रेशन कार्ड धारकांना खुशखबर !! श्रीराम जन्मभूमी सोहळा या ६ वस्तू मिळणार | Anandacha Shidha 2024 Update
नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आम्ही रेशन कार्ड धारकांसाठी एक खुशखबर घेऊन आलो आहोत. श्रीराम जन्मभूमी सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रेशन कार्ड धारकांना सहा वस्तू भेटणार आहेत त्या कोणत्या वस्तू आहेत हे आपण पुढे सविस्तरपणे जाणून घेऊ या.
मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी श्री राम प्राणप्रतिष्ठा दिनी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करून सर्वांना एक आनंदाचा इशारा दिला होता. त्या नुसार राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना दिवाळी प्रमाणेच ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या माहितीच्या आधारे, ज्यांच्या कडे हे शिधापत्रिका आहे त्यांना सहा वस्तू मिळणार आहेत. तुम्ही ही जर रेशनकार्ड धारक असाल तर त्या कोणत्या सहा वस्तू आहेत, हे जाणून घेण्यासाठी आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)
मित्रांनो, 10 जानेवारी 2024 रोजी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता दिली आहे. साखर खाद्यतेल चणाडाळ रवा, मैदा आणि पोहे अशा सहा वस्तूंचा याच समावेश करण्यात आला आहे. हा आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिकांना मिळणार आहे.
तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)
राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील असणाऱ्या किंवा केसरी कार्ड असणाऱ्या या सर्व शेतकरी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे. हा आनंदाचा शिधा वितरणाकरता येणारा खर्च हा सुमारे 549.86 कोटी रुपये अंदाजे खर्चास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे. आनंदाचा शिधा प्रति संच 100 रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे. या सहा वस्तू 22 जानेवारीपासून 29 फेब्रुवारी 2024 या काळात सर्व रेशन कार्ड धारकांना देण्यात येईल.
Tags: Anandacha Shidha, Anandacha Shidha 2024 Update, Reshning Card Shidh, Reshning Card Free Shidh, Reshning Card Free vastu