Payment AppPaytm

बँक अकाउंट मधून Paytm मध्ये पैसे कसे ट्रान्सफर करावे? | डेबिट कार्ड मधून Paytm मध्ये पैसे कसे ट्रान्सफर करावे? | How To Add Money in Paytm Marathi?

आज आपण Paytm Wallet मध्ये, आपल्या बँक अकाउंट, डेबिट/क्रेडिट कार्ड मधून पैसे कसे ट्रान्सफर करायचे ते बघणार आहोत. नोट बंदी आणि आत्ता कोरोना यामुळे भारतात डिजिटल व्यवहार खूप वाढले आहेत. या डिजिटल व्यवहारत Paytm चा पण मोठा वाटा आणि Paytm चा वापर करून आपण मोबाइल टीव्ही, इलेक्ट्रिसिटी आदींचा रीचार्ज, गॅस बिल, ट्रेन – बस तिकीट बुक करू शकतो. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी Paytm Wallet मध्ये पैसे असणे गरजेचे आहे.

बँक अकाउंट मधून Paytm मध्ये पैसे कसे ट्रान्सफर करावे

Paytm Wallet मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचे 3-4 पद्धती आहेत. चला तर मग आपण एका एका पद्धतीची स्टेप by स्टेप माहिती करून घेऊ. जर आपण Paytm अकाउंट ओपन केले नसेल तर हि पोस्ट वाचा – Paytm अकाउंट कसे तयार करावे ?



Debit(ATM) Card मधून Paytm मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची संपूर्ण माहिती

स्टेप 1: सर्व प्रथम, अँप उघडा जर तुम्ही आधीपासून लॉगिन केले नसेल तर मोबाइल नंबर टाकून लॉगिन करा.

स्टेप 2: तुम्हाला Paytm अँपच्या होम स्क्रीन वर Add Money ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा

स्टेप 3: त्यानंतर Amount बॉक्स मध्ये तुम्हाला जेवढे पैसे ट्रान्सफर कराचे आहेत तेवढे पैसे टाका आणि Add money बटण वर क्लिक करा

Paytm अँप ओपन करा Add Money वर क्लिक करा नंतर पैसे टाका आणि Add Money बटण वर क्लिक  करा

स्टेप 4: नंतर Debit Card ऑपशन निवडा, नंतर कार्डची माहिती टाईप करा जसे Card Number (16 अंकी नंबर), Month (कार्डवरील महिना निवडा करा), Year (कार्डवरील वर्ष निवडा करा) , CVV Number (कार्डच्या मागे असलेला 3 अंकी नंबर) Pay Now बटण वर क्लिक करा

स्टेप 5: आपल्या बँकेला लिंक असलेल्या मोबाइल नंबर वर OTP येईल तो टाईप करा आणि काही मिनिटात Paytm Wallet मध्ये पैसे जमा होतील.



Debit Card ऑपशन निवड नंतर Debit Card ची माहिती भरा नंतर OTP टाका

या सर्व स्टेप मध्ये तुमहाला काही अडचण येत असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला पूर्ण सहकार्य केली जाईल

Net Banking मधून Paytm मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची संपूर्ण माहिती

Net Banking चा वापर करून आपण Paytm Wallet मध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो.

स्टेप 1: Paytm अँप उघडून Add Money ऑपशन वर क्लिक करा. त्यानंतर Amount बॉक्स मध्ये तुम्हाला जेवढे पैसे ट्रान्सफर कराचे आहेत तेवढे पैसे टाका आणि Add money बटण वर क्लिक करा

स्टेप 2: नंतर Debit Card ऑपशन निवडा

स्टेप 3: मग नेट बँकिंगची साइट उघडेल, ज्यामध्ये नेट बँकिंग अकाउंट लॉगिन करा, नंतर टाकलेले पैसे चेक करून शेवटचा ट्रांसक्शन्स पासवर्ड टाका.

काही वेळातच Paytm Wallet मध्ये पैसे जमा होतील.


या लेख बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!