तुमच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची संपत्ती व इतर माहिती मोबाईल वर बघा - MarathiDiary
Information In Marathi

तुमच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची संपत्ती व इतर माहिती मोबाईल वर बघा

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही नवीन व उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण ग्रामपंचायत निवडणूक: गावातील सरपंचाची व ग्रामपंचायत सदस्यांची संपत्ती, शिक्षण व इतर माहिती आपल्या मोबाईल वर कशी बघायची या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Sarpanch Ani Sadasyachi Sampati Check Kara Online

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात नुकतीच 7751 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. आणि त्याचे निकाल देखील लागले आहेत. मित्रांनो, याच ग्रामपंचायत निवडणूकी दरम्यान प्रत्येक उमेदवाराने एक एफिडेवीट (Affidavit) भरणे आवश्यक असते. या एफिडेवीट मध्ये उमेदवाराची संपूर्ण माहिती लिहिलेली असते जसे की उमेदवाराचे नाव, शिक्षण, गुन्हे, संपत्ती याची माहिती असणे आवश्यक असते. हीच माहिती घर बसल्या आपल्या मोबाईल द्वारे कशी बघायची या बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



सरपंच किंवा ग्राम पंचायत सदस्यांची संपत्तीची माहिती मोबाईल द्वारे बघण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

सरपंच किंवा ग्राम पंचायत सदस्यांची संपत्तीची माहिती मोबाईल

स्टेप 1: मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला गुगल वर Gram Panchayat Election असे टाइप जरून सर्च करायचे आहे. त्या नंतर पहिली वेब साईट येईल State Election Commission त्यावर क्लिक करायचे आहे.

Sarpanch Ani Sadasyachi Sampati Check Kara Online Step 1

स्टेप 2: आता तुम्हाला Affidavit by the Final Contesting Candidates असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

Sarpanch Ani Sadasyachi Sampati Check Kara Online Step 2

स्टेप 3: आता पुढच्या पेज वर तुम्हाला ज्या गावच्या सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यांची संपत्ती व इतर माहिती बघायची आहे त्या गावची माहिती निवडायची आहे. जसे त्या गावचा जिल्हा, तालुका, वॉर्ड नंबर इत्यादी

  1. सर्वात आधी तुम्हाला Localbody विचारली जाईल. आत्ता ग्रामपंचायत निवडणूक झाले आहेत तर आपण इथे Gram Panchayat सिलेक्ट करायचे आहे.
  2. त्यानंतर गावचा Division निवडायची आहे. म्हणजे तुमचा जिल्हा कोणत्या डिव्हिजन मध्ये येतो ते सिलेक्ट करायचे आहे.
  3. नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा म्हणजे District विचारले जाईल. ते सिलेक्ट करून टाकायचे आहे.
  4. त्यानंतर Taluka तालुका टाकायचा आहे.
  5. आत्ता गावाचे नाव निवडा.
  6. आता तुम्हाला Election Programme Name विचारले जाईल. तर इथे जर तुम्हाला ग्रामपंचायत सदस्याचे बघायचे असेल तर ग्रामपंचायत सदस्य (Grampanchayat Member) सिलेक्ट करा. किंवा मग ग्रामपंचायत सरपंच (Grampanchayat Sarpanch) सिलेक्ट करा.
  7. आणि शेवटी वॉर्ड नंबर निवडा.

पूर्ण माहिती भरून झाल्यावर सर्च (Search) बटन वर क्लिक करा.



आता तुम्हाला All Final Contesting Candidate List च्या खाली सर्व उभे राहिलेले सरपंचाची व सदस्यांची यादी दिसेल. ज्या व्यक्तीची माहिती/एफिडेवीट तुम्हाला बघायचे आहे त्या त्या व्यक्तीच्या नावासमोर असलेल्या View Affidavit लिंक वर क्लिक करायचे आहे.

Sarpanch Ani Sadasyachi Sampati Check Kara Online Step 3

आत्ता नवीन पेज वर तुम्हाला त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती बघायला भेटून जाईल. सर्व माहिती जसे की त्याचे नाव, वय, शिक्षण, त्याची पूर्ण संपत्ती, मालमत्ता, घरची माहिती वगैरे दिसेल.

Sarpanch Ani Sadasyachi Sampati Check Kara Online Step 4

उमेदवाराच्या एफिडेवीट मध्ये कोण कोणती माहिती लिहिलेली असते?

मित्रांनो, ग्राम पंचायत सदस्य किंवा सरपंच उमेदवाराला नामनिर्देशन पत्रासोबत एक शपथपत्र ही द्यावे लागते. त्यात त्याचे नाव, वय, अवलंबित व्यक्तींची संख्या, लिहिलेली असते. तसेच उमेदवाराची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याची माहिती, व्यवसाय व कामधंदा असेल तर त्याचा तपशील लिहिलेला असतो. तसेच स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील ही दिलेला असतो. जंगम मालमत्ता म्हणजे बँकेतील ठेवी किंवा वित्तीय संस्था किंवा कंपनी मधील ठेवी, राष्ट्रीय बचत पत्रे, एलआयसी पॉलिसी, पोस्टाच्या बचती, शेअर बाजार गुंतवणूक वगैरे किती आहे याचा तपशील तसेच फर्म, कंपनी किंवा भागीदारी फर्म मधील गुंतवणूक, मोटर वाहन वगैरे गोष्टींचा तपशील दिलेला असतो. स्थावर मालमत्ता मध्ये उमेदवाराच्या नावे असलेली जमीन, घरे किंवा सदनिका, त्याचे क्षेत्र, त्या ही बाजारभाव नुसार मूल्य इतर संपत्ती मधील हक्क वगैरे गोष्टींचा तपशील असतो.

काही महत्त्वाचे

  • मित्रांनो एफिडेवीट मधील संपत्तीची ही सर्व माहिती खरी असते. जर ही माहिती खोटी आढळून आल्यास उमेदवाराचे सरपंच पद धोक्यात येऊ शकते. किंवा पद अपात्र ठरू शकते.
  • तसेच उमेदवाराला जात प्रमाणपत्र ही सादर करावे लागते.
  • याशिवाय निवडणूक निकाल लागल्या नंतर 30 दिवसांच्या आत उमेदवाराला निवडणुकीचा सम्पूर्ण खर्चाचा विहित तपशील सादर करावा लागतो. तसे न केल्यास उमेदवार ग्रामपंचायत चा सरपंच पदी राहण्यास अपात्र ठरू शकतो.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण गावातील सरपंचाची व ग्राम पंचायत सदस्यांची संपत्ती व इतर माहिती मोबाईल वर कशी बघायची ते बघितले. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच ही माहिती महत्व पूर्ण वाटली असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. तसेच नव नवीन लेख व महत्व पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला नेहमी भेट देत रहा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद