Anandacha Shidha

रेशन कार्ड धारकांना खुशखबर… गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंती निमित्त मिळनार आनंदाचा शिधा | Anandacha Shidha 2024 Update

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंती निमित्त रेशन कार्ड धारकांना कोणता शिधा मिळणार आहे, या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Anandacha-Shidha

मित्रांनो, आपल्या शासनाने पुन्हा एकदा रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानांमध्ये काही वस्तू देण्यात येणार आहे. यापूर्वी सुद्धा दोन ते तीन वेळा कोणत्या ना कोणत्या सणा निमित्त आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारकांना देण्यात आला होता, त्यामध्ये दिवाळी सण, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्त, तसेच शिवजयंती निमित्त रेशन कार्ड धारकांना आनंदाच्या शिद्याचे वाटप करण्यात आलेले होते.



तसेच आता सुद्धा येत्या गुढीपाडवा निमित्त व डॉ आंबेडकरांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळ घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पुन्हा एकदा आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना देण्यात येणार आहे. यात रेशन कार्ड धारकांना कोण कोणत्या वस्तू मिळणार आहेत त्या बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)

मित्रांनो, राज्यात गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व आदी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणाच्या निर्णया नुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयात प्रत्येकी 1 किलो या प्रमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधा जिन्नस असलेला ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येणार.

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)

Reshning Card Dharakana Anandacha Shidha Milnar

त्यानुसार राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लाख शेतकरी योजनेतील शिधापत्रिका धारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार आहे. यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चास शासनाद्वारे मंजूरी देण्यात आली आहे. आणि ज्यांना या आधी शिधा मिळाला आहे त्यांना सर्वांना हा आनंदाचा शिधा 15 एप्रिल नंतर मिळणार आहे. त्या संबंधित शासनाचा जीआर सुद्धा एक दोन दिवसात प्रकाशित करण्यात येणार आहे. धन्यवाद.



नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!