WhatsApp वर Block केले आहे की नाही तपासा (5 टिप्स) | How to Know if Someone Has Blocked You on WhatsApp
नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण WhatsApp वर कोणी आपल्याला Block केले आहे की नाही ते कसे समजेल, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, व्हाट्सऍप (whatsapp) वापरणारे जगात कोट्यावधी लोक आहेत. त्यामुळे व्हाट्सऍप हे जगातील सर्वात प्रसिद्ध असणारे मेसेजिंग ऍप आहे. व्हॉट्सऍप वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवं नवीन फीचर्स किंवा अपडेट आणत असते. व्हाट्सऍप मध्ये वेग वेगळे इमोजी, इमेजेस, व्हिडीओ, ऑडिओ फीचर्स ,सिक्युरिटी, प्रायव्हसी यासारखे अनेक पर्याय या ऍप मध्ये आहेत. या सर्वांप्रमाणेच व्हॉट्सऍप मधील एक महत्वाचे फिचर म्हणजे ‘ब्लॉक/ Blocked’ करणे हे आहे.
मित्रांनो, व्हाट्सऍप मुळे आपण जगाच्या कोणत्याही भागात असलो तरी एकमेकांशी सहज संवाद साधू शकतो. हा त्याचा फायदा तर आहे. पण जर एखादी व्यक्ती आपल्या मेसेज पाठवत असेल आणि ते मेसेज जर आपल्याला आक्षेपार्ह वाटले अथवा संबंधित व्यक्तीचे वागणे-बोलणे आक्षेपार्ह वाटले किंवा जर कोणी मेसेज करून त्रास देत असेल तर अश्या वेळी तुम्ही त्या व्यक्तीला व्हाट्सऍप वरून ब्लॉक करू शकता. म्हणजेच ब्लॉक केल्याने तो व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवू शकत नाही. किंवा तो तुमचे व्हॉट्सऍप स्टेटस किंवा प्रोफाईल पिक्चर पाहू शकत नाही. तसेच जर कोणी तुम्हाला ही ब्लॉक केले आहे का या बद्दल जाणून घ्यायचे असेल तर ते जाणून घेण्याची अशी कोणती अधिकृत सोय नाही.
परंतु, काही टिप्स अश्या आहेत ज्या टिप्सच्या मदतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकता की तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे का. त्या कोणत्या टिप्स आहेत हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
टीप 1
मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केले असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा dp रिमूव्ह झालेला दिसेल म्हणजेच त्या व्यक्तीचा प्रोफाइल पिक्चर दिसणार नाही. याचा अर्थ त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले असू शकते.
टीप 2
जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे लास्ट सीन किंवा online स्टेटस दिसत नसेल तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असण्याची शक्यता असते.
टीप 3
तसेच तुम्हाला जर असा संशय असेल की एखाद्या व्यक्तीने व्हाट्सऍप वर ब्लॉक केले आहे, तर अश्या परिस्थितीत तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज पाठवा. जर तुमचा मेसेज पोहोचला नाही किंवा त्या मेसेज ला डबल क्लीक झाले नाही तर समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असण्याची शक्यता आहे. मित्रांनो, कधी कधी इंटरनेट बंद असल्यामुळे देखील मेसेज डबल क्लीक होत नाही.
पण जर एक-दोन दिवसां नंतर ही मेसेज त्या व्यक्तीला पोहोचत नसेल किंवा डबल क्लीक होत नसेल, तर समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असण्याची शक्यता जास्त असते.
टीप 4
याशिवाय जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे, असा तुम्हाला संशय असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला व्हाट्सऍप कॉल करू शकता, जर समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर तुमचा कॉल लागणार नाही म्हणजेच रिंगिंग स्टेटस तुम्हाला दिसणार नाही.
टीप 5
मित्रांनो, जर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं आहे ,असा संशय असेल तर तुम्ही खात्री करण्यासाठी तुम्ही त्या व्यक्ती सोबत व्हाट्सऍप ग्रुप बनवा. जर तुम्हाला असा मेसेज आला की तुम्ही त्या व्यक्तीला जोडण्यासाठी ऑथोराइज्ड नाही, तर मात्र त्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक केल आहे.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही वरील पाच टिप्स च्या मार्फत हे जाणून घेऊ शकता की WhatsApp वर कोणी तुम्हाला Block केले आहे की नाही, मित्रांनो वरील पाच पैकी पहिल्या चार टिप्स मध्ये त्या समोरच्या व्यक्तीने प्रायव्हसी सेटिंग केलेली असू शकते, ज्यामुळे तुम्हाला त्याचे डीपी दिसत नसेल किंवा लास्ट सीन किंवा ऑनलाईन स्टेटस दिसत नसेल किंवा डेटा ऑफ असल्याने कॉल लागत नसेल. पण मित्रांनो पाचव्या टिप द्वारे तुम्ही हे खात्रीशीर समजून घेऊ शकता की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही. मित्रांनो, यमी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. आणि आमचा हा लेख पूर्ण वाचल्या बद्दल….. धन्यवाद