ESIC कार्ड डाउनलोड करा Free मध्ये मोबाईल वर | ESIC e Pehchan Card Download
नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ESIC मेंबर असाल म्हणजेच तुम्ही जर ESIC योजनेत सामील असाल तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ESIC कार्ड मिळते आणि या कार्डच्या मदतीने तुम्ही ESIC दवाखान्यात किंवा हॉस्पिटल मध्ये कोणताही खर्च न करता कोणत्याही आजारावर उपचार करू शकता.
मित्रांनो, ESIC च्या मिळणाऱ्या या सुविधांमुळे तुम्ही तुमचे ESI कार्ड किंवा तुमचे इसिक ई – पहचान कार्ड नेहमी जवळ ठेवावे. आणि मित्रांनो, त्यासाठी तुमच्या कडे ESIC चे ई कार्ड असणे आवश्यक असते. आणि ते तुम्हाला ESIC च्या वेबसाईट वरून डाउनलोड करावे लागेल.
ESIC योजनेबद्दल सविस्तर माहिती वाचा: ESIC संपूर्ण माहिती: म्हणजे काय, फायदे, सुविधा व लाभ, विमा, नोंदणी
त्यामुळे ESIC कार्ड डाउनलोड कसे करायचे व त्याची पूर्ण प्रोसेस काय आहे, या बद्दलच आज आम्ही तुम्हाला सविस्तर पणे माहिती सांगणार आहोत. त्यामुळे आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…
ESIC कार्ड डाउनलोड कसे करायचे
ESIC कार्ड डाउनलोड कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:-
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला गुगल क्रोम मधून esic च्या ऑफिशियल वेबसाईट www.esic.gov.in या वर जायचे आहे.
त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. आता खाली तुम्हाला Insured Person या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला Sign in करायचे आहे. जर तुमचे अशी अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचे युझरनेम व पासवर्ड टाकून नंतर दिलेला कॅपचा टाकून साइन इन करायचे आहे.
पण जर तुम्ही इथे नवीन असाल तर तुम्हाला इथे तुमचे अकाउंट तयार करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Sign up बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 2: त्या नंतर Insurance Number मध्ये तुमचा epic number टाकायचा आहे. त्या नंतर तुमची जन्म तारीख, मोबाईल नंबर, व कॅपचा कोड टाकून साइन अप करायचे आहे. या नंतर तुम्ही लॉगिन करू शकता.
स्टेप 3: तर मित्रांनो लॉगिन केल्यानंतर नेक्स्ट पेजवर आलेल्या नोटिफिकेशन नीट वाचून नंतर क्लोज बटन वर क्लिक करायचे आहे
स्टेप 4: आता नेक्स्ट पेजवर तुमच्या Insured Person चे सगळे डिटेल्स बघायला मिळतील. जसे की Insured पर्सन चे नाव, अपॉइंटमेंट डेट, आधार कार्ड नंबर वगैरे. तर हे सर्व डिटेल्स चेक करून नंतर थोडं खाली आल्यावर डाव्या बाजूला View/ print e-pehchan card या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: त्या नंतर नेक्स्ट पेज वर employee name, employer name, व employer code दाखवले जाईल. व त्या सोबतच view/ print e pehchan card च्या ऑप्शन मध्ये एक लिंक बघायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
स्टेप 8: क्लीक केल्यावर लगेच एका पेज वर तुमचे ई-पहचान कार्ड बघायला मिळेल. याच्या खाली download/ print चा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. व तुमचे ई पहचान कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होऊन जाईल.
या ई पहचान कार्ड वर तुमचे पर्सनल डिटेल्स, रजिस्ट्रेशन डिटेल्स, तसेच एम्प्लॉयेर डिटेल्स व ऍड केलेल्या फॅमिली मेम्बर चे डिटेल्स याशिवाय नॉमिनीचे डिटेल्स बघायला मिळतील.
मित्रांनो, त्या खालीच तुम्हाला तुमचे सिग्नेचर करायचे आहे व त्या खाली तुमच्या एम्प्लॉयेर चे म्हणजेच कंपनी चे सिग्नेचर किंवा स्टॅम्प घ्यायचा आहे. तसेच डाव्या बाजूला फॅमिली चा फोटो टाकुन त्यावर कंपनीचे किंवा esic डिस्पेन्सरी किंवा हॉस्पिटल चे सिग्नेचर व स्टॅम्प घ्यायचे आहे. म्हणजेच तुमचा फोटो अटेस्टेड करून घ्यायचे आहे.
मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही तुमचे ई पहचान कार्ड डाउनलोड करून त्याला पीडीएफ स्वरूपात कोणत्याही esic हॉस्पिटल मध्ये दाखवून तुमचा व तुमच्या फॅमिलीचा मोफत इलाज करू शकता.
ESIC कार्ड चे फायदे काय आहेत?
- मित्रांनो, इसिक कार्ड चा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे नोंदणीकृत कामगाराला व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मेडिकल बेनिफिट मिळतात. ज्यात राज्य कामगार विमा रुग्णालयातून म्हणजेच ESIC हॉस्पिटल मध्ये इसिक कार्ड धारक व्यक्ती मोफत उपचार घेऊ शकतो.
- तसेच प्रसूती काळात व प्रसूती नंतर संबंधित महिलेला देय रजेच्या 70 टक्के पगार दिला जातो.
- यासोबतच कामावर असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या पत्नीस पगाराच्या 60 टक्के पेन्शन मिळते तर मुलास 40 टक्के पेन्शन मिळते.
- काही वेळेस काम करताना बोट, डोळा, पाय तथा अन्य अवयवाचा अपघात झाला व तो अवयव निकामी झाल्यास एकूण पगाराच्या पाच टक्के रक्कम कामगाराला पेन्शन म्हणून मिळते.
- तसेच नोकरी वरून काढण्यात आल्या नंतर अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना अंतर्गत नोकरी गेल्यानंतर तीन महिन्यांचा 50 टक्के पगार मिळतो.
- आणि कामावर असताना जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधीसाठी 15 हजार रुपये दिले जातात.
- तसेच विमाधारक व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या उपचारावरील खर्चाची कोणतीही कमाल मर्यादा नाही. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये कितीही खर्च आला तरी ई पहचान कार्ड द्वारे तो अगदी मोफत होतो.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ESIC कार्ड डाउनलोड कसे करायचे, व त्याचे फायदे काय आहेत, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
Tags: ESIC Card Download, ESIC Card Free Download, ESIC Medical Card Free Download, ESIC Card Apply, ESIC Card Mhanje Kay, ESIC Card Kuthe Milte, ESIC Card Online, ESIC Card Kase kadhayche, ESIC Card Kuthe Milte, ESIC Card Download Kara, ESIC Card Mahiti, ESIC Card Marathi