Payment AppUPI

UPI Lite: म्हणजे काय?, कसे सेट करायचे?, फायदे, तोटे | How to set up UPI Lite in BHIM App

नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या लेखात तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी नवीन व महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण भीम अँप मधून यूपीआई लाइट (UPI Lite) कसे सेट करायचे व कसे वापरायचे, त्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत, या सर्व गोष्टीं बद्दल जाणून घेणार आहोत. या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

How to set up UPI Lite in BHIM App in Marathi

मित्रांनो, आत्ताचे युग हे डिजिटल युग आहे. आणि आजकाल लोक कॅश सांभाळत बसत नाही तर त्या ऐवजी यूपीआई पेमेंटचा वापर करताना दिसत आहेत. आणि प्रमाण फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात केले जात आहे. थोडक्यात काय तर भारतात कॅशलेस पेमेंटचा वापर अधिक होत आहे. त्यात यूपीआई पेमेंट सर्वत्र वापरले जाते जसे की शॉपिंग मॉल, हॉटेल, असो किंवा रस्त्यावरील विक्रेते. प्रत्येक जण यूपीआई द्वारे कॅशलेस पेमेंट करणेच पसंत करतात. खरंतर यूपीआई पेमेंट ही एक खुप सोपी अशी कॅशलेस पेमेंट सुविधा आहे. हीच सुविधा आता आणखी सोपी करण्यासाठी सरकारने UPI Lite नावाची सेवा सुरू केली आहे. यात तुम्हाला पिन न वापरता पेमेंट करता येतो. अजून ही बरेच फीचर्स आहेत या यूपीआई लाइट मध्ये. चला तर मग UPI Lite बद्दल सविस्तर पणे जाणून घेऊ या.



UPI Lite म्हणजे काय ?

सर्वात पहिले UPI Lite म्हणजे काय ते जाणून घेऊ या..

मित्रांनो, लहान लहान ट्रांझाक्शन पासून सुटका मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकतेच UPI Lite नावाचे एक नवीन अँप लाँच केले आहे. यूपीआई लाइट हे एक ऑन डिव्हाइस वॉलेट आहे ज्यात तुम्ही यूपीआई पिन न वापरता लहान लहान पेमेंट करू शकता. तसेच यूपीआई लाइट मध्ये तुम्ही जे पण व्यवहार करता ते तुमच्या बँक खात्यात (बँक स्टेटमेंट मध्ये) दिसत नाहीत. तुम्हाला जर हे अँप वापरायचे असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून काही पैसे हे यूपीआई लाइटच्या वॉलेट (Wallet) मध्ये टाकावे लागतात. त्यानंतर तुम्ही या अँपच्या मदतीने कुहेही पेमेंट करू शकता. या अँपची एका वेळी व्यवहार करण्याची मर्यादा जास्तीत जास्त 200 रुपये आहे. आणि शिल्लक मर्यादा (बॅलन्स) 2000 रुपये पर्यंत आहे. म्हणजे तुम्ही UPI Lite या अँपच्या Wallet मध्ये जास्तीत जास्त 2000 रुपये ठेवू शकता. त्यापेक्षा जास्त नाही. NPCI च्या वेबसाईट मध्ये म्हटल्या नुसार, UPI Lite अँपद्वारे 200 रुपया पर्यंत किंवा त्या पेक्षा कमी पेमेंट करण्यासाठी यूपीआई पिनची आवश्यकता लागणार नाही.

तसेच NPCI ने सांगितल्या नुसार सुरवातीला यूपीआई लाइट हे ऑफलाईन मोड वर काम करेल. म्हणजेच डेबिट पेमेंट तुम्ही इंटरनेट कनेक्शन शिवाय करू शकाल (पण साध्य हि सुविधा चालू झालेली नाही तुम्ही साध्य हे अँप ऑनलाईन वापरू शकता). तसेच सध्या तुम्ही UPI Lite च्या वॉलेट मधून फक्त डेबिट (फक्त पैसे पाठवू) शकता घेऊ शकत नाही. तसेच UPI Lite सध्या फक्त BHIM (भीम) अँप वर सुरू करण्यात आले आहे. आणि यात आठ बँकांना जोडण्यात आले आहे. त्यात कॅनरा बँक, इंडियन बँक,पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अश्या काही बँकांचा समावेश करण्यात आला आहे.

UPI Lite कसे सेट करायचे ?

आता भीम अँप (BHIM App) च्या माध्यमातून UPI Lite कसे सेट करायचे ते खालील स्टेप द्वारे जाणून घेऊ या

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला भीम अँप मध्ये लॉग इन (Log In) करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या अँप च्या होम पेज वर एक बॅनर दिसेल UPI Lite नावाचे त्यात तुम्हला Enable Now असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.



How to set up UPI Lite in BHIM App Step 1

स्टेप 2: या नंतर तुम्हाला दिलेल्या टर्म्स आणि कँडीशन्स ऍग्री करायच्या आहेत व Enable Now बटन वर क्लिक करायचे आहे.

How to set up UPI Lite in BHIM App Step 2

स्टेप 3: या नंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यात तुम्हाला wallet मध्ये बॅलन्स ऍड करावा लागेल. या wallet मध्ये तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे ऍड करू शकता. फक्त इथे मर्यादा 2000 रुपये इतकी आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम तुम्ही ऍड करू शकत नाहीत.

तर इथे तुम्हाला जेवढी रक्कम ऍड करायची आहे ती टाकून बँक अकाउंट सिलेक्ट करायचे आहे. व नंतर Enable UPI Lite या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. या नंतर तुम्हाला एक पिन (जी बँक निवडली आहे तिचा पिन) विचारला जाईल. मित्रांनो पिन तुम्हला फक्त wallet मध्ये अमाउंट क्रेडिट करताना टाकावा लागेल. त्यानंतर कोणताही पिन टाकायचा नाही.

तर मित्रांनो पिन टाकल्यानंतर तुमच्या wallet मध्ये अमाउंट ऍड होऊन जाईल.

How to set up UPI Lite in BHIM App Step 3

जेव्हा तुम्ही UPI Lite सुविधा चालू करता तेव्हा तुम्ही भीम अँपच्या बँक अकाउंट मध्ये आणखी एक अकाउंट ऍड होईल. जी बँक तुम्ही निवडली होती त्या बँकेच्या नावाने आणि पुढे UPI LITE असे लिहून येईल (State bank of India – UPI LITE). या वरून तुम्ही तुमचे UPI Lite अकाउंट ओळखू शकता.

How to Identify UPI Lite Account in BHIM App

तुम्ही तुमचे ट्रांझाक्शन पण चेक करू शकता तसेच बॅलन्स पण बघू शकता. मित्रांनो, इथे तुम्ही QR कोड वापरून किंवा Scan & Pay चा ऑप्शन वापरून पण पेमेंट करू शकता. फक्त पेमेंट करताना – UPI LITE अकाउंट निवडायला विसरू नका.

त्यासाठी तुम्हाला स्कॅन अँड पे ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमच्या समोर कॅमेरा ओपन होईल व जिथे तुम्हाला पेमेंट क्रौंच आहे तिथला QR कोड स्कॅन करायचा आहे व नंतर जेवढी अमाउंट पे करायची आहे तेवढी अमाउंट टाकायची आहे. व त्यानंतर – UPI LITE बँक अकाउंट निवडायचे आहे आणि नंतर Confirm ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व तुमचे ट्रांझेक्शन पूर्ण होऊन जाईल.

डेबिटच्या दरम्यान कुठेही तुम्हाला यूपीआई पिन मागितला जात नाही. तसेच तुम्हाला जर ट्रांझेक्शनची समरी बघायची असेल तर View Details वर क्लिक करून बघू शकता.

UPI Lite वापरण्याचा फायदा

  • मित्रांनो, यूपीआई लाइट चा फायदा म्हणजे लहान लहान पेमेंट करण्यासाठी हे एक उत्तम अँप आहे. तसेच बऱ्याच ग्रामीण भागात जिथे इंटरनेट कनेक्शनचे स्पीड कधी कधी कमी होतो, किंवा ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीये अश्या व्यक्तींसाठी UPI Lite ही सुविधा फायद्याची ठरणार आहे.
  • तसेच इंटरनेट शिवाय व कुठल्याही पिन शिवाय तुम्ही 200 रुपये पर्यंतचा पेमेंट करू शकता. फक्त अँपच्या वॉलेट मध्ये पैसे टाकताना तुम्हाला इंटरनेटची गरज पडते. तसेच तुमच्या गरजे नुसार ही सुविधा तुम्ही दिवसातून अनेक वेळा वापरू शकता.
  • तसेच UPI Lite अँपमुळे बँकिंग प्रणाली वर कमी भर पडणार आहे. तसेच फेल ट्रांझाक्शनचे प्रमाण ही कमी होईल.
  • या शिवाय बँक स्टेटमेंट आणि बँक पासबुक मध्ये छोट्या छोट्या खर्चाचा तपशील दिसणार नाही.
  • यूपीआई लाइट अँपची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इंटरनेट शिवाय व पिन शिवाय तुम्ही व्यवहार करू शकता. UPI Lite द्वारे केलेल्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

UPI Lite चे तोटे

  • मित्रांनो, यूपीआई लाइटचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे यात वॉलेट मध्ये क्रेडिट करण्यासाठी अजूनही इंटरनेटची आवश्यकता असते.
  • तसेच UPI Lite वॉलेटची 2000 रुपयेची मर्यादा ही खूप कमी आहे. जी काही दिवसातच संपू शकते.
  • बँक खात्यात जर शिल्लक रक्कम असेल तर त्याला थोड्या प्रमाणात व्याज मिळते पण यूपीआई लाइट वॉलेट कोणतेही व्याज देत नाही. तसेच सर्वच बँकांचा यात समावेश नाही.

UPI Lite कोण वापरू शकतो व कुठे वापरू शकतो?

मित्रांनो, UPI Lite ची सुविधा BHIM अँप वर देण्यात आली आहे. ही सुविधा विविध बँकचे ग्राहक वापरू शकता. त्यात कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक इत्यादी चा समावेश आहे.

तसेच UPI Lite च्या wallet ची सुविधा तुम्ही कुठेही छोट्या छोट्या पेमेंट करण्यासाठी वापरू शकता. त्यात शॉपिंग मॉल, किराणा दुकान, रस्त्यावरील विक्रेते, तसेच हॉटेल वगैरे ठिकाणी छोटे पेमेंट करण्यासाठी तुम्ही या सुविधेचा वापर करू शकता.

FAQ

UPI Lite अँप कोण वापरू शकतं?

मित्रांनो, यूपीआई लाइट (UPI Lite) हे आपण भीम अँप (BHIM App) वर वापरू शकतो. तसेच आठ बँकांचा यात समावेश झाला आहे. त्यामुळे ज्यांनी आधीच यूपीआई वर नोंदणी केली आहे आणि ज्यांचे या आठ पैकी कोणत्याही बँकेत खाते आहे असे लोक UPI Lite वापरू शकतात.
काही दिवसात इतर पेमेंट अँप (Gpay, Paytm, PhonePe…) मध्ये हि सुविधा चालू होईल.

UPI Lite वापरण्यासाठी इंटरनेट शी कनेक्ट होणे आवश्यक आहे का?

मित्रांनो, यूपीआई लाइट UPI Lite वापरताना म्हणजेच डेबिट करताना तुम्हाला इंटरनेट कनेक्शन असलेच पाहिजे असे काही नाही. तुम्ही ऑफलाईन मोड वर डेबिट करू शकता. परंतु फक्त wallet मध्ये अमाउंट क्रेडिट करताना मात्र तुम्हाला इंटरनेटची गरज भासणार आहे. (साध्य फक्त ऑनलाईन सुविधा चालू आहे)

UPI Lite द्वारे केलेल्या ट्रांझेक्शन वर काही शुल्क आकारले जाते का?

नाही. मित्रांनो, UPI प्रमाणेच UPI Lite वर केलेल्या ट्रांझेक्शन वर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही छोटे छोटे ट्रांझेक्शन UPI Lite च्या wallet मार्फत करू शकता. त्यामुळे जर तुम्ही अजूनही यूपीआई लाइट वापरत नसाल तर वापरणे चालू करा. हे अँप खूपच युझफुल आहे. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व लेख आवडला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत शेअर करायला विसरू नका. असेच नव-नवीन लेख व नव-नवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत राहू. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!