Uncategorized

फक्त याच खात्यात येणार माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता | Check Bank Account For Mazi Ladki Bahin Scheme

बऱ्याच महिला लाभार्थ्यांकडून एक प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे, तो म्हणजे तुमचे म्हणजेच संबंधित महिलेचे जर भरपूर बँक खाते असतील, तर नेमके योजनेचे पैसे कोणत्या बँक खात्यात मिळणार? नेमके कोणते बँक खाते द्यायचे? तर मित्रांनो, तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….

Check Bank Account for Ladki Bahin Yojana

मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता हा DBT प्रणाली द्वारे वितरित केला जाणार असल्याने, हा हफ्ता फक्त तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच वितरित केला जाईल. मग ते खाते कुठल्याही सरकारी बँकेचे असले तरी चालेल. थोडक्यात सांगायचे झाले तर, जर तुमचं जॉईंट खाते असेल तर ते तुम्ही देऊ नका. तसेच जर एखाद्या बँकेचे खाते आधार लिंक नसेल तर असे बँक खाते देखील देऊ नका.



त्या ऐवजी तुम्ही नवीन खाते उघडून ते देऊ शकता. किंवा जर तुमचं आधीच एखादं बँक खाते आहे, आणि जर तुम्हाला ते आधार लिंक आहे की नाही ते माहीत नसेल तर ते देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. कोणते बँक खाते आधार लिंक आहे हे ऑनलाईन पद्धतीने पाहून मग तेच खाते तुम्ही योजनेच्या लाभ घेण्यासाठी द्यायचे आहे.

कोणत्या बँक खात्यात येणार माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता?

स्टेप 1: मित्रांनो, तुमचे कोणते बँक खाते आधार शी लिंक आहे हे पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला आधारच्या म्हणजेच UIDAI च्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचे आहे. आधार कार्ड UIDAI वेबसाइट => myaadhaar.uidai.gov.in

Check Bank Account for Ladki Bahin Yojana Step 1

स्टेप 2: त्या नंतर तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील त्यातील ‘बँक सीडिंग स्टेटस/ Bank Seeding Status’ या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर लॉगिन करायचे आहे. त्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर व दिलेला कॅपचा टाकून ‘OTP ने लॉगिन करा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.



Check Bank Account for Ladki Bahin Yojana Step 3

स्टेप 4: त्या नंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी दिलेल्या जागी टाकून नंतर login बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5: परत एकदा तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील त्यातील ‘बँक सीडिंग स्टेटस/ Bank Seeding Status’ या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.

Check Bank Account for Ladki Bahin Yojana Step 5

स्टेप 6: त्या नंतर तुमच्या आधार कार्ड शी लिंक आलेले बँक खाते इथे दाखवले जाईल. त्यात हे बँक खाते कधी पासून लिंक आहे, बँक अकाउंट नंबर चे शेवटचे चार डिजिट, आणि अकौंटची सध्याची स्थिती म्हणजे ऍक्टिव्ह आज की इनऍक्टिव्ह ते दाखवले जाईल.

Check Bank Account for Ladki Bahin Yojana Step 6

मित्रांनो, जे अकाउंट इथे ऍक्टिव्ह आले तेच बँक अकाउंट / खाते तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या DBT साठी वापरू शकता. तसेच हेच खाते तुम्ही प्रत्येक योजनेच्या DBT साठी देखील वापरू शकता.
तसेच अर्ज भरताना तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर जो आहे तो व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. याशिवाय IFSC कोड अशी सगळी माहिती बिनचूक भरणं गरजेचं आहे. याशिवाय बँकेचं नाव, बँकेची शाखा ही सगळी माहिती भरणंही आवश्यक आहे. यामध्ये जर चूक झाली तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. यामुळे बँकेसंबंधी जो काही तपशील आहे तो अगदी नेमकेपणाने भरणं गरजेचं आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हफ्ता नक्की कोणत्या खात्यात येणार, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवादl

Tags: ladki bahin yojana dbt, bank account for ladki bahin yojana, ladli behna yojana Maharashtra, mukhyamantri majhi ladki bahin yojana application, documents required for Majhi ladki bahin scheme, aadhar bank account seeding status, bank account aadhar link, mukhyamantri mazi ladki bahin yojana installment, mukhyamantri mazi ladki bahin yojana online installment info, mukhyamantri mazi ladki bahin yojana installment info, mukhyamantri mazi ladki bahin yojana hapta mahiti, mukhyamantri mazi ladki bahin yojana payment info, mukhyamantri mazi ladki bahin yojana nari shakti doot payment, mazi bahin ladki yojana form kasa bharava, mazi ladki bahin online form, form filling

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!