क्रेडिट कार्ड (Credit Card)

One Score अँप वरून क्रेडिट स्कोर चेक कसा करायचा (Free मध्ये)

नमस्कार मित्रांनो, आज आपण वन स्कोर (One Score) अँप वरून क्रेडिट स्कोर (Credit Score) चेक कसा करायचा या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण One score अँप काय आहे, त्यात क्रेडिट स्कोर चेक कसा करावा, CIBIL स्कोर आणि Experian स्कोर यात काय फरक आहे, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

One Score App Varun Credit Score Check Kasa Karaycha

मित्रांनो, कोणतेही कर्ज घेण्यासाठी किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक केला जातो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा क्रेडिट स्कोर खूप महत्वाचा आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर कोणतीही बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज देते. पण जर तुमचा क्रेडिट स्कोर कमी असेल तर बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यास नकार देईल. मित्रांनो, खरंतर आपला क्रेडिट स्कोर किती आहे हे जर आपल्याला आधीच माहीत असेल तर आपण तो वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहतो. पण बऱ्याच लोकांना आपला क्रेडिट स्कोर कुठे आणि कसा पाहायचा हे माहित नसते. पण काळजी करू नका या लेखात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.



मित्रांनो, एक अँप आहे जिथे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर अगदी विनामूल्य चेक करू शकता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे अँप अगदी सुरक्षित आहे आणि या अँप मध्ये कोणत्याही प्रकारच्या ऍड येत नाही, तसेच या अँप मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ई-मेल द्यावा लागतो. तो दिल्यावर सुद्धा अँप तुम्हाला कधीच संपर्क करून त्रास देत नाही. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे स्पॅम कॉल किंवा ई-मेल या अँप द्वारे येत नाहीत. आणि तुमचा डेटा ही अगदी सुरक्षित राहतो. या अँपचे नाव आहे ‘One Score’ अँप. हो मित्रांनो, या अँप द्वारे तुम्ही अगदी घर बसल्या तुमचा सिबील आणि एक्सपीरियन स्कोर चेक करू शकता आणि तेही अगदी विनामूल्य. One score अँप बद्दल आणि या अँप द्वारे क्रेडिट स्कोर किंवा सिबील स्कोर चेक कसा करायचा हे आपण पुढे बघणारच आहोत. त्यामुळे आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

सर्वात पहिले One Score अँप काय आहे ते जाणून घेऊ या

One Score अँप काय आहे?

मित्रांनो, OneScore अँप एक भारतीय अँप आहे. आणि त्याचे मुख्यालय पुणे येथे आहे. OneScore App हे जून 2019 ला गूगल प्ले स्टोअर वर लाँच करण्यात आले होते. या अँप द्वारे तुम्हाला लाइफ टाइम फ्री मध्ये सिबील स्कोर चेक करता येतो. तसेच या अँप वर तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर बद्दल संपूर्ण माहिती पहायला मिळते ज्यात तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट ही बघू शकता.

तसेच One Score अँप मध्ये क्रेडिट स्कोर चेक करण्या व्यतिरिक्त, तुम्हाला तुमचे सर्व क्रेडिट कार्ड अकाउंट एकाच ठिकाणी पाहण्याची सुविधा देखील मिळते. शिवाय तुम्हाला तुमच्या ड्यु देत सह रेमाईंडर (Reminder) देखील सेट करण्याचा ऑप्शन मिळतो. मित्रांनो, OneScore अँप चे रिमाइंडर वैशिष्ट्य तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्डचे बिल आणि EMI वेळेवर भरण्यास मदत करते. जेणेकरून तुमच्या क्रेडिट स्कोर वर वाईट परिणाम होणार नाही. याशिवाय, तुम्ही तुमची सर्व लोन अकाउंट चे डिटेल्स एकाच टॅब मध्ये बघू शकता. यासोबतच वन स्कोर अँप वर तुम्हाला क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स देखील मिळतात. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अँप मध्ये तुम्हाला CIBIL आणि Experian दोन्ही कंपनी चे क्रेडिट स्कोर बघायला मिळतात.

आता One Score अँप द्वारे क्रेडिट स्कोर चेक कसा करायचा त्या बद्दल जाणून घेऊ या:



One Score अँप मध्ये क्रेडिट स्कोर चेक कसा करायचा

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये One Score ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे. व ते ओपन करायचे आहे.

One Score App Varun Credit Score Check Kasa Karaycha Step 1

स्टेप 2: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Check My Score या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

One Score App Varun Credit Score Check Kasa Karaycha Step 2

स्टेप 3: आता तुम्हाला दिलेल्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. व नंतर Get OTP ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

One Score App Varun Credit Score Check Kasa Karaycha Step 3

स्टेप 4: तसेच पुढे तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी टाकून Done बटन वर क्लिक करायचे आहे.

तसेच तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर पण विचारला जाईल तो दिलेल्या जागी टाका.

स्टेप 5: आता थोड्याच वेळात तुम्हाला तुमचा स्कोर शो होईल. मित्रांनो, इथे तुम्हाला CIBIL आणि Experian दोन्ही कंपनी चा सिबील स्कोर दाखवला जाईल. मित्रांनो, तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणी सिबील स्कोर चेक करायला गेलात तर तिथे फक्त एकच स्कोर शो होतो. पण One Score या अँप मध्ये तुम्हाला दोन कंपनीचे स्कोर बघायला मिळतात. इथे तुम्हाला प्रश्न पडू शकतो की दोन्ही स्कोर मध्ये फरक कसा काय? तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादे लोन घेता तेव्हा एखादी कंपनी त्याला लवकर अपडेट करते तर दुसरी कंपनी उशिरा अपडेट करते. त्यामुळे हा फरक दिसून येतो. खाली आम्ही सविस्तर फरक सांगितला आहे.

One Score App Varun Credit Score Check Kasa Karaycha Step 5

स्टेप 6: मित्रांनो, त्या खालीच तुम्हाला Check Report चा ऑप्शन ही दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या सिबील चा पूर्ण अहवाल बघू शकता.

मित्रांनो, त्याच बरोबर सर्वात खाली My Account ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमच्या नावावर किती लोन अकाउंट आहेत, किती क्रेडिट कार्ड्स आहेत ते सर्व चेक करू शकता. तसेच ड्यु डेट च्या आधी तुम्हाला Reminder सेट करायचे असेल तर ते ही तुम्ही Set Reminder या ऑप्शन मध्ये जाऊन करू शकता.

One Score App Varun Credit Score Check Kasa Karaycha Step 5

तसेच My Loans या ऑप्शन मध्ये तुम्ही तुमच्या नावावर किती लोन चालू आहे. ते चेक करू शकता. Credit Cards या ऑप्शन मध्ये तुम्ही तुमच्या नावावर किती क्रेडिट कार्ड्स आहेत, किती क्लोज झाले आहेत ते बघू शकता.

Consumer loan चा ऑप्शन देखील मिळतो. त्यात ही तुमच्या नावावर एखादे लोन दाखवले जाऊ शकते.

शेवटी तुम्हाला One Card चा ऑप्शन दिला आहे. मित्रांनो, हे ऍप्लिकेशन One Card चेच आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे OneCard घ्यायचे असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. त्यात तुम्हाला बरेच बेनिफिट्स मिळतात. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला बनवण्यासाठी One Card चा वापर करू शकता.

One Card Credit Card mahiti

One Card क्रेडिट कार्ड

मित्रांनो जर तुमचा CIBIL कमी असेल तर One Score अँप तुम्हाला FD (फिक्स्ड डिपॉसिटी) च्या बदल्यात क्रेडिट कार्ड देते. अगदी 2000 रुपयांची FD करून तुम्ही क्रेडिट कार्ड मिळवू शकता. तर या तुम्ही हे क्रेडिट कार्ड घेतले आणि वेळेवर क्रेडिट कार्डचे पेमेंट केले तर तुमचा क्रेडिट स्कोर सुधारू शकतो. आणि नंतर बँकेतून रेगुलर क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला FD च्या बदल्यात क्रेडिट कार्ड पाहिजे असेल तर इथे क्लिक करून One Card अँप डाउनलोड करा.

One Card क्रेडिट कार्ड अर्ज करण्यासाठी लिंक => One Card क्रेडिट कार्ड

नोट: जेवढ्या रुपयांची तुम्ही FD कराल तेवढ्या रुपयांचे क्रेडिट कार्ड तुम्हाला मिळेल.

तसेच जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर OneScore अँप तुम्हाला क्रेडिट कार्ड पण देते. इथे क्लिक करून OneCard अँप डाउनलोड करा आणि 5 मिनिटात क्रेडिट कार्ड मिळवा.

One Card क्रेडिट कार्ड अर्ज करण्यासाठी लिंक => One Card क्रेडिट कार्ड

मित्रांनो तुमच्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये जर चुकीची एन्ट्री (जसे कि तुम्ही न घेतलेले लोन/क्रेडिट कार्ड, लोनच्या हप्त्यांची चुकीची माहिती…) झाली असेल तर लवकरात लवकर काढून टाकणे खुप महत्वाचे असते, असे केले नाही तर तुमच्या क्रेडिट स्कोर वरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो . त्यामुळे आम्ही सिबील आणि एक्सपीरियन रिपोर्ट मधून चुकीची लोन किंवा क्रेडिट कार्ड ची एन्ट्री रिमूव्ह कशी करायची ते खाली सांगितले आहे.

न घेतलेले क्रेडिट कार्ड/लोन अकाउंट सिबील मधून रिमूव्ह करणे

सिबील रिपोर्ट मधील चुकीच्या एन्ट्री रिमूव्ह करणे

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला जे लोन अकाउंट किंवा जे क्रेडिट कार्ड रिमूव्ह करायचे आहे त्याला सिलेक्ट करून क्लीक करायचे आहे.

स्टेप 2: आता नेक्स्ट पेज वर खाली तुम्हाला Report an error चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे.

Remove CIBIL Report Wrong Entry Step 1

स्टेप 3: लगेच एक ID जनरेट होऊन जाईल. त्या control number ला कॉपी करून घ्यायचे आहे. व नंतर Confirm बटन वर क्लिक करायचे आहे.

Remove CIBIL Report Wrong Entry Step 2

स्टेप 4: नेक्स्ट पेज वर आलेल्या इंटरफेस मध्ये तुम्हाला काही माहिती भरायची आहे जसे की तुमचे नाव, पत्ता, स्टेट, सिटी, पिनकोड वगैरे. व त्यातच तुम्हाला Control number ही विचारला जाईल. तर तुम्ही कॉपी केलेला कंट्रोल नंबर इथे टाकायचा आहे. तसेच तुम्हाला इथे एखादे आयडी कार्ड मागितले जाईल, जसे की वोटर आयडी वगैरे. तो आयडी सिलेक्ट करून त्याचा नंबर टाकायचा आहे व नंतर Submit ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व अश्या प्रकारे तुम्ही तुमची रिक्वेस्ट कंपनी ला सबमिट करू शकता.

मित्रांनो, आता My account या ऑप्शन मधून तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन चेक करू शकता. Enquiry ऑप्शन मधून तुम्ही तुमच्या इन्कवायरिझ चेक करू शकता. आणि जर इन्कवायरी रिमूव्ह करायची असेल तर ते ही इथून करू शकता.

एक्स्पेरियन रिपोर्ट मधील चुकीच्या एन्ट्री रिमूव्ह करणे

स्टेप 1: मित्रांनो, एक्स्पेरियन मध्ये गेल्यावर खाली तुम्हाला Report an error चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे. व नंतर तुम्हाला दोन्ही आयडी दिसतील. तर दोन्ही आयडी म्हणजे UDID व ETN नंबर दोनी कॉपी करून घ्यायचे आहे. व नंतर Continue ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 2: आता नेक्स्ट पेज वर दिलेल्या जागी दोन्ही कॉपी केलेले आयडी तुम्हाला टाकायचे आहेत. व submit बटन वर क्लिक क्रौचे आहे.

स्टेप 3: मित्रांनो, आता तुम्हाला तुमचे नाव (पॅन कार्ड नुसार) व तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे. त्या नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो टाकायचा आहे व शेवटी submit बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4: मित्रांनो, आता तुमच्या समोर सर्व लोन अकाउंट ओपन होतील व जे अकाउंट तुम्हाला रिमूव्ह करायचे आहे त्याला सिलेक्ट करा. व नंतर सिलेक्ट केलेल्या अकाउंट चे सर्व डिटेल्स टाकायचे आहे. जसे की अकाउंट स्टेटस, लोन अमाउंट, ईमआई अमाउंट वगैरे. व शेवटी सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे. त्या नंतर तुमचे अकाउंट रिमूव्ह होऊन जाईल.

CIBIL आणि Experian मध्ये काय फरक आहे?

मित्रांनो, भारतात चार प्रकारच्या क्रेडिट ब्युरो कंपन्या आहेत. त्यापैकी Experian आणि CIBIL या दोन क्रेडिट कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांनी भारतीय वित्तीय बाजारपेठेत आपले स्थान मिळवले आहे. तसेच दोन्ही कंपन्यां कडे क्रेडिट स्कोर मोजणी करणे आणि त्याची देखरेख करण्यासाठी वेगवेगळे अल्गोरिदम आहेत. परंतु त्यातल्या त्यात CIBIL चा क्रेडिट स्कोर साठी मोठ्या प्रमाणावर विचार केला जातो. कारण बहुतेक बँका व वित्तीय संस्था CIBIL शी जोडल्या गेल्या आहेत. या दोघांमधला अजून एक फरक म्हणजे एक्सपेरियन चा क्रेडिट स्कोर 330 ते 830 पर्यंत असतो. तर सिबील चा क्रेडिट स्कोर 300 ते 900 पर्यंत आहे. तसेच एक्स्पेरियन जगभरातील अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. तर सिबील फक्त भारतात वापरले जाते.

मित्रांनो, सिबील आणि एक्स्पेरियन दोन्ही मध्ये फरक तर आहे पण तरीही दोघांचे आपआपले फायदे आहेत. CIBIL भारतीय व्यवसायांसाठी अधिक योग्य आहे. तसेच देशांतर्गत छोट्या कंपन्यांसाठी किंवा संस्थांसाठी, CIBIL स्कोर अधिक स्वीकार्य आहेत, तर बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी, Experian हा एक चांगला पर्याय आहे. शेवटी काय तर, कोणताही स्कोर वापरला जात असला तरीही, क्रेडिट स्कोर नेहमी चांगला ठेवण्याचा सल्ला दिला जातो. व त्यासाठी प्रत्येकाने च प्रयत्नशील राहिले पाहिजे.

FAQ

ब्युरो ते ब्युरो क्रेडिट स्कोर बदलू शकतो का?

हो मित्रांनो. कर्जासाठी अर्ज करताना बँका आणि NBFC कडून प्राप्त होणारा डेटा बहुतेक सारखाच असतो. पण सर्व बँका एकाच वेळी डेटा अपडेट करत नाहीत. शिवाय प्रत्येक ब्युरो स्वतःच्या मालकीचे स्कोरिंग मॉडेल फॉलो करते. त्यामुळे प्रत्येक क्रेडिट ब्युरो मध्ये तुमचा क्रेडिट स्कोर वेगवेगळा दिसू शकतो.

One Score अँप सुरक्षित आहे का?

हो मित्रांनो, One Score अँप पूर्णपणे सुरक्षित आहे. दिलेल्या माहितीचे रक्षण करणे हे अँप च्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. तसेच हे अँप बँक लेव्हल सेक्युरिटी सिस्टीम वापरतो आणि ग्राहकांचा डेटा कोणत्याही थर्ड पार्टी सोबत शेअर करत नाही. आणि ते ISO/IEC प्रमाणित आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही.

OneScore अँप खरचं विनामूल्य आहे का?

हो मित्रांनो. OneScore अँप हे खरंच विनामूल्य आहे. यात कोणताही ट्रायल पिरेड नसतो, ऍड नसते किंवा कोणत्याही प्रकारचा स्पॅम कॉल किंवा ई-मेल नाही. फक्त जर भविष्यात अँप ची स्वतःची अशी काही फायनान्शियल प्रॉडक्ट्स लाँच होऊ शकतात ज्यांची थोडीफार फी असू किंवा नसू शकते. परंतु, क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट रिपोर्ट बघणे हे पूर्णपणे विनामूल्य राहील.

OneScore वरून क्रेडिट स्कोर चेक केल्यास आपल्या क्रेडिट वर परिणाम होईल का?

मित्रांनो, तुमचा क्रेडिट स्कोर जर तुम्ही OneScore अँप च्या प्लॅटफॉर्म वर वैयक्तिकरित्या चेक केल्यास तुमच्या क्रेडीट वर त्याचा परिणाम होत नाही.

एक्सपेरियन (Experian) किंवा सिबिल (CIBIL) दोघांपैकी कोणते चांगले आहे?

मित्रांनो, CIBIL आणि Experian दोघांच्या ही काही चांगल्या गोष्टी आहेत. पण भारतात, CIBIL बिझनेस क्रेडिट स्कोर Experian पेक्षा वरचढ आहे. याचे कारण म्हणजे जवळपास 90% भारतीय बँका आणि वित्तीय संस्था या CIBIL शी जोडल्या गेल्या आहेत.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण वन स्कोर (One Score) अँप वरून क्रेडिट स्कोर (Credit Score) चेक कसा करायचा या बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!