आरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

लॅसिक सर्जरी (Lasik Surgery): म्हणजे काय, खर्च किती येतो?, प्रकार, फायदे व नुकसान

नमस्कार मित्रांनो, आज आपण लॅसिक सर्जरी (LASIK Surgery) म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, लॅसिक सर्जरी कोणी करावी, कोणी करू नये तसेच त्यासाठी कोणत्या टेक्नीक वापरल्या जातात, त्याचे फायदे काय, तोटे काय, त्यासाठी येणारा खर्च किती व ही पूर्ण प्रोसेस वेदनादायक असते का, या व अशा सर्व गोष्टींबद्दल माहिती समजून घेऊयात.

Lasik Surgery Sampurn Mahiti

मित्रांनो डोळे [eyes] हे मानवी शरीरातील एक महत्वाचा भाग आहेत. डोळ्यांमुळेच आपण जवळचे, लांबचे तसेच काहीही पाहू शकते. पाहण्याची शक्ती डोळे आपल्याला बहाल करतात. जर डोळेच नसतील तर आपण काहीही पाहू शकणार नाही आणि त्यामुळेच ते हेल्दी राहावेत म्हणून आपण प्रयत्न करायला हवा. डोळा हा विविध पार्ट्स ने बनला आहे जसे कि कॉर्निया (Cornea), बुबुळ (Iris), बाहुली (Pupil), डोळयातील पडदा (Retina), ऑप्टिक मज्जातंतू (Optic Nerve) आणि असे विविध अवयव एकत्रित येऊन काम करतात आणि आपण पाहू शकतो. जर हे सगळे अवयव व्यवस्थित काम करत नसतील तर मानवामध्ये मायोपिया (myopia) [जवळचे दिसत नाही], हायपरोपिया (hyperopia) [दूरचे दिसत नाही] डेव्हलप होतात आणि त्यामुळेच वस्तू बघायला प्रॉब्लेम्स येतात.



त्यामुळेच अशा लोकांना चष्मा (specs) लावायची गरज पडते. चष्म्यामुळे प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व होत नाही. आपण सतत चष्मा डोळयांवर लावून फिरू शकत नाही. चष्मीश व्यक्तीला काही प्रॉब्लेम्स चा सामना करावा लागतो जसे कि चहा पिताना चष्म्यावर फॉग/वाफ जमा होणे, तीव्र उन्हामध्ये गॉगल्स घालू न शकणे, मास्क वापरताना चष्म्यावर फॉग जमा होणे, पावसात चष्मा वापरू न शकणे, 3D चित्रपट पाहताना चष्म्याच्यावर गॉगल्स लावायला लागणे यासारख्या अनेक समस्यांचा सामना चष्मीश व्यक्तीला करावा लागतो. हे दुःख फक्त ज्याला चष्मा आहे तोच जणू शकतो नाही का!

आता तुम्ही काहीच चिंता करायची आवशक्यता नाही कारण तंत्रज्ञान इतके डेव्हलप झाले आहे कि यासारख्या समस्यांचा सामना करायची काहीच गरज नाही फक्त १५ ते २० मिनिटांच्या लॅसिक सर्जरी ने आपण काही वेळातच चष्म्याचा नंबर पूर्णपणे घालवू शकतो. चला तर मग उशीर का करायचा जाणून घेऊयात अजून माहिती.

लॅसिक सर्जरी म्हणजे काय?

लॅसिक सर्जरी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण प्रथम डोळ्यांनी गोष्टी कशा पाहू शकतो हे जाणून घेऊयात. तर आधी सांगितल्याप्रमाणे विविध पार्ट्स एकत्र येऊन काम करतात आणि आपण पाहू शकतो. कॉर्निया (Cornea) हा एक पारदर्शी (transparent) पडदा असतो जो डोळ्यांचा सगळ्यात बाहेरचं आवरण म्हणजे outer covering असतं. जेव्हा सूर्यप्रकाश किंवा कोणतीही आर्टिफिशिअल लाईट वस्तूवर पडते तेव्हा तो प्रकाश परावर्तित (reflect) होऊन कॉर्निया मधून डोळ्यांमध्ये शिरतो. कॉर्निया च्या बरोबर मागे बुबुळ (Iris) असते आणि त्याला लागून बाहुली (Pupil) असते. Iris प्रकाश कंट्रोल करायचा काम करते म्हणजेच प्रकाशाच्या कमी जास्त प्रमाणाप्रमाणे बुबुळ, बाहुली चा आकार बदलते.

Dola Kam Kasa Karto

जेव्हा जास्त प्रकाश असतो तेव्हा बुबुळ, बाहुली ला आकुंचित (contract) करते आणि जेव्हा प्रकाश कमी असतो तेव्हा प्रसारित (dilate) करते. अशाप्रकारे तीव्र प्रकाशापासून संरक्षण करायचं काम बुबुळ करते. आता जो प्रकाश कॉर्निया मधून बाहुली कडे येतो तो आता लेन्स वर पडतो. लेन्स कॉर्निया च्या बरोबर मागे असते. लेन्स आलेल्या प्रकाशाला रेटिना वर फोकस्ड करायचा काम करते. रेटिना हा डोळ्याच्या मागच्या भागामध्ये असतो. लेन्स रेटिना वर इमेज तयार करण्याचा काम करते पण ती जी इमेज असते ती इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये म्हणजेच उलट्या दिशेने असते.

मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि जर इमेज उलटी असते तर ती आपल्याला सरळ कशी दिसते? तर रेटिना च्या मागे असलेल्या ऑप्टिक मज्जातंतू (Optic Nerve) मेंदूमधील ओसीपीटल लोब (Occipital Lobe) ला काही इम्पल्स पाठवतात आणि त्याच्या कार्यामुळे आपण वस्तू सरळ पाहू शकतो. अशाप्रकारे जसा एखादा HD कॅमेरा फोटो तयार करतो तसेच आपला डोळा आपल्याला वस्तू दाखवतो. आहे ना इन्ट्रस्टिंग आता तुम्हाला कळलं असेल कि डोळा कसं काम करतो.



तर काहीवेळेस डोळ्यांचा सतत मोबाइल स्क्रीन, टीव्ही स्क्रीन किंवा कॉम्पुटरशी कॉन्टॅक्ट आल्यामुळे किंवा काही जेनेटिक कारणांमुळे दिसायचे कमी होते. कॉर्निया मधून पास झालेला प्रकाश रेटिना पर्यंत पोहचू शकत नाही आणि त्यामुळेच दिसायला प्रॉब्लेम येतो. जेव्हा आपल्याला चष्माचा नंबर लागतो तेव्हा डोळ्याची साईझ मागून वाढायला लागते आणि त्यामुळेच प्रकाश डोळ्याच्या मागच्या भागात असलेल्या रेटिना पर्यंत पोहचू शकत नाही त्यालाच मायोपिया (near sightedness) म्हणजेच जवळचे पाहताना कमी किंवा धूसर (blurry) दिसते.

लॅसिक सर्जरीमध्ये लेझर चा उपयोग करून कॉर्निया चा आकार बदलला जातो म्हणजेच त्याची साईझ लेझर बीम वापरून कमी केली जाते. मग साहजिकच साईझ कमी केल्यामुळे आपोआप प्रकाश रेटिना वर पोहचतो आणि आपल्याला सगळे व्यवस्थित दिसू लागते आणि तेही चष्म्याचा वापर न करता. आता तुम्हाला समजले असेलच लॅसिक लेझर काम कसे करते. चला तर मग जाणून घेऊयात लॅसिक सर्जरी चे प्रकार आणि त्याचा खर्च किती आहे.

लॅसिक सर्जरीचे प्रकार

आता सर्जरी म्हणाली कि आपल्याला पहिला डोक्यात येत ते म्हणजे चिरफाड, रक्त, बॅनडेज, टाके, जखमा आणि बरच काही. पण इथे तस काही पाहायला मिळणार नाही. लॅसिक सर्जरीचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत आणि हे तिन्ही प्रकार ब्लेड फ्री आहेत. म्हणजेच या तिन्ही प्रकारांमध्ये ब्लेड चा वापर न करता फक्त लेझर च्या साहाय्याने चष्म्याचा नंबर घालवता येतो. इतका सोप्पं आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये सर्जरी होऊन तुम्ही लगेच एक ते दोन तासांमध्ये घरी जायला मोकळे. चला तर मग पाहुयात किती प्रकारे आपण सर्जरी करू शकतो.

Types of Lasik Surgery

आम्ही लॅसिक सर्जरी चे तीन मुख्य प्रकार या लेखामध्ये सांगणार आहोत. पहिला कॉन्ट्यूरा व्हिजन (Contoura Vision), दुसरा स्माईल (Smile) आणि तिसरा शेवटचा लॅसिक (Lasik).

1] कॉन्ट्यूरा व्हिजन [Contoura Vision]

कॉन्ट्यूरा व्हिजन ही सर्वात अलीकडील आणि अडवान्सड सर्जरी आहे. कॉन्ट्यूरा व्हिजन हे चष्म्याचा नंबर घालवतेच आणि करेक्ट हि करते त्यासोबतच ज्या कॉर्नियल अनियमितता (corneal irregularities) [जसे कि cornea चा बदलेला आकार] आहेत त्या घालवायला हि मदत करते. ह्या सर्जरी ची किंमत अंदाजे 40 ते 90 हजार पर्यंत याचा खर्च जाऊ शकतो हि किंमत दोन्ही डोळ्यांसाठी आहे. याशिवाय हि टेक्नीक पेनलेस/वेदनारहित आहे. सोबतच उत्तम दर्जाची दृष्टी (vision) देते. हि टेक्नीक 2 वर्षे जुनी आहे. खूप महत्वाची गोष्ट म्हणजे हि टेक्नीक ब्लेड फ्री आहे.

इथे टाके अथवा इंजेक्शन ची काही आवशक्यता नाही. आता तुम्ही म्हणाल इंजेक्शन नाही तर भूल कशी देणार तर इथे भूल देण्यासाठी आय ड्रॉप्स चा वापर केला जातो. हि खूप सेफ टेक्नीक आहे आणि त्यासोबतच त्याचा रिकव्हरी टाइम हि खूप इमेडिएट/तात्काळ आहे. म्हणजेच जर आज सर्जरी झाली तर आपण उद्या कामाला लागू शकतो. अशाप्रकारे बाकीच्या प्रकारांशी तुलना करता ह्या टेक्नीक ची परिणामकारकता [efficacy] हि खूप चांगली आहे.

2] स्माईल [Smile]

स्माईल [Smile] सर्जरी ही 5 वर्षे जुनी आहे. कॉन्ट्यूरा व्हिजन प्रमाणेच ही टेक्नीक वेदनारहित (painless) आणि ब्लेड फ्री आहे. तसेच 30 ते 80 हजार पर्यंत याचा खर्च जाऊ शकतो आणि तेही दोन्ही डोळ्यांसाठी. 7 ते 10 दिवस हा ह्याचा रिकव्हरी टाइम आहे. म्हणजेच बाकीच्या प्रकारांशी तुलना करता ह्याचा रिकव्हरी टाइम जास्त आहे. जर तुम्ही आधी स्माईल [Smile] स्माईल सर्जरी केली असेल आणि काही कारणांनी तुम्हाला पुन्हा ही सर्जरी करायची गरज पडली तर थोडा अवघड आहे म्हणजेच थोडे कॉम्प्लिकेशन्स जास्त आहेत. बाकी कॉन्ट्यूरा व्हिजन शी तुलना करता ह्याची किंमत कमी आहे.

3] लॅसिक [Lasik]

ब्लेडलेस लॅसिक ही 10 वर्षे जुनी टेक्नीक आहे. त्याचा खर्च अंदाजे 85 हजार पर्यंत होऊ शकतो. हि वेदनारहित (painless) आणि ब्लेड फ्री टेक्नीक आहे. तसेच ह्याचा रिकव्हरी टाइम हि कमी आहे म्हणजे आपण लगेच कामाला लागू शकतो. हि सर्जरी सेफ आहे. याचबरोबर हि उत्तम दर्जाची दृष्टी (vision) देते.

लॅसिक सर्जरी करण्यासाठी कोण पात्र आहे?

  1. लॅसिक सर्जरी करण्यासाठी तुमचे वय कमीत कमी अठरा असणे गरजेचे आहे.
  2. जर तुमचे वय २१ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर उत्तमच आहे. आता तुम्ही म्हणाल इथे वय का महत्वाचे आहे तर जसे वय वाढते तशी उंची हि वाढते आणि कमीत कमी 21 वर्षांपर्यंत आपली उंची स्टेबल होते म्हणजे सेम राहते वाढत नाही आणि एकदा का उंची स्टेबल झाली कि चष्म्याचा नंबर हि स्टेबल होतो म्हणजे तोच राहतो बदलत नाही.
  1. लॅसिक सर्जरी हि तेव्हाच करतात जेव्हा तुमच्या चष्म्याचा नंबर स्टेबल आहे. म्हणजेच मागील काही वर्षांपासून तुमचा नंबर बदलेला नसावा तो सेम असावा.
  2. अजून एक महत्वाचा घटक म्हणजे तुमच्या डोळ्याचा cornea हा हेल्दी असायला हवा.

या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही सर्जरी करण्यासाठी पात्र आहात.

लॅसिक सर्जरी करण्यासाठी कोण पात्र नाही?

  1. ज्यांचा चष्म्याचा नंबर स्टेबल नाही अशा व्यक्ती.
  2. तुमचे डोळे फार कोरडे (dry) असतील तर
  3. जर तुमच्या डोळ्यांमधील cornea हा खूप पातळ (thin) असेल तर
  4. जर तुम्हाला डोळ्यांचा काही आजार असेल तर
  1. जर तुम्हाला ग्लुकोमा (glaucoma), कॅटरॅक्ट (cataract) म्हणजेच मोतीबिंदू यासारखे आजार असतील तर
  2. जर तुम्हाला सतत डोळ्यांचे इन्फेक्शन (infection) होत असेल तर
  3. जर तुम्ही डायबेटिक आहात आणि तुमचा डायबेटीस (diabetes) कंट्रोल नाहीये

या आणि अशा बऱ्याच कारणांमुळे तुम्ही लॅसिक सर्जरी करण्यासाठी पात्र नाही

लॅसिक सर्जरी करण्यामागील रिस्क

आता कोणतीही सर्जरी आली कि रिस्क हि आली मग ती सर्जरी डोळ्याची असुदे अथवा कोणतीही. काही लोकांना लॅसिक सर्जरी झाल्यानंतर काही साईड इफेक्ट्स चा सामना करावा लागतो. पण काही कालांतराने योग्य मार्गदर्शनाखाली साईड इफेक्ट्स कमी होऊ शकतात. काही दुर्मिळ केसेस मध्ये हे साईड इफेक्ट्स तसेच राहतात. खूप कॉमन साईड इफेक्ट्स म्हणजे डोळे कोरडे होणे हे प्रत्येक लॅसिक सर्जरी केलेल्या पेशंट मध्ये दिसून येते. तसेच डोळे दुखणे, त्यांना खाज येणे (itchy, scratchy) तसेच दिसताना धूसर दिसणे, discomfort जाणवणे, उजेडाचा त्रास होणे अशाप्रकारे काही परिणामांचा तुम्हाला सामना करावा लागेल. परंतु कालांतराने हे सगळे कमी होऊ शकते आणि तुम्ही पुन्हा व्यवस्थित पाहू शकाल तेही चष्मा न लावता.

लॅसिक सर्जरी करण्याआधी व नंतर काय काळजी घ्यावी?

  1. मित्रांनो जर तुम्हाला काही आजार असेल किंवा काही फॅमिली history असेल तर ते तुम्ही तुमच्या ऑप्थआल्मोलोजिस्ट (ophthalmologist) ला सांगणे गरजेचे आहे.
  2. जेव्हा तुमच्या चष्म्याचा नंबर स्टेबल असेल तेव्हाच तुम्ही लॅसिक सर्जरी चा विचार करावा
  3. जर तुम्हाला कोणत्याही औषधाची एलर्जी (allergy) असेल तर त्याबद्दल तुमच्या डॉक्टर शी आधीच बोला.
  4. डोळे हा फार महत्वाचा अवयव असल्यामुळे एखाद्या अनुभवी डॉक्टरचा विचार करावा.
  5. तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या टेस्ट आधीच करून घ्यावात आणि डॉक्टरांशी त्याबद्दल संवाद साधावा.
  1. लॅसिक सर्जरी झाल्यानंतर घरी जाऊन आराम करणेच योग्य आहे.
  2. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवस काळ्या चष्म्याचा वापर करा जेणेकरून तुमच्या डोळ्यांना उजेडाचा त्रास होणार नाही.
  3. लॅसिक सर्जरी झाल्यानंतर कोणत्याही डिजिटल स्क्रीन शी जसे कि मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही यांच्याशी संपर्क ठेवू नये. जर तुम्ही यांचा वापर केलात तर ड्रायनेस वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे काही दिवसांसाठी हे टाळावेच.
  4. डॉक्टरांनी दिल्याप्रमाणे आय ड्रॉप्स चा वापर करावा.
  5. सुरुवातीला स्क्रीन टाइम कमी ठेवून जसे बरे होताल तस तास वाढवावा जर तुम्ही स्क्रीन टाइम अचानक वाढवला तर त्रास होऊ शकतो. म्हणजेच जर आज तुम्ही 1 तास मोबाईल वापरला असेल तर उद्या अर्धा तास अजून वाढवा अचानक 5 तास करू नका असे करण्यामुळे ड्रायनेस वाढून डोळ्यांमध्ये खाज सुटेल.

लॅसिक सर्जरी ला किती वेळ लागतो?

मित्रांनो, लॅसिक सर्जरी पूर्ण होण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटे लागतात आणि जास्तीत जास्त 30 ते 45 मिनिटे लागू शकतात.

Tags: LASIK Surgery Mhanje Kay,

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!