आरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

दही खाण्याचे फायदे-तोटे व दही सोबत कोण कोणते पदार्थ खाऊ नये?

नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही नवीन व उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण दह्या चे फायदे, तोटे तसेच दह्या सोबत कोण कोणते पदार्थ खाऊ नये ? त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, या बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, दही हे आपल्याकडे सर्वात जास्त वापरले जाणारे व आवडीने खाल्ला जाणारा एक अन्न पदार्थ आहे. जेवणात दही चा वापर केल्यास अन्नाची चव वाढते, पण दही फक्त अन्नाची चव च वाढवत नाही तर आपल्या शरीरास आवश्यक असलेली अनेक पोषक द्रव्ये देखील देते.



दही खाल्ल्याने पोटाला आणि शरीराला थंडावा मिळत असतो. दह्या मध्ये असणारे बॅक्टेरिया हे आपल्या केसांना व त्वचेला निरोगी बनवतात. तसेच दही मध्ये कॅल्शियम असल्याने ते आपल्या हाडांना, दातांना, नखांना मजबूत बनवण्याचे काम करते. तसेच दह्या च्या नियमित सेवनाने आपल्या मांसपेशी चांगल्या पद्धतीने काम करतात. हे इतके सगळे गुणधर्म असूनही दही खाताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. काही पदार्थ असे असतात ज्यांच्या सोबत दही खाऊ नये. अन्यथा आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, असे कोणते पदार्थ आहेत ज्यांच्या सोबत दही खाऊ नये हे आपण जाणून घेऊ या. पण त्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. त्या आधी आपण दही खाण्याचे फायदे व तोटे काय आहेत ते जाणून घेऊ या…

Dahi Sobat He Padarth Khau Naye

दह्या सोबत कोण कोणते पदार्थ खाऊ नये?

Never eat these food with curd

केळी

मित्रांनो, बऱ्याच जणांना दही आणि केळी एकत्र खायला आवडते. पण असे केल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते किंवा शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात तसेच शरीरात जळजळ होण्यासारखे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे केळी आणि दही एकत्र खाऊ नये.

आंबा

मित्रांनो, आंबा आणि दही हे दोन्ही पदार्थ विरोधी आहेत. म्हणजेच आंबा हा गरम पदार्थ आहे तर दही थंड पदार्थ आहे. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्यास मनाई आहे. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास ऍलर्जी, अपचन, त्वचेवर पुरळ उठणे वगैरे सारखे समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आंबा आणि दही एकत्र खाऊ नये.

Dahi Sobat Amba Khau Naye

उडदाची डाळ

मित्रांनो, उडदाच्या डाळीच्या पदार्थांसोबत अनेक जण दही खातांना दिसतात. ते जरी चविष्ट लागत असले तरीही उडदाची डाळ आणि दही एकत्र खाल्ल्याने त्याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच तुम्हाला जर गॅस होण्याचा प्रॉब्लेम असेल तर उडीद डाळ आणि दही एकत्र खाऊ नका. कारण असे खाल्ल्यास गॅस ची समस्या गंभीर होऊन पचनक्रिया बिघडू शकते. त्यामुळे यापुढे उडदाची डाळ आणि दही एकत्र खाण्या आधी काळजी पूर्वक विचार करा. आणि असे खाणे टाळा.



मासे

मित्रांनो, मासे आणि दही एकत्र खाणे निषिद्ध मानले जाते. तुम्ही जर मासे आणि दही एकत्र खत असाल तर मात्र तुमच्या शरीराला अनेक समस्या सहन कराव्या लागतील. सर्वात महत्वाचे म्हणजे असे खाल्ल्यास पचन तर बिघडतेच पण त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे हे दोन पदार्थ एकत्र कधीही खाऊ नये.

Dahi Sobat Mashe Khau Naye

तळलेले पदार्थ

मित्रांनो तळलेले पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. अनेक जणांना तळलेल्या पदार्थां सोबत दही खायला आवडते. पण असे खाल्ल्यास तुम्हला अपचन, गॅस, पोटाचे विकार, छातीत जळजळ, अश्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पचन क्रियेत बिघाड होऊ द्यायचा नसेल तर तळलेले पदार्थ आणि दही एकत्र खाणे टाळावे.

कांदा

मित्रांनो कांदा आणि दही हे दोन्ही पदार्थ कोशिंबीर मध्ये एकत्र वापरले जातात. ते चवीला ही अगदी छान लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का कांदा आणि दही हे दोन्ही पदार्थ एकमेकांचे विरोधी पदार्थ आहेत. म्हणजेच कांदा हा आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतो तर दही हा थंड पदार्थ आहे. या दोघांच्या एकत्र सेवनाने त्वचे वर पुरळ येऊ शकते किमवा एक्झिमा, सोरायसिस अश्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दही आणि कांदा एकत्र सेवन करणे ताबडतोब थांबवावे.

दूध

मित्रांनो, दूध आणि दही हे दोन्ही पदार्थ जरी एकाच कॅटेगरी मधील असले तरीही त्यांना एकत्र कधी खाऊ नये. यामुळे ऍसिडिटी, अतिसार, अश्या समस्या उद्भवू शकतात.

Never eat these food with curd in Marathi

मित्रांनो, इथे अजून एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे वर सांगितल्या प्रमाणे तुम्ही जर वरील पदार्थ दह्या सोबत खाल्ले तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण अनेक लोक असे आहेत जे दह्या सोबत वरील सर्व पदार्थ नेहमी खात आले आहेत. पण तरीही त्यांना आत्ता पर्यंत काहीच त्रास झाला नाही. मित्रांनो, खरंतर प्रत्येकाच्या राहणीमान व पचनशक्ती वर ही गोष्ट अवलंबून असते. जसे की काही वेळा आपण प्रवास करतो तेव्हा प्रवासा दरम्यान एखादया गावचे पाणी आपण पिले तर आपल्याला त्रास होतो, पोट दुखतं किंवा आजारी पडतो. पण तेच पाणी त्या गावचे लोक नेहमीच पितात त्यांना त्याचा त्रास होत नाही. याचे कारण म्हणजे त्यांचे राहणीमान, त्यांची पचनशक्ती व त्यांना त्या पाण्याची झालेली सवय. त्याच प्रमाणे काही लोकांना दह्या सोबत कोणतेही पदार्थ खाल्ले तरी त्रास होत नाही. तर काहींना लगेच त्रास होतो. याचे कारण म्हणजे त्याची पचनशक्ती, राहणीमान व त्यांना नसलेली सवय.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण दह्या सोबत कोण कोणते पदार्थ खाऊ नये त्या बद्दल जाणून घेतले. तुम्हाला ही जर दह्या सोबत वरील पदार्थ खाण्याची सवय असेल तर ती सवय आजच थांबवा. कारण चव आणि आवड या पेक्षा तब्येत जास्त महत्वाची आहे.

दही कोणी खाऊ नये?

मित्रांनो, ज्या लोकांना दूध व दुधाच्या पदार्थांची ऍलर्जी आहे अश्या लोकांनी दही खाऊ नये. तसेच ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे त्यांनीही दह्याचे सेवन करणे टाळावे. तुम्हाला जर सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तरी देखील दही खाऊ नये.

दही कधी खावे व कधी खाऊ नये?

मित्रांनो, दह्याचे फायदे अनेक आहेत पण हे फायदे तेव्हाच होतील जेव्हा तुम्ही दही योग्य वेळी खाल. कारण चुकीच्या वेळी दही खाल्ल्याने शरीराला हानी होऊ शकते. आयुर्वेदानुसार रात्रीच्या वेळी दही खाऊ नये. कारण रात्री दहा खाल्याने पचन संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच पावसाळ्याच्या दिवसांत ही दही खाणे कटाक्षाने टाळावे. तसेच दही गरम करून खाउ नये व दररोज दह्याचे सेवन करू नये. खाण्या करीता नेहमी ताजे घरी तयार केलेले व योग्य विरजलेले दही खावे. व शक्यतो दुपारच्या वेळेस दही खावे.

दही खाण्याचे फायदे

Health Benefits of Curd or Dahi

आता आपण दही खाण्याचे फायदे काय असतात हे सविस्तर बघुयात.

  • मित्रांनो, दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दही आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. दह्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे दही खाल्याने आपल्या हाडांचे व दातांचे आरोग्य चांगले राहते. तसेच ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडे ठिसुळ होण्याचा धोका ही कमी होतो. त्यामुळे दही खाणे चांगले मानले जाते.
  • मित्रांनो, तोंडाला चव नसेल किंवा इतर काहीही खाण्याची इच्छा होत नसेल तर दही खावे, त्यामुळे तोंडाला चव येते.
  • दह्यात प्रोबायोटिक्स नावाचे घटक असतात त्यामुळे दही खाल्याने पचन संबंधित सर्व क्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते.
  • याशिवाय दही खाल्याने पोटफुगी, अतिसार, बद्धकोष्ठता यांसारखे आजार किंवा समस्या होत नाहीत.
  • मित्रांनो, दह्यात विविध घटकांसोबतच विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनरल्स सुद्धा खूप असतात. जे आपली इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
  • या शिवाय दह्यात सॅच्युरेटेड फॅट्स चे प्रमाण अधिक असते. असे जरी असले तरी ही दही खाल्ल्याने शरीरातील म्हणजेच रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. व रक्तदाब नियंत्रणात राहतो असे संशोधन मष्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळे दही खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते.
  • मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल पण दह्या मध्ये प्रोटिन्स चे प्रमाण ही अधिक आहे. त्यामुळे दही खाल्याने पोट भरल्या सारखे वाटते. लवकर भूक लागत नाही. व पर्यायाने वजनही आटोक्यात राहते.
  • मित्रांनो, दहीचा आणखीन एक फायदा म्हणजे तुम्ही दह्याचा समावेश गर्भवती महिलांच्या आहारात ही करू शकता. कारण प्रेग्नन्सी मध्ये हिमोग्लोबिन नियंत्रणात ठेवण्याचे ही काम ही दही करते.
  • मित्रांनो, तुम्हाला खूप थकवा आला असेल तर दही खा. दही खाल्ल्याने तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते. व सर्व थकवा निघून जातो.
  • तसेच दही आणि साखर खाल्ल्याने काम शक्ती वाढते. व नपुंसकत्व कमी होते.
  • याशिवाय दह्याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते व डायबिटीझ होण्याचा धोका कमी होतो.
  • मित्रांनो, दह्या मध्ये लॅक्टो बॅक्टेरिया सारखे पोषक जिवाणू असल्याने ते आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. दही खाल्याने आतड्यांचा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते.
  • मित्रांनो, दह्याचा अजून एक फायदा म्हणजे चेहरा व त्वचा उजळण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. लिंबू रस व दही एकत्र करून लावल्यास त्वचेवरील व चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या हळूहळू कमी होतात. तसेच गुलाब पाणी व हळद यासोबत दही लावल्याने यवाचा उजळते व मुलायम होते.
  • तसेच केसांच्या आरोग्यासाठी ही दही खूप उपयोगी आहे. 20 ते 25 मिनिटे केसांना दही लावून ठेवल्यास व नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुतल्यास केस मऊ होतात व कोंडाही निघून जातो. तसेच केस गळती कमी होते.

दही खाण्याचे तोटे

मित्रांनो, दही खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच जास्त प्रमाणात दही खाल्ले तर त्याचे नुकसान ही शरिराला भोगावे लागतील. अति प्रमाणात दही खाल्याने शरीरास हानी होऊ शकते. तुम्ही जर दह्याचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर आहारातील लोह आणि जस्त हे मिनरल्स शरीरात शोषुन घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जास्त प्रमाणात दही खाणे टाळावे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण दह्या सोबत कोण कोणते पदार्थ खाऊ नये, दह्याचे फायदे तोटे काय असतात त्या बद्दल जाणून घेतले. तुम्हाला आमचा हा लेख व ही माहिती आवडली असल्यास किंवा महत्व पूर्ण वाटली असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!