करत असाल तर पूर्वेला तोंड करून पूजा करावी व जर संध्याकाळी करत असाल तर उत्तरेला तोंड करून पूजा करावी.
  3. आता सर्वात पहिले तूपाने भरलेला दिवा लावायचा आहे व दिपपूजन करायचे आहे.
  1. त्या नंतर पवित्रकरण करायचे आहे. पवित्रकरण म्हणजे पूजा सुरू करण्यापूर्वी स्वत:ला किंवा पूजन साहित्य पवित्र करण्यासाठी हा विधी केला जातो.
  2. तसेच आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहात त्या आसनाची शुद्धी करण्यासाठी आसन पूजा करायची आहे.
  3. शुभ कार्य आणि शांतीसाठी स्वस्ति पूजन करायचे आहे व हातात पाणी घेऊन श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री महागणपती देवाची प्रसन्नतेने पूजा करतो. असा संकल्प करून श्री गणेशाचे ध्यान म्हणून त्यांना नमस्कार करावा.
  4. आता हातात अक्षदा घेऊन श्री गणपतीचे आवाहन व प्रतिष्ठापना करायची आहे.

(मित्रांनो, मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे खालील मंत्र म्हणावेत.

अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।
रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।
पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।
बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।
देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।।

  1. त्या नंतर श्री गणेशाला प्रथमत: पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे. व महागणपतीला नमस्कार करून वस्त्र समर्पित करा.
  2. श्री गणपतीला रक्त चंदनही अर्पित केले जाते. त्यामुळे चंदन, गंध, शेंदूर व दुर्वा वहावेत.
  3. त्या नंतर दिवा किंवा समई लावून सुगंधित अगरबत्ती लावावी.
  4. आता श्री गणेशाला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यात श्री गणेशाला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळे त्यामध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावे. तसेच दक्षिणा व नारळ देवाला अर्पण करावे.
  1. आता या नंतर श्री गणपतीची आरती करून पुष्पांजली अर्पण करावी. व गणपतीला एक प्रदक्षिणा मारावी.
  2. आता सर्वात शेवटी पूजा, विधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. त्यासाठी देवाकडे क्षमा प्रार्थना करावी.

गणपतीची प्राणप्रतिष्ठा माहिती थोडक्यात दिलेली आहे. तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर हा विडिओ बघा.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण श्री गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा साहित्य व मांडणी, अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवादl

लेखामध्ये दिलेले फोटोंचा रेफेरेंस Sonic Octaves Shraddha युट्युब चॅनेल वरून घेतला गेलेला आहे

Tags: Ganpati Pooja Sahitya, Ganpati Chaturthi Sahitya, Ganpati Chaturthi Mandani, Ganpati Chaturthi Pooja kashi Karaychi, Ganpati Chaturthi Puja, Ganpati Chaturthi Puja Vidhi, Ganpati Sthapana Vidi, Ganpati Sthapana Kashi Karaychi, Ganpati Stapana Sahitya, Ganpati Sahitya List, Ganpati Sthapana Sahitya List, Ganpati Pooja Sahitya List, Ganpati Pooja Kashi Karaychi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!