एसटी ची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना, फक्त 1100 रुपयात फिरता येणार संपूर्ण महाराष्ट्र
नमस्कार मित्रांनो आज आपण एसटी ची ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजने बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या योजने अंतर्गत फक्त 1100 रुपयात तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र फिरता येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळ च्या काय अटी आहेत, किती शुल्क द्यावे लागेल,या अश्या सर्व गोष्टीं बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, प्रवास करायचा प्रत्येकाला च आवडते. काही लोकं हौस म्हणून पर्यटन करतात तर काही जण कामा निमित्त प्रवास करतात. काही लोकं जास्त करून सुट्टीच्या दिवसांत आठवडा भर सूट्टी घेऊन मनसोक्त भ्रमंती करतात. पण प्रवास करण्याआधी सगळ्यांच्याच मनात प्रश्न येतो की प्रवास करायचा कश्याने, त्यासाठी किती खर्च येईल, वगैरे वगैरे… त्यातही प्रत्येकाकडे चार चाकी गाडी असेलच असे नाही. आजही असे अनेक प्रवासी आहेत जे एसटी ने प्रवास करणे पसंत करतात. पण एसटीचे वाढलेले भाडे बघता लोक प्रवास करणे टाळतात. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आता तुम्ही एसटी तुन प्रवास करू शकता तेही फक्त रू 1100 मध्ये.
ऐकून आश्चर्य वाटलं ना? हो मित्रांनो, एसटी महामंडळाने नवीन योजना सुरू केली जीचे नाव ‘आवडेल तेथे प्रवास’ असे आहे. या योजने अंतर्गत लोकांना खूप कमी खर्चात आवडेल तिथे प्रवास करता येणार आहे. एसटी च्या या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेबद्दल अजून सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…
सर्वात आधी ‘आवडेल तेथे प्रवास/MSRTC Aavdel Tithe Pravas’ योजना म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊ या:-
‘आवडेल तेथे प्रवास’ योजना म्हणजे काय
मित्रांनो, राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दहा दिवसांसाठी एसटी चा पास देत 1988 मध्ये ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेची सुरवात केली. प्रवाशां सोबत स्नेह, मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे तसेच प्रवाशांना कमी खर्चात विविध ठिकाणी किंवा आवडेल त्या ठिकाणी प्रवास करत यावा या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. मित्रांनो, 2006 मध्ये एसटी मंडळाने या योजनेची पुनर्रचना केली व 10 दिवसाचा पास कॅन्सल करून 4 आणि 7 दिवसाचा पास काढण्यात आला. तसे पाहिले तर इतर खाजगी ट्रॅव्हलिंग बसेस असताना सुद्धा प्रवाशांनी ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेला उत्तम प्रतिसाद दिला. हा पास शहर वाहतुकी सोबतच राज्यामध्ये तसेच आंतरराज्य वाहतुकी मध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध आहे.
याशिवाय तुम्हाला जर पास चे रिझर्वेशन करायचे असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. फक्त रिझर्वेशन साठी वेगके शुल्क द्यावे लागते. तर 4 आणि 7 दिवसांच्या पासचे शुल्क देखील वेगवेगळे आहे. याशिवाय एसटी ची साधी सेवा, रात्रीची सेवा, जलद सेवा, शिवशाही, हिरकणी अश्या वेगवेगळ्या बस ची निवड देखील प्रवाशांना करता येते. मित्रांनो, ही योजना वर्षभर जरी चालू असली तरी सण, उन्हाळा, हिवाळा, लग्नसराई अश्या प्रसंगी या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्यातल्या त्यात प्रामुख्याने पर्यटन स्थळी तसेच धार्मिक स्थळी, नैसर्गिक स्थळे, हिल स्टेशन वगैरे ठिकाणी या पास ची जास्त नोंदणी केलेली दिसते.
मित्रांनो, आवडेल तेथे प्रवास या योजने अंतर्गत चार दिवसांच्या पाससाठी वर्षातून 2 हंगाम करण्यात आले. एक कमी गर्दीचा म्हणजे 15 जून ते 14 ऑक्टोबर व जास्त गर्दीचा म्हणजे 15 ऑक्टोबर ते 14 जून. पण एसटी महामंडळाच्या म्हणण्यानुसार या दोन्ही हंगाम मधील पास च्या किंमती वेग वेगळ्या असतील.तसेच 7 दिवसांच्या पासप्रमाणे 4 दिवसांचा पास दिला जातो. आधी या पास चे दर किंवा शुल्क वेगळे होते आता सुधारित दर हे 5/1/2022 पासून लागू करण्यात आले आहेत. ते दर काय आहेत ते जाणून घेऊ या
पासचे सुधारित दर
मित्रांनो, जर वाहतुकीचा प्रकार हा साधी (साधी, जलद,रात्रसेवा,शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्यासह असेल तर
7 दिवसांच्या पासाचे मूल्य हे पुढील प्रमाणे:-
- प्रौढ व्यक्तींसाठी:- रू 2040
- मुलांसाठी:- रू 1025
4 दिवसांच्या पासाचे मूल्य पुढील प्रमाणे:-
- प्रौढ व्यक्तींसाठी:- रू 1170
- मुलांसाठी:- रू 585
तसेच जर वाहतुकीचा प्रकार हा शिवशाही (आसनी) आंतरराज्यासह असेल तर
7 दिवसांच्या पासाचे मूल्य हे पुढील प्रमाणे:-
- प्रौढ व्यक्तींसाठी:- रू 3030
- मुलांसाठी:- रू 1520
4 दिवसांच्या पासाचे मूल्य पुढील प्रमाणे:-
- प्रौढ व्यक्तींसाठी:- रू 1520
- मुलांसाठी:- रू 765
(टीप:- मित्रांनो, लहान मुलांच्या पासाचे दर हे 5 वर्षांपेक्षा जास्त व 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहे.)
आता या योजनेचे मुख्य नियम व अटी काय आहेत ते जाणून घेऊ या:-
‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेचे मुख्य नियम व अटी
- या योजने अंतर्गत 7 व 4 दिवसांचे पास दिले जातील.
- साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी ग्राह्य राहतील. ज्यामध्ये साधी बस, जलद रात्रराणी, शहरी यशवंति आंतरराज्यसह इत्यादी बसेस येतात.
- तसेच या योजनेत निमआराम बसेस साठी वेगळे दर निश्चित करण्यात आलेले नाहीत.
- शिवशाही बसेस साठी साधी निमआराम, विना वातानुकूलित शयन, आसनी या सर्व बसेस सेवेसाठी आंतरराज्यसह मार्ग ग्राह्य धरले जातील.
- मित्रांनो, आवडेल तेथे प्रवास या योजने अंतर्गत घेण्यात येणार पास हा 10 दिवस आधी घेता येईल.
- याशिवाय या योजने अंतर्गत दिलेला पास नियमित बस सोबतच यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या बसेस साठी देखील ग्राह्य धरला जाईल.
- या योजने अंतर्गत देण्यात आलेल्या पास हे पास धारक म्हणून कोणत्याही एसटी बस ला प्रवेश नाकारता येणार नाही.
- योजने अंतर्गत पास धारकाला बस मध्ये आसनासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्यात आलेली नाही.
- तसेच या योजने अंतर्गत प्रौढ पास धारकांना 30 किलो व 12 वर्षांखालील मुलांना 15 किलो पर्यंत प्रवासी सामान नेता येईल.
- या योजने द्वारे मिळालेल्या पास द्वारे प्रवास करत असताना आंतरराज्य प्रवासामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसेस जिथं पर्यंत जातात तिथं पर्यंत ऊ योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- पास धारकाकडून जर पास हरवला तर त्या बदल्यात दुसरा पास काढून मिळणार नाही. तसेच पास चा कोणताही परतावा मिळणार नाही.
- प्रवाशांकडून पास चा गैरवापर झाला असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा पास जप्त करण्यात येईल.
- तसेच जर पास धारकाचे प्रवासात कोणतेही मूल्यवान दागिने हरवल्यास महामंडळ त्याची जबाबदारी घेत नाही.
- या योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या पासची दिवस गणना 00:00 ते 24:00 या वेळेप्रमाणे राहील.
- तसेच पासच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी जर 24:00 वाजे नंतरही प्रवास करत असेल म्हणजेच जर पासची वैधता संपली असेल तर त्या पुढील प्रवाससाठी तिकीट घेणे बंधनकारक आहे.
- यासोबतच जर प्रवासा दरम्यान महामंडळातर्फेच बस मध्ये बिघाड झाल्यास तसेच निश्चित वेळेत पोहोचण्यास उशीर झाल्यास, पास धारकाला प्रवास खंडित झाला नसल्याने पास धारकाकडून दुसऱ्या तिकिटासाठी वेगळे पैसे घेतले जाणार नाहीत.
- तसेच कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक बंदअसल्यास योजने अंतर्गत प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळेत प्रवास न झाल्यास पास परतावा परत मिळेल किंवा वाहतूक पुन्हा पूर्वव्रत झाल्यासतीन महिन्यांच्या कालावधी पर्यंत त्याच पास ने प्रवास करता येईल.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजने बद्दल माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही कधी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्कीच घ्यायला हवा. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।