Aadhaar Card

आधार कार्ड मध्ये डॉक्युमेंट अपडेट कसे करायचे | Aadhar Document Update

नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या लेखात तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, तुमचं आधार कार्ड जर 10 वर्ष जुने असेल आणि तुम्ही आधार कार्ड तयार केल्यापासून एकदाही माहिती अपडेट केली नसेल तर तुमचे आधार कार्ड कॅन्सल (Aadhar Card Cancel) किंवा सस्पेंड (Aadhar Card suspend) होऊ शकते. असे होण्यापासून टाळण्यासाठी 10 वर्षाच्या आधी काढलेल्या आधार कार्डला तुम्हाला काही डॉक्युमेंट अपडेट करावे लागणार आहे. त्यामुळे कोणते डॉक्युमेंट अपडेट करायचे व ते कसे अपडेट करायचे हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि भारत सरकारे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी का सांगितले आहे ?



तर भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या 500 हुन अधिक योजना आहेत त्या योग्य व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी आधार कार्ड अपडेट सुरु करण्यात आले आहे. काही लोकांच्या आधार कार्ड वर चुकीची माहिती भरली गेलेली असू शकते, शिवाय काही बोगस आधार कार्ड पण आहेत त्यांचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने आधार अपडेट सुरु केले आहे.

कोणी आधार कार्ड अपडेट करावे ?

जर तुमचे आधार कार्ड 10 वर्ष जुने असेल आणि तुम्ही आधार कार्ड तयार केल्यापासून, कधीही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे, नाही तर आधार कार्ड बंद होऊ शकते. तसेच आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख अजून तरी जाहीर केलेली नाही पण लवकरच तारीख जाहीर होऊ शकते.

तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही प्रकारे अपडेट करू शकता. तसेच घर बसल्या मोबाईल द्वारे किंवा लॅपटॉप द्वारे सुद्धा तुम्ही हे काम करू शकता. ते कसे ते जाणून घेऊ या…

आधार डॉक्युमेंट अपडेट

स्टेप 1: मित्रांनो, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले UIDAI च्या myaadhar पोर्टल myaadhaar.uidai.gov.in वर जावे लागेल. नंतर तुमचे आधार लॉग इन करण्यासाठी Login बटन वर क्लिक करायचे आहे.



Aadhar Document Update Step 1

स्टेप 2: यानंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. व दिलेला कॅपचा टाकायचा आहे व सेंड ओटीपी वर क्लीक करून ओटीपी दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे. व लॉग इन करायचे आहे.

Aadhar Document Update Step 2

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर थोडे खाली स्क्रोल करून Documents Update असा ऑप्शन दिसेल. त्या वर क्लिक करायचे आहे. व पुढच्या पेज वर परत Next बटन वर क्लिक करायचे आहे.

Aadhar Document Update Step 3

स्टेप 4: आता तुम्हाला आधार कार्डला डॉक्युमेंट अपडेट कसे करायचे याची माहिती दिसेल, त्याखाली असलेल्या Next बटन वर क्लिक करायचे आहे.

Aadhar Document Update Step 4

स्टेप 5: मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वर असलेली तुमची वैयक्तिक माहिती दाखवली जाईल ती एकदा चेक करून घ्या. आणि पुढे जेव्हा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे तेव्हा त्या डॉक्युमेंट वरची माहिती आणि हि आधार कार्ड वरील माहिती सारखी आहे का ते चेक करून घ्या. सारखी नसेल तर जवळच्या Aadhar E Seva Kendra ला भेट देऊन माहिती उपडेट करा. (उदा. नावात बदल, पत्ता, जन्मदिनांक…)

माहिती बरोबर असेल तर खाली असलेल्या बॉक्स ( I verify that above details are correct ) वर टिक करा.

Aadhar Document Update Step 5

स्टेप 6: आता थोडे खाली स्क्रोल करून तुम्हाला दोन प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत

  1. Proof of Identity (POI) / ओळखीचा पुरावा
  2. Proof of Address (POA) / पत्त्याचा पुरावा

इथे डॉक्युमेंट अपडेट करताना काही गाईडलाइन्स देण्यात आल्या आहेत जसे की डॉक्युमेंट हे 2MB पर्यंत च असावे, तसेच फाइल ही JPEJ, PDF, PNG फॉरमॅट मधेच अपलोड करावी. इथे तुम्ही तुमचे पॅन कार्ड किंवा ड्राइविंग लायसन्स अपलोड करू शकता. मित्रांनो, तुमच्या आधार कार्ड वर जे नाव ,जी जन्म तारीख आहे त्याच नावाचे डॉक्युमेंट तुम्हाला अपडेट करायचे आहे.

आता बघू Proof of Identity (POI) आणि Proof of Address (POA) मध्ये कोणती डॉक्युमेंट अपलोड करायची. कोणतीही एक

  1. Proof of Identity (POI) – बँक पासबुक, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, किसान फोटो पासबुक, विवाह प्रमाणपत्र, अपंग आयडी कार्ड/अपंग आरोग्य सर्टिफिकेट…
  2. Proof of Address (POA) – ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट, लाईट बिल, गॅस कनेक्शन बिल, किसान फोटो पासबुक, विवाह प्रमाणपत्र, शाळेचे आयडी कार्ड…

आता डॉक्युमेंट अपलोड झाल्या नंतर खाली agree ऑप्शन वर क्लिक करून मग Next बटन वर क्लिक करायचे आहे.

Aadhar Document Update Step 6

स्टेप 7: मित्रांनो डॉक्युमेंट पूर्ण पणे अपलोड झाल्या वर तुम्हाला पेमेंट साठी विचारले जाईल. त्यासाठी पेमेंटसाठी accept बटन वर क्लिक करायचे आहे व नंतर Make Payment बटन वर क्लिक करायचे आहे.

आता तुम्हाला पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही इथे Net Banking, Wallet, किंवा UPI द्वारे सुद्धा पे करू शकता. जर तुम्ही यूपीआई द्वारे पेमेंट करत असाल तर तुमचा यूपीआई नंबर टाकून Proceed ऑप्शन वर क्लिक करायचे आहे व दिलेली अमाउंट रुपये 25 पेड करायचे आहेत.

Aadhar Document Update Step 7

स्टेप 8: मित्रांनो, पेमेंट झाल्यावर तुम्हाला Acknowledgement डाउनलोड करून घ्यायचे आहे. व त्याचा स्क्रीन शॉट काढून घ्या. किंवा PDF मध्ये ही सेव्ह करू शकता. अश्या प्रकारे तुमचे आधार कार्ड अपडेट होऊन जाईल.

Aadhar Document Update Step 8

आधार कार्डला डॉक्युमेंट अपडेट स्टेटस चेक

आता आपण बघू तुमच्या आधार कार्डला डॉक्युमेंट अपडेट करायचे काम कुठेपर्यंत आले आहे ते कसे चेक करायचे म्हणजेच स्टेटस कसा चेक करायचा.

आता तुम्ही myaadhaar पोर्टलच्या होम पेज वर या. नंतर थोडे खाली स्क्रोल करून Check Enrolment & Update Status ऑपशन वर क्लिक करा. नंतर तुम्हाला भेटलेल्या पावती वर असलेला SRN (Service Request Number) टाईप करा आणि नंतर कॅपचा टाका आणि Submit बटन वर क्लिक करा. तुम्हाला खाली लगेच तुमच्या अँप्लिकेशनचा स्टेटस दिसेल.

Aadhar Document Update Status Check

FAQ

आधार कार्ड मध्ये डॉक्युमेंट अपडेट होण्यासाठी किती वेळ लागतो ?

आधार कार्ड मध्ये डॉक्युमेंट अपडेट होण्यासाठी साधारण एका आठवडा ते एका महिना लागू शकतो. तुम्ही तुमच्या पावती वर असलेला SRN चा वापर करून स्टेटस चेक करू शकता.

आधार कार्डच्या नवीन अपडेट नुसार आधार कार्ड खरंच बंद होते का ?

हो होऊ शकते, कारण जर तुमचे आधार कार्ड हे 2015 सालच्या आधी तयार केलेले असेल आणि तुम्ही आधार तयार केल्यापासून त्यामध्ये कोणताही बदल किंवा माहिती अपडेट केली नसेल तर तुमचे आधार बंद होऊ शकते.

आधार कार्ड डॉक्युमेंट अपडेट स्टेटस कसा चेक करायचा ?

सर्वात पहिले तुम्हाला myaadhaar पोर्टल वर जावे लागेल. नंतर Check Enrolment & Update Status ऑपशन वर क्लिक करून, तुम्हाला भेटलेल्या Acknowledgement पावती वर असलेला SRN (Service Request Number) नंबर टाकून तुम्ही तुमच्या अँप्लिकेशनचा स्टेटस चेक करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण आधार कार्डला डॉक्युमेंट अपडेट कसे करायचे याबद्दल माहिती बघितली. आशा करतो की आमचा हा लेख तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तसेच हा लेख तुम्हाला आवडला असल्यास किंवा महत्वपूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद।

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!