महावितरण मीटर रिडींग स्वतः अँप मधून पाठवा ? (2 मिनिटात) | Mahavitaran Meter Reading
नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, आज आपण महावितरणच्या मीटर चे रिडींग अँपच्या माध्यमातून स्वतः कसे पाठवायचे, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, कोरोना काळात ग्राहकांच्या वीज बिलामध्ये भरमसाठ वाढ झालेली दिसून आली. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये खूप असंतोष निर्माण झाला होता. लोकांचा हा असंतोष बघता वीज महावितरणाने ग्राहकांनी स्वतः आपले मीटर रीडिंग पाठवावे असे आवाहन केले. वीज बिल अचूक असावे व ग्राहकांना स्वतः मीटरचे रिडींग पडताळणी करता यावी हा उद्देश ठेवून महावितरण ने ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच ग्राहकांनी मीटर रिडींगचा फोटो महावितरण कडे स्वतःहून पाठविल्यास त्यांना अनेक प्रकारे फायदे होऊ शकतात.
या निमित्ताने ग्राहकांचे आपापल्या मीटर रिडींगकडे लक्ष राहील. तसेच वीज वापर करण्यावर ही नियंत्रण ठेवता येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मीटर रिडींग नुसार वीज बिल आल्याची खात्री होईल. या शिवाय जर मीटर मध्ये काही दोष असल्यास किंवा ते नादुरुस्त असल्यास तशी तक्रार ही करता येईल. पण मीटर चे रिडींग कसे पाठवायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो, महावितरणचे मीटर रिडींग स्वतः कसे पाठवायचे हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Mahavitaran चे अँप डाउनलोड करायचे आहे.
स्टेप 2: या नंतर अँप ओपन करायचे आहे व त्या नंतर तुम्हाला सर्वात पहिले Login id व पासवर्ड विचारला जाईल. तुम्हाला जर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड माहित असेल तर तुम्ही तो तिथे टाकायचा आहे आणि जर माहित नसेल तर खाली दिलेल्या Don’t have account ? Sign Up या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 3: मित्रांनो, आम्ही Sign up हा ऑप्शन निवडत आहोत, या ऑप्शन केल्यावर नेक्स्ट पेज वर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल, त्यात तुम्हाला ग्राहक नंबर (Consumer Number) टाकायचा आहे. हा नंबर तुम्हाला तुमच्या लाइट बिल वर मिळेल. या नंतर तुम्हाला मोबाईल नंबर, ई-मेल आयडी टाकायचा आहे. व नंतर एक login name म्हणजेच युझरनेम टाकायचे आहे. त्या नंतर पासवर्ड टाकायचा आहे. हा पासवर्ड कन्फर्म करून Submit बटन वर क्लिक करायचे आहे. या प्रकारे तुमचे अकाउंट तयार होऊन जाईल.
स्टेप 4: मित्रांनो, आता युझरनेम व पासवर्ड टाकून तुम्हाला अकाउंट log in करायचे आहे. लॉग इन केल्यावर तुम्हाला नेक्स्ट पेज वर काही ऑप्शन दिसतील त्यातील Submit Meter Reading या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: मित्रांनो, क्लीक करून ही जर ऑप्शन अनेबल/चालू होत नसेल तर तुम्हाला महावितरनाचा एक SMS येणे गरजेचे आहे. तरच तुमचा ऑप्शन अनेबल होईल. हा मेसेज तुम्ही या अँप वर रजिस्टर केल्यावर, चालू किंवा पुढच्या महिन्याअखेरीस येऊ शकतो.
आत्ता तुम्ही या अँप मध्ये रजिस्टर केलेच आहे, तर या अँपमध्ये हि माहिती तुम्हाला भेटू शकते – चालू लाईट बिल चेक करणे, जुनी बिल तपासणे, बंद मीटर बद्दल तक्रार… इत्यादी इथे क्लिक (=> महावितरण अँप माहिती <=) करून सविस्तर माहिती घ्या.
मित्रांनो, या SMS मध्ये तुमचा ग्राहक क्रमांक, मीटर क्रमांक, तसेच वाचन दिनांक असे लिहिलेले दिसेल व कधी पर्यंत तुम्ही मीटर रिडींग पाठवू शकता ती तारीख पण दिलेली असते. तसेच हे मीटर रिडींग तुम्ही महावितरण च्या मोबाईल अँप द्वारे किंवा ग्राहक पोर्टल च्या सेल्फ रिडींग सुविधे मार्फत ही दिलेल्या तारखे पर्यंत कधीही पाठवू शकता.
स्टेप 6: Submit Meter Reading ऑप्शनला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचे नाव म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर मीटर आहे त्याचे नाव दिसेल. त्या नावावर क्लीक करायचे आहे.
स्टेप 7: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला रिडींग घ्यायचे आहे. ते तुम्हाला इथे तुमची सर्व माहिती दिसेल. ज्यात तुमचा Consumer Number म्हणजेच ग्राहक क्रमांक, Billing Unit, Bill Month, Reading Date, तसेच मागचे रिडींग तारीख, या सर्व गोष्टी दिसतील. त्या नंतर तुम्हाला परमिशन्स देण्यासाठी Ok बटन वर क्लिक करून नंतर वेगवेगळ्या मोबाइल (लोकेशन, कॅमेरा) परमिशन्स allow करायचे आहे.
स्टेप 8: मित्रांनो, आता तुम्हाला Meter Reading या ऑप्शन मध्ये KWH असे लिहिलेले दिसेल. याचा अर्थ किलोवॅट अवर (kilo watt hour). मीटर चे रिडींग घेताना ते KWH या फॉरमॅट मध्ये घ्यायचे आहे. त्यातही सर्वात पहिले तुमच्या मीटरचा फोटो घ्यायचा आहे. व त्यात जे रिडींग असेल तेच तिथे टाकायचे आहे.
आणि दुसरा ऑप्शन म्हणजे Meter Photo या ऑप्शन मध्ये तुम्हाला Press to capture photo या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे व तुमचा कॅमेरा ओपन होईल. आणि मीटर चा फोटो घ्यायचा आहे. ( मित्रांनो, रिडींग चा फोटो घेताना मिटरच्या स्क्रीन वर वेळ आणि तारीख नंतर रिडींग व नंतर kWH असे लिहिलेले दिसेल तेव्हाच फोटो घ्यायचा आहे) व नंतर Submit Reading या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
नोट: मीटरचा फोटो काढताना मीटर kWh येईल तेव्हाच फोटो काढायचा आहे, kWh सोडून दुसऱ्या कोणत्या हि युनिट चा फोटो ग्राह्य धरला जाणार नाही, याची नोंद द्यावी.
व परत Yes बटन वर क्लिक करायचे आहे. व तुमचे रिडींग सकसेसफुल्ली सेंड होऊन जाईल.
या महावितरणच्या अँप मध्ये मीटर रिडींग सारख्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध जसे कि चालू बिल चेक करणे आणि ऑनलाईन भरता येणे, जुनी बिलची यादी तपासणे, खराब/बंद मीटर आणि वीज चोरीची तक्रार करणे इत्यादी. महावितरण अँपच्या सुविधा वाचण्यासाठी हा लेख वाचा => महावितरण अँपची संपूर्ण माहिती
तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही स्वतः महावितरण ला तुमचे मीटर रिडींग पाठवू शकता. मित्रांनो, आशा करतो की या लेखाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तसेच हा लेख आवडला असल्यास किंवा मह्त्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।
Tags: Mahavitaran Meter Reading Send Mahiti, Mahavitaran Meter Reading Submit Online, Light Meter Reading Send karne mahiti, Meter Reading Online Send Kase Karayche, Mahavitaran Meter Reading Send information, Mahavitaran Meter Reading in Marathi