SBI Bank

SBI बँकेत दुसऱ्या बँकेचा चेक जमा करणे | How to Deposit Cheque in SBI Bank

नमस्कार मित्रांनो, आज आपण एका बँकेचा चेक दुसऱ्या बँकेत जमा कसा करावा? किंवा इतर बँकेचे जसे की HDFC, PNB, Bank of Baroda, Axis, बँक ऑफ इंडिया वगैरे बँकेचे चेक एसबीआय मध्ये कसे जमा करावे, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

SBI Banket Dusarya Bankecha Cheque Deposite Karne Mahiti

मित्रांनो, पूर्वी पैश्यांची देवाणघेवाण कॅश स्वरूपात केली जात होती. पण आता जर आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील तर त्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे चेक. मित्रांनो, चेक हा जेवढा सोपा मार्ग आहे तेवढाच सुरक्षित पण आहे. कारण चेक ची संपूर्ण प्रक्रिया ही ऑफलाईन असते. त्यामुळे त्यात कोणताही धोका नसतो, तर दुसरीकडे ऑनलाइन पैसे पाठवताना काही वेळा व्यवहार पेंडिंगमध्ये जातो. त्यामुळे अनेकवेळा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात ही आजकाल बहुतेक करून नोकरीच्या ठिकाणी चेक ने पगार दिला जातो. आणि मग चेक वरची अमाउंट आपल्या खात्यात जमा करावी लागते.



आणि त्यासाठी आपल्या बँकेची जमा करण्याची स्लिप भरून मग ते पैसे खात्यावर जमा होतात. बऱ्याचदा दिलेला चेक हा दुसऱ्या बँकेचा असतो आणि जमा दुसऱ्या बँकेत करावा लागतो. त्यामुळे अनेक जण विचारात पडतात, की आता कस करायचं? पण मित्रांनो, एका बँकेचा चा चेक दुसऱ्या बँकेत जमा करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

SBI बँकेत दुसऱ्या बँकेचा चेक जमा कसा करावा?

एका बँकेचा चेक दुसऱ्या बँकेत जमा कसा करावा? हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला चेक ज्या बँकेत जमा करायचा आहे त्या बँकेची pay-slip/चेक डिपॉजिट स्लिप घ्यायची आहे. इथे उदाहरण म्हणून आपण hdfc बँकेचा चेक SBI बँकेत जमा करत आहोत. तर तुम्हाला एसबीआय ची पे -स्लिप घ्यायची आहे.

त्या नंतर पे स्लिप च्या डावी बाजू आधी भरून घ्यायची आहे. ज्यात पहिले तारीख टाकायची आहे. इथे तुम्ही ज्या दिवशी स्लिप बँकेत जमा करणार आहात ती तारीख टाकायची आहे. त्या नंतर तुमचे नाव टाकायचे आहे. इथे चेक वर जे नाव असेल तेच टाकायचे आहे.

SBI Bankechi Pay Slip Kashi Bharaychi Left Side

त्या नंतर खाली दिलेल्या मोठ्या बॉक्स मध्ये तुम्हाला अकाउंट नंबर लिहायचा आहे. त्या नंतर Details of cash deposit या कॉलम मध्ये तुम्हाला चेक चा नंबर लिहायचा आहे. मित्रांनो, चेक नंबर हा चेक च्या खालच्या बाजूला दिलेला असतो, आणि तो सहा अंकी असतो.



HDFC Sample Cheque

तसेच दुसऱ्या कॉलम मध्ये अमाउंट लिहायची आहे. म्हणजे जितक्या रुपयाचा चेक आहे, तितकी अमाउंट टाकायची आहे. व नंतर रिकाम्या जागी एक आडवी रेष मारून नंतर खाली Total ऑप्शन मध्ये परत तीच अमाउंट लिहायची आहे. नंतर खाली तीच अमाउंट, वर्ड मध्ये म्हणजे शब्दांत लिहायची आहे.

स्टेप 2: आता पे स्लिप ची उजवी बाजू भरायची आहे. ज्यात सर्वात पहिले ज्या दिवशी तुम्ही ही स्लिप बँकेत भरणार आहात त्या दिवसाची तारीख टाकायची आहे. त्यानंतर जिथे तुम्ही खाते उघडले आहे त्याचे branch name लिहायचे आहे. त्यानंतर चेक वर लिहील्याप्रमाणे तुमचे पूर्ण नाव लिहायचे आहे. त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे.

SBI Bankechi Pay Slip Kashi Bharaychi Right Side

त्या नंतर जर तुमच्या कडे फोन नंबर असेल तर तो खाली दिलेल्या जागी ताजयचा आहे. आता या नंतर खाली Drawn on Bank कॉलम मध्ये ज्या बँकेचा चेक आहे त्या बँकेचे नाव टाकायचे आहे. इथे hdfc बँकेचा चेक आहे म्हणून आपण स्लिप मध्ये hdfc बँकेचे नाव टाकायचे आहे. त्या नंतर branch name, आणि त्या नंतर परत सहा अंकी चेक नंबर लिहायचा आहे.

आता या नंतर खाली चेक मध्ये लिहिलेली अमाउंट शब्दात लिहायची आहे. व त्या खालीच तुम्हाला तुमचा आधार नंबर व मोबाईल नंबर लिहायचा आहे. मित्रांनो, आता बाजूला तुम्हाला लिहिलेले दिसेल की जर तुम्ही 49 हजार पेक्षा जास्त रक्कम जमा करत असाल तर तुम्हाला तुमचा पॅन देणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला फजत वीस हजार रुपये जमा करायचे आहेत. तर अश्या वेळी तुम्हाला पॅन देणं आवश्यक नाही.

मित्रांनो, सर्वात शेवटी Signature of depositor म्हणजे पैसे जमा करणाऱ्याची म्हणजे तुमची सही करायची आहे.

चेक वटवायला किती वेळ लागतो?

मित्रांनो, जर तुम्ही त्याच बँकेत चेक वटवला तर तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला कामकाजाचे एक -दोन दिवस लागू शकतात. आणि जर दुसऱ्या बँकेत चेक वटवायचा असेल तर तीन ते सहा दिवस लागू शकतात. यात सुटीचे दिवस वगळा.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण एका बँकेचा चेक दुसऱ्या बँकेत जमा कसा करावा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

Tags: How to Deposite Cheque in SBI in Marathi, SBI Madhe Cheque Deposite Kasa Karaycha, SBI Banket Cheque Deposite Mahiti, HDFC bankecha cheque SBI Madhe Deposite Kasa karaycha, How to Deposite HDFC Bank Cheque into SBI in Marathi, Any Bank Cheque Deposite in SBI, how to deposit cheque in SBI, SBI Cheque Form Kara Bharaycha, How to Fill SBI Cheque Form in Marathi, SBI Cheque Deposite Marathi, Sbi Cheque Jama Kasa Karaycha, SBI Banket Cheque Jama Karne

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!