कोणत्याही कोर्ट केसची तारीख आणि केस स्टेटस ऑनलाइन पहा (App मध्ये) | Check Court Case Date & Case Status Online
नमस्कार मित्रांनो, आज आपण कोणत्याही कोर्ट केस चे स्टेटस चेक कसे करायचे? तसेच फक्त तुमचं नाव टाकून तुमच्या नावावर कोणती केस आहे का ते चेक कसे करायचे? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आपल्या भारतातील न्याय व्यवस्थेमध्ये लाखो खटले आहेत. काहींचा निकाल लागून जातो तर काही अजून ही प्रलंबित आहेत. यात ज्यांच्या कोर्ट केसेस प्रलंबित आहेत, त्यांना आपली कोर्ट केस कुठ पर्यंत आली आहे, त्याच सध्याच स्टेटस काय आहे, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी लोकांना एकतर कोर्टात तरी जावं लागत किंवा वकीलांशी वारंवार संपर्क तरी साधावा लागतो. या सगळया गोष्टीं मध्ये खूप वेळ आणि पैसा देखील जातो.
पण मित्रांनो, आत्ताच्या डिजिटल युगात, भारत सरकार आणि विविध न्यायालयांनी ऑनलाइन वेबसाईट द्वारे आणि मोबाईल ऍप च्या माध्यमातून कोर्ट केस संबंधित असणारी सर्व माहिती सहज उपलब्ध करून दिली आहे. यासाठी सरकारने नागरिकांच्या सोयी व सुविधा साठी ‘e Courts Services App’ हे एक अधिकृत मोबाइल ऍप सुरू केले आहे, ज्याद्वारे नागरिक भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयातील किंवा जिल्हा किंवा सत्र न्यायालयातील (District & Sessions Courts) केसेसचे स्टेटस मोबाईल वरून चेक करू शकतात. अगदी तुम्ही तुमचा नाव टाकून तुमच्या नावावर कोणती केस आहे का ते देखील चेक करू शकता. याशिवाय ऍपचा वापर करून केसची तारीख, स्टेटस, निकाल, पुढील तारीख इत्यादी माहिती काही सेकंदात मिळवता येते. त्यामुळे तुम्हाला ही तुमच्या कोर्ट केसची माहिती किंवा स्टेटस काही सेकंदात पहायचे किंवा चेक करायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….
कोर्ट केस स्टेटस/ माहिती ऑनलाइन तपासा
मित्रांनो, कोर्ट केस चेक करण्याचे दोन प्रकार उपलब्ध आहेत. एक वेबसाईटद्वारे व दुसर म्हणजे ऍप द्वारे. आज या लेखात आपण मोबाईल ऍप द्वारे आपल्या कोर्ट केस ची स्थिती म्हणजेच स्टेटस चेक कसे करायचे, या बद्दल जाणून घेणार आहोत…..
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल च्या प्ले स्टोअर वरून e Court Services हे ऍप इन्स्टॉल करून घ्यायच आहे.

स्टेप 2: ऍप ओपन केल्यावर तुम्हाला सर्च करायचं आहे, इथे तुम्ही तुमच्या केस चा CNR नंबर टाकून तुमच्या कोर्ट केस ची स्थिती तपासून घेऊ शकता. पण त्या आधी ऍप च्या होम पेज वर दिलेल्या तीन लाइन असलेल्या ऑप्शन वर क्लिक करून Setting या पर्यायावर क्लिक करायचे आहे
व तुम्हाला कोणत्या कोर्ट बद्दल जाणून घ्यायचे आहे ते कोर्ट सिलेक्ट करायचे आहे.

स्टेप 3: यासाठी इथे तुम्हाला High court, District court , आणि both असे ऑप्शन दिलेले आहेत. तुमची केस ज्या कोर्ट मध्ये असेल ते कोर्ट इथे सिलेक्ट करायचं आहे. आपण इथे High court सिलेक्ट करणार आहोत. आणि मग Ok बटन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 4: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला CNR नंबर चा ऑप्शन बघायला मिळेल. CNR नंबर हा तुम्हाला तुमच्या वकिलकडून मिळवू शकता किंवा जेव्हा तुम्ही केस करता तेव्हा हा CNR नंबर दिला जातो. हा नंबर टाकून तुम्ही तुमची कोर्ट केस ची स्थिती पाहू शकता.

पण जर तुम्हाला CNR नंबर माहीतच नसेल तर कोर्ट केस ची स्थिती तपासण्याच इतरही अनेक पर्याय इथे उपलब्ध करून दिले आहेत. जसे की तुम्ही Case Status या ऑप्शन मध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिले आहे. जसे की केस नंबर, filing number, FIR number, Advocate (यामध्ये तुम्ही तुमच्या वकिलाची नाव टाकून तुमची केस सर्च करू शकता) इत्यादी.
CNR नंबर कसा शोधायचा
स्टेप 1: मित्रांनो, जर तुमच्या कडे वरील पैकी काहीच नसेल तर तुम्ही Party या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 2: त्या नंतर तुम्हाला कोणत्या हाय कोर्ट ची केस चेक करायची आहे ते हाय कोर्ट सिलेक्ट करायचं आहे. त्या नंतर bench सिलेक्ट करायचं आहे. त्या नंतर Party ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. (जर तुम्ही वरती district सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला इथे state आणि district म्हणजेच तुमचा जिल्हा सिलेक्ट करावं लागेल.)
स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला petitioner (ज्याने केस केली आहे ती व्यक्ती) किंवा Respondent ( ज्याच्यावर केस केली ती व्यक्ती) यांचे नाव टाकायचे आहे, त्या नंतर खाली केस रजिस्ट्रेशन ची तारीख टाकायची आहे व नंतर pending/ disposed/ both यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडून Go बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4: नंतर Case नंबर वर क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला त्या नावावर जेवढ्या केस असतील त्यांचे डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यात case type, filing number, filing date, registration number/ date, CNR number, तसेच first hearing date कधी होती, next hearing date कधी आहे, याची माहिती दिलेली असते.

स्टेप 5: तसेच जर तुमच्या कडे फक्त केस नंबर असेल तर तो टाकून, केस टाइप टाकून तुम्ही तुमच्या केसची संपूर्ण माहिती पाहू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण कोणत्याही कोर्ट केस चे स्टेटस चेक कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवादl
FAQ
e- Courts Services App काय आहे?
मित्रांनो, e- Courts Services App हे भारत सरकारच्या न्याय विभागाने विकसित केलेले एक अधिकृत ऍप आहे, ज्याद्वारे भारतीय नागरिक जिल्हा आणि सत्र न्यायालयातील खटल्यांची माहिती ऑनलाइन पाहू शकतात.
कोर्ट केसचे स्टेटस तपासण्यासाठी कोणती माहिती लागते?
मित्रांनो, तुम्ही खालील पैकी कोणतीही माहिती वापरून तुमच्या केस ची माहिती शोधू शकता:
CNR नंबर
पक्षकाराचे नाव (Party Name)
वकीलाचे नाव (Advocate Name)
केस क्रमांक (Case Number)
FIR नंबर
केस टाइप वगैरे.
CNR नंबर नसल्यास काय करावे?
मित्रांनो, तुम्हाला जर CNR नंबर माहीत नसेल, तर तुम्ही इतर पर्याय वापरू शकता, जसे की पक्षकाराचे नाव, वकीलाचे नाव, किंवा केस क्रमांक वापरून देखील केस शोधू शकता.
e- Courts Services App वापरण्यास सुरक्षित आहे का?
हो मित्रांनो, हे ऍप सरकारने विकसित केलेले अधिकृत ऍप आहे, त्यामुळे वापरण्यास पूर्णतः सुरक्षित आहे.
प्रत्यक्ष कोर्टात जाण्या ऐवजी हे ऍप वापरू शकतो का?
हो मित्रांनो, प्रत्यक्ष कोर्टात जाण्या ऐवजी प्राथमिक माहिती किंवा केसचा अपडेट किंवा स्टेटस जाणून घेण्यासाठी हे ऍप अतिशय उपयुक्त ठरते. मात्र, असे असले तरी काही महत्वाच्या कार्यवाहीसाठी कोर्टात हजर राहणे आवश्यक असते.
Tags: कोर्ट केस स्टेटस, कोर्ट केस माहिती ऑनलाइन, कोर्ट केस तपासा, कोर्ट केस स्टेटस महाराष्ट्र, कोर्ट केस स्टेटस App, कोर्ट केसची माहिती, ऑनलाइन कोर्ट केस, कोर्ट केस स्टेटस Online, Court Case Status, Court Case Online, Court Case Maharashtra, Check Court Case Online, Court Case App, Court Case Details, Court Case Status Online, Court Case Info, Maharashtra Court Case