या डोसा तव्यावर बनतात कुरकुरीत डोसे | Best Dosa Tawa
नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. आज ची ही माहिती खास महिलांसाठी आहे, अस म्हणायला काही हरकत नाही. कारण आज आपण सर्वात चांगले डोसा तवा कोणते आहेत, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, डोसा हा पदार्थ सर्वांनाच खूप चांगला माहीत आहे. डोसा, अनेक जणांची फेवरेट डिश सुद्धा असेल. हा डोसा खायला तर सर्वानाच आवडतो, पण काही महिलांना डोसा बनवायचा म्हटलं की टेन्शन येत. याच कारण म्हणजे डोसा तव्याला चिकटतो. डोसा तव्याला चिकटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे तुमचा तवा. तो जर चांगला नसेल मग तर डोसा चिकटणारच. तसं डोसा बनवणे खुप सोपे आहे. पण तो यशस्वी रित्या बनण्यासाठी तुम्हाला जास्त गरज असते ती एका चांगल्या तव्याची. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला विविध प्रकारच्या डोसा तव्यांबद्दल माहिती देणार आहोत. जेणे करून तुम्ही तुमच्यासाठी एक परफेक्ट डोसा तवा निवडू शकाल.
डोसा तव्याची विविध प्रकार
नॉन स्टिक (Non-Stick) डोसा तवा
मित्रांनो, डोसा बनवण्यासाठी नॉन स्टिकचा तवा जास्त प्रसिद्ध आहे. त्याची सरफेस (त्वचा) खूप स्मूथ (गुळगुळीत) असते. त्यामुळे डोसा चिकटत नाही तसेच फाटत नाही. अनेक घरांमध्ये नॉन स्टिक चा डोसा तवा वापरला जातो. या तव्याचा सरफेस स्मूथ असल्याने तुमचा डोसा सहजपणे निघेल पण तो क्रिस्पी होणार नाही. तसेच जर नॉन स्टिक तव्याचे कोटिंग निघाले तर ते आरोग्यस खूप हानिकारक ठरू शकते.
प्युअर आयर्न (Pure Iron) डोसा तवा
मित्रांनो, प्युअर आयर्न तवा म्हणजे शुद्ध पोलाद/लोह पासून बनलेला. हा तवा आपण रोज चपाती व पराठे बनवण्यासाठी वापरतो. तसं डोस बनवण्यासाठी फ्लॅट तवा चांगला असतो. पण जर तुमचा प्युअर आयर्न डोसा तवा फ्लॅट (सपाट) नसेल तर मध्यभागी तो थोडा चिपकेल व जळेल. पण जर तुमचा प्युअर आयर्न तवा खूप जुना असेल तर डोसा बनवताना काही अडचण नाही येणार.
कास्ट आयर्न (Cast Iron) डोसा तवा
मित्रांनो, या तव्याचा सरफेस हा थोडा खडबडीत असतो. या तव्यावर कोणत्याही प्रकारची केमिकल कोटिंग केलेली नसते. त्यामुळे हा तवा टॉक्सिक फ्री तवा आहे. तसेच या तव्याला तुम्ही गॅस स्टोव्ह वर तसेच इंडक्शन वर सुद्धा वापरू शकता. तसेच यात कमी तेलात, न चिकटलेला उत्तम डोसा बनून तयार होतो. याचा सरफेस रफ असल्याने डोसा क्रिस्पी होतो. फक्त कास्ट आयर्न तव्यासाठी तुम्हाला वेळोवेळी सीज़निंग (Season) करावे लागते. आणि डोसा बनवायच्या आधी हि सीज़निंग करावे लागते.
भारतातील काही बेस्ट डोसा तवा
Hawkins अल्युमिनियम Futura नॉन स्टिक डोसा तवा
मित्रांनो, हा नॉन स्टिक तवा डोसा बनवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या तव्याची जाडी ही 4.88 mm असून तो 30 cm व्यास (डाइऐमिटर) चा आहे. या तव्यात उष्णता सगळीकडे एक सारखी पोहचते त्यामुळे डोसा चांगला बनतो. व करपण्याचे चान्सेस कमी होतात. तसेच या डोसा तवा चे हँडल हे हिट रेझिस्टंट आहे. तसेच हा तवा तुम्ही गॅस स्टोव्ह किंवा इंडक्शन वर ही वापरू शकता. या प्रोडक्ट वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते. तसेच याची किंमत ही अंदाजे 1500 रुपये च्या आसपास असू शकते.
तसेच या डोसा तव्याचा रंग काळा असून तो गोल आकारात व हार्ड एनोडाईज्ड अल्युमिनियम मध्ये मिळतो. या प्रोडक्ट सोबत तुम्हाला एक वुडन स्पॅटुला (डोसा उलटा करण्यासाठीचा चमचा) आणि एक स्क्रबर आणि वॉरंटी कार्ड पण मिळते. हा डोसा तवा तुम्ही डिश वॉशर मध्ये ही धुऊ शकता. एखाद्या साधारण नॉन स्टिक तवा पेक्षा हॉकिन्सचा हा डोसा तवा खूप चांगला आहे, व उत्तम प्रकारे काम करतो.
Indus Valley नेचरल कुकवेयर प्री-सीजन्ड सुपर स्मूथ कास्ट आयर्न डोसा तवा
मित्रांनो, आरोग्याच्या दृष्टीने कास्ट आयर्न चा डोसा तवा खूप उत्तम आहे. बऱ्याच लोकांना शरीरात लोहचे प्रमाणाची कमतरता असते. पण कास्ट आयर्न तवा मध्ये अन्न बनवल्याने किंवा शिजवल्याने शरीराला लोह मिळते. हा तवा तुम्ही गॅस स्टोव्ह तसेच इंडक्शन वर सुद्धा वापरू शकता. कास्ट आयर्न तवा दीर्घकाळ टिकतात. या तव्यावर तुम्ही डोसा सोबतच चपाती, पराठे, पॅन केक्स पण बनवू शकता. कास्ट आयर्न तव्याची खासियत म्हणजे तो प्युअर आयर्न चा बनलेला असतो व त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसते. तसेच तो नॉन टॉक्सिक आहे व नॉन स्टिक तवा पेक्षा चांगला आहे. तसेच त्याचा बेस जाड असल्याने त्यावर अन्न जळत नाही. फक्त कास्ट आयर्न तव्यासाठी तुम्हाला आधी seasoning करावे लागते.
डोसा तवा खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघायला हव्यात?
- मित्रांनो, डोसा तवा खरेदी करण्याआधी डोसा तव्याचा आकार बघणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत. तसेच तुम्हाला वक वेळेला किती डोसे बनवायचे आहे. या गोष्टी लक्षात ठेवून मगच डोसा तवा घ्यायला हवा.
- डोसा तवा पूर्ण पणे जाड आणि फ्लॅट सरफेस असलेला हवा. त्यामुळे डोसा बनवताना कोणताही त्रास होत नाही.
- तुम्ही घेत असलेला तवा कोणत्या पदार्थाचा किंवा प्रकारचा बनलेला आहे, ते बघणे ही तेवढेच महत्वाचे आहे. साधारणपणे डोसा तवा तीन प्रकारचे असतात. अल्युमिनियम, ऍनोडाईज्ड अल्युमिनियम आणि कास्ट आयर्न. या सर्वांपेक्षा कास्ट आयर्न डोसा तवा जास्त चांगला आहे, असे म्हटले जाते. कारण हे नॉन स्टिक असतात, उष्णता ही टिकून ठेवतात. तसेच दीर्घकाळ टिकतात. पण कास्ट आयर्न तवा वजनाने थोडे जास्त असतात. जर तुम्हाला वजनाने हलके डोसा तवा पाहिजे असतील तर तुम्ही ऍनोडाईज्ड अल्युमिनियम डोसा तवा निवडू शकता.
- तुम्ही घेत असलेला डोसा तवा इंडक्शन वर वापरण्या योग्य आहे की नाही ते एकदा तपासून घ्या.
- डोसा तव्याचे हँडल हे उष्णता प्रतिरोधक असायला हवे. त्यामुळे काम करणे सोपे जाते. फक्त जर तुम्ही कास्ट आयर्नचा डोसा तवा घेत असाल तर त्याचे हँडल्स एकदा चेक करून घ्या. कारण काही कास्ट आयर्न तव्याना हँडल नसते.
- डोसा तवा तसं जास्त महाग नसतात. त्यांची किंमत सहसा 300 रुपये पासून ते 3000 रुपये पर्यंत असू शकते. त्यामुळे तुमच्या आवश्यकते नुसार व गरजे नुसार तुम्ही योग्य त्या किमतीचा डोसा तवा निवडू शकता.
- तुम्ही निवडलेल्या डोसा तव्यावर तुम्हाला कमीत कमी एक वर्षाची तरी वॉरंटी असायला हवी. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या प्रोडक्ट ची वॉरंटी नक्की तपासा.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण सर्वात चांगले डोसा तवा बद्दल जाणून घेतले. आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल. तसेच लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद।