Digital Health ID CardGovernment CardsTop Postआयुष्मान भारत कार्ड (Ayushman Bharat Health Card)

ABHA हेल्थ कार्ड: ऑनलाईन अर्ज, नोंदणी, फायदे | ABHA Health ID Card Apply Online Marathi

आभा हेल्थ आयडी कार्ड (ABHA Health ID Card): ऑनलाईन अर्ज कसा करायचा. नोंदणी, लाभ इत्यादींची चर्चा या पोस्ट मध्ये केली जाईल. आयुष्मान भारत-डिजिटल मिशन अंतर्गत नागरिकांना एक डिजिटल हेल्थ आयडी मिळेल. प्रत्येक नागरिकाचे आरोग्यासंबंधी रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील, रुग्णांचा एक इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड तयार केला जाईल. यात रुग्णाच्या वैद्यकीय व उपचाराबाबत संपूर्ण माहिती असेल. अभा हेल्थ कार्ड पूर्वी फक्त हेल्थ कार्ड म्हणून ओळखले जात असे. ज्यांचे नाव बदलून आता ABHA हेल्थ कार्ड करण्यात आले आहे.

Digital Health ID Card Apply Online Marathi

मित्रांनो, जेव्हा कधी आपण आजारी पडतो , तेव्हा त्या आजारासाठी किंवा व्याधीसाठी डॉक्टर कडे जातो. तेव्हा डॉक्टर आपल्याला विचारतात की या आजारावर यापूर्वी तुम्ही कुठे उपचार घेत होतात का, आणि जर घेत असाल तर त्याचे रिपोर्ट दाखवा. आणि जर त्या वेळी आपल्या कडे ते रिपोर्ट नसतील तर मग परत सगळ्या टेस्ट करून आजाराचं निदान करावं लागतं. आणि या पूर्ण प्रोसेस मध्ये आपला वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी खर्च होऊन जातात. आणि जर तुमचे आधीच्या आजाराचे मेडिकल रिपोर्ट्स असतील तर ते प्रत्येक वेळेस सोबत कॅरी करावे लागतात. पण मित्रांनो, आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण आता तुम्ही ABHA health Card (आभा हेल्थ कार्ड) वापरू शकता.



मित्रांनो, ABHA हेल्थ कार्ड हा आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा च एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ABHA हेल्थ कार्ड द्वारे तुम्ही तुमच्या आरोग्य विषयक नोंदी डिजिटल पद्धतीने पाहू शकता आणि दाखवू ही शकता. ABHA हेल्थ कार्ड चा एक फायदा म्हणजे एकदा का तुम्ही हे कार्ड बनवल की नंतर तुम्हाला तुमच्या सर्व मेडिकल रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरां कडे जाण्याची गरज नाही. कारण तुमचे सर्व मेडिकल रिपोर्ट्स आणि तुमच्या आरोग्याशी संबंधित असणारे सर्व कागदपत्रे तुमच्या ABHA हेल्थ कार्ड मध्ये अगदी सुरक्षित राहतात. आणि तुम्हाला ते जेव्हा पहायचे किंवा दाखवायचे असतील तेव्हा तुम्ही ते ABHA क्रमांक द्वारे पाहू किंवा दाखवू शकता.

नोट: बऱ्याच लोकांचा डिजिटल हेल्थ कार्ड अणि आयुष्यमान भारत कार्ड यामधे गोंधळ होत आहे. जर हा लेख फक्त डिजिटल हेल्थ कार्ड बद्दल आहे. जर तुम्हाला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार देणाऱ्या आयुष्यमान भारत कार्ड बद्दल माहिती पाहिजे असे तर हा लेख वाचा: =>आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड सोप्या सरळ भाषेत माहिती<=

मित्रांनो, या हेल्थ कार्ड मध्ये तुमचा कोणता रक्तगट आहे, तुम्हाला कोणते आजार झाले आहेत आणि तुम्ही यापूर्वी कोणत्या डॉक्टर कडे उपचार घेतले आहेत, तुमचे सर्व लॅब रिपोर्ट्स, अशी सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध असते आणि ही सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होत असल्याने तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हरवण्याची भीती राहत नाही. तर मित्रांनो, अजून जास्त वेळ न घेता हे ABHA हेल्थ कार्ड कसे काढायचे या बद्दल माहिती जाणून घेऊ या.

ABHA हेल्थ कार्ड कसे तयार करावे

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात आधी तुमच्या फोन किंवा लॅपटॉपच्या सर्च ब्राउझर मध्ये जाऊन, आयुष्मान भारत च्या अधिकृत वेबसाइट ला ओपन करा किंवा abdm.gov.in या लिंक वर क्लीक करा.

स्टेप 2: आता वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या create ABHA number या ऑप्शन वर क्लिक करा.



ABHA Health Card Tayar Kase Karayche Step 2

स्टेप 3: आता तुम्हाला दिलेल्या दोन ऑप्शन मधून Using Aadhar हा ऑप्शन निवडायचा आहे आणि Next बटण वर क्लिक करायचे आहे. इथे तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही Using driving license हा ऑप्शन सुद्धा निवडू शकता.

ABHA Health Card Tayar Kase Karayche Step 3

स्टेप 4: आता पुढे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे व दिलेला कॅप्चा टाकायचा आहे आणि नंतर Next बटण वर क्लिक करायचे आहे.

ABHA Health Card Tayar Kase Karayche Step 4

स्टेप 5: आता तुमच्या आधार कार्ड शी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक 6 अंकी OTP येईल. तो OTP दिलेल्या जागी टाकायचा आहे आणि Next ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

ABHA Health Card Tayar Kase Karayche Step 5

स्टेप 6: मित्रांनो, आता तुम्ही OTP टाकला की लगेच तुमचे ABHA हेल्थ कार्ड तयार होईल. या कार्ड मधील सर्व माहिती तुमच्या आधार कार्ड मधील माहिती सारखीच असते.

ABHA Health Card Tayar Kase Karayche Step 6

पण मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या ABHA हेल्थ कार्ड मधील काही माहिती बदलायची असेल, तर डाव्या बाजूला दिसणाऱ्या Edit details या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार माहिती एडिट करून भरू शकता. ABHA हेल्थ कार्ड मध्ये आभा क्रमांक हा 14 अंकी असतो. हा ABHA नंबर वापरून तुम्ही तुमचे ABHA हेल्थ कार्ड कधीही डाउनलोड करून घेऊ शकता.

ABHA Health Card Tayar Kase Karayche Step 6 Sub-Step 2

स्टेप 7: मित्रांनो, यानंतर तुम्ही Google Play Store वरून ABHA ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. या ABHA ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही तुमच्या ABHA नंबर टाकून त्या द्वारे तुमचे सर्व हेल्थ रेकॉर्ड आणि मेडिकल रिपोर्ट्स अगदी सहजपणे पाहू शकता. याशिवाय तुम्ही ABHA हेल्थ कार्ड डाउनलोड करून, तुमच्या ABHA नंबर द्वारे डॉक्टरांची अपॉइंटमेंट देखील बुक करू शकता.

ABHA Health Card Tayar Kase Karayche Step 7

ABHA हेल्थ कार्ड काय आहे

आभा हेल्थ कार्ड योजना नक्की काय आहे?

आरोग्य ओळखपत्र प्रत्येक भारतीयाचे आरोग्य खाते म्हणून काम करेल. यामध्ये चाचण्या, रोग, डॉक्टरांनी भेट दिलेली, औषधे, अहवाल आणि निदानाशी संबंधित सर्व तपशील असतील. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती आरोग्य ओळखपत्रात समाविष्ट केली जाईल. सर्व माहिती एकच ठिकाण आहे ज्यामुळे देशातील सर्व नागरिकांसाठी हे सोयीस्कर होईल.

हेल्थ आयडी देता ऑनलाईन पद्धतीने साठवला जाईल, ज्यामुळे रुग्णाची माहिती रुग्णालये आणि डॉक्टरांमध्ये डिजिटल पद्धतीने शेअर करता येते. रुग्ण हेल्थ आयडीची माहिती कोणाशी आणि किती वेळ वापर होत आहे यावर नियंत्रण ठेवू शकतो शिवाय कोणते रिपोर्ट कोणासाठी हेही तो ठरवू शकतो.

जर व्यक्ती सरकारी योजनांचा लाभ घेऊ पाहत असतील, तर त्यांना त्यांचा आयडी त्यांच्या आधारशी जोडावा लागेल. ते कोणासाठी आणि किती विशिष्ट कागदपत्रे कोणासोबत सामायिक करू इच्छितात ते निवडू शकतात. जर व्यक्ती सरकारी योजनांचा लाभ घेऊ पाहत असतील, तर त्यांना त्यांचे आयडी त्यांच्या आधारशी जोडणे आवश्यक असेल.

ABHA हेल्थ कार्ड कसे वापरावे

जेव्हा तुम्ही उपचार किंवा वैद्यकीय टेस्ट करायला जाता तेव्हा तुमचे हेल्थ कार्ड पुढे करून त्यामध्ये माहिती भरायला सांगावे. या योजनेची माहिती बऱ्याच दवाखाने, हॉस्पिटलला माहित नाही त्यामुळे तुम्हाला माहिती भरताना अडचण येऊ शकते. तसेच दवाखाने, हॉस्पिटल ला या योजनेत सहभागी जाल्यानंतरच तुमची माहिती भरता येते आणि या योजनेचा जास्त प्रसार न झाल्यामुळे माहिती भरताना अडचण येऊ शकते. मोठ्या हॉस्पिटल आणि सरकारी दवाखान्यात तुम्हाला तुमचे हेल्थ कार्ड भरून घेताना जास्त अडचणी येणार नाहीत.

ABHA हेल्थ कार्ड चे फायदे

आता या डिजिटल हेल्थ आयडी कार्ड चे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ या

  • मित्रांनो, हेल्थ आयडी कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही भारतात कुठेही गेलात आणि जर तुम्हाला ऍडमिट व्हावे लागले तर तुमच्या या हेल्थ आयडी कार्डच्या सहाय्याने तुम्ही तुमचे जुने रेकॉर्ड्स डॉक्टर ला दाखवून योग्य ते उपचार घेऊ शकता.
  • तसेच तुम्ही तुमच्या हेल्थ आयडी शी तुमचे इतर हेल्थ डिटेल रेकॉर्ड्स कधीही लिंक करू शकता.
  • आपल्या हेल्थ शी निगडित सर्व रेकॉर्ड्स या हेल्थ आयडी कार्डमध्ये रजिस्टर असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजारा विषयी असणारे कागदपत्रे जवळ ठेवण्याची आवश्यकता नाही.
  • एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या मुलांचे हेल्थ आयडी कार्ड बनवू शकता. तसेच तुमचा हेल्थ आयडी ऍक्सेस म्हणून एखादा नॉमिनी सुद्धा जोडू करू शकता. हा नॉमिनी तुमचे हेल्थ रेकॉर्ड पाहण्यास व त्यांना मॅनेज करण्यात तुमची मदत करू शकतो.
  • तुमचे सर्व हेल्थ रेकॉर्ड्स हेल्थ आयडी द्वारे डॉक्टर बघू शकतात. त्यामुळे डॉक्टरांना तुमचे पुन्हा पुन्हा चेकअप करावे लागणार नाहीत.

हेल्थ कार्ड तयार करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?

हेल्थ आयडी कार्ड आधार आणि मोबाईल नंबर सारख्या तपशीलांच्या मदतीने तयार केले जाते, प्रत्येक व्यक्तीसाठी एक अद्वितीय आयडी तयार करते. तसेच, आरोग्य ओळखपत्र ऐच्छिक आहे आणि एखाद्या व्यक्तीला आरोग्य ओळखपत्र नको असल्यास त्याला उपचार दिले जातील.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान राबविण्यास मान्यता दिली आहे.

डिजिटल हेल्थ आयडी कार्ड हेल्पलाईन: कस्टमर केअर टोल-फ्री नंबर / ईमेल

डिजिटल आरोग्य मिशन योजना किंवा एनडीएचएम पोर्टलच्या समस्यांशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास ऑनलाइन वापरकर्ते ग्राहक सेवेशी संपर्क साधू शकतात.

  • NDHM कस्टमर केअर टोल फ्री नंबर- 1800-11-4477/14477
  • NDHM कस्टमर केअर मेल पत्ता- [email protected]

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!