पिक विम्याचे पैसे तुम्हाला किती मिळणार मोबाईल नंबर टाकून चेक करा | Check Online Pik Vima Status | Crop Insurance Status Check
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण पीकविमा जमा होण्यास सुरुवात! Localised पीकविमा मिळणार कि Yield Based, Status चेक कसे करायचे? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आपल्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांना गेल्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान सहन करावं लागलं. हे झालेले नुकसान शेतकऱ्यांनी पीक विमा योजने अंतर्गत क्लेम करत भरून काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्या नुसार आता राज्य सरकार व विमा कंपन्या यांच्या मार्फत या पीक विमाचे वाटप सुरू झालं आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्या वर पीक विमा मिळाला असेल, तर काहींना अजून ही पीक विमा मिळाला नसेल. तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांना आता डबल पीक विमा मिळणार आहे.
तसेच विमा कंपनी कडून ही काहींच्या बँक खात्यात हे डबल पैसे येण्याचे काम ही सुरू झाले आहे. त्यामुळे तुम्हाला ही डबल विमा रक्कम मिळणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करून पहायचे आहे. त्यासाठी अर्जाचे स्टेटस कसे चेक करायचे व आपल्याला किती पीक विमा मिळणार आहे हे कशा प्रकारे जाणून घ्यायचे, या बद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…
पीक विमा स्टेटस चेक कसे करण्यासाठी स्टेप्स
स्टेप 1:- मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला https://pmfby.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे. नंतर वेबसाईट च्या होम पेज वर तुम्हाला ‘Farmer Corner’ हा पर्याय दिसेल त्या पर्याया वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 2:- या नंतर नेक्स्ट पेज वर Farmer Application मध्ये Login for farmer या वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3:- त्या नंतर तुमच्या रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाकून कॅपचा टाकायचा आहे व Request for OTP या बटन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4:- आता पुढे तुम्हाला फार्मर डिटेल्स दाखवले जातील. त्या नंतर खाली वर्ष 2024 टाकून नंतर हंगाम (Season) मध्ये खरीप निवडायचं आहे. (म्हणजे ज्या वर्षासाठी माहिती हवी आहे ते वर्ष निवडायचे आहे)

स्टेप 5:- त्या नंतर खाली तुम्हाला ज्या काही पॉलिसि आहेत त्या दाखवल्या जातील. (जर तुम्ही तुमच्या प्रत्येक पिकाचा विमा क्लेम केला असेल तर तुम्हाला तेवढ्या पॉलीसी दिसतील. एक असेल तर एकच दिसेल. )

स्टेप 6:- मित्रांनो, त्यात पॉलीसी नंबर दिसेल, तसेच Total Claim Amount दिसेल. म्हणजे त्या पॉलीसी वर किती पीक विमा मिळाला ते दाखवले जाते. आता तुम्हि तुमची पॉलीसी सिलेक्ट करायची आहे.

स्टेप 7:- त्या नंतर तुम्हाला तुमच्या क्लेम ची सर्व माहिती दाखवली जाईल. त्यात तुम्ही घेतलेल्या पीक समोरील view बटन वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती पाहू शकता. ज्यात तुमच्या क्लेम ची तारीख, क्लेम रक्कम, क्लेम चा प्रकार, युटीआर नंबर (UTR Number), दिसेल व क्लेम स्टेटस मध्ये Payment success असे आले असेल तर तुमचा पीक विमा रक्कम तुमच्या खात्यात जमा झाला आहे.
स्टेप 8:- मित्रांनो, जर तुम्हाला एकाच पिकासाठी दोनदा पीक विमा येणार असेल तर ते ही तुम्ही इथेच पाहू शकता. म्हणजेच जर तुम्ही सोयाबीन लावला असेल, तर त्याचा पीक विमा UTR नंबर जनरेट झाल्या नंतर तुमच्या बँक खात्यात जमा होईल व तसे Payment Success स्टेटस देखील दाखवले जाईल.
टीप :
मित्रांनो, जर तुम्हाला स्टेटस मध्ये काहीही माहिती दिसली नाही, तर तुमचा क्लेम मंजूर झालेला नसेल. तसेच जर झिरो (0) रक्कम दाखवत असेल, तर क्लेम मंजूर झालेला नाही किंवा पडताळणी अर्धवट आहे. आणि खात्यावर रक्कम आली असेल, तर “ Credited ” किंवा Payment Success असं स्टेटस तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याचा पीक विमा रक्कम वेग वेगळी असणार आहे. काहींना कमी तर काहींना जास्त रक्कम मिळू शकते.
तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पीक विमाचे स्टेटस चेक करू शकता. तसेच खरीप व रब्बी 2024, 2023, 2022 हंगामाचे अपडेटही या वेबसाईट वर पाहू शकता. तसेच प्रत्येक हंगामासाठी वेगळी पॉलिसी आणि मंजूर झालेली रक्कम तपासता येते. तसेच मिळणारी रक्कम हो Yield Based आहे की Localised आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण पीक विमाच्या अर्जाचे स्टेटस चेक कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवादl
Tags: Crop Insurance Status 2025, pik vima paise kaise check kare, pik vima new update, rabbi pik vima 2024, pik vima kharip 2024, pik vima 2024 list kaise dekhe, pik vima 2024 form kaise bhare, pik vima 2024 maharashtra, rabbi pik vima update, pik vima update today, mid term, localised pikvima, yield based pikvima, agrim pikvima, pmfby, 25% agrim pikvima,crop insurance claim status online, pik vima status online, crop insurance news, crop insurance claim status, pik vima yadi, vima policy status online, kharip pik vima 2025, pmfby crop insurance policy status check, vima vatap Update