बॅटमॅनचे 5 सर्वोत्तम खलनायक | The 5 Greatest Batman Villains Of All Time

फक्त नायक भन्नाट हवा ही मानसिकता आता काळानुसार बदलत चालली आहे…विचार करा बाहुबली सिनेमात फक्त प्रभास एका वेळी 4–5 बाण सोडतोय हे दाखवलं असतं तर काय मजा? राणा डुग्गबटी तसला दाखवला नसता तर काय अर्थ होता बाहुबलीच्या ताकतीचा, तर हल्लीच प्रदर्शित झालेले सिनेमे आणि त्यातील खलनायक म्हणजे आरआरआर मध्ये स्कॉट सारखा क्रूर खलनायक, तर बघताच भंबेरी उडावी असा केजीएफ २ मधील संजय दत्त ने साकारलेलं अधिरा. या असल्या खलनायकांमुळे सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर जातो.
बॉलीवूडमध्ये एक काळ गब्बरसिंग आणि मोग्याम्बो ने गाजवला होता. पण हल्ली हा खतरनाक खलनायकांचा काळ बॉलीवूडमधून जणू संपुष्टात आल्या सारखं वाटतंय
हे असलं सेलमॉन भाई कित्येक सिनेमांत दाखवतो…मग त्यासाठी मी दाक्षिणात्य सिनेमा का बघू? कळतंय णा मी काय म्हणतोय ते?

थोडक्यात नायक – खलनायक – प्रतिनायक असं असायलाच हवं…नाही तर सुपरमॅन एवढा भारी सुपरहिरो – नुसत्या नजरेने जाळून काढेल…पण मग तेवढंच बघायला जाणार का आपण? त्याला भिडायला कोणी तोलमोलाचं नको का? जसं डार्क साईड किंवा डूम्स डे किंवा अपोकॅलिप्स सारखे खलनायक पाहिजेतच की.



बॅटमॅन हा एकमेव सुपरहिरो आहे ज्याच्यात कोणत्याही सुपरपॉवर नाहीत तरी तो जस्टीस लीगच्या इतर सोबत्यांहून कमी वाटत नाही.

जस्टीस लीग – माझा सर्वात आवडता सुपरहिरो ग्रुप – ओरिजिनल 7 तर विषय आहे बॅटमॅनचे खलनायक. त्याचे 5 सर्वोत्तम खलनायक आपण बघूया. सर्वात फेमस असलेला हा

Batman Villains Joker

Batman Villains Joker

जोकर

याला कोण ओळखत नाही??? तर याचा उदो उदो केला गेलाय असं वाटलं असेल कारण याच्यावर वेगळा सिनेमा आला म्हणून की काय?

बॅटमॅनप्रमाणे जोकरकडे कोणतीही सुपर पॉवर नाही, त्याऐवजी त्याचे रासायनिक अभियांत्रिकीमधील कौशल्य तो विषारी किंवा प्राणघातक रचना आणि थीमॅटिक शस्त्रे विकसित करण्यासाठी वापरतो – ज्यामध्ये धार केलेले पत्ते, प्राणघातक जॉय बझर आणि अॅसिड फवारणी करणारी लॅपल फुले यांचा समावेश होतो. या दोघांचे सगळेच ऍनिमेटेड सिनेमे मी पाहिले आहेत, ज्यातील ‘ बॅटमॅन अंडर द रेड हूड ‘ आणि ‘ बॅटमॅन किलिंग द जोक ‘ हे माझे वैयक्तिक आवडते आहेत.



Batman Villains Selina Kyle Catwoman

Batman Villains Selina Kyle Catwoman

कॅटवूमन (सेलिना काइल)

ही गॉथम सिटीमधील एक रत्न चोर आहे आणि बॅटमॅनच्या सर्वात प्रसिद्ध शत्रूंपैकी एक आहे. गॉथमच्या रस्त्यावर (टिच्चून) टिकून राहायला शिकलेल्या अनाथाच्या रूपात चित्रित केलेल्या सेलिनाने जगण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करला… पण ते स्टाईलने करण्याचा निर्धार करून ती मार्शल आर्ट शिकली आणि मार्जार चौर्यामध्ये (कॅट थिवरी) कौशल्यपूर्ण चोऱ्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण घेतले. तिची गुन्हेगारी कृत्ये अनेकदा अनिच्छेने केलेल्या परोपकारामुळे घडतात, ज्यामुळे ती सतत खलनायक वाटते. ही अधूनमधून बॅटमॅनची सहयोगी म्हणून पण दाखवली गेलेली आहे. माझ्या आवडत्या दोन कॅटविमेन आहेत, पहिली ‘ एनी हॅथवे ‘ (द डार्क नाईट राईझेस) आणि दुसरी हॅली बेरी ( कॅटवूमन) – (तशी एका चित्रपटात ‘ किम बासिंगर ‘ होती पण ती कॅटवूमन नव्हती – काश असती

Batman Villains Harvey

Batman Villains Two-Face (Harvey Dent)

टू फेस (हार्वी डेंट)

एकेकाळी गॉथम सिटीचा एक उज्ज्वल आणि उत्कृष्ट जिल्हा वकील, हार्वे डेंटला न्यायालयीन खटल्यादरम्यान जमाव बॉस साल मारोनीने त्याच्यावर अॅसिडिक रसायने फेकल्यानंतर त्याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला घट्ट जखमा झाल्या आहेत. तो नंतर वेडा होतो आणि “टू-फेस” व्यक्तिमत्त्वाचा अवलंब करतो, तो क्रमांक दोन, द्वैत संकल्पना आणि चांगले आणि वाईट यांच्यातील संघर्षाने वेडलेला गुन्हेगार बनतो.

Batman Villains Bane

Batman Villains Bane

बेन

हा दक्षिण अमेरिकेतील बेटावरील तुरुंगातून पळून गेलेला दोषी आणि सुपर-खलनायक/मारेकरी आहे. वेनम या औषधाच्या व्युत्पन्नाचा प्रयोग केल्यामुळे बेनची शारीरिक ताकद असामान्य आहे. जेव्हा त्याने बॅटमॅनची पाठ मोडली तेव्हा तो “द मॅन हू ब्रोक द बॅट” म्हणून ओळखला जाऊ लागला, ज्यामुळे त्याने ब्रूस वेनला बॅटमॅनचे व्यक्तिमत्त्व (पर्सोना) सोडण्यास भाग पाडले.

Batman Villains Ra's al Ghul

Batman Villains Ra’s al Ghul

रेइश अल गूल (डीमन हेड)

माझा आवडता रेईश अल गूल ‘ लीआम निसन ‘ (डार्क नाईट राईझेस) आणि ‘अलेक्झेंण्डर सिडिश ‘ (गॉथम) या दोघांनी प्ले केलेले आहेत. तर रेइश अल गूलच्या कथेत अनेकदा लाझारस तळी असतात, जे मरणासन्न जीवन पुनर्संचयित करतात. लाझारस तळ्याने रेईशचे आयुष्य बरेच वाढवले आहे (तब्बल 6 शतकाहून जास्त), ज्यामुळे तो अधिक धोकादायक बनला आहे कारण विशेषतः त्याने शतकानुशतके त्याने जी लढाऊ कौशल्ये शिकून पारखली आहेत त्यासाठी.

अश्या असंख्य सुपर खलनायकांशी आपला सुपर नसलेला नायक बॅटमॅन लढतो, का आवडू नये मग तो?

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!