Uncategorized

निवृत्तीनंतर पैश्यांची गुंतवणूक कशी कराल? | How do you Invest your Retirement Income (PF & Gratuity)

हा लेख वाचणारे तुम्ही कदाचित नुकतीच नोकरीला सुरुवात केली असेल, किंवा नोकरीत रुजू होऊन बरेच वर्षे झाली असतील किंवा तुम्ही आता नोकरीतून निवृत्त होण्याच्या टप्प्यावर आहात. तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. तर नोकरी करणारे आपण, या सगळ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे पीएफ आणि ग्रॅजुईटी! आपण नोकरी करत असताना दर महिन्याला थोडे थोडे पैसे पीएफ खात्यात जमा होत असतात, यामध्ये आपला आणि आपल्या कंपनीचा थोडा थोडा वाटा असतो. आणि चक्रवाढ पध्दतीने ही रक्कम वाढत जाऊन जेव्हा आपण नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतो किंवा निवृत्त होतो तेव्हा ती रक्कम बऱ्यापैकी वाढलेली असते, शिवाय आपण पाच वर्षापैकी अधिक काळ आपल्या नोकरीत एकाच कंपनीत काम केलेले असले तर कंपनी तर्फे ग्रॅजुईटी देखील मिळते.

How do you invest your retirement income PF Gratuity
How do you Invest your Retirement Income (PF & Gratuity)

पण निवृत्तीनंतर ही रक्कम एकसाथ हातात पडते / पडेल तेव्हा या रकमेचा भविष्यात योग्य वापर कसा करावा यासाठी हा लेख.



जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये भविष्याचा विचार करून एसआईपी च्या माध्यमातून गुंतवणूक करतो, आणि जेव्हा आपली नोकरी संपून आता आपल्याला आपल्या जमापुंजीतून पैसे काढायचे असतात तेव्हा ते आपण एकत्रित न काढता (SWP) म्हणजेच सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅनच्या माध्यमातून ते पैसे हळूहळू काढू शकतो. जेणेकरून आपल्या गरजेपुरते पैसे दर महिना आपल्या गरजेसाठी काढून उरलेले पैसे गुंतून राहतील व वाढतील हा त्या मागचा उद्देश असतो.

पण पीएफ आणि ग्रॅजुएटी ची रक्कम एकसाथ हातात आल्यावर ती एफडी मध्ये गुंतवणूक करावी व कमी व्याज पण मुद्दल सुरक्षित अशी गुंतवणूक करावी की शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करावी यामध्ये आपला गोंधळ होतो.

तेव्हा ही गुंतवणूक नेमकी कशी करावी हे तुमच्या उत्पन्नाच्या इतर स्त्रोतांवर अवलंबून आहे, आणि यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

1) पोस्टाची जेष्ठ नागरिक बचत योजना

निवृत्तीनंतर तुमच्याकडे उत्पन्नाचे इतर कोणतेही स्रोत नसल्यास तुम्ही पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला वार्षिक ८.५% मिळतात आणि मूळ पैसे भारत सरकारकडे १००% सुरक्षित आहेत. हा सर्वाधिक व्याजदर आणि उपलब्ध सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. तुम्हाला तिमाही व्याज पेमेंट मिळेल. योजनेचा कालावधी 5 वर्षे आहे आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 15 लाख रुपये आहे. आणि यावरील व्याज करपात्र आहे.

हेही वाचा - निवृत्तीनंतर पैश्याच्या टंचाईविना आयुष्य जावो यासाठीचा 4% नियम

2) डेट म्युच्युअल फंड खरेदी करणे

तुम्ही डेट म्युच्युअल फंडात काही रक्कम गुंतवू शकता. ते तुम्हाला मार्केट ट्रेंडनुसार व्याज देतील. व्याजदरात घट झाल्यास, तुमची NAV वाढेल. ३६ महिने होल्ड केल्यानंतर तुम्हाला इंडेक्सेशन बेनिफिट मिळेल आणि कर दायित्व खूपच कमी असेल. तुमच्या मासिक रोख प्रवाहाच्या गरजेनुसार तुम्ही पद्धतशीर पैसे काढण्याचा पर्याय देखील निवडू शकता



3) बँक एफडी

बँक एफडीमध्ये जरी आपल्याला वार्षिक जास्त परतावा मिळत नसला तरी देखील 10-15% पैसे आकस्मिक निधी म्हणून ठेवा. वैकल्पिकरित्या, तुम्ही काही लिक्विड म्युच्युअल फंड किंवा इक्विटी आर्बिट्रेज फंड खरेदी करू शकता. तो पर्याय देखील एफडी पेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकतो

4) म्युच्युअल फंड डिव्हिडंड पेआऊट

डिव्हिडंड पेआउट पर्यायांसह संतुलित इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये 20% -25% पैसे ठेवा. बॅलन्स्ड इक्विटी MF 65% इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात आणि डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये शिल्लक असतात. तुम्ही ऑनलाइन मूल्य संशोधनाच्या रँकिंगवर आधारित शिल्लक विचार करू शकता. फक्त थेट योजना खरेदी करा आणि नियमित योजना नाही; तुम्ही तुमच्या कमाईत 1% बचत कराल

या व्यतिरिक्त वयोमानानुसार तुम्हाला तुमच्या वैद्यकीय खर्चात देखील वाढ झालेली दिसून येईल तेव्हा या वयात तुमचे व तुमच्या जोडीदाराचे मेडिक्लेम नक्कीच असुद्यात जेणेकरून जर काही कारणास्तव तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले तर तुमच्या गुंतवणूकीवर या खर्चाचा भार पडू नये

लेखक – अभिजित ननावरे

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!