Health Insurance

हेल्थ इन्शुरन्स माहिती मराठी

आज आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल माहिती घेऊ, जसे कि हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय असते, हेल्थ इन्शुरन्स च बेस्ट प्लान कसा निवडायचा? त्यासाठी काय काय पेपर्स लागतात?

हेल्थ इन्शुरन्स याला आरोग्य विमा असे सुद्धा म्हणतात. हा एक असा विमा आहे जो कि accident , illness किंवा एखाद्या serious आजारामुळे medical emergency मध्ये आपल किंवा आपल्या कुटुंबच संरक्षण करत असतो. तर जर कधी एखादा विमा धारकाला कोणत्याही कारणात्सव वैद्यकीय मदत लागती तर त्याला cashless सुविधा मिळू शकते. त्याला घरातून आणण्या पासून ते योग्य उपचारा नंतर सुखरूप व्यवस्थित घरी सोडण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे नियोजनाचे काम हेल्थ इन्शुरन्स कंपनी करत असते.



कॅशलेस सुविधा म्हणजे वैद्यकीय इमर्जन्सी मध्ये आपल्याला दवाखान्यात आल्यापासून लगेच पैशांची गरज लागते आपल्याकडे पुरेसे जर पैसे नसतील तर आर्थिक दृष्ट्या अडचणी आपल्याला येऊ शकतात. त्यामुळे विमा घेताना कॅशलेस आरोग्य विमा चा पर्याय घेतल्यास आपल्याला उपचाराचे पैसे भरावे लागत नाही. आपल्या वतीने आपली हेल्थ इन्शुरन्स कंपनी दवाखान्याचे बिलाचे पैसे देते. आपल्याला फक्त योग्य ते कागदपत्रे हेल्थ इन्शुरन्स कंपनीला देणे गरजेचे असते.

हेल्थ इन्शुरन्स घेणे का गरजेचे आहे ?

आपल्या आत्ताच्या धावपळीच्या आयुष्यामुळे आपण बरेचदा आपल्या तब्येतीकडे किंवा त्याच्याशी संबंधित समस्यांकडे लक्ष देत नाही आत्ताच्या या वेगवान आयुष्यात सगळे लोक आपल्या कामात खूप व्यस्त झालेली आहेत. तसेच आपल्या मित्रांच्या सोबत, आपल्या फॅमीली सोबत वेळ घालवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नसतो. एवढा आपल्याला कामाचा ताण आहे त्यामुळे आपल्या या कामाच्या ताणामुळे जीवन अतिशय विखुरला गेला आहे. याचा परिणाम आपल्या तब्येतीवर दिसून येतो. आज-काल कधी काय घडेल किंवा कधी काय होईल कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स घेणे अगदी गरजेचे आहे. अश्या परिस्थितीमध्ये आपण आयुष्यभर जे कमवतो ते कमावलेलं दवाखान्यात उपचार घेण्यासाठी खर्च होऊन जातो. या प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपण हेल्थ इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे.

हेल्थ इन्शुरन्स चे प्रकार

  1. वयक्तिक हेल्थ इन्शुरन्स – पर्सनल हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुम्हाला दुखापत झाली असेल, अनेक रोगांवर ट्रीटमेंट चालू असेल, दवाखान्यात ऍडमिट करायची वेळ असेल, ऑपरेशनचा खर्च असेल, रूमचं भाडं अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश या प्रकारात होतो. ज्यांचे वय 18 ते 70 आहे. ती लोक पर्सनल हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकतात. या विम्यात सहभाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक विमा असतो.
  2. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स – तुम्हाला कुटुंबातील सर्व मेंबर साठी परवडणारी अशी ही विमा पॉलिसी आहे. या पॉलिसीत सहभागी असलेल्या सर्व सदस्यांसाठी सिंगल सम इन्शुरन्स लोटस लागू असते. योजना खूप फायदेशीर आहे कारण याचा प्रीमियम हा खूप कमी असतो.
  3. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी – ही पॉलिसी एकत्र काम करणाऱ्या कामगारांच्या गटासाठी समूहासाठी तयार केली गेली आहे. तुमची जर एखादी कंपनी असेल ज्यात अनेक लोक काम करत असतील तर अशा कर्मचाऱ्यांसाठी ही योजना घ्यावी. कर्मचाऱ्यांना दिला जाणारा हा एक प्रकारचा फायदा आहे. या विम्यात प्रीमियम हा कमीत कमी किमतीचा येतो.
  4. ज्येष्ठ नागरिकांचा विमा – ही विम्याची पॉलिसी 60 वर्षापेक्षा जास्त वय आहे अशा लोकांसाठी तयार केली गेली आहे. म्हणूनच त्याला ज्येष्ठ नागरीक हेल्थ इन्शुरन्स असे म्हणतात. तुमच्या घरात जर कोणी या वयापेक्षा जास्त असतील तर त्यांच्यासाठी ही पॉलिसी चांगली आहे.
  5. मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स किंवा मातृत्व आरोग्य योजना – या योजनेसोबत एक प्रसूती कव्हर म्हणून खरेदी करता येतो. जन्माच्या आधी डिलिव्हरी आणि जन्मानंतरच्या टप्प्यात झालेला सर्व खर्च इथे कव्हर केला जातो. जे कुटुंब बाळाच्या योजना ची तयारी करत आहे. त्यांनी ही पॉलिसी घ्यावी. यात वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक अशा गोष्टी समाविष्ट असतो. नवीन जन्मलेल्या बाळाला त्याच्या पहिल्या 90 दिवसांपर्यंत यात कव्हरेज मिळतं.
  6. गंभीर आजार विमा किंवा क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स – सध्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक रोगांचे प्रमाण वाढत आहे. हे लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार केली गेली आहे. या पॉलिसीत कॅन्सर स्ट्रोक, अर्धांग वायू, हृदय विकाराचा झटका, रक्तदाब शस्त्रक्रिया, बायपास अशा अनेक बऱ्याच रोगांचा समाविष्ट होतो.

चांगले असे हेल्थ इन्शुरन्स कसे निवडायचे

हेल्थ इन्शुरन्स घेताना ते आपल्या फायदेशीर आहे की नाही हे आधी तपासून पहावे. कुठलेही हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना पैशाकडे हाथ आखडता घ्यावा इन्शुरन्सची वैशिष्ट्ये बघून घ्यावे, ज्याचा फायदा आपल्याला स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी होणार आहे.

विमा घेताना किती रकमेचा विमा घ्यावा याबद्दल कोणताही असा नियम नाही. ते सर्वस्वी तुम्ही कुठल्या शहरात राहता, तुमच्या कुटुंबात आजारपणाचा काय इतिहास आहे. विमा घेणाऱ्याचे वय किती आहे, या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. विमा घेताना सप्लीमेंट म्हणजेच बाजारात असलेल्या साधारण पॉलिसीपेक्षा जास्त खर्च कव्हर आहे का ते तपासून घ्यावे. विमा घेताना आधीपासून व्यक्तीला असलेल्या रोगांचा समावेश विम्यात आहे की नाही हे तपासून बघावे.

कोणताही हेल्थ इन्शुरन्स येण्याच्या आधी सल्लागारांकडून हेल्थ इन्शुरन्स ची माहिती घ्यावी. अथवा बऱ्याच कंपन्यांच्या योजनांची तुलना करून बघावी. वेगवेगळ्या पॉलिसीची तुलना करून बघावी. प्रेमियम बघून कोणताही विमा घेऊ नका.



विमा घेताना लागणारी कागदपत्रे किंवा विमा क्लेम करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

कोणत्याही प्रकारचा विमा घेताना वयाचा पुरावा, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, वैद्यकीय अहवाल आणि प्रपोजल फॉर्म या गोष्टी आवश्यक असतात. ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा किंवा वयाचा पुरावा याच्यात मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, वीज बील, टेलीफोन बील असे पुरावे तुम्ही कागदपत्र म्हणून सादर करू शकतात.

तर मित्रांनो, आरोग्य विमा बद्दलचे तुमचे बरेचे प्रश्न स्पष्ट झाले असतील आणि तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स बद्दल बरीच माहिती मिळाली असेल अशी आशा करतो.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!