Cooking Tips

गॅस सिलेंडर जास्त दिवस चालण्यासाठी काही खास उपाय | Best Ways to Save LPG Cooking Gas

नमस्कार मित्रांनो, आज आपण गॅस सिलेंडर जास्त दिवस चालण्यासाठी काही खास व सोपे उपाय जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुमचा गॅस एक महिना ऐवजी दोन महिने चालेल. चला तर मग माहिती जाणून घेऊ या.

Cooking Gas Bachat Kashi Karaychi

मित्रांनो, पूर्वी लोकं लाकडं पेटवून त्यावर अन्न शिजवत होते. त्यानंतर पुढे स्टोव्ह आला, नंतर गॅस आला आणि आता तर काय विजेवर चालणारी शेगडी देखील बाजारात उपलब्ध झाली आहे. जरी आता विजेवर चालणारी शेगडी उपलब्ध असली तरी आजही सर्वसामान्य लोकांच्या घरात अन्न शिजवण्यासाठी गॅसच्या शेगडीचा म्हणजेच LPG गॅस चा अधिक वापर होतो. मित्रांनो, स्वयंपाकासाठी वापरला जाणारा हा LPG गॅस आल्यापासून लोकांचा वेळ खूप वाचू लागलाय.



अन्न शिजवणे, पाणी उकळणे अशी अनेक कामं आपण यावरच करत असतो. मित्रांनो, एकीकडे जरी एलपीजी गॅसच्या मदतीने स्वयंपाक करणे खूप सोपे झाले असले तरी दुसरीकडे एलपीजी गॅसच्या वाढत्या दरांमुळे खर्च देखील वाढत चालला आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. अनेक घरांमध्ये तर एक सिलेंडर महिनाभरही नीट चालत नाही. त्यामुळे आपल्या एलपीजी गॅसची अधिकाधिक बचत कशी होईल आणि जास्तीत जास्त दिवस एकच गॅस टाकी कशी पुरेल यासाठी काय करता येईल याचाच विचार आपण करतो.

मित्रांनो, त्याच अनुषंगाने तुम्हाला मदत म्हणून आज आम्ही या लेखातून तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला एलपीजी गॅसचा योग्य वापर करण्यास मदत करतील आणि तुमचा खर्च देखील कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील आणि तुमची गॅस टाकी जास्तीत जास्त दिवस चालेल. तर मित्रांनो, तुमच्या घरातही वापरत असलेला एलपीजी गॅस जर लवकर संपत असेल, तर तो जास्तीत जास्त वापरता यावा त्यासाठी काही खास उपाय आपण पुढे जाणून घेऊ या. पण त्यासाठी तुम्ही आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

गॅस सिलेंडर लवकर संपण्याची कारणे

मित्रांनो, अनेकवेळा गॅस जास्त वापरला नाही तरीही तो लवकर संपतो. मग आपण विचार करत बसतो की कोणी पाहुणे आले नाही किंवा नेहमीपेक्षा जास्त काही अन्नही शिजवले नाही, गॅस चा जास्त वापर ही नाही तरी देखील गॅस इतक्या लवकर कसा संपतो? मित्रांनो, खरंतर गॅस जास्तीत जास्त दिवस कसा जाईल याचा विचार करण्याआधी तुमचा गॅस लवकर का संपतो याचा विचार करणे किंवा याकडे लक्ष देणे जास्त आवश्यक आहे. तसे पाहिले तर गॅस लवकर संपण्यामागे खूप कारणे आहेत, त्यापैकी काही महत्वाची कारणं पुढील प्रमाणे.

गॅस फिटिंग

Cooking Gas Save Kasa Karaycha Tip 1

मित्रांनो, अनेक वेळा गॅस फिटिंग करताना देखील काही चुका होऊन गॅस लवकर संपू शकतो. बऱ्याचवेळा गॅस टाकीचे रेग्युलेटर खराब झालेले असते, किंवा पाइप खराब झालेला असतो आणि त्यामधून गॅस लिकेज होत असतो. रेग्युलेटर खराब असेल तर ते बंद असले तरीही गॅस गळती होत राहते, आणि परिणामी गॅस लवकर संपतो. त्यामुळे तुमचा गॅस चे रेग्युलेटर व पाइप नीट चेक करून घ्यावा.

निष्काळजीपणा

मित्रांनो, गॅस लवकर संपण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे आपला निष्काळजीपणा असतो. कारण जेव्हा आपण गॅस सिलेंडर घेतो तेव्हा आपण त्याचे सील व्यवस्थित बंद आहे का? गॅसवर लिहिलेलं वजन आणि सिलेंडर मध्ये असलेला गॅस यांचं वजन सारखंच आहे का? त्याची एक्सपायरी डेट वगैरे गोष्टी आपण चेक करत नाही. तसं गॅस कंपनी देखील आपल्याला सांगत असते की सील तुटलेले गॅस सिलेंडर घेऊ नये, किंवा गॅसचे वजन, एक्सपायरी डेट वगैरे गोष्टी तपासून मगच सिलेंडर विजय घ्या. पण आपण आपल्या निष्काळजीपणाने किंवा आपल्याला माहीत नसल्याने या गोष्टी बघत नाही. त्यामुळे ही गॅस टाकी लवकर संपू शकते.



गॅसची फ्लेम व्यवस्थित नसणे

Cooking Gas Save Kasa Karaycha Tip 2

मित्रांनो, गॅस लवकर संपण्यामागे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे गॅसची फ्लेम व्यवस्थित नसणे. म्हणजे तुम्ही गॅस कितीही वाढवला तरीही त्याची फ्लेम वाढत नाही. त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी जास्त गॅस वापरला जातो. मित्रांनो, गॅस च्या बर्नर मध्ये कधी कधी कचरा अडकतो व त्यामुळे त्याचे छिद्र बंद होतात, व त्यामुळे गॅसची फ्लेम नीट चालत नाही. त्यामुळे तुमच्या गॅसची फ्लेम किंवा बर्नर साफ करणे आवश्यक आहे. आता हे काम करण्यासाठी तुम्हाला कोणाला बोलवायची गरज नाही, तर तुम्ही स्वतः सुद्धा घरच्या घरी गॅसची फ्लेम साफ करू शकता.

त्यासाठी गॅसचे रेग्युलेटर बंद करून त्याचे बर्नर काढून ते ब्रश किंवा सुई च्या साहाय्याने त्याचे छिद्र मोकळे करा किंवा हे गॅसचे बर्नर तुम्ही पेट्रोल किंवा केरोसीन मध्ये थोडावेळ भिजत ठेवा, व नंतर स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कोरडे करून घ्या. तसेच गॅस च्या खालच्या बाजूला एक नोझल असतो ज्यातून गॅस येतो. त्यातही जर काही कचरा किंवा धुळीचे कण अडकले तर कितीही स्पीड वाढवला तरी देखील गॅस चालत नाही व तो लिकेज होत राहतो. तर त्यामुळे तुमचे गॅसचे नोझल देखील सुई किंवा निडल च्या साहाय्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे.

गॅस ची फ्लेम व भांड यातील अंतर

मित्रांनो, अनेक वेळा गॅसची फ्लेम आणि भांड यातील अंतर जास्त असल्याने भांड गरम व्हायला वेळ लागतो. आणि गॅस जास्त वाया जातो.

गॅस जास्तीत जास्त दिवस चालावा यासाठी खास उपाय

Cooking Gas Save Kasa Karaycha Tip 3

आता गॅस जास्तीत जास्त दिवस चालावा यासाठी काही खास उपाय जाणून घेऊ या:-

  • मित्रांनो, बहुतेक लोक भांडी धुऊन झाल्यावर स्वयंपाकासाठी थेट गॅसच्या शेगडीवर ठेवतात. पण ओले भांडे गॅसवर ठेवल्याने त्यासाठी अधिक गॅस लागतो. त्यामुळे आधी ते पुसून कोरडे करून घ्यावे. ज्यामुळे गॅस वाया जात नाही.
  • गॅस लायटर नेहमी चांगले असावं. कारण बऱ्याच वेळा आपण लायटरचे बटन दाबत राहातो, पण गॅस काही लवकर पेट घेत नाही. यामध्ये गॅस विनाकारण वाया जातो.
  • तसेच बरेच लोकं आधी भांडी गॅसच्या शेगडीवर ठेवतात आणि नंतर कांदे, टोमॅटो, लसूण किंवा भाज्या कापतात. यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस वाया जातो. म्हणून तुम्ही गॅसवर अन्न शिजवण्यासाठी ठेवाल त्याआधी सर्व तयारी करुन घ्या. मगच स्वयंपाकाला सुरुवात करा.
Cooking Gas Save Kasa Karaycha Tip 4
  • याशिवाय अन्न शिजवताना ते झाकून मध्यम आचेवर शिजवावे असे म्हणतात. पण असे बरेच लोक आहेत जे खूप मोठा गॅस करून आणि भांडं न झाकता अन्न शिजवतात. त्यामुळे गॅस जास्त लागतो. म्हणून तुम्हाला जर गॅस वाचवायचा असेल तर मध्यम आचेवर शिजवून भांडे झाकून ठेवावा. यामुळे तुमची भरपूर गॅसची बचत होऊ शकते.
  • तसेच स्वयंपाक करण्याआधी बर्नर ओले तर नाही ना हे तपासून घ्या. गॅस धुतांना बर्नरवर देखील शिंतडे उडतात. त्यामुळे त्याची काळजी घ्या. वेळोवेळी गॅस बर्नर स्वच्छ करून घ्या.
  • जर तुम्हाला तुमचा गॅस जास्त काळ टिकवायचा असेल तर तुमच्या गॅस सिलेंडरचे लिकेज नक्की तपासून घ्यावे. अनेक वेळा आपल्या नकळत गॅस सिलिंडर हळूहळू गळत राहतो. यामुळे गॅस लवकर संपतो. म्हणून वेळेत सर्विसिंग करून पाईप बदलुन घ्या.
  • कुकर लावण्याआधी डाळ, तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा, त्यामुळे ते शिजायला कमी वेळ लागतो आणि गॅसची बचत होते. शिवाय भिजवून शिजवलेले डाळ, तांदूळ पौष्टिकही असतात.
  • यासोबतच जर तुमचा स्वयंपाकाचा गॅस लवकर संपत असेल, तर तुम्ही प्रेशर कुकर चा जास्तीत जास्त वापर करावा. कारण प्रेशर कुकरमध्ये बहुतेक पदार्थ लवकर शिजतात. आणि पर्यायी गॅस कमी लागतो.

तर मित्रांनो, अश्या प्रकरे तुम्ही जर घरगुती LPG गॅस सिलिंडर बचत करण्यासाठी वरील गोष्टी केल्या तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.

Tags: Gas Kasa Vachvaycha, Gas Madhe Bachat Kashi Karaychi, Gas Cylinder Jast Divas Kasa Chalel, Cooking Gas Kasa Save Karaycha, Gas Saving Tips in Marathi, Lpg Gas Saving Tips Marathi, Cooking Gas Save Marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!