अँसिडीटी म्हणजे नेमकं काय ? अँसिडीटी वर साधे सोपे घरगुती उपाय
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण अँसिडीटी म्हणजे नेमकं काय ? आणि अँसिडीटी वर असणारे साधे सोपे घरगुती उपाय माहिती करून घेणार आहोत.
मित्रांनो, अँसिडीटीचा त्रास हा प्रत्येकला होतो. कामाची अनियमित वेळ, धावपळी चे जीवन, अवेळी जेवणे, बदलती जीवन शैली यासर्व कारणांमुळे अपचन होऊन अँसिडीटीचा त्रास सुरू होतो. अँसिडीटीमुळे छातीत जळजळ होणे हा त्रास अनेकांना होतो. मग शेवटी डॉक्टरकडे जावे लागते. त्यामुळे अँसिडीटी ही नेहमी आढळून येणारी तक्रार आहे. पण अँसिडीटी म्हणजे नेमकं काय? त्याची लक्षणे कोणती? अँसिडीटी का होते? व त्यावरील घरगुती उपाय काय? या बद्दल आपल्याला माहीत असणे खूप महत्वाचे आहे.
चला तर मग अँसिडीटी बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या. आणि तुम्हाला ही जर अँसिडीटी चा त्रास असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे त्यामुळे शेवट पर्यंत नक्की वाचा.
अँसिडीटी म्हणजे नेमकं काय ?
What is Acidity?
अँसिडीटी म्हणजे आपल्या पोटात म्हणजेच जठरात प्रमाण पेक्षा जास्त आम्ल तयार होणे. अँसिडीटी ला आम्ल पित्त असेही म्हणतात. खरंतर हे आम्ल अन्न पचन होण्यासाठी खूप आवश्यक असते. पण जर याचे प्रमाण गरजे पेक्षा जास्त झाले तर मग अँसिडीटी म्हणजे आम्लपित्त चा त्रास होतो.
अँसिडीटीची लक्षणे
What are the Symptoms and Signs of Acidity?
मित्रांनो अँसिडीटी म्हणजे नेमकं काय होतं हे तुम्हाला माहीत आहे का, माहीत नसेल तर आपण आता त्याची लक्षणे जाणून घेऊया.
- मित्रांनो, तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल, काहीच काम करावेसे वाटते नसेल, कशात लक्ष लागत नसेल , डोके दुखत असेल तर हे अँसिडीटी होण्याचे लक्षण असू शकते.
- अँसिडीटी चा त्रास जास्त होत राहिला की मग पोटात जळजळ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कधी कधी पोट ही दुखायला लागते.
- मित्रांनो, जर तुम्हाला सतत आंबट ढेकर येत असतील किंवा घशा जवळ आंबट आंबट वाटत असेल तर तुम्हाला अँसिडीटी झाली आहे असे समजावे.
- या शिवाय जर तुम्हाला उलटी सारखे होत असेल तर तुम्हाला अपचन होऊ शकते व यामुळे अँसिडीटी चा त्रास होऊ शकतो.
- तसेच जर तुम्हाला छातीत किंवा घशात जळजळ होत असेल तर तुम्हाला अँसिडीटी चा त्रास होत आहे . व तुम्हाला त्या कडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
- या शिवाय जर तुम्हाला करपट ढेकर येत असतील, डोळ्यासमोर अंधारी येत असेल, चक्कर येत असतील, अंग जड पडत असेल तर अँसिडीटी असू शकते.
ऍसिडीटी होण्याची कारणे कोणती
What are the Causes of Acidity?
मित्रांनो, आपल्या स्वतः च्या काही चुकीच्या सवयीमुळे आपल्याला अँसिडीटी चा त्रास होत असतो. त्यामुळे तुम्हाला जर अँसिडीटी होत असेल तर ते होण्याचे कारण काय आहे ते तुम्हाला माहीत असायला हवे. चला तर अँसिडीटी होण्यामागची काय कारणं आहेत ते बघू.
- अँसिडीटी होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे अवेळी जेवण करणे. तुम्ही जर नको त्यावेळी जेवण करत असाल तर तुम्हाला अँसिडीटी चा त्रास होतो. रात्रीचे जेवण जर उशिरा केले तर तुम्हाला अँसिडीटी होणार म्हणजे होणारच.
- अनेक जणांना उरलेले जेवण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ही खातात. या शिळ्या अन्न मुळे सुद्धा अँसिडीटी चा त्रास होऊ शकतो. कारण शिळे अन्न पचायला जड जाते. म्हणून अँसिडीटी होण्याचे हे ही एक कारण आहे.
- तुम्ही जर जेवणाची वेळ चुकवली व काही तिखट तेलकट किंवा मसालेदार खाल्ले तर तुम्हाला अँसिडीटी होते. अश्या तिखट पदार्थमुळे मग घशाशी आंबट आंबट पाणी येते व जळजळ सुरू होते. त्यामुळे चुकीच्या वेळी असे स्पाईसी पदार्थ खाणे हे सुद्धा अँसिडीटी चे एक कारण आहे.
- एखादा पदार्थ आवडल्या वर तुम्ही तो जास्त खाता, त्यामुळे अति जास्त प्रमाणात खाणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त खाणे यामुळे अपचन होते. व मग अँसिडीटी होते. म्हणून च क्षमतेपेक्षा जास्त खाणे हे ही अँसिडीटी चे एक कारण आहे.
- तसेच जास्त मांसाहार व मसालेदार खाणे हे ही अँसिडीटी होण्याचे एक कारण आहे. या शिवाय जास्त स्ट्रेस घेतल्या मूळे ही अँसिडीटी चा त्रास होतो.
- याशिवाय मद्यपान किंवा अधिक प्रमाणात धूम्रपान करणे हे सुद्धा अँसिडीटी होण्याचे प्रमुख कारण आहे.
अँसिडीटी वर घरगुती उपाय
Home Remedies for Getting Relief From Acidity
- मित्रांनो, जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर अशा वेळी तुम्ही थंड दुधाचे सेवन केले पाहिजे. थंड दूध पिल्याने पोटातील जळजळ कमी होते व ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.
- अनेकांना अँसिडीटी झाल्यावर आईस्क्रीम खाल्ली की बरे वाटते त्या मुळे व्हॅनिला आइस्क्रीम सुद्धा अँसिडीटी झाल्यास खाल्ले तर त्याने आराम मिळतो. या व्हॅनिला आइसक्रीम मुळे पोटात थंडावा निर्माण होतो आणि ॲसिडिटीला आराम मिळतो.
- मित्रांनो जेवण झाल्यावर केळ खाल्ल्याने पोटात झालेले गॅस कमी होतात, तसेच जर तुम्हाला करपट ढेकर येत असतील तर अशा वेळेस केळी खाल्ल्याने आराम मिळतो. त्यामूळे अँसिडीटी मध्ये केळी खाल्याने फायदा होतो.
- मित्रांनो अँसिडीटी झाल्यावर आवळा सुपारी किंवा आवळ्याची एखादी फोड खाल्ली तरी अँसिडीटी मध्ये आराम मिळतो. कारण आवळ्याचा रस अँसिडीटी ची तीव्रता कमी करतो.
- ॲसिडिटीचा त्रास झाल्यावर घरच्या घरी तुम्ही तो कमी करू शकता तेही जिरे पाणी पिऊन. जिरे पाणी पिल्यामुळे अँसिडीटीचा त्रास कमी होतो.
- अँसिडीटी झाल्यावर लवंग चघळल्याने लवकर आराम मिळतो.
- नारळाचे पाणी खूप फायदेशीर असते. अँसिडीटी मध्ये सुद्धा नारळाचे पाणी हळूहळू पिल्याने पोटात थंडावा तयार होऊन अँसिडीटी ला आराम मिळतो.
- अँसिडीटी झाल्यावर अनेक जणांना घशाशी तिखट किंवा आंबट पाणी आल्यासारखे वाटते किंवा करपट ढेकर येतात. काही जणांना डोकेदुखी होते, मळमळ होते, तर अशा वेळेस आल्याचा रस किंवा आल्याचा एक तुकडा चघळल्याने अँसिडीटी मध्ये आराम मिळतो.
- काही जणांना अँसिडीटी मध्ये मळमळ किंवा उलटी सारखे होते. तर अश्यावेळी तुम्ही कोकम चे सरबत किंवा रस पिल्याने तुम्हाला उलटी होईल व लगेच बरे वाटेल.
- तसेच अँसिडीटी मध्ये जर जळजळ होत असेल किंवा तिखट पाणी वर येत असेल तर लगेच बडीशेप खाल्याने अँसिडीटी कमी होऊ लागते, व आराम मिळतो.
- अँसिडीटी झाल्यावर किंवा अँसिडीटी होऊ नये म्हणून शक्यतो जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.
- रात्री जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. त्यामुळे अँसिडीटीचा त्रास होतो. म्हणून जेवण व झोप यामध्ये कमीत कमी दोन तासाचे अंतर असायला पाहिजे.
- तुमच्या जीवनशैली त थोडा बदल करा. रोज व्यायाम करा. भरपूर पाणी प्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धूम्रपान व मद्यपान करणे टाळावे.
- अँसिडीटी झाल्यावर तुम्ही ताकाचे सेवन केल्याने सुद्धा लवकर आराम मिळतो.
- तुळशीचे पाने खूप औषधी असतात. तुळशीचे तीन ते चार पाने चावून खाल्याने अँसिडीटी ला लवकर आराम मिळतो.
- पिकलेले अननस खाल्ल्याने पोटातील गॅसेस पासून आराम मिळतो. व अँसिडीटी चा त्रास कमी होतो.
- पुदिन्याची काही पाने चावून खाल्याने सिद्ध पोटात थंडावा निर्माण होऊ अँसिडीटी च्या त्रास ला लवकर बरे करते.
- अँसिडीटी झाल्यावर गूळ खावा व त्यावर एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे अँसिडीटी व गॅसेस वर लगेच फायदा होतो.
- कधी कधी अपुरी झोप झाल्याने किंवा टेंशन मुळे सुद्धा अँसिडीटी चा त्रास होतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. आणि कुठलाही ताण तणाव घेऊ नका.
- बरेच जण अँसिडीटी झाल्यावर तात्पुरते उपाय करतात. पण यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून तुम्हाला जर घरगुती उपाय करून ही अँसिडीटी कमी होत नसेल तर डॉक्टर चा सल्ला घ्या.
मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेल की अँसिडीटी ला बरे करण्यासाठी तुम्ही वरिल कोणताही घरगुती उपाय करू शकता. नाही तर डॉक्टर चा सल्ला ही घेऊ शकता. पण तुम्हाला जर नेहमी अँसिडीटी चा त्रास होत असेल तर घाबरू नका. कारण हा काही आजार नाही. अँसिडीटी ही फक्त निष्काळजी पणा व तुमच्या चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी मुळे होतो. म्हणून फक्त स्वतः ची काळजी घ्या. वेळेवर जेवा. भरपूर पाणी प्या. पुरेशी झोप घ्या. आणि स्ट्रेस फ्री रहा.
तर मित्रांनो, आज चा हा लेख तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. तसेच तुम्हाला हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.