BankSBI BankTop Post

कोणताही बँकचा चेक कसा भरायचा ? | How To Fill Cheque In Marathi ? | How To Write Cheque In Marathi ?

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण कोणताही बँकचा चेक कसा भरायचा ते बघणार आहोत. बँक खाते उघडल्यानंतर आम्हाला बँकेचे चेकबुक मिळते. जर तुम्हाला चेकबुक भेटले नसेल तर बँकेला ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करून तुम्ही ते मिळवू शकता. एकदा अर्ज केल्यानंतर १५ ते ३० दिवसाच्या कालावधीत ते पोस्टाने घरपोच पाठवले जाते.

How To Fill Cheque In Marathi

चेकद्वारे आपण आपल्या बँक खात्यातून इतर कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो. पण चेक भरताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे जर चुकीचा चेक भरला गेला तर चेक बाउंस होऊन बँक दंड आकारू शकते.



चेकमध्ये काय भरणे आवश्यक आहे ?

कोणत्याही बँकेच्या चेक मध्ये ५ गोष्टी भरणे महत्वाचे असते, जर यापैकी एकही गोष्ट भरली गेली नाही किंवा चुकीची भरली गेली तर बँक चेक बाउंस करून चेक माघारी पाठवू शकते आणि तुम्हाला तुम्हाला दंड देखील भरावा लागेल.

या ५ गोष्टी कोणत्या आहेत त्या बघूयात !

  1. Payee Name / देयकाचे नाव – ज्या व्यक्तीला किंवा कंपनी ला पैसे द्यायचे आहेत त्याचे नाव इथे भरा
  2. Amount in Words / रक्कम अक्षरामध्ये – किती पैसे द्यायचे आहे ते अक्षरामध्ये लिहा
  3. Amount / रक्कम अंकात – किती पैसे द्यायचे आहे ते अंकात लिहा
  4. Signature / सही – या जागेवर तुमची सही करा पण लक्षात ठेवा तुमच्या बँक अकाउंटला जोडली गेलेली सही करा
  5. Date / तारीख – इथे तारीख लिहा आणि लक्षात ठेवा या तारखेपासून पुढे तीन महिने हा चे वैध असेल

चेक भरताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !

1) Payee Name / देयकाचे नाव

ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे ट्रान्सफर करणार आहेत, त्या व्यक्तीचे त्याच्या बँक अकाउंट मध्ये असलेले नाव जसेच्या तसे लिहा कोणतीही स्पेल्लिंग मिस्टेक चालणार नाही.

नाव लिहिताना खाडाखोड करू नये केली असेल तर तो चेक चेक बाउंस होऊ शकतो

2) Amount in Words / रक्कम अक्षरामध्ये

चेकमध्ये रक्कम भरताना शब्दामध्ये जास्तीची जागा ठेवू नये आणि रक्कम लिहून झाल्यावर मोकळ्या जागेत लाईन ओढावी. हे चेक मध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी कमी येऊ शकते.



3) Amount / रक्कम अंकात

चेकमध्ये अंकामध्ये रक्कम भरताना अंक नीट वाचता येतील असे लिहा आणि रक्कम लिहून झाल्यावर मोकळ्या जागेत लाईन ओढावी.

रक्कम लिहून झाल्यावर शेवटी ‘ /- ‘ ( उदा. १०००/- ) असे चिन्ह टाकावे यामुळे चेक मध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यास मदत होते

4) Signature / सही

अकाउंट उघडताना जी सही तुम्ही केली होती तीच सही इथे करा. सही जर चुकीची केली गेली तर चेक माघारी येऊ शकतो

5) Date / तारीख

इथे जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला पैसे देणार आहेत त्या वेळेची तारीख इथे लिहा. तारीख हि DD/MM/YYYY ( तारीख/महिना/वर्ष ) या फॉरमॅट मध्ये लिहा.

तुम्ही लिहिलेल्या तारखेपासून पुढच्या तीन महिन्यापर्यंत हा चे वैध असतो नंतर तो अवैध होऊन काही कामाचा राहत नाही.

चेकच्या खाली असलेल्या नंबरचा अर्थ

चेक नंबर- हा सहा अंकी चेकचा नंबर असतो. प्रत्येक बँकेची शाखा आपल्या ग्राहकांसाठी चेक नंबर तयार करते नंतर कधी गरज पडल्यास या नंबर वरून तुमची माहिती बँकेला मिळते.

उदा. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला चेक दिला असेल आणि तो तुम्हाला कॅन्सल करायचा असेल तर हा चेक नंबर बँकेला देऊन तुम्ही तो कॅन्सल करू शकता.

MICR कोड – Magnetic Ink Character Recognition याचा वापर बँकेच्या कामासाठी होतो. जेव्हा चेक क्लिअर होत असतो त्यावेळी या नंबर वरून हा चेक कोणत्या बँकेचा आहे, कोणत्या शाखेचा आहे हे समजते.

Account ID with RBI – हा चेक कधी RBI मध्ये गेला तर या नंबर वरून बँकेची माहिती RBI ला भेटते.

Transaction Code – हा कोड बँकेला कोणत्या प्रकारचे अकाउंट आहे हे ओळखण्यास मदत होते जसे ३१ सेविंग अकाउंट, ५० करंट अकाउंट इत्यादी.


या पोस्टबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट करून नक्की सांगा ! धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!