ATM CardBankDebit Cardक्रेडिट कार्ड (Credit Card)

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती – फरक, फायदे-तोटे, प्रकार

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे. तसेच या कार्ड मध्ये काय फरक असतो हे पण बघणार आहोत त्याच बरोबर व्हिसा, मास्टर, रुपये कार्ड यांची सुद्धा माहिती घेणार आहोत.

Credit Card, Debit Card Information in Marathi

डेबिट कार्ड

आजच्या जगात डेबिट कार्ड हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. कारण आजकाल सगळीकडे कॅशलेस सुविधा आपल्याला उपलब्ध आहे आणि आजकाल सर्वांकडे डेबिट कार्ड आहे. त्यामुळे आपल्याला व्यवहार करताना पैशांची गरज भासत नाही आपण कोणत्याही ठिकाणी डेबिट कार्डद्वारे पेमेंट करू शकतो. डेबिट कार्ड मुळे मोठमोठे सर्व प्रकारचे व्यवहार हे लवकर आणि सोपे होतात. समजा आपल्याला कधी काही अडचण आणि किंवा पैशांची गरज असली तर आपल्याला बँक उघडण्याची वाट बघावी लागत नाही डेबिट कार्ड असल्यामुळे आपली गैरसोय होत नाही आणि आपले कामेही लवकर होतात.



आपण आता बघूया डेबिट कार्ड म्हणजे काय? डेबिट कार्ड चा वापर कसा करावा? कार्ड कसे मिळवावे व त्याचे फायदे आणि तोटे ही सर्व माहिती आपण बघणार आहोत. जी तुमच्यासाठी खूप फायद्याची आणि उपयोगी पडणारी आहे.

डेबिट कार्ड हे प्लास्टिक पासून बनवलेले असते ते आपल्याला आपण जेव्हा बँकेत अकाऊंट उघडतो तेव्हा जर आपल्याला त्याची गरज असेल तर बँकेद्वारे आपण ते घेऊ शकतो. डेबिट कार्ड चा आकार 85.60mm×53.98mm एवढा असतो. डेबिट कार्ड हे आपले अकाऊंट ला जोडलेले असते.

डेबिट कार्ड पाहिजे असल्यास आपल्याला दोन पद्धतीने बँकेकडून ते घेता येते पुढील पद्धतीचा वापर करून आपण ते घेऊ शकतो:-

  1. ऑनलाईन बँकेला अर्ज करून (नेट बँकिंग किंवा वेबसाइट वर माहिती भरून)
  2. जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करून

घरी राहून जर आपल्याला डेबिट कार्ड काढायचे असेल तर आपण आपल्या मोबाईल द्वारे किंवा आपल्याकडे कॉम्पुटर असेल तर त्याद्वारे बँकेच्या वेबसाईटवर आपल्याला अर्ज द्यावा लागतो. जर आपण बँकेत जाऊन डेबिट कार्ड काढणार असाल तर आपल्याला एक अर्ज देऊन त्या अर्जाला आपल्या आधार कार्डची प्रत जोडून बँकेत जमा करावी लागते.

वरील सांगितल्याप्रमाणे कोणत्या प्रकारे आपण डेबिट कार्ड साठी अर्ज करू शकतो. आणि अर्ज केल्यानंतर काही दिवसातच आपण अर्जामध्ये दिलेल्या पत्त्यावर डेबिट कार्ड हे पोस्टाने येते. त्यांनी आपल्या डेबिट कार्ड सोबत एक पिन नंबर पण एक नंबर द्वारे आपण डेबिट कार्डचे व्यवहार करू शकतो. डेबिट कार्डचा वापर आपण अनेक ठिकाणी करू शकतो. जसे की पेट्रोल पंपांवर, फोन मध्ये किंवा हॉटेलमध्ये आपल्या बिल भरण्यासाठी वापर करू शकतो. तसेच ऑनलाइन शॉपिंग, मोबाईल बिल, लाईट बिल अशा अनेक प्रकारचे बिल भरण्यासाठी डेबिट कार्डचा उपयोग होतो.



क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड जे असतं ते एटीएम सारखाच एक कार्ड असत. क्रेडिट कार्ड चे फंक्शन हे एटीएम कार्ड सारखेच असतात पण काहींना पिन नसतो. क्रेडिट कार्ड मध्ये बँक आपल्याला आपला सिबिल स्कोर नुसार एक लिमिट देते, म्हणजे आपल्याला पैसे देतात जसे दहा हजार, वीस हजार, तीस हजार एवढे किंवा त्यापेक्षा जास्त.

जेव्हा आपण क्रेडिट कार्ड साठी अर्ज करतो तेव्हा बँक आपल्या क्षमतेनुसार म्हणजे जेवढा आपला इन्कम आहे त्यानुसार आपल्या एका लिमिट पर्यंत पैसे वापरण्याची मुभा देते. क्रेडिट कार्ड मध्ये आपल्याला कॅश काढण्याची सुविधा नसते आणि असली तरी ५% ते १०% एवढी असते तसेच. पण आपण कॅश काढली तर आपल्याला नुकसान होऊ शकते कारण कॅश काढल्यानंतर त्याचे आपल्याला व्याज द्यावे लागते. आणि जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग केली किंवा कार्ड स्वाईप केलं तर त्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचे व्याज लागत नाही.

जेवढे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पैसे खर्च करतात तेवढेच आपल्याला बँकेला परत द्यावे लागतात. तसं बघायला गेलं तर आजकाल सर्वांनाच क्रेडिट कार्डचं आकर्षण आहे. त्याचं कारणही तसंच आहे आपल्या पगारापेक्षा आपला खर्च हा जास्त वाढला आहे त्यामुळे सर्वच लोक क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतात. महिनाभर खर्च करून आपण आपला पगार झाल्यानंतर त्याचे बिल भरू शकतात क्रेडिट कार्डद्वारे आपण एखादी मोठी वस्तू सुद्धा घेऊ शकतो म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत ही खूप जास्त आहे जी आपण सोबत भरू शकत नाही तर क्रेडिट कार्डवर तीच वस्तू आपण EMI वर पण घेऊ शकतो म्हणजे ती वस्तू घेतल्यानंतर त्याचे पैसे आपण प्रत्येक महिन्याला ठराविक तारखेच्या दिवशी भरू शकतो.

एटीएम कार्ड

आपण बघतो या देशात सगळीकडे पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जातो एटीएम म्हणजे Automatic Teller Machine असा आहे. एटीएम कार्ड द्वारे आपण देशभरातून कुठेही पैसे काढू शकतो. साधारण सर्व डेबिट कार्ड ला एटीएम कार्ड म्हंटले जाते. एटीएम कार्ड मुळे तुम्हाला बँकेत जाऊन लाईन मध्ये उभ राहून बँकेतून पैसे काढण्याची गरज लागत नाही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार सोयीनुसार कुठेही सहज पैसे काढू शकता. ATM कार्डमुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीची मदत न घेता सहज पैसे काढू शकता.

ATM हे फक्त पैसे काढण्या पुरते ते वापरता येते असं काही नाहीये एटीएम कार्ड द्वारे तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मधील सर्व माहिती बघू शकता. छोटे स्टेटमेंट तुमच्या बँकेतील अकाउंट चे बघू शकता. दोन बँक अकाउंट मध्ये व्यवहार पण करू शकतो. बिलांची पैसेही देऊ शकता आपण आपले पैसे एटीएमद्वारे डिपॉझिट करू शकतो. या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांना ठरवलेली किंमत देखील द्यावी लागते. एटीएम कार्ड हे सुरक्षित व्यवहारासाठी वापरलं गेलं पाहिजे म्हणून मॅग्नेटिक स्ट्रिप ऐवजी आता EMV Chip सोबत बनवलं जातं.

डेबिट, क्रेडिट, एटीएम कार्ड मधला फरक

एटीएम कार्ड (ATM CARD)

एटीएम कार्डचा उपयोग हा फक्त कॅश काढण्यासाठी केला जातो. या कार्डच्या ट्रांजेक्शन साठी तुम्हाला एक पिन नंबर ची गरज लागते. एटीएम कार्ड हे आपल्या करंट अकाउंट व सेविंग अकाउंट ला जोडलेले असत. आपलं अकाऊंट जर एका बँकेत आहे, तर समजा तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले तर तुम्हाला त्याचा चार्ज द्यावा लागतो. जेवढे पैसे तुमच्या अकाउंट मध्ये आहेत तेवढेच पैसे तुम्ही एटीएम/डेबिट कार्डनी एटीएम मधून काढू शकता किंवा तेवढ्याच पैशाची शॉपिंग करू शकता.

डेबिट कार्ड (Debit Card)

डेबिट कार्ड हे एटीएम कार्ड सारखेच असते, पण एटीएम कार्ड पेक्षा जास्त सुविधा डेबिट कार्ड असतात. पण त्यात क्रेडिट ची सुविधा नसते एटीएम कार्ड सारखच आपली खरेदी करण्यासाठी चार अंकी पिन नंबर ची गरज असते. एटीएम मशीन सारखाच डेबिट कार्ड आपण दुकानांमध्ये किंवा हॉटेलमध्ये देखील वापरू शकतो. एटीएम कार्ड सारखं डेबिट कार्ड मधून तुम्हाला सेविंग अकाउंट मधून पैसे काढण्याची सुविधा देखील असते. डेबिट कार्ड हे क्रेडिट कार्ड पेक्षा वेगळे आहे, तुम्हाला याचे व्याज द्यावे लागत नाही.

क्रेडिट कार्ड (Credit Card)

क्रेडिट कार्ड द्वारे तुम्ही एटीएम मधून सुद्धा पैसे काढू शकता (पण त्यावर व्याज आणि जास्तीचे चार्जेस लागतात). तुमचा सिबिल स्कोर बघूनच बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देते. क्रेडिट कार्ड ग्राहक कोणती प्रॉडक्ट ऑनलाईन/ऑफलाईन/EMI खरेदी करू शकता. क्रेडिट कार्ड ला एक लिमिट असते त्या लिमिट नंतर तुम्ही पैसे खर्च शकत नाही. क्रेडिट कार्ड ट्रांजेक्शन वर खूप सारे ब्रँड आकर्षक असे डिस्काउंट पण देतात. क्रेडिट कार्डचे बिल तुम्ही वेळेवर नाही भरलं तर तुम्हाला त्याच व्याज सुद्धा द्यावा लागत.

RuPay कार्ड काय आहे?

20 मार्च 2012 या दिवशी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने “RuPay” कार्ड लॉन्च केला आहे.
त्यामध्ये पेमेंट साठी लागणारे कमिशन हे मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड या दोन्ही कार्ड पेक्षा खूप कमी आहे. त्याचा वापर भारतात खूप जास्त होतो RuPay कार्ड भारतात लॉंच करून प्रगतीकडे वाटचाल केली आहे. या कार्डला भारताने दुसऱ्या देशांमध्ये पण लॉन्च केले आहे. RuPay कार्डची रोजची Withdrawal लिमिट 25 हजार ते १ लाख असू शकते.

मास्टर आणि व्हिसा कार्ड मधील फरक

मास्टर कार्ड आणि व्हिसा कार्ड या दोन्ही अमेरिकेतील कंपन्या आहे. या कंपन्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्षेत्रात कार्यरत आहे. जगभरात त्यांचा व्यवसाय चालतो त्यामुळे भारताने सुद्धा RuPay कार्ड आणून या क्षेत्रात आपले स्थान बनवायला सुरुवात केली आहे. मास्टर कार्ड आणि व्हिसा कार्ड या दोन्ही कंपन्या पेमेंटसाठी RuPay कार्डच्या तुलनेत जास्त कमिशन घेतात.

मास्टर कार्ड आणि व्हिसा कार्डद्वारे तुम्ही भारतात एटीएम मधून रोज कमीत कमी शंभर रुपयांपासून ते जास्तीत जास्त एक लाखापर्यंत पैसे काढू शकता. तर दुसऱ्या देशात चाळीस हजार रुपयांप्रमाणे त्यांच्या करन्सी प्रमाणे पैसे काढू शकता. दुसऱ्या देशांमध्ये व्हिसा कार्डची कमीत कमी रोज ची कॅश विथड्रॉव्हल वेगवेगळ्या एटीएम मध्ये वेगवेगळी असते.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!