Aadhaar Card

नवीन आधार कार्ड मध्ये हे 5 बदल जाणुन घ्या व 2 मिनटात डाऊनलोड करा | Download New Aadhaar Card

नमस्कार मित्रांनो, आता नविन आधार कार्ड आले आहेत, ज्यात काही महत्त्वाचे 5 बदल करण्यात आले आहेत, हे कोणते बदल आहेत आणि हे नवीन आधार कार्ड घरच्याघरी डाउनलोड कसे करायचे, या बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Navin Aadhaar Card Download Kase Karayche

मित्रांनो, आधार कार्ड (Aadhar Card) म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रापैकी एक आहे. आजकाल छोट्या मोठ्या कुठल्याही कामासाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसां पर्यंत आज सगळ्यांकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे. आधार कार्ड हे आपलं ओळखपत्र असल्याने त्याबद्दल प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच आधार बद्दल नवीन अपडेट म्हणजे आता आधार कार्डच्या स्वरूपात आता काही नवीन बदल करण्यात आले आहेत.



हे बदल म्हणजे त्या व्यक्तीची अधिक माहिती आधार कार्ड वर छापण्यात आली आहे. तुम्ही घरबसल्या हे नवीन प्रकारचे आधार कार्ड मागवून घेऊ शकता. आणि ते पीडीएफ रुपात डाउनलोड देखील करून घेऊ शकता. तर हे नवीन आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे त्या बद्दल आपण आधी जाणून घेणार आहोत.

नवीन आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे

नवीन आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे जे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला गुगल वर ssup.uidai.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे. या नंतर वेबसाईट ओपन झाल्या वर Login चा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.

Navin Aadhaar Card Download Kase Karayche Step 1

स्टेप 2: आता पुढे तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल, तो टाळून नंतर दिलेला कॅपचा जसा चा तसा टाकायचा आहे. व Send OTP ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

या नंतर तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी दिलेल्या जागी टाकून Login बटन वर क्लिक करायचे आहे.



Navin Aadhaar Card Download Kase Karayche Step 2

स्टेप 3: त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला आधार सर्व्हिस चे भरपूर ऑप्शन दिसतील. त्यातील दुसरा ऑप्शन Download Aadhaar या वर क्लिक करायचे आहे.

Navin Aadhaar Card Download Kase Karayche Step 3

स्टेप 4: शेवटच्या स्टेप मध्ये Download बटन वर क्लिक करा.

Navin Aadhaar Card Download Kase Karayche Step 4

स्टेप 4: या नंतर तुमचे आधार कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होईल, या आधार कार्ड ला ओपन करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड टाकावा लागेल. तो पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर कॅपिटल इंग्रजी मध्ये आणि सोबत तुमचे जन्म वर्ष असा टाकायचा आहे. या नंतर तुमचे आधार कार्ड ओपन होईल.

उदा. तुमचे नाव Sachin Ramesh Tendulkar आहे आपले जन्म वर्ष 1973 आहे
आपला आधार कार्डचा पासवर्ड – SACH1973

Navin Aadhaar Card Download Kase Karayche Step 5

नवीन आधार कार्ड मध्ये झालेले बदल

आता या नवीन आधार कार्ड मध्ये कोण कोणते बदल झाले आहेत ते पाहू या.

  1. मित्रांनो, या नवीन आधार कार्ड वर आता तुमच्या मूळ गावाचे नाव ही दिसणार आहे. त्यासाठी व्हि टी सी (VTC) म्हणजे village, town, city असा नवीन ऑप्शन यात वाढवण्यात आला आहे. यात
    व्हिलेज समोर तुमच्या गावाचे नाव दिसेल. टाऊन समोर तुमचा राहता पत्ता दिसेल आणि सिटी मध्ये तुमच्या शहराचे नाव दर्शविले जाईल.
    तसेच त्याच्यात खाली PO म्हणजे तुमच्या जवळचे पोस्ट ऑफिस दर्शविले जाईल.
  2. दुसरा बदल असा की आधारा कार्ड वरील तुमच्या फोटोच्या डाव्या बाजूला आता तुम्हाला आधार कधी जारी करण्यात आले ती तारीख दिसणार आहे.
Navin Aadhaar Card Badal
  1. त्यानंतर तिसरा बदल म्हणजे आधार वर तुमच्या नाव व जन्म तारीख झाल्या वर खाली एका मोठया बॉक्स मध्ये सूचना देखील दिली असणार ज्यात आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणजेच प्रूफ ऑफ आयडेंटिटी आहे आणि हे कोणतेही ओनरशीप तसेच जन्म दाखल्याचा पुरावा साध्य करत नाही. असे नमूद केलेले आहे.
  2. चौथा बदल म्हणजे आधार कार्ड च्या मागच्या बाजूला ते कार्ड कधी डाउनलोड करण्यात आले आहे ती तारीख दिसणार आहे.
  3. पाचवा आणि शेवटचा बदल म्हणजे आधार कार्ड च्या मागच्या बाजूस आधार नंबर दिला आहे त्याच्या खाली व्ही आई डी (VID) नंबर देखील दिसणार आहे.
    अशाप्रकारे हे पाच नवीन आधार कार्ड चे बदल आहेत.

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)

नवीन आधार कार्ड घरी कसे मागवायचे?

मित्रांनो, हे नवीन आधार कार्ड घरी मागवण्यासाठी तुम्हाला आधार च्या विविध सर्व्हिसेस मध्ये खालीच एक तिसरा ऑप्शन दिसेल Order Aadhar PVC card. यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार वरची सर्व माहिती चेक करा आणि नेक्स्ट बटन वर क्लिक करून 50 रू चे पेमेंट करून तुम्ही तुमचे नवीन आधार कार्ड घरी पोस्टाने मागवू शकता.

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण नवीन आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे व त्यात कोणते बदल झाले आहेत, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: Navin Aadhaar Card Download, Aadhaar Card Download, New Aadhaar Card Download, New Aadhaar Card Download Marathi, Aadhaar Card Download in Marathi, Update Aadhaar Card Download, Aadhaar Card Download info in Marathi, Aadhaar Card Download information in Marathi, Adhaar Card Download Mahiti, Aadhaar Card Download Mahiti, New Aadhaar Card Update Marathi, New Aadhaar Card Update Information, New Aadhaar Card Update info in Marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!