Government Certificate

निराधार, अपंग, विधवा, वृद्ध पेन्शन योजना, हयातीचा दाखला ऑनलाइन काढा | Hayat Praman Patra Online | Life Certificate Online

नमस्कार मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन कसा काढायचा? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Hayat Praman Patra Registration Process Online

मित्रांनो, सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महत्त्वाची मानली जाते. ही योजना अशा व्यक्तीं साठी आहे जे काम करण्यास असमर्थ आहेत, जसे की वृद्ध, दिव्यांग, किंवा अपंग, निराधार, महिला वर्ग, श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना वगैरे या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मासिक पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते, जी त्यांचं जीवनमान सुधारण्यास मदत करते.



मात्र, या योजने अंतर्गत पेन्शन चा लाभ सुरू राहावा यासाठी लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असते. पूर्वी हा दाखला प्रत्यक्ष ग्राम पंचायत, तहसील कार्यालय किंवा इतर संबंधित शासकीय ठिकाणी जाऊन द्यावा लागत असे. परंतु, सध्याच्या डिजिटल युगात शासनाने ही प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना आता त्यांच्या घरी बसूनच, मोबाईल ऍप द्वारे, हयातीचा दाखला (Life Certificate) सादर करता येतो. या बद्दल माहितीसाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….

हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन काढण्यासाठी स्टेप्स

स्टेप 1:- मित्रांनो, सर्वात पहिले तुमच्या मोबाईल च्या प्ले स्टोअर मधून दोन ऍप इन्स्टॉल करायचे आहेत. पहिले म्हणजे Aadhaar Face RD हे ऍप इन्स्टॉल करून ठेवायचं आहे. या ऍप ला ओपन करायचं नाही.

Hayat Praman Patra Online Step 1

स्टेप 2:- आता प्ले स्टोअर वरून दुसरं ऍप इन्स्टॉल करायचं आहे, ते म्हणजे Beneficiery Satyapan App- BSA . ऍप इन्स्टॉल झाल्या वर ते ओपन करायच आहे.

Hayat Praman Patra Online Step 2

स्टेप 3:- आता या नंतर तुम्हाला कोणतीही एक भाषा निवडायची आहे.

Hayat Praman Patra Online Step 3

स्टेप 4:- नंतर नेक्स्ट पेज वर Proceed For Device Registration या बटन वर क्लिक करायचं आहे.



Hayat Praman Patra Online Step 4

स्टेप 5:- त्या नंतर पुढे तुम्हाला Device Registration करण्या साठी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे तुम्ही तुमचा किंवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीचा आधार व मोबाईल नंबर टाकू शकता. त्या नंतर Register बटन वर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल. तो दिलेल्या जागी टाकून Submit बटन वर क्लिक करायचं आहे.

Hayat Praman Patra Online Step 5

स्टेप 6:- आता पुढे ज्या व्यक्तीचा आधार नंबर तुम्ही टाकला होता त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे व Select operator type मध्ये Self and family सिलेक्ट करायचं आहे आणि खाली दिलेल्या टर्म्स आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करून Scan बटन वर क्लिक करायचं आहे.

Hayat Praman Patra Online Step 6

स्टेप 7:- मित्रांनो, आता ज्या व्यक्तीचं तुम्ही आधार नंबर टाकला आहे त्या व्यक्तीचं Face authentication होईल. म्हणजेच त्या व्यक्तीचा चेहरा स्कॅन होईल. तर यासाठी Face scan इथे Yes बटन वर क्लिक करायचं आहे व नंतर दिलेल्या सर्कल मध्ये चेहरा बरोबर ऍडजस्ट करून डोळे मिचकवायचे आहेत. या नंतर तुमची केवायसी पूर्ण होऊन जाईल. व तुमचं रजिस्ट्रेशन ही पूर्ण होऊन जाईल.

Hayat Praman Patra Online Step 7

स्टेप 8:- मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Central Govt असा ऑप्शन दिसेल ,त्यावर क्लिक करायचं आहे.

Hayat Praman Patra Online Step 8

स्टेप 9:- आता या नंतर पुढे तुम्हाला National social assistance programme (NSAP) असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.

Hayat Praman Patra Online Step 9

स्टेप 10:- या नंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन ओपन होतील, Beneficiary Verification आणि View Beneficiary Certificate. यातील पहिला ऑप्शन Beneficiary Verification या वर क्लिक करायचं आहे.

Hayat Praman Patra Online Step 10

स्टेप 11:- आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Beneficiary Authentication करायचं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचा तुम्हाला हयातीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचं आहे. त्या नंतर त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जाईल तो टाकून Submit बटन वर क्लिक करायचं आहे.

Hayat Praman Patra Online Step 11

स्टेप 12:- त्या नंतर तुम्हाला Beneficiery Validated असं लिहिलेलं दिसेल. मित्रांनो, खरंतर असा मेसेज दिसला तरच तुम्ही त्या व्यक्तीचा हयातीचा दाखला काढू शकाल. नंतर टर्म्स आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करून Scan बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 13:- आता पुढे तुम्हाला Face capture किंवा Finger / Iris यापैकी कोणतीही एक RD सर्व्हिस सिलेक्ट करायला सांगितले जाईल. तर इथे आपण Face capture हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत.

Hayat Praman Patra Online Step 13

स्टेप 14:- मित्रांनो, Face capture हा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुम्हाला आधी सांगितल्या प्रमाणे ज्या व्यक्तीचा हयातीचा दाखला काढायचा आहे, त्या व्यक्तीचा चेहरा बरोबर दिलेल्या सर्कल मध्ये घेऊन त्यांना डोळे मिचकवायला सांगायचे आहे. या प्रकारे त्यांचा फोटो काढायचा आहे. फोटो बरोबर कॅपचर झाल्या वर तुम्हाला image captured successfully असा ऑप्शन दिसेल म्हणजेच त्या व्यक्तीचं केवायसी कम्प्लिट झालेलं आहे. त्या नंतर तुमचा हयातीचा दाखला / सर्टिफिकेट जनरेट होऊन जाईल. या हयातीच्या दाखल्यात तुमचं म्हणजेच बेनिफिशियरी व्यक्तीचं नाव, रजिस्ट्रेशन डेट, मोबाईल नंबर, कोणती स्कीम आहे त्याच नाव, आहि सर्व माहिती आलेली दिसेल.

Hayat Praman Patra Online Step 14

स्टेप 15:- मित्रांनो, आता तुम्हाला ते सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे. त्या साठी परत मागे यायचं आहे आणि दुसरा ऑप्शन View Beneficiary Certificate या वर क्लिक करायचं आहे.

Hayat Praman Patra Online Step 15

स्टेप 16:- त्या नंतर तुम्हाला इथे आता BSA ID लागेल. मित्रांनो, आता ज्या व्यक्तीचं केवायसी केलं आहे, त्याच्या मोबाईल वर मेसेज आला असेल त्यात हा BSA आयडी तुम्हाला मिळून जाईल. तर हा BSA ID घेऊन दिलेल्या जागी टाकायचा आहे व Submit बटन वर क्लिक करायचं आहे.

Hayat Praman Patra Online Step 16

नंतर परत त्याच मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जाईल. तो ओटीपी टाकून verify बटन वर क्लिक करायचं आहे.

Hayat Praman Patra Online Step 17

स्टेप 17:- त्या नंतर तुमचं सर्टिफिकेट जनरेट म्हणजेच डाउनलोड होऊन जाईल. याचा स्क्रीन शॉट काढून घ्यायचा आहे व त्याची प्रिंट देखील तुम्ही काढून ठेवू शकता.

Hayat Praman Patra Online Step 17

तर मित्रांनो, अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पेन्शन मिळवण्या साठी तुम्ही मोबाईल ऍप द्वारे हयातीचा दाखला (Life Certificate) काढू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन कसा काढायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.

FAQ

हयातीचा दाखला म्हणजे काय?

मित्रांनो, हयातीचा दाखला हा एक अधिकृत दस्तऐवज आहे, जो पेन्शन धारक जिवंत असल्याचे प्रमाणित करतो. संजय गांधी निराधार योजना किंवा इतर पेन्शन योजना अंतर्गत हा दाखला सादर करणे आवश्यक असते.

या हयातीच्या दाखल्याची वैधता किती असते?

मित्रांनो, या हयातीच्या दाखल्याची वैधता एक वर्षासाठी असते. म्हणजेच तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर पेन्शन योजना अंतर्गत पेन्शन घेत असाल तर दरवर्षी तुम्हाला हा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

हयातीचा दाखला मिळवण्यासाठी कोणते शुल्क आकारले जाते का?

नाही मित्रांनो, हयातीचा दाखला (life certificate ) म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सेवा भारत सरकार मोफत पुरवते. त्यामुळे पेन्शन धारकांनी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कोणतेही शुल्क भरणे टाळले पाहिजे आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यासाठी आणि त्यांचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मिळविण्यासाठी केवळ अधिकृत जीवन प्रमाण केंद्रांना भेट द्यावी. तथापि काही एजंट शुल्क आकारू शकतात, अश्या व्यक्ती किंवा एजंट पासून सावध राहिले पाहिजे.

Tags: niradhar hayat praman patra, sanjay gandhi niradhar yojana hayaticha dakhla, niradhar yojana hayaticha dakhla, hayat praman patra kase kadhave, hayat praman patra online, pension yojana hayat praman patra online, pension yojana hayaticha dakhla online, hayat dakhla pension online, hayat dakhla pension marathi, hayat dakhla pension online apply, hayat dakhla mobile mdhun, pension hayat dakhla online

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!