Shop

एअर फ्रायर बद्दल सर्व माहिती | Air Fryer Detail Information

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण एअर फ्रायर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Air Fryer Detail Information in Marathi

एअर फ्रायर (Air fryer) म्हणजे काय?

What is mean by Air fryer



मित्रांनो, एअर फ्रायर म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा ओव्हन असतो. ज्यामध्ये एक हॉट कॉईल ने गरम हवा सगळीकडे पसरवली जाते. तसेच यात पदार्थानुसार तापमान नियंत्रित सुध्दा करता येते. एका विशिष्ट प्रकारच्या डिझाइन मूळे ही गरम हवा पदार्थाच्या चारही बाजूने फिरते व त्यामुळे तो पदार्थ व्यवस्थित शिजला जातो. एअर फ्रायर मध्ये शिजवलेला एखादा पदार्थ एका विशिष्ट तापमानात शिजवला मुळे तो तळलेल्या पदार्थ सारखाच वरून कुरकुरीत व आतून मऊ होतो. यात तेल चे प्रमाण अगदी कमी म्हणजे दोन ते तीन चमचे लागते. त्यामुळे तेलाचा कमीत कमी उपयोग करण्यासाठी एअर फ्रायर हा अगदी चांगला पर्याय आहे.

एअर फ्रायर का वापरावा

Why should we use Air fryer?

मित्रांनो, तुम्हांला जर तळलेले पदार्थ खायला खूप आवडत असतील पण जर जास्त तेलकट पणामुळे तुम्ही ते खात नसाल तर एअर फ्रायर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑपशन आहे. एअर फ्रायर मध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही कमीत कमी तेलात बनवू शकता. तसेच हे पदार्थ आरोग्यास सुद्धा उत्तम असतात. त्याने तब्येतीवर कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. आणि तळलेल्या पदार्थांचा आनंद तुम्ही एअर फ्रायर वापरून घेऊ शकता.

अनेक लोकांचा असा दावा आहे की एअर फ्रायर मूळे फ्रेंच फ्राईज, चिकन विंग्स, फिश स्टिक्स या सारखे पदार्थ मधील चरबीचे प्रमाण कमी होते. कारण यात तेल खूपच कमी प्रमाणात वापरले जाते. थोडक्यात काय तर एअर फ्रायर हे स्वयंपाक घरातील असे उपकरण आहे जे अन्ना भोवती गरम हवा फिरवून ते अन्न तळते/फ्राय करते. आणि या हवेत तळलेले पदार्थ हे खोल तेलात तळलेल्या पदार्थांपेक्षा नक्कीच चांगले आरोग्य दायी असतात. म्हणून एअर फ्रायर वापरणे कधीही चांगले.

एअर फ्रायर वापरण्याचे फायदे

What are the Benefits of Air Fryer Cooking?



  1. एअर फ्रायर म्हणजे हवेत तळलेले पदार्थ हे खोल तळलेल्या पदार्थां पेक्षा आरोग्यदायी असतात.
  2. एअर फ्रायर मध्ये केलेले पदार्थ हे कमी चरबी व कॅलरीज चे असतात.
  3. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा कॅलरी कमी प्रमाणात घ्यायच्या असतील तर एअर फ्रायर वापरणे हे तुमच्यासाठी चांगले ठरू शकते.
  4. एअर फ्रायर ला डिप फ्रायर पेक्षा कमी तेल लागते.
  5. या एअर फ्रायर मध्ये जेवण बनवणे खूप सोपे आहे.
  6. एअर फ्रायर मध्ये शिजवलेले अन्न छान कुरकुरीत म्हणचे क्रिस्पी होते ते ही अगदी कमी तेलात.
  7. एअर फ्रायर चा चांगला फायदा असा की ते खूप लवकर गरम होते. व तुमचा स्वयंपाक चा वेळ वाचतो.
  8. जसे की ओव्हनला प्री हिटिंग ची गरज असते. पण एअर फ्रायर ला बऱ्याच पाक कृतींसाठी प्री हिटिंग ची गरज पडत नाही.
  9. एअर फ्रायर हे स्वच्छ करण्यास ही अगदी सोपे आहे. काही एअर फ्रायर बास्केट हे डिश वॉशर मध्ये सुद्धा साफ करता येतात.

एअर फ्रायर चे तोटे

Disadvantages of Air Fryer Cooking?

  1. एअर फ्रायर मध्ये बनवलेले पदार्थ हे चवीला थोडे वेगळे असू शकतात. म्हणजे डिप फ्राइंग च्या तुलनेत एअर फ्रायर मधल्या अन्नाची चव थोडी वेगळी लागू शकते.
  2. एअर फ्रायर मध्ये ही काही प्रमाणात हानिकारक रसायने तयार होत असल्याने त्याचा वापर थोडा मर्यादित असावा. (याचे ठोस पुरावे कुठेही उपलब्ध नाहीत)
  3. काही पदार्थांना शिजवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

आता भारतातील काही चांगले एअर फ्रायर बद्दल जाणून घेऊ या

Lifelong fryo 4.5L एअर फ्रायर

मित्रांनो, 4.5 ली चे हे एअर फ्रायर खूप चांगले क्वालिटी चे मानले जाते. चार ते पाच लोकांसाठी हे एअर फ्रायर पुरेसे आहे. यात तुम्ही पदार्थ ग्रिल करू शकता, बेक करू शकता, रोस्ट करू शकता, फ्राय करू शकता. हे एअर फ्रायर 1400 W चे असते जे दोन ते तीन मिनिटात गरम होऊन जाते. तसेच यात आपण टाइमर सिलेक्ट करू शकतो व टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम सुद्धा यात दिलेली आहे.

शिवाय या प्रोडक्ट ची एक वर्षाची वॉरंटी तुम्हाला इथे मिळते. आणि जवळ पास 4000 ते 4300 रुपये पर्यंत याची किंमत असू शकते. हे प्रोडक्ट शक्यतो ब्लॅक कलर मध्ये असते. आणि याचे वजन अंदाजे 3000 ग्रॅम पर्यंत असू शकते.

Lifelong LLHF421 Fryo Air Fryer

INALSA (इनालसा) 4L एअर फ्रायर

मित्रांनो, इनालसा कंपनीचे हे 4 लिटर चे एअर फ्रायर हे नॉन स्टिक, ऍडजस्टेबल, व वापरण्यास सोपे असे आहे. या एअर फ्रायर मध्ये तुम्हाला 1400 W पॉवर कॅपसीटी मिळते. जे दोन ते तीन मिनिटात गरम होते. यात तुम्हाला स्मार्ट एअर क्रिस्प टेक्नॉलॉजी मिळते जे पदार्थांची क्रिस्पी नेस टिकवून ठेवते. यात ही तुम्हाला टाइमर सेटिंग मिळते सोबतच टेम्परेचर कंट्रोल सिस्टिम सुद्धा मिळते.

या प्रोडक्ट तुम्हाला ची दोन वर्षांची वॉरंटी मिळते. तसेच याची किंमत हो जवळ पास 5500 ते 6000 रुपये पर्यंत असू शकते. इनालसा चे हे एअर फ्रायर मध्ये तुम्हाला डिजिटल टच स्क्रीन मिळते. यात तुम्हाला बझ्झर सुद्धा मिळतो कूकिंग झाल्यावर वाजतो. याचे फीट सुद्धा नॉन स्लीपी आहेत. यात तुम्ही चिप्स सोबतच चिकन, बीफ, करी, तसेच डेझर्ट सुद्धा कूक करू शकता. तसेच या स्टायलिश एअर फ्रायर चे वजन ही 5 ते 5.2 किलो च्या आसपास असू शकते.

INALSA Air Fryer Digital Nutri Fry

Solara (सोलारा) Large 5.5L डिजिटल एअर फ्रायर

मित्रांनो, सोलारा चे हे एअर फ्रायर 5.5 लिटर कॅपॅसिटी चे असून 5 ते 6 जणांसाठी पुरेसे आहे. यात 360° मध्ये एअर सर्क्युलेशन होते ज्यामुळे अन्न चार ही बाजूने व्यवस्थित शिजते. व पदार्थाला छान क्रिस्पीनेस येतो. यात ही तुम्हाला 1400 W पॉवर कॅपॅसिटी मिळते. खूपच छान असे हे प्रोडक्ट आहे. तसेच यात 8 प्री सेट मोड मिळतात. व हे प्रोडक्ट डिजिटल असल्याने यात टाइमर लावू शकता किंवा पाहिजे तेवढे टेम्परेचर सेट किंवा कंट्रोल करू शकता.

याशिवाय एक वर्षाची इथे तुम्हाला प्रोडक्ट वॉरंटी मिळते. तसेच याचे वजन अंदाजे 4.2 किलो पर्यंत असू शकते. आणि किंमत बघायची झाली तर सोलारा चे 5.5 ली चे हे डिजिटल एअर फ्रायर तुम्हाला जवळ जवळ 7000 रुपये पर्यंत मिळू शकते. या एअर फ्रायर चे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे हे डिजिटल टच स्क्रीन मेन्यू सह येते आणि शिवाय यात तुम्हाला शंभर पेक्षा जास्त रेसिपी असलेले एक रेसिपी ई – बुक मिळते. ज्याचा वापर करून तुम्ही नवीन नवीन पदार्थ करून बघू शकता. तसेच यात असलेल्या फ्रायर चा पॅन हा नॉन स्टिक असून तो वेगळ्या बास्केट सह येतो. या शिवाय ते डिश वॉशर मध्ये सुद्धा साफ केले जाऊ शकते.

SOLARA Xtra Large Digital Air Fryer

Philips (फिलिप्स) 4.1L डिजिटल एअर फ्रायर

मित्रांनो, फिलिप्स कंपनी चे सर्वच प्रोडक्ट हे चांगले असतात. तसेच यांचे एअर फ्रायर पण अतिशय उत्तम दर्जाचे आहे. यात तुम्हाला 4.1 लिटर ची क्षमता मिळते जे चार ते पाच व्यक्तीसाठी पुरेसे आहे. यात ही तुम्हाला 1400 W ची पॉवर कॅपॅसिटी मिळते. यात सुद्धा तुम्हाला रॅपिड एअर सर्क्युलेशन फॅसिलिटी मिळते ज्यामुळे अन्न लवकर शिजते. शिवाय यात 7 प्री सेट मेन्यू मिळते जे तुमचे कूकिंग सोपे करून टाकते. या एअर फ्रायर मध्ये तुम्हाक टायमर सेटिंग व टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम मिळते.

यात तुम्हाला दोन वर्षांची प्रोडक्ट वॉरंटी मिळते व याची किंमत ही अंदाजे 9000 ते 9800 रुपये म्हणजे जवळ जवळ 10,000 पर्यंत असू शकते. या एअर फ्रायर ची किंमत जरी जास्त असली तरी हे प्रोडक्ट खूप टिकाऊ आहे. आणि यात जवळ पास 90 टक्के कमी तेल लागते. म्हणजे अगदी थोड्याच तेलात तुम्ही यात पदार्थ बेक करू शकता, रोस्ट करू शकता, ग्रिल वगैरे करू शकता.

PHILIPS Digital Air Fryer

Havells (हावेल्स) 5L Prolife Grande एअर फ्रायर

मित्रांनो, हावेल्स चे हे एअर फ्रायर एक उत्तम व चांगल्या दर्जाचे तयार केले असून वापरण्यासाठी ते अतिशय अनुकूल आहे. यात ही अन्न चांगले शिजवण्यासाठी 360° एअर सर्क्युलेशन मिळते. तसेच यात 10 प्री सेट पर्याय मिळतात जे तुमचे जेवण रुचकर आणि स्वादिष्ट बनवतात. हे एअर फ्रायर LED डिस्प्ले सह येते . तसेच यात ऍडजस्टेबल टायमर व टेम्परेचर कंट्रोल येते. याशिवाय यात ऑटोमॅटिकली 60 मिनिट पर्यंत ऑटो शूट ऑफ (ऑटोमॅटिक बंद होणे) फॅसिलिटी मिळते. यात तुम्हाला 1700 W पॉवर कॅपॅसिटी मिळत असून या प्रोडक्ट ला खूप कमी ऊर्जा लागते.

याचे वजन अंदाजे 7 किलो पर्यंत असते. यात तुम्हाला ओव्हर हिटिंग प्रोटेक्शन सिस्टीम मिळते व एक सेफ्टी लॉक मिळते. ज्यात तुमचे अन्न जास्त गरम म्हणजेच Over Heating होण्यापासून वाचते. यात तुम्हाला दोन वर्षांची प्रोडक्ट वॉरंटी मिळते. या एअर फ्रायर ची किंमत ही जरा जास्त असून ती अंदाजे 11,500 ते 12,000 रुपये पर्यंत असू शकते.

Havells Prolife Grande Air Fryer

एअर फ्रायर विकत घेताना कोणत्या गोष्टी बघाव्यात

Factors to Consider When Choosing Your New Air Fryer

मित्रांनो एअर फ्रायर खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला हव्या.. जसे की…

  • वीज वापर – तुम्ही निवडलेल्या एअर फ्रायरला किती वीज लागते हे बघणे खूप आवश्यक आहे. कारण या वरच तुमचे विजेचे बिल वाढेल की कमी होईल ते ठरेल.
  • क्षमता – मित्रांनो, एअर फ्रायर हे वेगवेगळ्या कॅपॅसिटी म्हणजे क्षमतेचे असते. त्यात तुम्हाला किती अन्न शिजवायचे आहे त्यावर किती लिटर चा एअर फ्रायर घ्यायचा हे ठरते. म्हणजे 3 ते 4 व्यक्ती असलेल्या कुटुंबासाठी 4 किंवा 5 लिटर चे एअर फ्रायर पुरेसे होते.
  • टेम्परेचर सेटिंग – एअर फ्रायर घेताना त्यात ऍडजस्टेबल टेम्परेचर कंट्रोल सेटिंग आहे का ते बघून घ्या. कारण त्याचा थेट परिणाम हा तुमच्या अन्नावर होणार आहे.
  • ऑटो ऑफ सिस्टीम – एअर फ्रायर मध्ये ऑटो ऑफ सिस्टीम मध्ये तुम्ही टायमर लावू शकता. टायमर मुळे वेळ झाली की ते आपोआप बंद होते.

एअर फ्रायर ची काळजी कशी घ्यावी

Air Fryer Care And Maintenance Tips

मित्रांनो, एअर फ्रायर वापरून झाल्यानंतर नेहमी स्वच्छ करून व पूर्ण कोरडे करून ठेवावे. आत मध्ये अन्नाचे कण किंवा तेल सांडले असेल तर ते काढून टाका. गॅस स्टोव्ह किंवा इतर गरम वस्तू जवळ एअर फ्रायर ठेवू नका. फ्रायरच्या मागच्या बाजूला गरम हवेचे आउटलेट असते ते ब्लॉक होणार नाही याची काळजी घ्या. एअर फ्रायर ची बाहेर ची बाजू ही ओल्या कपड्याने पुसून घ्यावी. आत असलेले फूड बास्केट व डिप पॅन हे साबणाच्या पाण्याने स्वच्छ करून कोरडे करून मगच ठेवावे. ड्रीप पॅन हे नॉन स्टिक असते त्यामुळे त्याला धातूच्या घासणी ने घासू नये.

तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण एअर फ्रायर बद्दल सर्व माहिती जाणून घेतली. आशा आहे की तुम्हाला आज चा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसेच तुमच्या मित्रासोबत हा लेख शेअर करायला विसरू नका.

अश्या या उपयोगी व आरोग्यासाठी उपयुक्त असलेले तसेच वापरण्यास अगदी सोपे असे हे एअर फ्रायर एकदा तरी नक्की वापरून बघा. व इतरांनाही वापरण्यास सांगा.
धन्यवाद !

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!