Bank Statement

ऍक्सिस बँकेचे स्टेटमेंट ऑनलाइन चेक/ डाउनलोड करा (2 मिनिटात) | Axis Bank Statement

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण ऍक्सिस बँकेचे स्टेटमेंट ऑनलाइन पद्धतीने चेक/ डाउनलोड कसे करायचे, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Axis Bank Statement Check Ani Download Kase Karayche

मित्रांनो, ऍक्सिस बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे. ऍक्सिस बँकेचे अधिकृत कार्यालय अहमदाबाद येथे आहे आणि सेंट्रल ऑफिस मुंबई येथे आहे. ऍक्सिस बँक आपल्या ग्राहकांना खाते उघडण्यापासून ते विविध प्रकारच्या सुविधा वेळोवेळी देत असते. याशिवाय ऍक्सिस बँक आपल्या ग्राहकांना खात्यातील शिल्लक तपासणे म्हणजेच त्यांच्या बँक खात्याचे संपूर्ण स्टेटमेंट जाणून घेण्याची व डाउनलोड करण्याची सुविधा देखील प्रदान करते.



तुम्हाला खात्याबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही बँकेचे स्टेटमेंट बघू शकता. आणि महत्वाचे म्हणजे हे स्टेटमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील बघू शकता. त्यामुळे तुम्ही देखील जर ऍक्सिस बँकेचे खातेधारक असाल आणि बँकेला भेट न देता, रांगेत उभे न राहता तुम्हाला तुमचे खाते स्टेटमेंट कसे मिळवायचे हे माहीत करून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. कारण या लेखात आम्ही तुम्हाला ऍक्सिस बँकेचे स्टेटमेंट ऑनलाइन कसे मिळवायचे, यासंबंधित सर्व माहिती सांगणार आहोत.

ऍक्सिस बँक स्टेटमेंट डाउनलोड/ चेक

मित्रांनो, सध्या जवळपास सर्वच सरकारी तसेच खाजगी बँका त्यांच्या ग्राहकांना बँक स्टेटमेंटची सुविधा देत आहेत. तुम्ही ही तुमचे बँकेचे स्टेटमेंट विविध पद्धतीने काढू शकता. त्या कोणत्या विविध पद्धती आहेत त्या बद्दल पुढे जाणून घेऊ या:-

इंटरनेट बँकिंग द्वारे ऍक्सिस बँक स्टेटमेंट मिळवणे

स्टेप 1: मित्रांनो, आजकाल इंटरनेट बँकिंगचा वापर जास्त प्रमाणात वाढत आहे. ऍक्सिस बँकेचे इंटरनेट बँकिंग वापरण्यासाठी, तुम्हाला सर्वात पहिले इंटरनेट बँकिंग मध्ये तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्या नंतर, तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. त्याच्या मदतीने तुमच्या नेट बँकिंग खात्यात तुम्हाला लॉग इन करायचे आहे.

Axis Internet Banking Bank Statement Download Step 1

स्टेप 2: त्या नंतर डॅशबोर्ड तुम्हाला तुमचे अकाउंट दिसेल ज्या अकाउंट चे स्टेटमेंट काढायचे आहे त्यासमोर असलेल्या View All वर क्लिक करा.

Axis Internet Banking Bank Statement Download Step 2

स्टेप 3: त्या नंतर थोडे खाली स्क्रोल करून तुम्ही तुमचे शेवटचे 10 व्यवहार म्हणजे स्टेटमेंट पाहू शकता. तसेच तुम्हाला जर डिटेल मध्ये स्टेटमेंट पहायचे असेल किंवा डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला Statement ऑप्शन वर क्लिक करा.



Axis Internet Banking Bank Statement Download Step 3

स्टेप 4: नंतर Detailed Statement हा ऑप्शन निवडावा लागेल.

Axis Internet Banking Bank Statement Download Step 4

स्टेप 5: त्यानंतर तुम्हाला ज्या तारखेचे स्टेटमेंट पहायचे आहे ती तारीख निवडायची आहे. याशिवाय, तुम्ही महिना, मागील महिना, शेवटचे 3 महिने, वर्तमान आर्थिक वर्ष देखील निवडू शकता. व तुमचे बँक स्टेटमेंट पाहू व डाउनलोड करून घेऊ शकता.

Axis Internet Banking Bank Statement Download Step 5

मोबाईल बँकिंग द्वारे ऍक्सिस बँकेचे स्टेटमेंट कसे मिळवायचे?

स्टेप 1: मित्रांनो, मोबाईल बँकिंगद्वारे तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट मिळवण्यासाठी, तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या स्मार्टफोन वर गुगल प्ले स्टोअर वरून Axis Mobile – Pay, Invest & UPI ऍप इंस्टॉल करावे लागेल आणि रजिस्ट्रेशन करावे लागेल.

Axis Mobile Banking Bank Statement Download Step 1

स्टेप 2: त्यानंतर तुम्हाला M- Pin सबमिट करून ऍप मध्ये लॉग इन करायचे आहे. आता तुमच्या समोर मोबाईल बँकिंग चे डॅशबोर्ड ओपन होईल, त्या नंतर तुम्हाला अकाउंट्स या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Axis Mobile Banking Bank Statement Download Step 2

स्टेप 3: यानंतर तुम्हाला शेवटचे 10 व्यवहार तुम्हाला दिसतील. याशिवाय, जर तुम्हाला डिटेल्स मध्ये स्टेटमेंट पहायचे असेल, तर तुम्हाला View Statement ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Axis Mobile Banking Bank Statement Download Step 3

स्टेप 4: तसेच तुम्हाला जर तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट तुमच्या ईमेल वर घ्यायचे असतील तर तुम्हाला रिक्वेस्ट स्टेटमेंट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे, जर तुम्हाला स्टेटमेंट डायरेक्ट तुमच्या मोबाईल वर पाहिजे असेल तर वरती तारीख निवडून Download Statement ऑपशन वर क्लीक करायचे आहे.

Axis Mobile Banking Bank Statement Download Step 4

मिस्ड कॉल द्वारे ऍक्सिस बँक स्टेटमेंट काढणे

मित्रांनो, Axis Bank द्वारे देण्यात येणाऱ्या मिस्ड कॉल सेवेद्वारे, तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक काही सेकंदात बघू शकता आणि घर बसल्या. त्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून 1800 419 6969 (इंग्लिश मध्ये) किंवा 1800 419 6868 (हिंदी मध्ये) या नंबर वर कॉल करायचा आहे व दोन रिंग वाजताच फोन डिस्कनेक्ट होईल. त्या नंतर आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर बँकेकडून एक एसएमएस येईल. त्यात तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट दिसेल.

SMS द्वारे ऍक्सिस बँक स्टेटमेंट कसे मिळवायचे?

मित्रांनो, तुम्हाला जर ऍक्सिस बँकेच्या एसएमएस (SMS) बँकिंग सिस्टीम द्वारे तुमच्या खात्याचे स्टेटमेंट मिळवायचे असेल, तर तुम्हाला 8691000002 किंवा 56161600 वर एसएमएस करावा लागेल. काही वेळानंतर, तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबर वर बँकेकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुमच्या ऍक्सिस बँक खात्याचे स्टेटमेंट दिले जाईल.

MINI <ABC> ABC जागी तुमचा अकाउंट नंबर, 8691000002 किंवा 56161600 नंबर वर SMS करा

ATM मधून Axis Bank खात्याचे स्टेटमेंट कसे काढायचे?

मित्रांनो, आता तुम्ही ऍक्सिस बँक खात्याचे स्टेटमेंट एटीएम द्वारे ही काढू शकता. त्यासाठी तुम्ही ऍक्सिस बँकेच्या एटीएम कार्डचा वापर करू शकता. एटीएम द्वारे स्टेटमेंट कसे काढायचे ते पुढील स्टेप्स द्वारे जाणून घेऊ…

स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या जवळच्या ऍक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये जावे लागेल.

स्टेप 2: आता तुम्हाला तुमचे ऍक्सिस बँकेचे एटीएम कार्ड एटीएम मशीनमध्ये स्वॅप करायचे आहे.

स्टेप 3: या नंतर तुम्हाला तुमची भाषा हिंदी किंवा इंग्रजी निवडायची आहे.

स्टेप 4: त्या नंतर Mini Statement या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व तुमचे सेव्हिंग किंवा करंट अकाउंट निवडायचे आहे.

स्टेप 5: या नंतर आता तुम्हाला तुमचा एटीएम पिन टाकून कन्फर्म ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आता थोड्या वेळात एटीएम मशीन मधून एक पावती बाहेर येईल. यामध्ये तुम्ही केलेल्या शेवटच्या 10 व्यवहारांचे स्टेटमेंट डिटेल्स दाखवले जातील.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ऍक्सिस बँकेचे स्टेटमेंट विविध प्रकारे कसे काढायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: Axis Bank Statement Download Kase Karayche, Axis Bank Statement Download in Marathi, Axis Statement Download in Marathi, Axis Bank Statement Check Kase Karayche, Axis Bank Statement Kase Baghayche, Axis Bank Statement Kase tapasayche, Axis Bank Statement Check in Marathi, Axis Bank Statement Kadhane, Axis Bank Statement PDF Download Kashi Karaychi, Axis Bank Statement PDF Download Marathi, Axis Bank Statement Mahiti, Axis Bank Statement Info in Marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!