Government License

फूड लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे | Food Licence Online Registration

नमस्कार मित्रांनो आज आपण फूड लायसन्स (Food License) ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे, या सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, ज्या प्रकारे शॉप टाकण्यासाठी शॉप ऍक्ट लायसन्सची आवश्यकता असते, त्याच प्रकारे ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ विकले जातात त्यासर्वांना फूड लायसन्स ची गरज असते. मित्रांनो, तुम्ही ही जर एखादे हॉटेल, बेकरी किंवा एखादा फूड व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे ही फूड लायसन्स असणे खूप आवश्यक आहे. खरंतर फूड व्यवसाय हा एक चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार ही उपलब्ध होतात.



पण एखादे हॉटेल किंवा फूड व्यवसाय सुरू करणे खूप सोपे असते, परंतु त्या व्यवसायाची कायदेशीर नोंदणी करणे ही खूप महत्त्वाचे आणि बंधनकारक आहे. त्यासाठीच प्रत्येक फूड विक्रेत्याकडे फूड लायसन्स असणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचा फूड व्यवसाय अधिकृत करता येईल. हे फूड लायसन्स कसे काढायचे आणि ते ही ऑनलाईन पद्धतीने, हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Food Licence Online Registration

चला तर मग फूड लायसन्स कसे काढायचे त्या बद्दल माहिती जाणून घेऊ या.

फूड लायसन्स ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे?

स्टेप 1: मित्रांनो, फूड लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले फूड लायसन्स च्या अधिकृत वेबसाइट foscos.fssai.gov.in वर जायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला Apply for New License/Registration या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर पोर्टल चे पेज ओपन होईल.

Food Licence Online Registration Marathi Step 1

स्टेप 2: आता पोर्टल पेज वर थोडे खाली General या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Food Licence Online Registration Marathi Step 2

स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला तुमचे State म्हणजेच राज्य सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमची बिझनेस कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यासाठी इथे तुम्हाला काही ऑप्शन दिले आहेत. जसे की, Manufacturer, Trade /Retailer, Food services, Central government agencies, Head office असे ऑप्शन दिसतील. त्यातील तुमचा जो बिझनेस असेल तो सिलेक्ट करायचा आहे.



समजा तुम्ही किराणा चे दुकान टाकणार असाल तर तुम्ही Trade /Retailer हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमचा वार्षिक उलाढाल (Turnover) किती आहे ते सिलेक्ट करायचे आहे. व नंतर Proceed ऑप्शन वर क्लिक करायच आहे.

Food Licence Online Registration Marathi Step 3

स्टेप 4: आता नेक्स्ट पेज वर You are eligible for State License, Click here to proceed असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

Food Licence Online Registration Marathi Step 4

स्टेप 5: मित्रांनो, आता तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल ‘Form A’. त्यातील सर्व डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. त्यात सर्वात पहिले Applicant details मध्ये तुम्हाला तुमचे नाव आणि शॉप चे नाव टाकायचे आहे. त्यानंतर Designation (कोणत्या प्रकारचे दुकान/व्यवसाय आहे) सिलेक्ट करायचे आहे. यात तुम्ही Individual आहात की Partnership की Proprietor आहात ते सिलेक्ट करायचे आहे.

Food Licence Online Registration Marathi Step 5

स्टेप 6: आता पुढे तुम्हाला तुमचा बिझनेस अड्रेस टाकायचा आहे. म्हणजेच तुमचा फूड बिझनेस ज्या ठिकाणी आहे टोटल पत्ता टाकायचा आहे. त्या नंतर तुमचा निवासी पत्ता व बिझनेस चा पत्ता एसच आहे का ते विचारले जाईल. जर दोन्ही पत्ते एकच असतील तर Yes ऑप्शन वर टिक करा. व जर पत्ता एकच नसेल तर No ऑप्शन वर टिक करा.

Food Licence Online Registration Marathi Step 6

स्टेप 7: आता तुम्हाला तुमचा Correspondence address म्हणजे जिथे तुम्ही राहताय तिथला पत्ता टाकायचा आहे.

स्टेप 8: त्यानंतर Contact Details मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी टाकायचा आहे. व नंतर Contact Person चे नाव टाकायचे आहे. आता तुम्हाला किती वर्षांसाठी लायसन्स काढायचे आहे ते सिलेक्ट करायचे आहे.

Food Licence Online Registration Marathi Step 8

स्टेप 9: आता तुम्हाला Food कॅटेगरी मध्ये तुम्ही तुमच्या दुकानात कोण कोणते फूड ठेवणार आहात ते ऍड करायचे आहे. त्यानंतर Other Details मध्ये वॉटर सप्लाय चा सोर्स सिलेक्ट करायचा आहे. व नंतर Save and next बटन वर क्लिक करायचे आहे.

Food Licence Online Registration Marathi Step 9

स्टेप 10: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Sign up details टाकायचे आहेत त्यात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, ई-मेल आयडी, व belongs to टाकायचे आहे. तसेच सेकंडरी कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील तर ते टाका, व त्या नंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. व दिलेला कॅपचा टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

Food Licence Online Registration Marathi Step 10

स्टेप 11: आता तुमच्या मोबाईल नंबर व ई-मेल वर एक ओटीपी पाठवला जाईल तो टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुमचे रेजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल व तुम्हाला एक आयडी मिळेल तो सेव्ह करून ठेवायचा आहे. व नंतर Ok बटन वर क्लिक करायचे आहे.

Food Licence Online Registration Marathi Step 11

फूड लायसन्स साठी डॉक्युमेंट्स अपलोड व पेमेंट कसे करायचे

मित्रांनो, आता या नंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत व पेमेंट करायचे आहे. इथे तुम्हाला तुमचा फोटो, ओळखीचा पुरावा व प्रीमायसेस (दुकानाच्या आसपासचा) चा फोटो असे कागदपत्रे अपलोड करावे लागेल.

स्टेप 1: डॉक्युमेंट्स मध्ये सर्वात पहिले तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो जास्तीत जास्त 3mb पर्यंत व jpeg फॉरमॅट मध्ये असावा. आता आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, वॉटर कार्ड,पासपोर्ट वगैरे यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता.

आता तुम्हाला Other Documents या ऑप्शन मध्ये यायचे आहे. तिथे तुम्हाला View mandatory documents ऑप्शन वर क्लिक करून मग New registration ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे कोण कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते बघायला मिळते.

Food Licence Document Upload Marathi Step 1

मित्रांनो, आता Proof of premises मध्ये डॉक्युमेंट म्हणून तुम्ही शॉप चे लाइट बील, किंवा शॉप ऍक्ट लायसन्स किंवा NOC वगैरे कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. त्या नंतर टर्म्स आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करायच्या आहेत.

स्टेप 2: आता तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. मित्रांनो जर तुम्ही एक वर्षासाठी लायसन्स काढत असाल तर तुम्हाला 100 रुपये फी असेल व जर पाच वर्षांसाठी लायसन्स काढत असाल तर तुम्हाला 500 रुपये भरावे लागतील. तर हे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला Online payment या ऑप्शन वर टिक करायचे आहे.

आता खाली तुम्ही Preview application या ऑप्शन वर वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमच्या समोर तुमचे पूर्ण ऍप्लिकेशन ओपन होईल. त्यातली माहिती तुम्ही ते पुन्हा एकदा चेक करू शकता. व काही करेक्शन असतील तर ते पुन्हा एडिट करू शकता.

मित्रांनो, आता यानंतर तुम्हाला Pay ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3: त्यानंतर पेमेंट मेथड सिलेक्ट करायची आहे. यात तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआई वगैरे कोणत्याही पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून नंतर Pay Now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व तुमचे पेमेंट आता सक्सेसफुली पे होऊन जाईल.

Food Licence Document Upload Marathi Step 3

फूड लायसन्स एप्लिकेशन स्टेटस चेक कसा करायचा

त्या नंतर तुमच्या समोर एक pdf ओपन होईल. हा pdf म्हणजे रिसीट आहे. जी तुम्हाला डाउनलोड करून जपून ठेवायची आहे. मित्रांनो, यातच तुम्हाला एक ऍप्लिकेशन आयडी मिळेल जो कॉपी करून होम पेज वर यायचे आहे. व ऍप्लिकेशन स्टेटस चेक करायचे आहे.

Food Licence Document Upload Marathi Step 4

स्टेप 1: होम पेज वर Track application ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.

Food Licence Application Status Check Step 1

स्टेप 2: नंतर Application reference number टाकायचा आहे व दिलेला कॅपचा टाकायचा टाकून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे. व नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचे ऍप्लिकेशन स्टेटस बघायला मिळेल. यात तुमचे ऍप्लिकेशन कोणत्या स्टेज ला आहे ते कळेल. मित्रांनो, पूर्ण प्रोसेस होण्यासाठी 10 ते 12 दिवस लागतील.

Food Licence Application Status Check Step 2

त्यानंतर जर तुम्ही परत स्टेटस चेक केले तर तुम्हाला Registration certificate issued असे दिसेल. म्हणजेच तुमचे रेजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाले आहे.

स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला login करायचे आहे. त्यासाठी ई-मेल किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकून Proceed बटन वर क्लिक करायचे आहे. व नंतर सबमिट करायचे आहे.

आता नेक्स्ट पेज वर डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला खाली Issued registration certificate असे दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे व तुमच्या समोर सर्व माहिती ओपन होईल. त्यात तुम्ही रिसीट बघू शकता, डाउनलोड करू शकता. तसेच डाव्या बाजूला फूड लायसन्स डाउनलोड करण्यासाठी एक ऍप्लिकेशन नंबर दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. व तुमच्या समोर फूड लायसन्स pdf मध्ये ओपन होईल. यामध्ये तुमची सर्व माहिती व फोटो सुद्धा आलेला दिसेल. तसेच identity card सुद्धा दिसेल. हे identity card सेव्ह करून त्याची प्रिंट काढून घ्या व तुमच्या शॉप मध्ये लावा.

Food Licence Application Status Check Step 3

FAQ

कोणत्या परिस्थितीत फूड लायसन्स रद्द होऊ शकते?

मित्रांनो, जर तुम्ही विकत असलेल्या अन्नातून विषबाधा होत असेल किंवा रोग प्रसार होत असेल, किंवा जर तुम्ही fssai च्या नियमांचे उल्लंघन केले तर तुमचे फूड लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

फूड लायसन्स काढण्यासाठी किती शुल्क द्यावे लागते?

मित्रांनो, जर तुम्ही फूड लायसन्स साठी नवीन रेजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला 100 रुपये प्रति वर्ष शुल्क आकारण्यात येते. व जर तुम्हाला तुमचे लायसन्स रिन्यू करायचे असेल म्हणजेच नूतनीकरण करण्यासाठी देखील प्रति वर्ष 100 रुपये प्रमाणे शुल्क आकारले जाईल.

मुदत संपल्यानंतर फूड लायसन्सचे नूतनीकरण कसे करावे?

मित्रांनो, फूड लायसन्स ची मुदत संपल्या नंतर 30 दिवसांच्या आत अर्ज करावा लागतो. तसे न केल्यास त्याचे नूतनीकरण करता येणार नाही. आणि तुम्हाला लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला FBO ला पुन्हा अर्ज करावा लागेल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे एकदम सोप्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फूड लायसन्स काढू शकता. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!