शेवटच्या स्टेजचा पेशंट बरा करणारे 5 फ्री हॉस्पिटल | Free Hospital for Cancer, Heart, Brain
नमस्कार मित्रानो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण भारतातील असे पाच सर्वोतकृष्ट फ्री हॉस्पिटल बघणार आहोत जिथे सर्वच आजार, अगदी शेवटच्या स्टेजचा पेशंट देखील अगदी बरा होतो. चला तर मग ते कोणते 5 फ्री हॉस्पिटल आहेत, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेऊ या.
मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी ऍडमिट होतो तेव्हा आपल्याला बराच खर्च येतो. त्यात तपासनी फी लागते, एड्मिशन चार्जेस लागतात, तसेच राहण्याचा व खाण्याचा खर्च लागतो. याशिवाय आपला येण्याजाण्याचा खर्च होतो तो वेगळाच. बरं एवढे करून सुद्धा आजार बरा होईल का किंवा जर एखादा खूप गंभीर आजार असलेला अगदी शेवटच्या स्टेज ला गेलेला पेशंट नीट होईलच याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. पण मित्रांनो, तुमच्या माहिती साठी म्हणून सांगतो की आपल्या देशात असेही काही हॉस्पिटल आहेत की जिथे असे म्हणजे अगदी शेवटच्या स्टेजला गेलेले आजार सुद्धा बरे होतात. आणि ते ही अगदी विनामूल्य.
मित्रांनो, अश्या हॉस्पिटल मध्ये ना तुम्हाला तपासणी फी लागते,ना एड्मिशन चार्जेस लागतात,ना राहण्याचा किंवा खाण्याचा खर्च लागतो. तसेच येण्याजाण्याचा खर्च देखील ते देत असतात. आणि या हॉस्पिटल ची वैशिष्ट्य म्हणजे कितीही गंभीर आजार असला अगदी शेवटच्या स्टेज ला गेलेला पेशेंट ही हे हॉस्पिटल स्वीकारत असतात. त्यांना एडमिट करुन घेतात व त्या पेशंट ला बरे करण्याचा 100% प्रयत्न करतात. महत्वाचे म्हणजे हे सगळ होत ते पुर्णतः मोफत.
मित्रांनो, या मध्ये एक दवाखाना तर असा आहे की ते 10 वर्षाच्या आतील लहान मुलांच्या ह्रदयावर फ्री मध्ये उपचार करतात. कितीही कॉम्प्लिकेटेड ह्रदयाचा आजार असला तरी तो अगदी ग्यारंटी ने बरा करतात. तर ते कोणते पाच हॉस्पिटल आहेत ज्या मध्ये कोणताही आजार अगदी फ्री व विनामूल्य केला जातो, त्या बद्दल आपण पुढे माहिती जाणून घेऊ या, पण त्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…
Tata Memorial Hospital Mumbai
मित्रांनो, किडनी नंतर जर कुठला गंभीर आजार असेल तर तो कॅन्सर चा असतो. आणि कॅन्सर च्या आजार वर चांगला उपचार करायचा म्हटलं तर खर्च हि भरपुर येतो. पण आता काळजीच कारण नाही, कारण कॅन्सर वर कमीत कमी खर्चात उपचार करण्यासाठी आता Tata memorial hospital आहे जे मुंबई मध्ये स्थित आहे. आणि महत्वाचे म्हणजे या हॉस्पिटल मध्ये पेशंट वर 70% मोफत उपचार केले जातात.
Shree Sai Baba Hospital Bengalore
मित्रांनो, या हॉस्पिटल मधे हृदय आणी मेंदु यांवर उपचार केले जातात. या हॉस्पिटल मध्ये सर्व उपचार मोफत केले जातात. तसेच इथे ओपिडी चार्जेस पण नसतात. इथे थोडी फार फी भरावी लागते पण भारत सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्या या ठिकाणी लागु आहेत.
Sri Sathya Sai Sanjeevani Hospital New Raipur
मित्रांनो, श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल हे छत्तीसगढ मधील रायपुर मध्ये स्थित आहे. या हॉस्पिटल मध्ये 10 वर्षा खालील मुलांचे हृदय संबधित जर कोणते आजार असतील तर ते अगदी मोफत केले जातात. विशेष म्हणजे या रुग्णालयात ही कॅश काउंटर नाही. देशभरातील रुग्णांव्यतिरिक्त इतर अनेक देशांतील रुग्णही मोफत उपचारासाठी या हॉस्पिटल मध्ये येतात, ज्यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. इथे पेशंट सोबत त्याच्या एका नातेवाईकाला सुद्धा राहण्याची व खाण्याची फ्री मध्ये सोय केली जाते.
Guru Hari Kishan Hospital Delhi
मित्रांनो, किडनी साठी मोफत इलाज करणारे कोणते हॉस्पिटल असेल तर ते म्हणजे Guru Hari Kishan Hospital Delhi या हॉस्पिटल मधे किडनीच्या सर्वच आजारावर इलाज व ऑपरेशन अगदी मोफत केली जातात. तसेच जर एखाद्याची किडनी बदलायची असेल किंवा किडनी ट्रांसफर करायची असेल तर ती सुधा मोफत केली जाते. या हॉस्पिटल च्या सुविधे बद्दल बोलायचे झाले तर येथे किडनी डायलिसिसची व्यवस्था खूप चांगली करण्यात आली आहे. याशिवाय रूग्णांच्या जेवणाचीही व्यवस्था हॉस्पिटल कडून केली जात आहे.
या हॉस्पिटल च्या क्षमते बद्दल बोलायचे झाले तर या हॉस्पिटल मध्ये एकावेळी 100 लोक डायलिसिस करू शकतात. या हॉस्पिटल ची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे हॉस्पिटल आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असून हे रूग्णांसाठी पूर्णपणे मोफत आहे. तसेच हे जगातील पहिले हॉस्पिटल आहे ज्यात ‘कॅश काउंटर’ नसेल. इथे रुग्णांना फक्त नोंदणी करावी लागेल आणि त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील.
Guru ka langar Eye Hospital Chandigarh
मित्रांनो, चंदिगढ मध्ये असलेले गुरू का लंगर आय हॉस्पिटल हे अस हॉस्पिटल आहे की जिथे कैश काउंटर च नाही, की जिथे पैसे घ्यायला कोणीच माणूस नाही. या हॉस्पिटल मध्ये तुमच्या येण्याचा जाण्याचा खर्च देखील दिला जातो. या हॉस्पिटल मध्ये डोळ्यांचे सर्व प्रकारचे आजार बरे केले जातात. इथे फक्त मोतीबिंदू च नाही तर रेटिना चे ऑपरेशन देखील फ्री मध्ये केले जातात. थोडक्यात सांगायचे तर डोळ्याचा कितीही किचकट आजार असला तरी तो बरा केला जातो. एवढेच नाही तर आलेल्या सर्व पेशंट साठी भोजनाची व्यवस्थाही या हॉस्पिटल मध्ये करण्यात आली आहे.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण शेवटच्या स्टेजचा पेशंट सुद्धा बरा करणारे 5 फ्री हॉस्पिटल कोणते आहेत त्यांच्या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
Tags: best free hospitals in india, best free hospitals in mumbai, best free hospitals in maharashtra, best hospital in india, best eye hospitals in india, eye hospitals, hospitals, best hospital, hospital, india, top 10, aiims, medanta, lilavati hospital, apollo hospital, fortis hospital, eye7, tata memorial hospital, christian medical college