CheQ अँप संपूर्ण माहिती: क्रेडिट कार्ड बिल पेमेंट कसे करायचे, कॅशबॅक, चार्जेस
- CheQ अँप म्हणजे नेमकं काय
- CheQ अँप मध्ये अकाउंट तयार कसे करायचे
- CheQ अँप मधून क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट कसे करायचे
नमस्कार मित्रांनो आज आपण CheQ क्रेडिट कार्ड बिल पेमेंट अँप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण CheQ अँप म्हणजे नेमकं काय आहे, ते कसे काम करते, अँप मध्ये अकाउंट ओपन करून क्रेडिट कार्ड बिल पेमेंट कसे करायचे, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, मागील काही वर्षांत भारतात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत खूप वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे, क्रेडिट कार्ड द्वारे दिले जाणारे अनेक ऑफर्स आणि फायदे. मित्रांनो, क्रेडिट मार्केट जसजसे वाढत गेले, तसतसे प्रत्येक व्यक्ती एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डे बाळगू लागली, पण यामुळे एक नवीनच आणि वेगळी समस्या निर्माण झाली ती म्हणजे या सर्व क्रेडिट कार्डांची बिलिंग सायकल मॅनेज करणे. हो मित्रांनो, लोकं क्रेडिट कार्ड तर वापरतात पण त्यांचे बिलिंग मॅनेज करणे किंवा वेळेवर भरणे प्रत्येकालाच नाही जमत. त्यातल्या त्यात मार्केट मध्ये अनेक बिल पेमेंट अँप्स आहेत. त्यातच आता तुमची क्रेडिट कार्ड बिलं भरण्यासाठी CheQ नावाचा एक नवीन अँप मार्केट आले आहे. हो मित्रांनो, CheQ अँप हे एक क्रेडिट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म आहे ज्या द्वारे तुम्ही तुमची सर्व क्रेडिट कार्ड बिलं एकाच ठिकाणी भरू शकता. तसेच CheQ चिप्स च्या रुपर प्रत्येक व्यवहारांवर तुम्हाला 1% रिवॉर्ड पॉईंट्स दिली जातात. जे तुम्ही ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्वीगी वगैरे प्लॅटफॉर्म वरून रिडिम करू शकता. तसेच पैशा मध्ये हि कन्व्हर्ट करू शकता. या CheQ अँप बद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणारच आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा
सर्वात पहिले CheQ अँप म्हणजे नेमकं काय आहे, त्याबद्दल जाणून घेऊ या
CheQ अँप म्हणजे नेमकं काय
मित्रांनो, CheQ हे एक नवीन क्रेडिट कार्ड बिल पेमेंट अँप आहे. यात तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड बिल पेमेंट वर 1% कॅशबॅक मिळते. म्हणजे ज्या प्रकारे CRED अँप वर प्रत्येक क्रेडिट बिल पेमेंट वर कॅशबॅक मिळतो तसेच CheQ अँप मध्ये ही तुमच्या प्रत्येक क्रेडिट कार्ड बिल पेमेंट वर तुम्हाला कॅशबॅक दिला जातो. मित्रांनो, हे अँप आत्ताच 14 फेब्रुवारी ला लाँच करण्यात आले आहे. आणि महत्वाचे म्हणजे आपण इतर क्रेडिट बिल पेमेंट अँपचे प्रतिस्पर्धी म्हणून CheQ अँप ला नक्कीच पाहू शकतो. तसेच तुम्ही तुमची सर्व क्रेडिट थकबाकी अँप मध्ये पाहू शकतात, यामध्ये EMI, BNPL आणि क्रेडिट कार्ड बिल या सर्वांचा समावेश होतो.
आता CheQ अँप मध्ये अकाउंट तयार कसे करायचे त्या बद्दल जाणून घेऊ या:
CheQ अँप मध्ये अकाउंट तयार कसे करायचे
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तूम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये CheQ अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे.
CheQ अँप डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक => CheQ अँप गुगल प्ले स्टोर
स्टेप 2: त्या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. मित्रांनो, इथे तुम्हाला तो मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमच्या क्रेड कार्ड ला रेजिस्टर असेल. तर मोबाईल नंबर टाकल्या नंतर Get OTP या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: आता तुम्हाला SMS साठी परमिशन मगितली जाईल. तर त्याला allow करायचे आहे. व नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.
स्टेप 4: त्या नंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड नुसार तुमचे नाव टाकून नंतर ई-मेल आयडी टाकायचा आहे. व नंतर Confirm बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: आता तुमच्या क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन ला Fetch केलं जाईल.
स्टेप 6: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचे नाव दिसेल, त्या नंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्याचा ऑप्शन दिसेल. तसेच त्या खाली तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर ही दाखविला जाईल जो experian ब्युरो तर्फे शो केला जातो. मित्रांनो, तुमच्या मोबाईल नंबर शी जितके पण क्रेडिट कार्ड रेजिस्टर असतील ते सर्व क्रेडिट कार्ड्स तुम्हाला इथे बघायला मिळतील.
स्टेप 7: आता तुम्हाला खाली Explore CheQ या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 8: आता तुम्ही अप्पच्या मेन डॅशबोर्ड वर याल. इथे तुम्हाला तुमची ड्यु अमाउंट दिसणार नाही. कारण त्या आधी तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड व्हेरिफाय करावे लागेल. त्या नंतर जेव्हा तुमचे स्टेटमेंट जनरेट होईल तेव्हा तुम्हाला तुमची ड्यु अमाउंट बघायला मिळेल.
आता CheQ अँप द्वारे क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट कसे करायचे ते जाणून घेऊ या:
CheQ अँप मधून क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट कसे करायचे
स्टेप 1: मित्रांनो, अँप च्या डॅशबोर्ड वर तुम्हाला Pay now चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे.
स्टेप 2: त्या नंतर तुमचा क्रेडिट कार्ड नंबर टाकून Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: त्या नंतर क्रेडिट कार्ड चे एक्सपायरी मंथ व इयर टाकायचे आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड चा CVV नंबर टाकायचा आहे. व नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: मित्रांनो, नेक्स्ट पेज वर तुम्हाला जितक्या अमाउंटचे बिल पे करायचे आहे ती अमाउंट टाकायची आहे.
(मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही इथे छोटी अमाउंट म्हणजे रू 100 किंवा रू 200 टाकून बघावी जेणेकरून तुम्हाला कळेल की ती अमाउंट किती वेळात रिसिव्ह होते. समजा, तुम्ही रू 200 चे बिल पेमेंट केले तर 1% च्या हिशोबाने तुम्हाला 2 पॉईंट्स म्हणजेच दोन cheq chips मिळतील. तसेच रू 2000 वर तुम्हाला 20 पॉईंर्स मिळतील, रू 20,000 वर तुम्हाला 200 पॉईंट्स मिळतील. आणि जर रू 2 लाख पे केले तर तुम्हाला 2000 पॉईंट्स मिळतील. मित्रांनो, इथे तुम्ही कमीत कमी 100 रुपये तर जास्तीत जास्त रू 10 लाख पर्यंत क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करू शकता. तसेच दर महिन्याला तुम्ही 4000 पर्यंत पॉईंट्स earn करू शकता.
मित्रांनो, इथे 1 पॉईंट ची किंमत ही वेग-वेगळी असू शकते. जर तुम्ही तुमचे पॉईंट्स ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, किंवा स्वीगी च्या गिफ्ट वाउचर मध्ये कन्व्हर्ट केले तर तुम्हाला 1 पॉईंट्स ची किंमत रू 1 मिळेल. आणि जर तुम्ही तुमचे पॉईंट्स डायरेक्ट कॅश मध्ये कन्व्हर्ट करणार असाल तर 4 पॉईंट्स ची किंमत ही रू 1 च्या बरोबर असेल.)
तर मित्रांनो, आता तुम्हाला जितक्या अमाउंट चे बिल पेमेंट करायचे आहे ती अमाउंट टाकून नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 6: आता तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड व्हेरिफाय करायचे आहे त्यासाठी तुमच्या अकाउंट मधून 2 रुपये कट जेल जाईल. पण ते तुम्हाला नंतर रिफंड ही केले जातात. तर आता तुम्हाला खाली दिलेल्या Verify My Card या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 7: मित्रांनो, आता तुमच्या क्रेडिट कार्ड ला रेजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल. तो दिलेल्या जागी टाकायचा आहे. व नंतर Confirm बटन वर क्लिक जरायचे आहे.
स्टेप 8: आता तुमच्या कार्ड मधून 2 रुपये कट केले जातील व तुमचे कार्ड सक्सेसफुली व्हेरिफाय होऊन जाईल. व तुमचे क्रेडिट कार्ड अँप वर ऍड होऊन जाईल.
आता पुढच्या वेळेस पासून तुम्हाला डायरेक्ट तुमची ड्यु अमाउंट बघून पेमेंट करता येईल. व त्यानुसार तुम्हाला 1% प्रमाणे कॅशबॅक दिले जाईल.
मित्रांनो, इथे आपण 200 रुपये चे बिल पेमेंट करत आहोत तर त्यासाठी Pay now वर क्लिक केल्या नंतर तुम्ही पेमेंट च्या पेज वर याल. इथे तुम्हाला पेमेंट मेथड सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट कश्याने पे करणार आहात, gpay, paytm नेट बँकिंग,किंवा डेबिट कार्ड.ते सिलेक्ट करायचे आहे. समजा जर तुम्ही paytm द्वारे बिल पेमेंट करणार असाल तर त्याला सिलेक्ट केक्यावर तुम्हाला पेमेंट ची समरी दिसेल. ती चेक करून Pay now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व तुम्ही डायरेक्ट पेटीएम अँप वर जाल. इथे तुम्ही तुमचा यूपीआई पिन टाकून तुमचे ट्रांझक्षण पूर्ण करून घ्यायचे आहे. व तुमचे क्रेडिट कार्ड चे बिल सक्सेसफुली पे होऊन जाईल.
मित्रांनो, तुमचे अमाउंट तूमच्या अकाउंट वर 2 दिवसात रिफ्लेक्ट होऊन जाईल. पण जास्त करून काही मिनिटांतच तुमची अमाउंट तुमच्या अकाउंट वर रिफॆक्ट होऊन जाते. इतर अँप द्वारे पेमेंट केल्यास त्या अमाउंट ला रिफ्लेक्ट होण्यास दोन ते तीन दिवस लागतात. पण cheQ अँप मध्ये या साठी फक्त काही मिनिटं लागतात. हे या अँप चे खास वैशिष्ट्य आहे.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड चे बिल या cheQ अँप द्वारे पे करू शकता.
आता Pay Together ऑप्शन बद्दल जाणून घेऊ या:
मित्रांनो, cheQ अँप चे खास वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये तुम्हाला pay together चा ऑप्शन मिळतो. Pay Together म्हणजे तुम्ही तुमचे सर्व बिलं मग ते क्रेडिट कार्ड असो किंवा कोणतेही लोन असो सर्व प्रकारचे बिल चे पेमेंट तुम्ही एकाच ठिकाणी एकसाथ करू शकता.
FAQ
CheQ अँप सुरक्षित आहे का?
हो मित्रांनो, CheQ अँप त्याच्या वापरकर्त्यांसाठी अत्यंत सुरक्षित पेमेंट अनुभव देते. त्यासाठी अँप वापरकर्त्याचा सर्व व्यवहार आणि डेटा एन्क्रिप्ट करते. तसेच CheQ अँप हे PCI, DSS लेव्हल 1 चे पालन करते आणि RBI च्या मार्गदर्शक तत्त्वां नुसार क्रेडिट कार्ड माहिती साठवते.
मिळालेले चिप्स किंवा पॉईंट्स कालबाह्य होतात का?
हो मित्रांनो, तुम्हाला पेमेंट केल्यावर जे चिप्स मिळतात त्यांची एक लिमिटेशन असते. एक वर्षात तुम्हाला हे चिप्स युझ करावे लागतात नाहीतर ते एक्सपायर होऊन जातात.
एका महिन्यात किती चिप्स earn करू शकतो?
मित्रांनो, एका महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त 4000 चिप्स किंवा पॉईंट्स कमवू शकता.
CheQ चिप्स म्हणजे काय आहेत?
मित्रांनो, CheQ चिप्स हे अँपचे एक प्रकारचे चलन आहे, जे CheQ वरील प्रत्येक पेमेंटसाठी बक्षीस म्हणून प्राप्त होते. हे cheQ चिप्स तुम्ही Amazon, Flipkart, Swiggy, Zomato इत्यादी ठिकाणी व्हाउचर साठी रिडिम करू शकता किंवा त्यांना कॅश मध्ये ही रूपांतरित करू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण CheQ अँप काय आहे, त्याद्वारे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट कसे करायचे या बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।