1 लिटरमध्ये 100 किलोमीटर पर्यंत मायलेज देणाऱ्या या स्वस्त गाड्या | Best Mileage Bike
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला 1 लिटर पेट्रोल मध्ये जास्त मायलेज देणाऱ्या कोणत्या पाच बाईक आहेत, या बद्दल सविस्तर पणे माहिती सांगणार आहोत.
मित्रांनो, आजकाल अनेक जण बाहेर कामानिमित्त जाताना कार ऐवजी बाईक ला म्हणजेच दुचाकी गाडी ला जास्त प्राधान्य देतात. पण सध्याचे पेट्रोल चे वाढलेले दर बघता बाईक वापरावी की नाही, किंवा खरेदी करावी की नाही हाच प्रश्न पडतो. पण पेट्रोलचे दर वाढलेले असले तरी देखील सामान्य माणसाला बाईक शिवाय दुसरा पर्याय नसतो. मग अश्या वेळी जास्तीत जास्त मायलेज देणारी बाईक खरेदी करण्याकडे लोकांचा जास्त कल असतो.
मित्रांनो, तुम्ही जर रोजच्या वापरासाठी उत्तम मायलेज देणारी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बाजारात अनेक उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध आहेत, हा पण त्यांच्या किंमतीही तश्याच जास्त असतात. पण मित्रांनो, काळजी करू नका, तुम्ही जर जास्त मायलेज देणारी व परवडणाऱ्या किमतीत दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा हा लेख फक्त तुमच्या साठी आहे. या लेखात आम्ही 2023 च्या ARAI (Automotive Research Association of India) नुसार सर्वाधिक मायलेज असणाऱ्या 5 मोटरसायकल ची लिस्ट व माहिती तुमच्यासाठी आणली आहे.
त्यामुळे तुम्ही जर 1 लिटर पेट्रोल मध्ये जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या मोटरसायकल शोधत असाल, आणि ज्यांच्या किंमतीही कमी व तुम्हाला परवडणाऱ्या असतील अश्या मोटरसायकल तुम्ही शोधत असाल तर त्या मोटरसायकल बद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
1 लिटर पेट्रोल मध्ये जास्त मायलेज देणाऱ्या बाईक
HONDA CD 110 DREAM
मित्रांनो, ही मोटरसायकल होंडा कंपनी ची असून जास्त मायलेज देणारी तर आहेच शिवाय जास्त टिकणारी आहे. तसेच ही बाईक BS6 मध्ये येत असून बाईक मध्ये 109.51 cc फ्यूल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7500 आरपीएम वर 8.6 एचपी 5500 आरपीएम वर 9.30 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईक चे इंजिन 4 स्पीड गियर बॉक्स मध्ये देण्यात आले आहे. म्हणजे ही गाडी 4 गियरबॉक्स ची आहे. होंडाच्या इतर टू व्हिलर्स प्रमाणे या CD 110 DREAMS मध्ये सुद्धा सायलेंट स्टार्ट फीचर देण्यात आले आहे.
ही बाईक Standard आणि Deluxe या दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. या बाईक ची Ex शोरूम किंमत ही रू 64505 ते 65505 इतकी आहे. व या बाईक चे मायलेज हे 74 किमी/ ली इतके आहे. होंडाच्या या सर्वात स्वस्त बाईक मध्ये इंजिन स्टार्ट / स्टॉप स्विच, डीसी हेडलॅम्प, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विच, ट्युबलेस टायर्स, लांब आणि आरामदायक सीट, सीलेर आणि सील चेन असलेली सीबीएस अशी वैशिष्ट्ये आहेत.
ही बाईक होंडाच्या एन्हेन्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) तंत्रज्ञानाने सज्ज आहे. या बाईक च्या पुढील आणि मागील भागामध्ये 130 मिमी ड्रम ब्रेक आहेत. ही बाईक एकूण 8 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मित्रांनो, Honda CD 110 Dream ही होंडा कंपनी ची सर्वात स्वस्त बाईक असून होंडाच्या या बाईकला संपूर्ण भारतात खूप मोठी मागणी आहे. खासकरून ग्रामीण भागात या बाईकला सर्वात जास्त मागणी आहे.
Bajaj Platina 110
मित्रांनो, बजाज प्लॅटिना 110 ही भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे. या बाईक ची एक्स शोरूम किंमत ही 65930 रू पासून सुरू होते. तसेच Bajaj Platina 110 च्या पॉवर परफॉर्मन्स मध्ये 115 सीसी इंजिन असून, 4 स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन सोबत एयर कूल्ड इंजिन दिले आहे. याचे इंजिन 7000 आरपीएम वर 8.6 पीएस चे मॅक्सिमम पॉवर आणि 5000 आरपीएम वर 9.81 एनएम चे टॉर्क निर्माण करते. तसेच या बाईक चे इंजिन 4 स्पीड गियर बॉक्स ट्रान्समिशन सुसज्ज आहे.
ही गाडी 80 किमी/ ली इतके मायलेज देते. याशिवाय बाईक मध्ये अँटी स्किड ब्रेकिंग सिस्टम मिळेल. या बाईक मध्ये नाईट्रॉक्स सस्पेंशन सह Comfor टेक्नॉलॉजी, लांब सीट, मोठे फुट पॅड्ससारखे फीचर दिलेले आहेत. तसेच या बाईक मध्ये नवीन स्प्रिंग टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे. व याच्या ट्यूबलेस तयार मुळे यात केवळ दुचाकीस्वारचं नाही तर त्याच्या मागे बसणाऱ्यालाही आरामदायक व सुरक्षित राईडचा अनुभव मिळतो.
TVS STAR CITY PLUS
मित्रांनो, ही बाईक बजाज प्लॅटिना पेक्षा ही जबरदस्त मायलेज देते. ही बाईक दोन प्रकारात येते TVS STAR CITY PLUS ES Drum आणि TVS STAR CITY PLUS ES Disc. या बाईक ची एक्स शोरूम किंमत रू 70005 पासून ते रू 72755 इतकी असून याचे एव्हरेज 86 किमी / ली इतके आहे.
मित्रांनो, टीव्हीएस स्टार सिटी प्लस बाईक 110 सीसी, सिंगल-सिलेंडर फ्यूल इंजेक्टेड इंजिन वर चालते जे 7,350 आरपीएम वर 8.08 बीएचपी पॉवर आणि 4,500 आरपीएम वर 8.7 एनएम टॉर्क निर्माण करतं. ही बाईक 4 स्पीड ट्रांसमिशन सह सादर करण्यात आली असून यात ट्यूबलेस टायर सह बाईक मध्ये 17 इंचाची चाके देण्यात आली आहेत.
याशिवाय कलर ऑप्शन्सच्या डिटेल्ड सिरीज सह फ्युल एफिशिएंट इंजिन आणि लो कर्ब वेटसह टीव्हीएस स्टार सिटी प्लस एक शानदार व्हॅल्यू फॉर मनी, एंट्री लेव्हल मोटारसायकल आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
Bajaj CT 100
मित्रांनो, कमी किमतीत उत्कृष्ट मायलेज देणं हे या बाईक चे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच ही बाईक खूप लोकप्रिय आहे. ARAI नुसार याचे मायलेज 89 किमी / ली इतके आहे. काही लोक तर याचा मायलेज 100 किमी / ली निघतो असेही सांगतात. या बाईक ची एक्स शोरूम किंमत 53696 रुपया पासून चालू होते.
मित्रांनो, Bajaj CT 100 बाईक मध्ये BS6 कम्पलायंट 102 सीसीचे 4 स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन इंजिन दिले गेले आहे. यात देण्यात आलेले इंजिन 7500 आरपीएम वर 7.79 PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 5500 आरपीएम वर 8.34 Nm चे टॉर्क जनरेट करते. CT 100 या बाईक च्या इंजिन मध्ये 4 स्पीड गियरबॉक्स देण्यात आले आहे. यात हॅलोजन लाइट्स, फुल बॉडी ग्राफिक्स, सिंगल-पीस सीट, अलॉय व्हील आणि कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम (CBS) सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
Hero Splendor Pro
मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून भारतात लोकप्रिय असलेली व सर्वाधिक मायलेज देणारी कोणती गाडी असेल तर ती म्हणजे Hero Splender Pro. ARAI नुसार ही बाईक 90 किमी / ली इतके जास्त मायलेज देते. व याची किंमत 74000 रुपयांपासून सुरू होते. या बाइक मध्ये 97.2 cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 8000 आरपीएम वर 8.2 bhp पॉवर आणि 4500 आरपीएम वर 8 Nm टॉर्क जनरेट करते.
ही बाईक वेगवेगळ्या व्हेरिएंट मध्ये येते ज्यात pro, plus, i3s, i smart 110 यांचा समावेश आहे. याचे फ्यूल टँक 11 लीटर पेक्षा जास्त आहे. त्यामुळे फ्यूल टँक कॅपिसिटी आणि मायलेजचा आढावा घेतला तर एकदा टँक फुल केल्या नंतर ही बाइक 990 किमी पर्यंतचे अंतर पार करू शकते असे सांगितले जाते.
मित्रांनो, हिरो चे अजून एक मॉडेल आहे Hero Splendorxtec जे 99.5 किमी / ली इतके मायलेज देते.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण एक लिटर पेट्रोल मध्ये जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या 5 बाईक, बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
Tags: Best Mileage Bike, Top Mileage Bike, Cheap Mileage Bike, Best Mileage Bike in Marathi, Best Average Bike Marathi, Changale Average Denari Gadi, Changale Average Denari Bike, Best Mileage Bike List, Best Hero Mileage Bike, Best Bajaj Mileage Bike, Best TVS STAR Mileage Bike, Best HONDA Mileage Bike