लाईट बिल कमी करण्याचे साधे सोपे 5 उपाय | How To Reduce Electricity Bill
नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला कोणतेही चुकीचे काम न करता, बेकायदेशीर काम न करता वीज बिल कमी कसे येईल, या साठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
मित्रांनो, ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग आजकाल सर्वत्रच विजेचा वापर केला जातो. तुम्ही जितकी वीज खर्च कराल तेवढे तुम्हाला वीज बिल येते. अश्या वेळी वीज बिल कसे वाचवायचे किंवा कमी कसे करायचे, असा विचार सगळेच जण करतात. आणि यासाठी नव-नवीन कल्पना देखील लढवत असतात. यामुळे वीज चोरी सारखे प्रकार घडतात. पण वीज बिल कमी येण्यासाठी वीज चोरणे वगैरे प्रकार करणे चुकीचे आहे. यामुळे तुम्हाला जेल होऊ शकते किंवा मोठा दंड देखील भरावा लागू शकतो. पण मग असा कोणता पर्याय आहे ज्यामुळे कोणते चुकीचे काम न करता, बेकायदेशीर काम न करता वीज बिल कमी येईल.
मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल पण काही अश्या गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमचे वीज बिल बऱ्याच प्रमाणात कमी येऊ शकते. आता तुम्हाला वाटेल की आम्ही तुम्हाला लाईट कमी वापरा, फॅन कमी वापरा, एसी कमी वापरा वगैरे असे सल्ले देऊ, पण मित्रांनो, यापैकी कुठलाच सल्ला आम्ही तुम्हाला देणार नाहीये. तर त्या ऐवजी तुम्हाला काही अश्या गोष्टी सांगणार आहोत ज्या वापरल्याने किंवा अंमलात आणल्याने तुमचे वीज बिल नक्कीच कमी येईल. चला तर मग जाणून घेऊ या त्या कोणत्या गोष्टी आहेत. पण त्या साठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
टीप नंबर 1
मित्रांनो, तुमच्या घरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे कमी आहेत, तरी पण बिल मात्र भरमसाठ येतंय? टीव्ही, फ्रिज, एसी पण चांगल्या रेटिंगचे घेतले आहेत. आणि बल्ब, ट्युब लाईट काढून एलईडी लाइट्स लावले आहेत. तरीही वीज बिल जास्त येतेय. असे असेल तर मग तुम्हाला तुमच्या स्विच बोर्ड वरील लाल इंडिकेटर कडे लक्ष द्यावे लागणार आहे.
हो मित्रांनो, तुमच्या घरात प्रत्येक खोलीत स्वीच बोर्ड वर लाईट आहे की नाही हे दाखविणारा इंडिकेटर तर असेलच. आणि तुम्हाला तर माहीत असेलच की यात बटन चालू केल्यावर लाईट पेटते आणि बटन बंद केल्यावर लाईट बंद होते. तसं पाहिलं तर हे इंडिकेटर आपल्या खूप उपयोगी आहेत. परंतू ते तेवढीच जास्त वीजही घेतात. तुम्हाला वाटत असेल अशी घेऊन घेऊन किती वीज घेतील? पण मित्रांनो, हा आकडा खूप मोठा आहे. जो तुमच्या महिन्याच्या वीज बिलावर खूप मोठा परिणाम करतो.
महत्वाचे म्हणजे हे इंडिकेटर्स 24 तास सुरु असतात. आणि महत्वाचे म्हणजे आतील बल्ब पेटविण्यासाठी ते वीज घेतात. परंतू आपण याकडे कधी लक्ष देत नाही. समजा जर एक इंडिकेटर 5 वॅट चे असेल, आणि तुमच्या घरात जर 10 इंडिकेटर असतील तर 50 वॅट इतका लोड या इंडिकेटर मुळे येत असेल. मग आता हे इंडिकेटर जर 20 तास चालत असतील तर मग किती बिल वाढेल ते पण बघा.
हे तुम्ही अगदि सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे वॅट×तास÷1000 हा फॉर्म्युला वापरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे 50 वॅट × 20 ÷ 1000 असे केले तर 1 युनिट येते. म्हणजे दिवसाला जर एक युनिट पकडले तर महिन्याचे 30 युनिट होतात. आणि जर एक युनिट ची किंमत 10 रुपये असेल तर महिन्याला तुमचे 300 रुपये वीज बिल जास्तीचे येईल ते पण फक्त एका इंडिकेटर मुळे. त्यामुळे घरात जास्तीचे इंडिकेटर बसवू नका, आणि जर वापरायचेच असतील तर एलईडी इंडिकेटर वापर जे कमी वीज खातात.
तुम्हाला लाईट बिल कमी करण्यासाठीच्या आणखी ४ टिप्स वाचायच्या असतील तर, “<< टीप नंबर..” बटणावर क्लिक करा
Tags: How To Reduce Electricity Bill in Marathi, Reduce Electricity Bill in Maharashtra, Save Electricity Bill, Save Electricity Tips In Marathi, Light Save Kashi Karaychi, Light Bill Kami Kashe Karayche, Light Bill Save Tips, Electricity Bill Kami Kashe Karayche, Electricity Bill Kami karne Tips, Electricity Bill Bachat, Light Bill Bachat Kashi Karaychi, Save Light Bill Tips