भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा? | Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana Online Form
नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण भांडी वाटप योजना/Bhandi Vatap Yojana साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी देखील सरकार विविध प्रकारच्या योजना राबवित असते. त्यातीलच भांडी वाटप योजने द्वारे बांधकाम कामगारांना भांड्याचे किट/ संच दिले जात आहे. मित्रांनो, मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना भांडी वाटप संचाचे वितरण करण्यात आलेले होते, परंतु तेव्हा अनेक बांधकाम कामगार भांडी वाटप संचांपासून वंचित राहिलेले होते, अशा कामगारांना भांडी वाटप संच मिळावा म्हणून परत एकदा ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. तर या योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा
स्टेप 1:- मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला https://hikit.mahabocw.in या वेबसाईट वर जायचे आहे. नंतर वेबसाईट च्या होम पेज वर तुम्हाला काही माहिती भरायची आहे. ज्यात सर्वात पहिले तुम्हाला Worker Registration Number म्हणजेच कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे.

स्टेप 2:- मित्रांनो, हा नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला पहिले https://iwbms.mahabocw.in या वेबसाईट लिंक वर जायचे आहे. त्या नंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड व फॉर्म भरताना जो नंबर दिला होता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे व Proceed to Form या बटन वर क्लिक करायचं आहे. त्या नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून Validate OTP बटन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 3:- तुम्ही भरलेला फॉर्म, त्याची तारीख, तुमचा फोटो वगैरे सर्व माहिती तुम्हाला आलेली दिसेल. तसेच यामध्ये तुमचा Registration Number सुद्धा असतो. जर तुमचा फॉर्म अप्रुव्ह झाला असेल तर तरच तुम्ही भांडी योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात.

स्टेप 4: तर हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून परत मागे आधीच्या वेबसाईट वर येऊन कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे व बाहेर कुठेही क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही बाहेर क्लिक कराल तसं नंतर तुम्हाला तुमचा नोंदणी करण्याचा दिनांक, नूतनीकरण दिनांक, तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, तुमचं पूर्ण नाव, जन्म तारीख व वय अशी संपूर्ण माहिती आलेली दिसेल.
आता खाली तुम्हाला Select Camp या ऑप्शन मध्ये तुमच्या जवळपास च्या कोणत्याही एका कॅम्पला इथे सिलेक्ट करायचं आहे.

स्टेप 5:- त्या नंतर Appointment Date वर क्लिक करायचं आहे व तुम्हाला तुमची भेटीची तारीख सिलेक्ट करायची आहे. तारीख सिलेक्ट करण्यासाठी तुमच्या समोर कॅलेंडर ओपन होईल त्यातील लाल रंग मध्ये दाखवलेल्या दिवशी सुट्टी असते, तर पिवळ्या रंगाचा दाखवलेल्या दिवशी अपॉइंटमेंट बुक झालेली आहे व इतर कोणतीही तारीख तुम्ही निवडू शकता व तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. बुक केलेल्या दिवशी जाऊन तुम्ही तुमचे भांडी किट घ्यायचं आहे.

स्टेप 6:- त्या नंतर Download self declaration document यावर क्लिक करून तुम्हाला स्वयंघोषणपत्र अपलोड करायचं आहे. या स्वयंघोषणपत्रात सर्व माहित भरून खाली सही करायची आहे व अपलोड करायचं आहे.

स्टेप 7: त्या नंतर Print Appointment या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 8:– त्या नंतर तुम्ही आता भरलेला पूर्ण अर्ज समोर दिसेल, तुम्ही याची प्रिंट काढून घ्यायची आहे व जिथे तुम्हाला किट मिळणार आहे तिथे हा अर्ज घेऊन जायचा आहे. तुम्हाला यात गृहपयोगी 17 प्रकारामधील एकूण 30 नग भांडी मिळतील. पण मित्रांनो, जर तुम्ही दिलेल्या तारखेला, दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल व तुम्हाला भांडी किट मिळणार नाही. त्यामुळे वेळेत नक्की उपस्थित रहा.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण भांडी वाटप योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवादl
Tags: bhandi vatap yojana online form, bandhkam kamgar bhandi form kasa bharava, bhandi yojana form kasa bharava, kamgar bhandi vatap, mofat bhandi vatap, bhandi vatap bandhkam kamgar online form, bhandi yojana online apply form, mofat bhandi yojana form, mbocww bhandi vatap form, kamgar kalyam bhandi vatap form, bandhkam kamgar bhandi vatap form kaise bhare, bandhkam kamgar bhandi yojana form kaise bhare, Bhandi sanch, bandhkam kamgar bhandi yojana apply online