BankSBI Bank

आपला बॅंकेतील रजिस्टर मोबाईल नंबर बदलल्या नंतर घ्या ही काळजी, त्यामुळे आपले ‘हे’ नुकसान होणार नाही

आजकाल लोकं अगदी सहज आपला मोबाईल नंबर बदलतात. पण मोबाईल क्रमांक बदलल्या नंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी याची माहिती लोकांना नसते. शिवाय ही काळजी का घ्यावी याची देखील माहिती लोकांना नसते. पण जर असे केले नाही तर आपले किती नुकसान होऊ शकते याचे एक उदाहरण आपण पाहू.

आपला बॅंकेतील रजिस्टर मोबाईल नंबर बदलल्या नंतर घ्या ही काळजी, त्यामुळे आपले 'हे' नुकसान होणार नाही

Take care after changing your bank register mobile number



अश्याच एका महिलेने तिचा मोबाईल क्रमांक बदलला, परंतु तिने तो बँकेत कळवला नाही. आणि एक दिवशी तिच्या बँक खात्यातून तब्बल ८,१६,०००/- रुपये अज्ञाताने काढून घेतले.

आता हे नक्की कसे घडले ?

  1. तर या महिलेने तिच्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक केला होता. तो नंबर तिने 4 वर्षे वापरला नाही.
  2. पण तिने तिच्या KYC मधून ते हटवण्यासाठी बँकेला कळवले नाही.
  3. आता, ती वापरात नसलेल्या मोबाईल सिम नंबर मोबाईल कंपनीने बंद केला आणि दुसऱ्या व्यक्तीला दिला.
  4. मोबाइल कंपनीच्या पॉलिसीनुसार, जर कोणताही नंबर जर तुम्ही ६ महिन्यांपर्यंत वापरला नाही तर तो दुसऱ्याला देवु शकतात. आणि आपण त्यांना यावर जाब विचारू शकत नाही
  5. आता बँकेच्या नियमित घडामोडींचा येणारा एसएमएस ज्याला नवीन नंबर मिळाला होता त्याला यायला लागले. मग त्याने काय केले ? तर त्याने एका लिंकद्वारे बँकेच्या साइटवर प्रवेश केला. आणि लॉगिन मध्ये जाऊन फरगेट पासवर्ड केले. आता बँकेकडून आलेल्या लिंकचा OTP सत्यतेसाठी त्याच्या ताब्यात असलेल्या नंबरवर गेला, त्याने औपचारिकता पूर्ण केली आणि इंटरनेट बँकिंगद्वारे आनंदाने सर्व पैसे काढले.

त्यामुळे, बँक खात्याशीस काय पण आपण वापरत नसलेला किंवा बंद केलेला आपला जुना नंबर आपण कोठेही लिंक केलेला असेल तर, बँकिंग नियमानुसार बँकेत जाऊन तो नंबर डीलिंक करावा लागेल.

कृपया वरील बाबी लक्षात घेता. आपला सहा महिने वापर न केलेला मोबाइल नंबर दुसऱ्याला रिअलॉट केला जाऊ शकतो.

ही वस्तुस्थिती आपल्यापैकी अनेकांसाठी नवीन माहिती असू शकते.



खुप महत्त्वाची गोष्ट आहे. नक्की विचार करा आणि मोबाईल नंबर बदलल्यानंतर तो बँकेत अपडेट करण्याची गरज लक्षात घ्या. आणि ही माहिती आपल्या जवळच्या सगळ्या लोकांना पाठवा

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!