Shetkari

ई पीक पाहणी नवीन ॲप: माहिती, नोंदणी, Free डाउनलोड | Digital Crop Survey 3.0 Mobile App

नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, ई पीक पाहणी (E-Peek Pahani) करिता आता फक्त हे एकच Digital Crop Survey 3.0 Mobile App ऍप वापरले जाणार आहे, या बद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

E-Peek Pahani App Mahiti

मित्रांनो, आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर्फे वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध योजना व सुविधा पूरविल्या जातात. त्यामध्ये अनुदान, पीकविमा, नुकसान भरपाई इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. मात्र, अनेक पिकांची नोंद करण्यासाठी अद्ययावत पाहिजे तशी सुविधा नाही. त्यामुळे शासनाकडून मिळणारे अनुदान, विमा किंवा नुकसान भरपाई यांसारख्या गोष्टी शेतकऱ्यां पर्यंत पोचण्यास विलंब होत असतो.



यासर्व गोष्टींचा विचार करून आता शेती संबंधित असलेली बरीच कामे ऑनलाईन पध्दतीने केली जात आहेत. यामध्ये शेतीच्या इतर कामांसोबतच पिकांची पाहणी व पीक नोंद देखील ऑनलाईन पध्दतीने केली जात आहे. मित्रांनो, पीक पाहणी करन्यासाठी आधी शेतकरी ई पीक पाहणी ऍप वापरत होते. मात्र आता ई पीक पाहणी या ऍप चे नवीन व्हर्जन आले आहे. ते म्हणजे डिजिटल क्रॉप सर्व्हे 3.0 मोबाईल ऍप.

E-Peek Pahani App

या ऍप मध्ये पूर्वीपेक्षा अजून डेव्हलपमेंट करण्यात आली आहे. या ऍप द्वारे शेतकरी बांधव मोबाईल च्या साहाय्याने आता आपल्या शेताच्या बांधावर जाऊन स्वतः पिकांची नोंद करत आहेत. काय आहे हे नवीन अपडेटेड ऍप? आणि त्याचा उपयोग व वापर कसा करायचा या बद्दल आपण पुढे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….

डिजिटल क्रॉप सर्वे ऍप माहिती

सर्वात पहिले डिजिटल क्रॉप सर्वे या ऍप बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ या:-

मित्रांनो, डिजिटल क्रॉप सर्व्हे या ऍप ला केंद्र सरकार स्थरावरून स्वीकारण्यात आले असून, या मोबाइल ऍप द्वारे पिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या मोबाईल ऍप च्या माध्यमातून कृषी विभाग आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांना शेतात कोणती पिके घेतली जात आहेत, याची संपूर्ण माहिती संकलित करता येणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे डिजिटल पीक सर्वेक्षणात प्रशिक्षण हे खूप महत्वाचे आहे, आणि त्यासाठी आता प्रशिक्षणही दिले जाऊ लागले आहे.



मित्रांनो, पीक पाहणी करून नंतर त्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर होत असते. ही पीक पाहणी करणे आवश्यक तर असतंच, पण पीक पाहणी यशस्वी झाली की नाही हे तपासणे देखील गरजेचे असते. याचे कारण म्हणजे शासनाकडून मिळणारे अनुदान किंवा नुकसान भरपाई इत्यादी गोष्टींसाठी पीक पाहणी करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकरी कोणत्याही सरकारी योजनेपासून वंचीत राहणार नाही. या ऍप द्वारेच तुम्हाला तुमच्या पिकांची नोंद करता येणार आहे. मित्रांनो, या ऍप द्वारे महाराष्ट्र राज्यातील उन्हाळी हंगामाच्या 34 तालुक्यां मधील साडे तीन हजाराहून अधिक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करून GIS नकाशे शेतकऱ्यांना उपलब्ध देखील करून दिली जाणार आहेत.

डिजिटल क्रॉप सर्व्हे ऍप कशासाठी वापरावे?

मित्रांनो, डिजिटल क्रॉप सर्व्हे या ऍप द्वारे शेतकऱ्यांनी ज्या पिकांची लागवड केलेली आहे, त्या पिकांच्या क्षेत्रांची नोंद करता येणार आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाला कळेल की, कोणत्या पिकाची किती क्षेत्रात लागवड झाली आहे. यामुळे शासनाला उत्पादनाचा देखील अंदाज लावता येईल. आणि मग त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेख विभागा अंतर्गत काही योजना आणल्या जातात. हे डिजिटल क्रॉप सर्व्हे ऍप वापरण्यास सोपे असल्याने शेतकऱ्यांना ते सहज वापरता येईल.

मित्रांनो, पूर्वी पिकांची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागत होते. पण आता या ऍप मुळे शेतकऱ्यांना कुठेही जायची गरज नाही. ते स्वतः या मोबाईल ऍप द्वारे आपल्या पिकाची नोंद करू शकतात आणि पिकांची माहिती डायरेक्ट शासनाला पोहोचवू शकता. त्यामुळे शेतकऱ्याचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचणार आहे. शिवाय शेतकरी स्वतः ही नोंद करणार असल्याने पिकांची अचूक नोंद होईल.

आता डिजिटल क्रॉप सर्व्हे ऍप चा वापर कसा करायचा, त्या बद्दल जाणून घेऊ या:-

  1. मित्रांनो, डिजिटल क्रॉप सर्व्हे हे ऍप ई पीक पाहणी ॲप सारखेच आहे. किंबहुना हे ऍप ई पीक पाहणी ऍप चे नवीन व्हर्जन असून त्याला वापरणं देखील तितकंच सोपं आहे.
  2. हे ऍप वापरण्यासाठी तुम्हाला ते गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचे आहे. यासाठी तुम्हाला E-Peek Pahani ई-पीक पाहणी (DCS) असं सर्च करून ॲप डाऊनलोड करायचे आहे.
E-Peek Pahani App
  1. त्यानंतर ऍप ओपन करून तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल, तिथे तुम्हाला तुमचं नाव, गावं सिलेक्ट करायचं आहे, मग तुम्हाला तुमच्या गटाचा नंबर टाकायचा आहे व पुढे तुमच्या पिकाची नोंदणी करण्याकरिता ऑप्शन येईल.
E-Peek Pahani App Register Step 2
  1. पिकांची विचारलेली माहिती भरून आणि फोटो अपलोड करायचा आहे.
  2. आता ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायांचे आहे. ही माहिती डायरेक्ट राज्य शासनाकडे पोहचवून जाईल. अशा प्रकारे तुम्ही डिजिटल क्रॉप सर्व्हे ऍपचा वापर करून पिकांची नोंद करू शकता.
E-Peek Pahani App Register Step 3

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ई पीक पाहणी करिता आता फक्त हे एकच ऍप- Digital crop survey 3.0 mobile app वापरले जाणारे असून आपण त्या बद्दल माहिती जाणून घेतली. मित्रांनो, हे ऍप शेतकरी सहज वापरू शकतात. या ऍप द्वारे शेतकऱ्यांना खरीप व रब्बी दोन्ही ही हंगामातील पिकांची नोंद करता येणार आहे. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवादl

Tags: digital crop survey, ई-पीक पाहणी, डिजिटल क्रॉप सर्व्हे, ई-पीक पाहणी ॲप, e-peek pahani, e pik pahani kashi karavi 2024, kharip 2024 e peek pahani, kharif 2024 e peek pahani, e pik pahani navin mobile app, e peek pahani new mobile app, e peek pahani 3.0 app, digital crop survey mobile app, digital crop survey application, digital crop survey in Marathi, pik karj, pik karj 2024, pik karj kharip 2024, navin pik karj, navin pik karj 2024, pik karj yojana 2024, navin pik karj yojana, pik karj mahiti, pik karj navin mahiti, crop loan 2024, new crop loan 2024, crop loan 2024 information, पीक कर्ज, पीक कर्ज 2024, नवीन पीक कर्ज 2024, नवीन पीक कर्ज 2024 माहिती, नवीन पीक कर्ज योजना, खरीप हंगाम 2024 पीक कर्ज माहिती, tech with rahul

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!