सर्वात चांगले मिनी रेफ्रिजरेटर (मिनी फ्रिज) | Best Mini Refrigerator 2022
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण यावर्षी च्या सगळ्यात चांगले मिनी रेफ्रिजरेटर बद्दल जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी असो, किंवा सतत कामासाठी बाहेर फिरणारे व्यावसायिक असो, प्रत्येकाला फ्रीज ची गरज पडत असते. तसेच फॅमिली मोठी असेल तर आपण मोठे फ्रीज घेतो. पण छोट्या फॅमिली मध्ये किंवा सिंगल व्यक्तीसाठी मोठे फ्रीज परवडत नाही. त्यामुळे अश्या लोकांसाठी मिनी फ्रीज वापरणे योग्य असते. आणि आज काल बऱ्याच लोकांचा कल हा जास्त करून मिनी फ्रीज कडे असतो. तसेच ऑफिसेस, हॉटेल्स, किंवा गेस्ट रूम मध्ये वापरण्यासाठी मिनी फ्रीज ला जास्त मागणी आहे.
1) Amazon Basics 43L सिंगल डोअर मिनी रेफ्रिजरेटर | Amazon वर बघा |
2) Godrej 30L मॉडेल, क्यूब पर्सनल कूलिंग सोल्युशन | Amazon वर बघा |
3) Haier 53 L टू स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर मिनी फ्रिज | Amazon वर बघा |
4) Hisense 44 L 1 स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर मिनी रेफ्रिजरेटर | Amazon वर बघा |
5) Godrej 99 L टू स्टार इन्व्हर्टर डायरेक्ट कूल सिंगल डोअर मिनी रेफ्रिजरेटर | Amazon वर बघा |
मित्रांनो, 100 लिटर पेक्षा कमी क्षमता असलेल्या फ्रिज ला मिनी फ्रिज असे म्हटले जाते. मिनी फ्रीज हे मोठ्या फ्रीजचे च छोटे स्वरूप असते. मोठ्या फ्रीज सारखे च फीचर्स यात ही काही प्रमाणात बघायला मिळतात. तसेच इतर मोठ्या फ्रीजच्या तुलनेत मिनी फ्रीज वीज कमी प्रमाणात खर्च करते. आणि जर तुम्ही 5 स्टार मिनी फ्रीज घेतले तर त्यामुळे तुम्ही तुमचे वीज बिल खूप कमी करू शकतात. म्हणजे वीज बिलाचा तुमचा बराचसा खर्च वाचू शकतो.
पण या मिनी फ्रीजचा खर्च किती येतो, याची किंमत किती असते, त्याचे वैशिष्ट्ये, त्याची क्षमता किती आहे, त्यात वापरलेले तंत्रज्ञान कसे आहे, या सर्व समजून घेणून मगचं मिनी फ्रीज खरेदी केले पाहिजे. त्यातही सर्वोत्तम मिनी फ्रीज चे अनेक व्हाराएटिझ किंवा प्रकार उपलब्ध असल्याने मिनी फ्रीज घेताना बरेच लोक गोंधळलेले असतात.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सगळ्यात बेस्ट मिनी फ्रीज निवडण्यासाठी थोडी मदत करणार आहोत. आपण या वर्षीच्या बेस्ट मिनी फ्रीज चे काही प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये बघू या.
Amazon Basics 43L सिंगल डोअर मिनी रेफ्रिजरेटर
मित्रांनो, जर तुम्हाला एखादे छोटे व कमी बजेट मध्ये बसणारे मिनी फ्रीज बघत असाल तर हे ऍमेझॉन बसिकस चे 43L सिंगल डोअर मिनी रेफ्रिजरेटर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या फ्रिज मध्ये भाज्या, मांस, तसेच आईस्क्रीम वगैरे थंड पेय स्टोअर करण्यासाठी उत्तम टेम्परेचर सेटिंग करण्यात आलेल्या आहेत.
तसेच या मिनी फ्रिज ची क्षमता 43 ली. ची असून याचे वजन जवळ जवळ 16 किलो पर्यंत आहे. या मिनी फ्रिज चे उंची तुम्ही ऍडजस्ट पण करू शकता. म्हणजे याची हाएट पण वाढवू शकता. याच्या आवाजा बद्दल सांगायचे झाले तर 45 ते 50 DB पर्यंत याचा आवाज येतो. तसेच याची किंमत सात हजार ते आठ हजार पर्यंत असू शकते. या मिनी फ्रिज ची एका वर्षाची प्रॉडक्ट वारंटी व पाच वर्षांची कंप्रेसर ची वारंटी मिळते. याची Insulation मटेरियल खूप चांगले बनवले गेले आहे व बनवताना हे फ्रिज खूप चांगले मजबूत पद्धती चे बनवले गेले आहे.
Godrej 30L मॉडेल, क्यूब पर्सनल कूलिंग सोल्युशन
मित्रांनो, गोदरेजचा 30 ली चा हा मिनी फ्रिज मॉडेल विद्यार्थी किंवा वैयक्तिक उपयोगासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे. याची एनर्जी एफिशिएनसि खूप चांगली आहे. यात कंप्रेसर येत नाही. या कंपनीने एक नवीन टेक्नॉलॉजी चा या मिनी फ्रिज मध्ये वापर केला आहे, जी फक्त कूलिंग प्रोड्युस करते. यात बर्फ जमवता येत नाही. तुम्हाला जर फक्त भाज्यासाठी, खाद्य पदार्थ किंवा कोल्ड ड्रिंक्स थंड ठेवण्यासाठी एखादं मिनी फ्रिज हवे असेल तर गोदरेज चे 30 ली चे हे मिनी फ्रिज तुमच्यासाठी उत्तम आहे.
या मिनी फ्रिज मध्ये तुम्हाला Duel LED लाइट्स मिळतात. तसेच याचे Insulation मटेरियल खुप चांगले आहे. याचा आवाज पण जास्त येत नाही. तसेच हे फ्रिज मेंटेनन्स फ्री आणि Environment फ्रेंडली आहे.
मित्रांनो, हे मिनि फ्रिज जवळ जवळ 11 किलो चे असून या फ्रिज ची क्षमता 30 ली आहे. तसेच याची वार्षिक ऊर्जा क्षमता ही 208 किलोवाट आहे. आणि याची किंमत 7200 रुपये पर्यंत असून या प्रोडक्ट ला एक वर्षाची वारंटी मिळते.
Haier 53L टू स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर मिनी फ्रिज
मित्रांनो, मिनी फ्रिज मधल्या सर्वोत्तम विक्रेत्या पैकी एक, हायर कंपनीचे 53 ली चे टू स्टार डायरेक्ट कूल मिनी फ्रिज मॉडेल आहे. एका क्लासिक डिझाइन सोबत हे मिनी फ्रिज काळ्या आणि पांढऱ्या अश्या दोन रंगात उपलब्ध आहे.
हायर कंपनीचे हे 53 ली मिनी फ्रिज मॉडेल वर्षाला 176 युनिट ऊर्जा खर्च करते. शिवाय या मिनी फ्रिज मध्ये एका वर्षाची प्रोडक्ट वारंटी व पाच वर्षाची कंप्रेसर वारंटी मिळते. शिवाय आईसिंगसाठी यात चांगले कंपार्टमेंट दिले गेले आहे. व स्पेस पण खूप चांगला मिळतो. यात तुम्हाला सहा टेम्परेचर कंट्रोल सेटिंग मिळतात.
सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या मिनी फ्रिजची कूलिंग खूप फास्ट आहे. तसेच या मिनी फ्रिज ची क्वालिटी खूप मजबूत असून हे स्टेबिलायझेर फ्री आहे. याचे Insulation मटेरियल 25 टक्के जास्त जाडीचे बनवले गेले आहे. ज्यामूळे ते खूप दीर्घकाळ पर्यंत टिकते.
मित्रांनो, या मिनी फ्रिज ची क्षमता 53 ली ची असून याचे वजन 15 किलो पर्यंत आहे. तसेच याची किंमत 8900 रुपये पर्यंत असू शकते.
Hisense 44L 1 स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर मिनी रेफ्रिजरेटर
मित्रांनो, हायसेन्स कंपनी चे 44 ली चे मिनी फ्रिज एक मजबूत प्रकारचे मिनी फ्रिज आहे. या मिनी फ्रिज मध्ये तुम्हाला एका वर्षाची प्रॉडक्ट वॉरंटी आणि दहा वर्षांची कंप्रेसर वॉरंटी मिळते. या हायसेन्स मिनी फ्रीज ला वर्षाला दोनशे युनिट उर्जा खर्च होते. या मिनी फ्रिज चे फिनिशिंग स्टील चे बनलेले आहे. येथे इनर कंपार्टमेंट खूप चांगले आहेत, शिवाय याच्या आत मध्ये खाद्य पदार्थ, भाज्या, बॉटल्स ठेवायला भरपूर स्पेस उपलब्ध करून दिलेली आहे.
या मिनी फ्रीज चे डोअर रिव्हरसीबल आहे. म्हणजेच या फ्रीज चे डोअर तुम्ही दोन्ही बाजूने म्हणजेच उजव्या आणि डाव्या बाजूने उघडू शकता. या शिवाय याचे हँडल हि खूप आकर्षक पद्धतीने तयार केले गेले आहे.
तसेच या मिनी फ्रिज मध्ये तुम्हाला सहा टेंपरेचर कंट्रोल सेटिंग्स मिळतात, ज्याद्वारे तुम्ही हवे ते टेंपरेचर सेट करू शकता. याचे कूलिंग झोन पण खूप चांगले आहे. याच्या आवाजा बद्दल बोलायचे झाले तर त्याचा आवाज 40 ते 50 DB पर्यंत येतो. तसेच याच वजन जवळ जवळ 14 किलो पर्यंत असू शकते. तसेच या मिनी फ्रिज ची किंमत 7400 रुपये पर्यंत असू शकते.
Godrej 99L टू स्टार इन्व्हर्टर डायरेक्ट कूल सिंगल डोअर मिनी रेफ्रिजरेटर
मित्रांनो, गोदरेज कंपनी चे हे 99 ली चे मिनी फ्रिज मॉडेल दिसायला खूप सुंदर आणि चमकदार दिसते. गोदरेज चे हे मॉडेल नुकतेच 2021 मध्ये लाँच झाले आहे. यात तुम्हाला इन्व्हर्टर कंप्रेसर टेक्नॉलॉजी मिळते. तसेच एक वर्षाची प्रोडक्ट वारंटी व दहा वर्षांची कंप्रेसर वारंटी मिळते.
या मिनी फ्रिज मध्ये खूप स्पेस मिळते ज्यात तुम्ही भाज्या, फळे, थंड पेये, बॉटल्स व आईसिंगसाठी वेगळी जागा भेटते. तसेच तुम्ही यात टेम्परेचर कंट्रोल सेटिंग पण बघू शकता. शिवाय या मिनी फ्रिज मध्ये खूप वेग वेगळे कलर्स उपलब्ध आहे. यात खूप सारे कंपार्टमेंट मिळतात. बॉटल्स ठेवण्यासाठी भरपूर जागा मिळते.
याचे Insulation मटेरियल खूप चांगले आहे. या मिनी फ्रिज ला वर्षाला 178 युनिट वीज खर्च होते. यात तुम्हाला अँटी गॅसकेट मिळते जे बॅक्टेरिया होण्यापासून रोखते. या मिनी फ्रिज ची क्षमता 99 ली ची असून याचे वजन जवळ जवळ 22 किलो पर्यंत आहे. तसेच या मिनी फ्रिज चे हँडल अतिशय सुंदर डिझाइन केले आहे, त्यामुळे या मिनी फ्रिज ला एक आकर्षक व आधुनिक लुक येतो. तसेच या मिनी फ्रिज ची किंमत 10990 पर्यंत असू शकते. जर तुम्ही ऑफर मध्ये हे फ्रिज घेतले तर आणखी स्वस्त मिळू शकते.
मित्रांनो, हे तर झाल मिनी फ्रिज बद्दल. पण मिनी फ्रिज घेताना काही गोष्टी लक्षात आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजे , जसे की त्या मिनी फ्रिज ची क्षमता, इंस्टॉलेशन प्रकार, वॉरंटी, शेल्फ, त्यात फ्रीझर उपलब्ध आहे का, वार्षिक किती ऊर्जा लागते, त्याचा आवाज किती होतो वगैरे माहिती.
तर मित्रांनो, असे हे मिनी फ्रिज वजनाला खूप हलके असल्याने एक ठिकाणा हून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते. तसेच याला कमी जागा लागते. शिवाय मिनी फ्रिज मध्ये पदार्थ लवकर थंड होतात. म्हणजे या फ्रिज चा कूलिंग रेट खूप फास्ट आहे.
रेफ्रिजरेटर च्या वाढत्या मागणीमुळे अनेक उत्पादक वेगवेगळे आकर्षक व वैशिष्ट्यनी समृद्ध आहे मिनी फ्रिज बनवत आहेत. आणि आजच्या लेखात आम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम मिनी फ्रिज बद्दल इथे सांगण्याचा व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि हा लेख वाचून तुमच्या घरात एक नवीन मिनी फ्रिज नक्की येईल अशी आशा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
Tags: Best Mini Refrigerator, Best Mini Fridge, Mini Refrigerato, Best Refrigerator 2022, Best Mini Refrigerator in India, Mini Refrigerator information in Marathi, Mini Fridge information in Marathi, Chote Fridge Mahiti, Mini Fridge Mahiti, Mini Fridge Marathi