मजबूत, टिकाऊ कपडे वाळत घालण्याचे स्टँड | Top 5 Best Clothes Drying Stand
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण कपडे सुकन्यासाठी वापरले जाणारे रॅक/स्टँड बद्दल जाणून घेणार आहोत. तसेच भारतातील सर्वात चांगले रॅक स्टँड कोणते आहेत त्याबद्दल ही माहीत करून घेणार आहोत.
मित्रांनो, घर छोटे असल्यास किंवा बाल्कनी छोटी असेल तर कपडे सुकवणे जरा कठीण जाते, त्यातपण जर पावसाळा असेल तर मग कपडे वाळवणे खूपच अवघड असते. मग हे कपडे सुकवायचे कुठे व कसे, हा प्रश्न पडतो. त्यासाठी तुम्ही कपडे सुकवायचे रॅक/स्टँड खरेदी करू शकता. या रॅक स्टँडमुळे कपडे सुकवणे सोपे जाते. कारण या रॅक स्टँड ला जागा कमी लागते. तसेच ते फोल्डेबल असतात आणि तुम्ही घरात फॅनखाली ठेवून कपडे सुकवू शकतात. पण कपडे सुकवण्यासाठी कोणते रॅक स्टँड घ्यावे, ते कसे वापरावे, त्यात कोणते फीचर असावेत, या सर्वांबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
कपडे सुकवण्याचे रॅक स्टँड खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
मित्रांनो, बदलत्या ऋतू मध्ये कपडे सुकवणे कठीण काम असते, तसेच जागा कमी असेल तर सर्व कपडे सुकवणे अशक्य असते. अश्या वेळी एक पर्याय म्हणजे कपडे सुकवण्याचे स्टँड. हे कपडे सुकवण्याचे स्टँड वेग-वेगळ्या साईझ मध्ये येते. पण कोणती साईझ चे स्टँड घ्यावे, कोणत्या मटेरियल चे स्टँड घ्यावे अश्या बऱ्याच गोष्टी बद्दल लोकांना माहीत नसते. त्यामुळे कपडे सुकवण्याचे स्टँड खरेदी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या…
- जेव्हा तुम्ही कपडे सुकवण्याचे स्टँड घ्यायला जाल तेव्हा ते स्टँड कोणत्या मटेरियल चे बनले आहे ते तपासून बघा. कारण ओल्या कपड्यांमुळे तसेच हवेत राहिल्यामुळे स्टँडला गंज वगैरे लागण्याचे शक्यता असते. त्यामुळे शक्य असल्यास गंज मुक्त व स्टेनलेस स्टील चे स्टँड खरेदी करावे.
- या स्टँड वर आपण ओले कपडे टाकणार आहोत, आणि तुम्हाला तर माहीतच आहे की ओल्या कपड्यांचे वजन जास्त असते, त्यामुळे स्टँड खरेदी करताना तो मजबूत, टिकाऊ, आणि हेवी ड्युटी फिचर असणारा म्हणजे पाच ते पन्नास किलो चे वजन पेलणारा स्टँड असावा.
- तसेच कपडे सुकवण्याचे स्टँड जास्त जड नसावे. कारण पावसाळ्यात तुम्हाला आत बाहेर करावे लागते. त्यामुळे प्रत्येक वेळी स्टँड उचलून न्यावे लागेल. म्हणून स्टँड खरेदी करताना त्याचे वजन जास्त नसावे.
- मित्रांनो, ओले कपडे सुकवण्यासाठी स्टँडची डिझाइन नक्की पहा. असे स्टँड निवड जे फोल्डेबल असेल, कमी जागा व्यापणारे असेल म्हणचे स्टँड जितके कॉम्पॅक्ट असेल तितके चांगले.
भारतातील सर्वात चांगले कपडे सुकवण्याचे रॅक स्टँड
Best Clothes drying stand in India
चला तर बघुयात सर्वात चांगले मजबूत टिकाऊ कपडे सुकवण्याचे स्टँड / कपडे वाळत घालण्याचे स्टँड
LiMETRO Stainless Steel Foldable Cloth Dryer Stand (लिमेट्रो)
मित्रांनो, कपडे सुकवण्याच्या रॅक स्टँड मधले हे एक बेस्ट drying स्टँड आहे. तसेच LiMETRO चे ब्रँड हा त्याच्या चांगल्या क्वालिटीच्या स्टेनलेस स्टीलसाठी ओळखला जातो. हे रॅक सुद्धा स्टेनलेस स्टील चेच बनलेले आहे. हे रॅक स्टँड गंज मुक्त आणि वॉटर प्रूफ आहे. तसेच कुठल्याही सिझनमध्ये इनडोअर किंवा आऊट डोअर तुम्ही हे रॅक वापरू शकता. याशिवाय हे रॅक पोर्टेबल असून या प्रोडक्ट चे वजन 4.1 किलो आहे. याची किंमत ही अंदाजे 2000 रुपये च्या आसपास असू शकते. तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला सहा महिन्यांची वॉरंटी मिळते.
Amazon Basics Indoor Clothes Dryer Tower (ऍमेझॉन बेसिक)
मित्रांनो, अमेझॉनचे हे कपडे सुकवण्याचे रॅक स्टँड खुप मजबूत डिझाइनचे आहे. तसेच मोठ्या फॅमिलीसाठी तर हे रॅक टॉवर एक उत्तम पर्याय आहे. या रॅकला तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये, छतावर किंवा पावसाळ्यात घरात सुद्धा ठेवू शकता. तसेच तुम्हाला यात सहा फोल्डेबल विंग्स मिळतात. ज्यामुळे तुम्हाला भरपूर स्पेस मिळतो. तसेच काही सेपरेट पोल्स असलेल साइड विंग्स मिळतात, ज्यावर तुम्ही छोटे कपडे किंवा टी शर्ट वगैरे टाकू शकता. जर तुम्हाला मोठ्या कपड्यांमधील अंतर वाढवायचे असेल आणि छोट्या कपड्या मधील अंतर कमी करायचे असेल तर तुम्ही त्याची लेव्हल ऍडजस्ट करू शकता. हे स्टँड व्हील्स सह येते, त्यामुळे तुम्ही याला एका जागे वरून दुसऱ्या जागी हलवू शकता.
तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते. याची किंमत बघायची झाली तर ते तुम्हाला 2000 रुपयेच्या जवळ पास मिळू शकते. तसेच हे रॅक स्टँड ओल्या कपड्यांचे 35 ते 45 किलो वजन पेलू शकते. आणि यात तुम्हाला प्लास्टिक कोटिंग दिली जाते.
Happer Premium Cloth Drying Stand with Wheels (हापर)
मित्रांनो, हे रॅक स्टँड 30 किलो कपड्याचा भार सांभाळू शकतो. यामध्ये 24 रॉड व 55 लिनीअर फीट कपडे सुकवण्याची जागा आहे. यामध्ये सहा फोल्डेबल विंग्स येतात. तसेच हे रॅक स्टँड फोल्डेबल आहे. त्यामुळे वापर झाल्यानंतर तुम्ही याला फोल्ड करून ठेवू शकता. तसेच याला जास्त जागा लागत नाही. याची किंमत ही अंदाजे 2400 रुपये च्या आसपास असू शकते. तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते.
LivingBasics Stainless Steel Cloth Drying Stand (लिव्हिंग बेसिक्स)
मित्रांनो, यामध्ये तीन लेअर जंबो फोल्ड आहेत. तसेच हे सहा फोल्डेड विंग्स आणि 24 रॉड आहेत. याचे ऍडजस्टेबल विंग्समुळे याला खूप कमी जागा लागते. त्यामुळे एखाद्या कमी जागेत पण हे राहू शकते. तसेच प्रत्येक दोन रॉडच्या मध्ये खूप स्पेस दिला आहे. त्यामुळे कपडे व्यवस्थित सुकतात. हे स्टँड 50 किलोच्या ओल्या कपड्यांचे वजन उचलू शकते. इतके हे मजबूत आहे. याचे रॉडस हे वॉटर प्रूफ व रस्ट फ्री म्हणजे गंज मुक्त आहेत. याची किंमत ही अंदाजे 3500 रुपये पर्यंत मिळू शकते. तसेच या प्रोडक्ट वर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते.
Parasnath 3 Poll Steel Clothes Drying Stand (पारसनाथ)
मित्रांनो, सर्व प्रकारच्या कपड्यांसाठी हा रॅक स्टँड बनलेला आहे. तसेच याची कॅपॅसिटी पण पुरेशी आहे. जास्तीत जास्त 40 किलोचा भार हा रॅक सांभाळू शकतो. यात तुम्हाला तीन पोल्स व तीन लेयर मिळतात. ज्यामध्ये तुम्ही लहान व इतर कपडे तसेच बेडशीट ही सुकवू शकता. कपडे सुकवण्याचे हे रॅक स्टँड सॉलिड स्टील चे बनलेले आहे. तसेच वॉटर प्रूफ असल्याने ते गंजत नाही. याच्या स्टँडला खाली व्हील्स दिल्या आहेत त्यामुळे तुम्ही हे स्टँड घरात कुठेही हलवू शकता. स्पेअर कपडे सुकवण्यासाठी यात अतिरिक्त हँगर दिले गेले आहेत. याची किंमत अंदाजे 2400 रुपयेच्या आसपास असू शकते. व या प्रोडक्ट वर तुम्हाला दहा वर्षाची वॉरंटी मिळते.
विविध प्रकारचे कपडे सुकवण्याचे रॅक स्टँड
मित्रांनो, कपडे सुकवण्याचे रॅक स्टँड चे काही प्रकार पण असतात. त्यापैकी काही प्रकारचे रॅक स्टँड ची माहिती खाली दिली आहे. त्याचा पण तुम्हाला नक्की उपयोग होईल.
फ्रिस्टॅण्डिंग रॅक – मित्रानो, कपडे सुकवण्याचे हे रॅक स्टँड खूप मोठे असतात. आणि घरात वापरण्यासाठी अगदी योग्य असतात. या रॅकला हवा मिळवण्यासाठी व कपडे सुकवण्यासाठी आजूबाजूला मोकळी जागा हवी असते. जर तुम्हाला फ्रीस्टॅण्डिंग रॅक घ्यायचे असेल तर शक्यतो व्हील्स म्हणजे चाक असलेले रॅक स्टँड घ्या, जेणे करून तुम्हाला ते गरजे नुसार हलवता येईल.
वॉल माउंटेड (Wall Mount) भिंतींना फिट केलेले
मित्रांनो, नावाप्रमाणेच हे रॅक स्टँड भिंतींना फिट केले जातात. याचा पण चांगला उपयोग होतो. हे वॉल माउंटेड रॅक स्टँड फोल्ड करता येतात, त्यामुळे वापर झाल्यानंतर तुम्ही या रॅक स्टँड ला फोल्ड करून ठेवू शकता. यामुळे तुमची जागा पण वाचते. फक्त एकदा फिट केल्या नंतर तुम्ही या रॅक स्टँड ला भिंतीतून काढू शकत नाही. पण आवश्यकता असेल तेव्हा बाहेर खेचुन हा वॉल माउंटेड रॅक स्टँड पाहिजे तेवढा पसरवता येतो. व काम झाल्यावर परत दुमडून ठेवता येतो.
सईलींग माउंटेड (Ceiling Mount) छताला टांगते
मित्रांनो, हे स्टँड तुमच्या Ceiling ला म्हणजेच छताला बसवले जातात. याची खासियत म्हणजे या रॅक स्टँड ला दोरी व स्ट्रिंग बसवलेले असतात. या स्ट्रिंगच्या मदतीने तुम्ही ड्राइंग रॅक खाली खेचू शकता. त्यावर कपडे टाकून परत स्ट्रिंगच्या सहाय्याने ते वर ओढू शकता. कपडे वर छताला लावल्यामुळे तुमच्या येण्या जाण्याच्या मार्गात कपडे येत नाही. तसेच हा ceiling माउंटेड रॅक स्टँड वापरण्यासाठी तुम्हाला शिढी किंवा स्टेप स्टूल घेण्याची गरज भासत नाही.
ओव्हर द डोअर (Over the Door) दारावर लटकवलेले
मित्रांनो, हा रॅक तुम्ही दरवाजाच्या वरच्या बाजूला बसणारा ड्राइंग रॅक आहे. जेव्हा तो वापरात नसतो तेव्हा त्याला दरवाजाच्या बाजूला दुमडून ठेवता येतो. त्यामुळे दरवाजा उघडणे, बंद करणे सोपे जाते. आणि जेव्हा तुम्हाला हा रॅक वापरायचा असतो तेव्हा तो दरवाजाच्या 90° मध्ये उघडून त्यावर कपडे सुकवू शकता. फक्त कपडे सुकत असताना तुम्हाला दरवाजा ऑपरेट करता येणार नाही. कमी जागेच्या दृष्टीने हे ड्राइंग रॅक स्टँड खूप उपयुक्त आहे.
कपडे सुकवण्याचे रॅक स्टँड वापरण्याचे काय फायदे आहेत
- तुमच्या आवश्यकते नुसार तुम्ही हे रॅक स्टँड उघडू किंवा दुमडू शकता.
- जर तुम्ही इनडोअर कपडे सुकवत असाल तर धुळीचा कोणताच परिणाम कपड्यांवर होत नाही.
- कपडे रॅक वर आणि घरातच सुकवल्याने ते सूर्यप्रकाशात येत नाही, त्यामुळे कपड्यांचा रंग ही जात नाही.
- अति सूर्यप्रकाश मुळे कपडे कोरदे व कडक पडतात. पण रॅक स्टँड असल्याने कपडे घरातच असल्याने , कपडे डायरेक्ट सन लाईट मध्ये येत नाहीत. व त्याला कडकपणा येत नाही.
- कपडे सुकवण्याचे स्टँड फ्लोड करता येत असल्याने ते तुम्ही कधीही व कितीही वेळ वापरू शकता. तसेच कोणत्याही सिझन मध्ये तुम्ही त्याला वापरू शकता.
- कपडे घरातच सुकवल्याने त्यांचा फॅब्रिक वर कोणताच फरक पडत नाही. व ते वर्षानुवर्षे नवीन राहतात.रॅक स्टँड वापरताना वाऱ्याची काळजी नाही राहत.
- शक्यतो कपडे नैसर्गिक रित्या सुकवले जात असल्याने वीज बिल पण कमी येते.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण कपडे सुकवण्याबद्दल बरीच शी माहिती जाणून घेतली. तसेच काही बेस्ट क्लाथ ड्राइंग रॅक स्टँड बद्दल पण जाणून घेतले. तुही जर कपडे सुकवण्यासाठी रॅक स्टँड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुम्हाला नक्की मदत करेल, अशी आशा करतो.
तसेच हा लेख तुम्हाला आवडला असेल व महत्वपूर्ण वाटला असेल, तर तुमच्या मित्र मैत्रीणी सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.