Student ABC IDStudents

विद्यार्थ्यांसाठी ABC ID ऑनलाइन काढा 2 मिनिटात | How to Create Student ABC ID

मित्रांनो, तुम्ही जर कॉलेज विद्यार्थी असाल तर आजचा हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज या लेखात आपण ABC आयडी बद्दल माहिती बघणार आहोत. तुम्ही जर तुमचे ABC आयडी काढले असेल तर चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही अजून ही तुमचे ABC आयडी काढले नसेल किंवा जर तुम्हाला या बद्दल काहीच माहीत नसेल तर काळजी करू नका, ABC ID बद्दल पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.

How to Create Student ABC ID in Marathi

ABC म्हणजे नेमकं काय?

मित्रांनो, ABC म्हणजे Academic Bank of Credits. तुम्हाला माहीत असेल नवीन शैक्षणिक धोरण सुरू होऊन एक वर्ष होऊन गेले. त्याच्या पार्श्वभूमी वर केंद्र सरकारने आता Academic Bank of Credits म्हणजेच ABC ची सुरुवात केली आहे. अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स हे वर्क व्हर्च्युअल स्टोअर हाऊस आहे. जिथे कॉलेज मध्ये जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक डेटा स्टोअर केला जाणार आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांना व विद्यार्थ्यांना अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स या योजनेत आपली नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक विद्यापीठाचा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक डेटा इथे सेव्ह होणार आहे. या शिवाय जर एखाद्या विद्यार्थ्याला काही कारणास्तव त्याचा अभ्यासक्रम मधेच सोडावा लागला तर आता त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाहीये. तर त्या विद्यार्थ्यला कालावधी नुसार प्रमाणपत्र, डिप्लोमा, किंवा डिग्री म्हणजेच पदवी दिली जाणार आहे. त्यात प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर Certificate (प्रमाणपत्र), द्वितीय वर्ष उत्तीर्ण झाल्यावर डिप्लोमा आणि तीन वर्षे किंवा अभ्यासक्रम पूर्ण केल्या वर डिग्री म्हणजेच पदवी दिली जाणार आहे.



अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स म्हणजेच ABC योजना ही ‘डिजिलॉकर’ प्रणाली अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. यात विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक खाते सुरू करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या संस्थेची ABC वर नोंदणी असणे आवश्यक आहे. एकदा विद्यार्थ्यांनी आपली माहिती ABC वर अपलोड केल्यावर त्यांची पदवी पूर्ण होई पर्यंतची सर्व माहिती या डिजीलॉकर मध्ये सेव्ह राहणार आहे. एवढेच नाही तर विविध सरकारी व खाजगी कँपन्या उमेदवारांची निवड करताना त्या त्या विद्यार्थ्याच्या परवानगीनेच ABC चा ऍक्सेस मिळवून त्या विद्यार्थ्याच्या गुणांची माहिती पडताळून पाहू शकणार आहेत. यासाठी ABC चा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने सर्व संस्थांनी व विद्यार्थ्यांनी तातडीने आपली नोंदणी एबीसी वर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ABC ID ऑनलाइन तयार करणे

चला तर मग ABC वर नोंदणी कशी करायची ते बघू या

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला सरकारच्या abc.gov.in या वेबसाईट वर यायचे आहे. त्या नंतर उजव्या बाजूला वरती Log in चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला Student आणि University चा ऑप्शन दिसेल, त्यातील Student हा ऑप्शन निवडायचा आहे.

How to Create Student ABC ID Step 1

स्टेप 2: नेक्स्ट पेज वर तुम्हाला DigiLocker ऑप्शन दिसेल. इथे जर तुमचं डिजिलॉकरच अकाउंट असेल तर डायरेक्ट युझरनेम व पिन टाकून Sign in करायचे आहे. पण जर तुमचे DigiLocker वर अकाउंट नसेल तर खाली तुम्हाला Sign Up for Meri Pehchaan वर क्लिक करायचे आहे.

How to Create Student ABC ID Step 2

स्टेप 3: त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला आता DigiLocker चे अकाउंट उघडायचे आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व खाली दिलेल्या Generate OTP या बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर थोड्याच वेळात लगेच तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला दिलेल्या बॉक्स मध्ये टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.



व्हेरिफाय केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आधार कार्ड प्रमाणेच तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे. त्या नंतर तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजेच जन्म तारीख टाकायची आहे. मित्रांनो इथे तुमची जन्म तारीख सुद्धा तुम्हाला आधार कार्ड मध्ये लिहिल्या प्रमाणेच टाकायची आहे. त्या नंतर तुमचे Gender सिलेक्ट करायचे आहे. व नंतर एक युझरनेम क्रिएट करायचा आहे. त्या नंतर सहा डिजिटचा पिन तयार करून टाकायचा आहे. नंतर Confirm पिन मध्ये ही तोच Pin टाकायचा आहे. त्या नंतर खाली दिलेल्या बॉक्स मध्ये टिक करून Submit बटन वर क्लिक करायचे आहे. व या नंतर तुमचे डिजिलॉकर चे अकाउंट उघडून जाईल.

How to Create Student ABC ID Step 3

स्टेप 4: मित्रांनो, आता तुम्हला Verify your account with Aadhar या ऑप्शन मध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. व Continue बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या आधार ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी दिलेल्या जागी टाकायचा आहे व Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

How to Create Student ABC ID Step 4

त्या नंतर तुमच्या समोर ABC student account created असा मेसेज लिहिलेला दिसेल. व खाली तुम्हाला ABC ID पण दिलेला असेल त्याचा स्क्रीन शॉट काढून ठेवा. अश्या प्रकारे तुमचे ABC आयडी तयार होऊन जाईल.

How to Create Student ABC ID Step 5

मित्रांनो, तुमचे प्रोफाइल व्हेरिफिकेशन होत नसेल तर तुमचे आधार अपडेट करून घ्या. आणि तुमच्या नावाचे स्पेल्लिंग आणि जन्म तारीख तपासून घ्या.

ABC मध्ये कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे?

मित्रांनो, एबीसी मध्ये युजीसी मान्यताप्राप्त उच्च संस्थे सोबतच, अभियांत्रिकी, वैद्यकीय, डेंटल, कायदा, आणि इतर ही व्यावसायिक अभ्यासक्रमांचा यात समावेश असणार आहे. तसेच जर तुम्ही मध्येस अभ्यासक्रम सोडला आणि जर तुम्हाला परत प्रवेश घ्यायचा असेल तर आता काळजी नाही. कारण एबीसी ही योजना नवीन शैक्षणिक धोरण अधिक लवचिक बनवण्यासाठी आणली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी त्याच्या मनानुसार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. या शिवाय कोणत्याही संस्थेचा विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. फक्त त्यासाठी त्या संस्थेची एबीसी मध्ये नोंदणी असणे अनिवार्य आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ABC ID कसा काढायचा या बद्दल सविस्तर पणे जाणून घेतले. आशा करतो या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तसेच हा लेख आवडला असल्यास व महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद

Tags: Student ABC ID Mean, ABC ID Meaning in Marathi, What is ABC ID, ABC ID Fayde, ABC ID Upyog kay ahe, ABC ID ka kadhave, ABC ID Koni Kadhave, ABC ID Card Mhanje Kay, Vidhyrthi ABC ID Mhanje kay, Vidyrthi ABC ID Card info in Marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!