Students

विद्यार्थी सोप्या मार्गाने पैसे कसे कमवू शकतात | Easy Ways For Students To Make Money Marathi

आपण विद्यार्थी म्हणून पैश्यासाठी, आपल्या पॉकेटमनी साठी नेहमीच आपल्या पालकांवर अवलंबून असतो. पण जर आपल्या मध्ये काही कला असेल तर त्या कलेचा वापर करून आपण आपल्यासाठी स्वतःच पॉकेटमनी कमवू शकतो. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे घरी बसूनच पैसे कमावणे हे फारच सुकर झाले आहे, म्हणूनच आज आपण विद्यार्थी म्हणून तुम्ही शिक्षण घेता घेता कसे काही सोप्या मार्गाने पैसे कमवू शकता याची माहिती घेणार आहोत!

Easy Ways For Students To Make Money in Marathi

1) ब्लॉगिंग (Blogging)

जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल व तुमच्याकडे अशी काही माहिती असेल जी सर्वांनाच वाचायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच या पर्यायाचा विचार करू शकता. मागील काही वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे जलद पैसे कमावण्यासाठी ब्लॉगिंग हा एक चांगला पर्याय आहे.
तुम्ही सुरुवातीला Blogger, WordPress यांसारख्या साईट्स ची मदत घेऊन श्रीगणेशा करू शकता, व नंतर SEO सारख्या गोष्टी शिकून आपल्या वेबसाईटला अधिकाधिक सुंदर बनवू शकता.



2) अँफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

जर तुमची स्वतःची वेबसाईट असेल जिला दररोज शेकडो लोक भेट देत असतील तर अँफिलिएट मार्केटिंग हा व्यवसाय करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. यात तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या वेबसाईट्स वरील वस्तूंच्या लिंक्स आपल्या वेबसाइटवर टाकायच्या असतात. जर या लिंक्स च्या मदतीने एखाद्याने ती वस्तू खरेदी केली त्यातील काही रक्कम ही तुम्हाला मिळते. एकूणच फार कमी कष्ट असणारा असा हा व्यवसाय आहे.

3) फ्रीलांसिंग (Freelancing)

मागील काही वर्षांत नव्यानेच उदयाला आलेलं हे क्षेत्र आहे, ज्यात तुम्ही तुमच्या कौशल्याच्या जोरावर जगातील कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीस त्यांचे काम पूर्ण करून देऊ शकता.
यात प्रामुख्याने प्रोगेमिंग, ग्राफिक डिसाईनिंग, अनुवाद, शिकवणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.

जर तुमच्या कडे एखाद्या विषयावरील चांगली पकड असेल तर तुम्ही या क्षेत्रात चांगली प्रगती करू शकता.Upwork, Fiverr ही काही फ्रीलांसिंग साठीची प्रसिद्ध वेबसाइट आहेत.

4) यूट्यूब (Youtube)

आज यूट्यूबवर विडिओ पाहिले नाही असा माणूस आपल्याला शोधून देखील सापडणार नाही.हेच यूट्यूब आपण जर त्यावर त्यांचे नियम पाळून व्हिडिओस बनवले तर आपल्याला चांगले मानधन देते, शिवाय आपल्याला प्रसिद्धी देखील मिळते.

विद्यार्थी यावर विविध अभ्यासाशी निगडित गोष्टी तसेच संगीत, चित्रकला यांसारख्या विषयांवर व्हिडिओस बनवू शकतात व समाजात इतरांना मदत करून आपली एक वेगकी ओळख निर्माण करू शकतात.



5) शिकवणी (Teaching)

आपल्या प्रत्येकातच एक शिक्षक लपलेला असतो त्यामुळे विद्यार्थी देखील आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना शिकवून ज्ञानाचा प्रसार करू शकतात व मोबदल्यात काही मानधन कमवू शकतात. फक्त अभ्यासच नव्हे तर तुम्ही चित्रकला, संगीत या गोष्टी देखील इतरांना शिकवून काही पैसे कमवू शकता. आजकाल वेदांतू, छेग या सारख्या संस्था ऑनलाइन शिक्षक शोधत असतात. जर तुम्ही एखाद्या विषयात निपुण आहात, त्या क्षेत्रावर तुमचं प्रभुत्व आहे तर तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून देखील शिकवणी घेऊ शकता

6) शेअर बाजार (Share Market)

शेअर बाजार म्हंटल की पटकन आपल्याला जुगार हा शब्द आठवतो. पण शेअर बाजार खरंच जुगार आहे का? या विषयी आपण सविस्तर आपल्या वेबसाईटवर एक लेख लिहला आहे. खालील लिंकवर जाऊन तुम्ही हा लेख वाचू शकता

तर आजकाल एकदम स्वस्तात तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडून मिळते. झेरोधा, उपस्टॉक, ग्रो, 5 पैसा या सारख्या माध्यमांनी आता एकदम स्वस्तात तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडून मिळेल. त्यानंतर अभ्यास करून जर तुम्ही या क्षेत्रात गुंतवणूक करायला सुरुवात केलीत आणि इन्ट्राडे करण्याचे टाळून जर स्विंग ट्रेंडिंग च्या माध्यमातून पैसे कमावण्याचा प्रयत्न विद्यार्थी म्हणून करू शकता. यामुळे बचतीची आणि त्यातून गुंतवणूक करण्याची सवय लागेलचं शिवाय शेअर बाजारामुळे ज्ञानात अजून भर देखील पडेल, फक्त शेअर बाजाराच्या आहारी जाऊ नये

शेवटी विद्यार्थी असताना देखील तुम्ही अनेक चांगल्या मार्गांनी पैसे कमवून स्वावलंबी होऊ शकता व आपल्या आई-बाबांना आर्थिक बाबतीत थोडासा हातभार लावू शकता.
मग तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करत आहात आता?

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!